17/03/2019
दुसऱ्या अहमदनगर आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात ९० पेक्षा अधिक देशांचा सहभाग
गाठ (भारत) आणि लाईक अ गुड किड (ईराण ) हे लघुपट प्रथम
लघुपट व माहितीपट हे समाजात घडणाऱ्या घटनेंचे प्रतिबिंब आहे त्यामुळे जगात काय घडत आहे ते समजते असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजग राहुल जाधव यांनी केले तसेच स्थानिक पातळीपासून ते जागतिक पातळीपर्यंत सर्व विषयांना स्पर्श करण्याची ताकद बाळगणारे लघुपट हे एक प्रभावी माध्यम आहे. एखादा विषय कमीतकमी वेळात प्रेक्षकांसमोर मांडण्याचे कसब ह्या लघुपटातून करता येते असे वक्तव्यं पुरस्कार विजेते दिग्दर्शक महेश काळे दुसऱ्या अहमदनगर आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाच्या समारोपप्रसंगी बोलत होते. यावेळी फेस्टिवलचे परीक्षक देवेंद्र जाधव, विजयालक्ष्मी जाधव, संयोजक योगेश शर्मा, महेंद्र शर्मा, तसेच परेश वाघ,सुहास म्हस्के, आकाश शिंदे गणेश रायकर यांच्यासह अनेक फिल्ममेकर उपस्थित होते.
या प्रसंगी मा. प्रकाश धोत्रे (प्रसिद्ध अभिनेते),शशिकांत नजाण (अ.भा.म.चि.म -नगर विभाग) व शाम शिंदे (नाट्यकर्मी) यांचा प्राइड ऑफ नगर हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले
अष्टविनायक मोशन फिल्म्स व प्रयोग कलाकृती आयोजित या महोत्सवात एकूण ६५० पेक्षा जास्त व ९० पेक्षा जास्त देशांनी सहभाग नोंदविला होता. त्यातील १७० लघुपटांची व माहितीपटांची निवड झाली.
स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे - प्रथम - गाठ, व्दितीय - पुलंजी , तृतीय - कावल दैवाम व सावळी विभागून, नगर जिल्ह्यातील शॉर्ट फिल्म - इस्तू व विराट १८ विभागून, स्पेशल ज्युरी अवॉर्ड - प्रॉन्स व तरंग, बेस्ट डायरेक्टर - बिट्टू कुमार (शमशान ), माहितीपट प्रथम - सीक अमोर (अमेरिका), व्दितीय - बेल इले अन मेर (कॅनडा), व अल्फाओ (पोर्तुगाल) विभागून, स्पेशल ज्युरी अवॉर्ड - लिविंग व द इज (भारत), इम्मीग्रॅण्ट टू हेवन (इजिप्त), बेस्ट डायरेक्टर - धनंजय खैरनार (फड) भारत, आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म - प्रथम - लाईक अ गुड किड (ईराण ), व्दितीय - द पोस्टमन (सिंगापूर), तृतीय - गुड बाय माय सन (जपान), स्पेशल ज्युरी अवॉर्ड - सेकंड क्लास (स्वीडन), बेस्ट डायरेक्टर - मिचेल ग्रूस्के (जर्मनी )