15/04/2020
कोरोना ची माहिती पुरवणाऱ्या पत्रकारांची ही दखल घेणे गरजेचे.....
पत्रकारांला जात,धर्म,नातेवाईक,परिवार नसतोच तो फक्त देश हितासाठी माणूस म्हणून जगत असतो..इतरांनावर होणारा अन्याय शासन दरबारी प्रमाणित पणे मांडत असतो त्यात पत्रकारांनावर होणारे आघात तो चिमुटपणे सहन करत समाजाची अविरतपणे सेवा करत असतो..कायम तो माणूस म्हणून जगात असतो..
आज कोरोना या महामारीने जगात थैमान घातले आहे. कित्येक लोकांचा यामुळे जीव गेला आणि कित्येकांना लागण झालेली आहे. त्याचबरोबर दिवसेंदिवस कोरोना बधितांचा आकडा हा वाढत चालला आहे, त्यामुळे जगभरात सर्वत्र भीतीचे वातावरण पसरलेले आहे... मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र बंद ची घोषणा केली आणि मोदींनी lockdown ची घोषणा केली आणि सर्वांना घरातच रहा व सुरक्षित राहण्याचा संदेश दिला गेला परंतु या अश्या वातावरणात देखील डॉक्टर्स, पोलिस आणि पत्रकार हे काम करत आहेत...
डॉक्टरांची भूमिका तर देवाप्रमाणेच नक्कीच आहे, ते दिवसरात्र पेशंटची सेवा करत आहेत, त्याचबरोबर पोलिस ही जनतेला वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत....
याचे सर्वत्र कौतुक होताना दिसते परंतु पत्रकारही घरबसल्या सर्वांना माहिती मिळावी यासाठी काम करत आहेत, परंतु पत्रकाराचे कुठुन कौतुक झालेलं मला दिसलं नाही...
आत्ताच काही दिवसांपूर्वीची घटना माझा एक पत्रकार मित्र बातमी करून वापस येत असताना पोलिसांनी त्याला अडवले मित्राने त्याचे ओळखपत्र दाखवले परंतु त्याचा कसलाही विचार न करता पोलिसांनी त्याला मारहाण केली हे चुकीचं आहे...पत्रकारही जनतेच्या हिताचे काम करतो....
पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे पत्रकारांना विचार स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. समृद्ध लोकशाहीसाठी सरकारच्या कामाची, राजकीय सामाजिक नेत्यांच्या भूमिकांची समीक्षा करणाऱ्या पत्रकारांची देशाला गरज आहे. त्यामुळे पत्रकारांवर होणारे हल्ले हे लोकशाही वरील हल्ले ठरतात ...
एखाद्या पत्रकारावर हल्ला झाला आणि समाजाने समोर येऊन निषेध केला किंवा घाबरू नको आम्ही तुझ्या पाठीशी आहोत असा आश्वासक शब्द दिला अस अलीकडे कधी घडलेलं नाही. यात गंमत अशी आहे की, केवळ समाजच नाही तर पत्रकार ज्या वर्तमानपत्रासाठी काम करत असतो तो वर्तमानपत्रही अंगावरची पाल झटकल्यासारखे अश्या प्रसंगी पत्रकाराला बाजूला करतात...
अहो तोही मेहनत घेतोच की, जनतेसाठी तो ही स्त्यावर उतरलाच की हो, त्याने ही त्याचा जीव जनतेच्या भल्यासाठी धोक्यात घातलाच की , त्यांच्यामुळेच तर सर्व अपडेट्स आपल्याला घरबसल्या मिळत आहेत...ह्यांनाही फॅमिली आहे ना तरीही ते तुम्हाला घर बसल्या सर्व आकडेवारी देतात लागण झालेल्यांची, मृतांची, बरे झालेल्यांची सर्व आकडेवारी ची संपूर्ण माहिती देतात त्यामुळे मला अस वाटत सर्व पत्रकार बांधवांच ही कौतुक झालंच पाहिजे....👍👍हे सर्व जण तुमच्या भल्यासाठी रस्त्यावर उतरलेत तुम्ही फक्त त्यांना सहकार्य करा....घरातच रहा, support करा आणि काळजी घ्या.....
©भरत कोल्हे
मो. 9960790691