25/11/2020
यशवंतराव चव्हाण म्हणजे आधुनिक महाराष्ट्राचे शिकपकर, जेव्हा आपण आधुनिक महाराष्ट्र म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ किंवा इशारा महाराष्र्टा सारख्या पुरोगामी राज्याच्या बसलेल्या घडी कडे जातो. महाराष्ट्राची बसलेली घडी म्हणजे ‘सहकाराची घडी’, म्हणजे महाराष्ट्रच्या ‘महामंडळाची घडी’ , महाराष्ट्राच्या सहकारी साखर कारखान्यांची आणि सहकारी बँकांची घडी, महाराष्ट्राची घडी म्हणजे यशवंतरावांनी देश हित लक्षात घेऊन घेतलेले निर्णय, जे सगळे निर्णय नंतर देशाने स्वीकारले आणि त्याच घडीवर आजवर देश चालत आला आहे.
आज जरी ती घडी मोडण्याच काम सुरु असेल, सहकार मोडण्याचा डाव रचला जात असतील, तर ते मोडणाऱ्यांनी हे लक्षात घ्यायला हवं कि ही घडी महाराष्ट्राच्या एका उत्तुंग विचाराच्या नेत्याने बसवलेली घडी आहे. आणि ही महाराष्ट्र सहजा सहजी मोडू देणार नाही.
स्वर्गीय यशवंतरावं चव्हाण, ह्यांना SeeSaw चं अभिवादन