13/03/2020
_*🦠 कोरोना व्हायरस: गुगलचे भारतातील कार्यालय बंद*_
_*Tikzik | Update*_
▪कोरोना व्हायरसने जगभरातील अनेक देशांमध्ये थैमान घातले आहे. कोरोनाचे ७० पेक्षा जास्त रुग्ण भारतातही आढळून आले आहेत. त्यामुळे अनेक राज्यांनी शाळा महाविद्यालयासह थिएटरही बंद ठेवली आहे. पण आता बहुराष्ट्रीय कंपन्यांनाही कोरोनाचा फटका बसायला लागला आहे. कोरोनाची बंगळुरुमधील गुगल कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला लागण झाल्यानंतर कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे.
▪आमच्या बंगळुरु कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. हा कर्मचारी कोरोनाची लक्षण दिसण्याआधी काही तास कार्यालयामध्ये होता. त्याला आता अलिप्त ठेवण्यात आल्याची माहिती गुगलने दिली. आम्ही कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या प्रसारामुळे घरूनच काम (वर्क फ्रॉम होम) करण्याचे सांगितले आहे. आरोग्य विभागाच्या आदेशानुसार आम्ही योग्य ती काळजी घेत राहू, असेही गुगलने स्पष्ट केले आहे.
-----------------
_*📍दिल्लीतील सर्व शाळा-महाविद्यालये आणि चित्रपटगृहे ३१ मार्चपर्यंत बंद*_
_*Tikzik | Update*_
▪कोरोनाला ‘जागतिक महामारी’असे जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केल्यानंतर दिल्लीमधील केजरीवाल सरकारने कोरोनाला महामारी घोषित केले आहे. ३१ मार्चपर्यंत चित्रपटगृहे आणि सर्व शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
▪उपराज्यपाल अनिल बैजल यांनी आरोग्य विभागाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन, राज्याचे मुख्य सचिव विजय देव या बैठकीत उपस्थित होते. या बैठकीत कोरोना आजाराला महामारी घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
▪सरकारने कोरोनाचा संसर्ग वाढण्याच्या भीतीने सर्व शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी फक्त ५ वी पर्यंच्या विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली होती. आता सर्वच शाळा महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. राज्य सरकारने कोरोनाचा सामना करण्यासाठी २५ रुग्णालय सज्ज ठेवली आहेत.
-----------
_*🦠कोरोनाचा कर्नाटकात पहिला बळी, देशातील एकूण रुग्णांची संख्या ७७ वर*_
_*Tikzik | Update*_
▪बुधवारी कर्नाटकातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून कोरोनाची लागण या व्यक्तीला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. आज या व्यक्तीच्या रक्ताच्या नमुन्यांचा अहवाल समोर आला असून त्याला कोरोनाची लागण झाली होती, असे यामध्ये निष्पन्न झाले आहे.
▪कोरोना व्हायरसचे केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये नवे रुग्ण आढळून आल्यामुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या ७७वर पोहोचली आहे. कोरोनाचे तीन नवे रुग्ण केरळच्या तिरुवअनंतपूरम, थ्रिस्सूर आणि कन्नूर जिल्ह्यांमध्ये आढळले आहेत. त्यामुळे १७ वर राज्यातील एकूण रुग्णांची संख्या पोहोचली आहे. यामधील दोघे दुबई आणि कतारमधून परतले होते.
▪त्याचबरोबर कोरोनाचे आणखी तीन रुग्ण महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे आणि पुण्यामध्येही आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १४ वर पोहोचली आहे. यामधील पुण्यामधील रुग्ण हा अमेरिकेतून आला होता, तर ठाण्यातील रुग्ण हा फ्रान्सवरून आल्याची माहिती मिळत आहे.
▪तसेच, कोरोनाचा २६ वर्षीय रुग्ण कर्नाटकमध्ये आढळून आल्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या पाचवर पोहोचली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने हा रुग्ण ग्रीसवरून परतल्याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर विशेष कक्षामध्ये या रुग्णाला ठेवले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
▪सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा रुग्ण मुंबईचा रहिवासी असून तो सहा मार्चला ग्रीसवरून मुंबईत आला होता. त्यानंतर तो आठ मार्चला विमानाने बंगळुरूला आला आणि नऊ मार्चला त्याने आपल्या ऑफिसमध्येही हजेरी लावली होती. यावेळी त्याने आपल्या चार जवळच्या मित्रांची भेट घेतली होती. त्यानंतर त्याच दिवशी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा भाऊ बंगळुरूमध्ये राहत असून, त्याचे आई-वडील आणि पत्नी मुंबईमध्ये राहतात. त्याच्या कुटुंबीयांबाबत तसेच बंगळुरूमध्ये त्याने फिरण्यासाठी जी रिक्षा वापरली. रिक्षाचालकाबाबत माहिती काढण्यात आली असून, त्यांनाही निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
_*⚡ टिकझिक न्युज | जॉब्स | माहिती | मनोरंजन Facebook आणि WhatsApp वर अगदी मोफत 🥏 जॉईन करण्यासाठी क्लिक करा : 👉*_ https://bit.ly/2nNtgiY
_*📱जाहिरातीसाठी संपर्क : 8983898362*_
News | Jobs | Info | Entertainment on absolutely free