शब्दामृत - प्रकाशन । पर्यटन । निर्मिती

  • Home
  • शब्दामृत - प्रकाशन । पर्यटन । निर्मिती

शब्दामृत - प्रकाशन । पर्यटन । निर्मिती शब्दामृत - प्रकाशन । पर्यटन । निर्मिती

https://youtu.be/VkQMGjXD7no?si=xBT5Ji438iCQcly2शब्दामृत सोबत अविस्मरणीय अंदमान यात्रेचे अनुभव ऐकण्यासाठी हा व्हिडिओ नक्...
05/05/2024

https://youtu.be/VkQMGjXD7no?si=xBT5Ji438iCQcly2

शब्दामृत सोबत अविस्मरणीय अंदमान यात्रेचे अनुभव ऐकण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. चॅनेल सबस्क्राईब करा.

21/03/2024

२२ तारखेपासून येतोय सावरकर सिनेमा, सगळ्यांनी सहकुटुंब बघा, म्हणा, मी सावरकरगोत्री !

09/03/2024

आठवणी सावरकरांच्या - भाग ४

शब्दामृतच्या कार्यक्रमाला आल्याबद्दल सुनील देवधर यांचे मनस्वी आभार !
07/03/2024

शब्दामृतच्या कार्यक्रमाला आल्याबद्दल सुनील देवधर यांचे मनस्वी आभार !

02/03/2024

देशासाठी लढून सावरकरांना काय मिळालं ?? खूप खूप महत्वाची ही सावरकरांची आठवण…आपल्या सिरीजचा तिसरा भाग ! कसा वाटला कळवा नक्की, शेअर करा !

26/02/2024

#आठवणीसावरकरांच्या #नक्कीबघा #महत्त्वाचे !
सावरकरांच्या आठवणींचा दुसरा भाग आज त्यांच्या आत्मर्पण दिवसाच्या निमित्ताने सदर करत आहोत ! जास्तीत जास्त शेअर करा, आजचा दिवस सावरकरमय होऊद्या !!

25/02/2024

#नक्कीबघा #शेअरकरा
२६ फेब्रू - दुपारी १.३० आणि रात्री १० वाजता

20/02/2024

#महत्त्वाचे
आठवणी सावरकरांच्या !
ही नवी सिरीज घेऊन आपल्यासमोर येत आहेत, लेखक, इतिहास अभ्यासक आणि शब्दामृत चे संचालक श्री. पार्थ बावस्कर. आपण नक्की ऐका, सर्व सावरकरप्रेमींपर्यंत शेअर अवश्य करा.
#सावरकर

06/08/2023

अंदमान बोलावतंय नव्या हंगामाच्या तारखा जाहीर करत आहोत. अधिक माहितीसाठी संपर्क करा - ९९७००७७२५५
खालील मेसेज संपूर्ण वाचा -

*अंदमान बोलावतंय !*
*महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत असलेली अंदमान यात्रा, नव्या हंगामाची नोंदणी सुरू करत आहोत.*

*आपल्या सर्वांचे आराध्य दैवत स्वा. सावरकर यांची अंदमनातून मुक्तता होऊन १०१ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने सावरकरांना अभिवादन करण्यासाठी शब्दामृत प्रकाशनातर्फे ही विशेष सहल आयोजित करण्यात येत आहे संपूर्ण प्रवासात सावरकर विचारांचा जागर करण्यासाठी प्रसिद्ध व्याख्याते, लेखक, इतिहास अभ्यासक पार्थ बावस्कर हे सोबत असतील. या सहलींचे आणखी एक आकर्षण म्हणजे झी मराठी सारेगमप मधील आपल्या सर्वांची लाडकी गायिका मुग्धा वैशंपायन. या सहलीदारम्यान दररोज स्वा. सावरकर रचित गीते आपल्या सर्वांसमोर मुग्धा वैशंपायन आपल्या गोड स्वरातून सादर करणार आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे मुख्य तपशील व काही वैशिष्ट्ये सोबत देत आहोत.*

*१. स्वा. सावरकरांना अभिवादन करण्यासाठी वंदे मातरम्, जयोस्तुते, आणि ने मजसी ने या गाण्यांचे गायन व सावरकरांची मुक्तता होऊन १०१ वर्ष झाली या निमित्ताने १०१ ज्योती प्रज्वलित करण्याचा विशेष कार्यक्रम आयोजित केला जाईल.*

*२. या कार्यक्रमादरम्यान व्याख्याते पार्थ बावस्कर हे सेल्युलर कारागृहात व्याख्यान देतील. प्रसिद्ध गायिक मुग्धा वैशंपायन यावेळी सावरकरांची गीते गातील. या अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार होण्याची ही सुवर्णसंधी.*

*३. अंदमान प्रवासात संपूर्णपणे ३ स्टार उत्तम दर्जाच्या हॉटेलमध्ये निवास व्यवस्था असेल. ट्विन शेअरिंग तत्वावर रूम्स असतील.*

*४. दररोज एकवेळ नाश्ता, एकवेळ चहा, आणि दोनदा उत्तम दर्जाचे शुद्ध शाकाहारी जेवण ( दोन्ही वेळीं गोड पदार्थ ) अशी परिपूर्ण व्यवस्था या प्रवासात असेल.*

*५.अंदमानात स्थळदर्शन करतांना प्रत्येक वेळी एसी बस / टेम्पो ट्रॅव्हलर गाडीचा प्रवास असेल.*

*६. या विशेष सहलीत मुख्य आकर्षण म्हणजे अंदमानातील प्राणी आणि पक्षी यांच्याशी संवाद साधणार्या, त्यांच्याशी बोलणाऱ्या श्रीमती अनुराधा राव यांच्या तोंडून सावरकरांचे आजवर कधीही न ऐकलेले अनुभव ऐकता येतील.*

*७. सहभागी प्रत्येकाला सावरकरांनी त्यांच्या काळ्या पाण्याच्या शिक्षेसोबत गळ्यात अडकवलेला बिल्ला अभिमानाने धारण करायचा आहे,आमच्यातर्फे सहभागी प्रत्येकाला हा ऐतिहासिक आणि दुर्मिळ बिल्ला भेट देण्यात येईल. या बिल्याचे महत्व अनन्यसाधारण आहे.*

*८. सहलीत दररोज व्याख्याते,लेखक पार्थ बावस्कर हे सावरकरांच्या जीवनावरील विविध पैलू उलगडणारे व्याख्यान सादर करतील. दररोज एक तास हे व्याख्यान होईल. मुग्धा वैशंपायन विविध राष्ट्रभक्तीपर गीते गातील.*

*९. सहलीदरम्यान पार्थ बावस्कर यांच्या संकल्पनेतून साकारलेला "हे मातृभूमी तुजला" हा कार्यक्रम मुग्धा वैशंपायन आणि पार्थ बावस्कर सादर करतील.*

*१०. पोर्टब्लेअर शहर, नेताजी सुभाष -पूर्वीचे रॉस बेट, शहीद बेत - नील बेट,स्वराज्य बेट - हॅवलॉक बेट या विविध स्थळांना भेटी देण्यात येतील. शहीद व स्वराज्य बेटांवर प्रत्येकी एक रात्र मुक्काम असेल, येथील समुद्रकिनारे जगभर प्रसिद्ध आहेत, आशिया खंडातील क्रमांक २ वर असणाऱ्या राधानगरी बीचवर भरपूर वेळ घालवता येईल.*

*११. लाईमस्टोन लेणी या खाऱ्या पाण्यापासून बनलेल्या गुफा आणि सोबतच जारव्हा नावाचे दुर्मिळ आदिवासी प्रजाती हे दोन्ही बघण्याची सुवर्णसंधी या सहलीत आम्ही उपलब्ध करून देत आहोत. सोबत मॅनगृव्ह फॉरेस्टला भेट देण्यात येईल.*

*१२. संपूर्ण दिवसभरात सावरकरांनी जो त्याग केला, जे कष्ट भोगले त्याची माहीत नसलेली कहाणी ऐकत ऐकत अंदमानातील सर्वोत्तम आणि जगप्रसिद्ध स्थळांना भेटी देण्यासाठी विशेष आयोजन म्हणजे "अंदमान बोलावंतय" ही विशेष सहल.*

*१३. या प्रवासादरम्यान ६ तासांचा अविस्मरणीय जहाज प्रवास करायचा आहे तोही काळ्या पाण्याच्या समुद्रातून. हा प्रवास तीन टप्यात असेल.*
*पोर्ट ब्लेअर ते स्वराज्य द्वीप*
*स्वराज्य ते शहीद द्वीप*
*शहीद ते पोर्ट ब्लेअर*

*१४. दिनांक 20 ते 26 नोव्हेंबर 2023*
*दिनांक 22 ते 28 जानेवारी 2024*
*या यंदाच्या तारखा आहेत. पोर्ट ब्लेअर येथे दुपारी १ पर्यंत पोहोचेल असे विमान आपण बुक करायचे आहे.*

*१५. सावरकरांच्या मुक्ततेनिमित्त त्यांना वंदन करण्यासाठी ही सहल आहे, त्यामुळे निवडक सावरकरप्रेमीना सहभागी करून घेण्यात येईल. यात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाची विशेष काळजी घेतली जाईल.*

*१६. एकूण मूल्य आहे ३९,५००/- ( incl GST ) ज्यात अंदमान ते अंदमान असा संपूर्ण प्रवास, निवास, जेवण, स्मारकाची तिकिटे, जहाज प्रवास यांचा समावेश आहे. मुंबई किंवा पुणे येथून अंदमान पर्यंत विमानाची तिकिटे आपण काढायची आहेत.*
*प्रत्येकी रुपये १०,०००/- विनापरतावा भरून आपण आपली जागा नक्की करू शकता.*

*१७. अंदमानातील बहुतांश स्थळे दाखवणारी तसेच व्याख्याते,लेखक पार्थ बावस्कर यांची व्याख्याने आणि मुग्धा वैशंपायन यांची गीतमैफल आयोजित करणारी ही एकमेव यात्रा आहे.*

*१८. या यात्रेतील सर्वात महत्वाचा क्षण म्हणजे सेल्युलर कारागृहात जाऊन सावरकरांना अभिवादन करणे. यासाठी आपण बराच वेळ राखून ठेवला आहे. यावेळी आपल्याला तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल.*

*१९. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमानात सर्वप्रथम भारताचा तिरंगा फडकवला. त्या स्थानावर आज एक अतिभव्य भारताचा तिरंगा उभारण्यात आला आहे. या यात्रेत आपण सायंकाळी तिरंगा स्थानाला भेट देऊन अभिमानाने त्याची कहाणी पार्थ बावस्कर यांच्याकडून ऐकून घेणार आहोत. या ठिकाणी मुग्धा वैशंपायन यांच्या सुमधुर स्वरात आपण राष्ट्रगीत आणि वंदे मातरम मोठ्या अभिमानाने गणार आहोत.*

*२०. अंदमानातील ख्यातनाम आणि जगविख्यात असलेला लेझर शो पाहून कार्यक्रमाची सांगता होईल.*
*मित्रहो,*
*ज्या सावरकरांनी अंदमानात ५० वर्ष शिक्षा भोगण्याच्या इराद्याने पाऊल ठेवले, हाल सोसले त्यांना वंदन करण्यासाठी एकदा तरी अंदमानला जायलाच हवे. आतापर्यंत सुमारे दीड हजार लोकांना आम्ही यशस्वी अंदमान सहल घडवली आहे. आपणही हा अनुभव घ्या. आपल्या प्रत्येकाचे ते कर्तव्य आहे.आपण आपल्या परिचितांना या सहलीत सामील करा, तरुणांपर्यंत हा सावरकर विचार नेण्यासाठी ही माहिती आपल्या परिचितांना नक्की शेअर करा, चला, अंदमान बोलावंतय !*

आपले
*शब्दामृत प्रकाशन*
*बुकिंगसाठी सम्पर्क - ९९७००७७२५५*

आज शरद पोंक्षे लंडनला निघालेत…अनेकांचा समज होईल की नाटकाचा दौरा किंवा असेल एखाद्या सिनेमाचं शुटींग ! नाही ! हे निमित्त फ...
22/06/2023

आज शरद पोंक्षे लंडनला निघालेत…अनेकांचा समज होईल की नाटकाचा दौरा किंवा असेल एखाद्या सिनेमाचं शुटींग !
नाही ! हे निमित्त फार वेगळं आणि महत्वाचं आहे, शरदजी इंग्लंडला निघालेत २० दिवसांसाठी आणि हा दौरा, नाटक, सिनेमा, शूटिंगचा नाही तर आहे फक्त आणि फक्त सावरकर विचारांचा !
या काळात सलग १५ व्याख्यानं लंडनच्या विविध शहरातून शरद पोंक्षे देणार आहेत. महाराष्ट्रातून इतक्या मोठ्या प्रमाणात अशी सलग सावरकरांवर व्याख्यान देण्यासाठी जाणारे शरद पोंक्षे हे पहिले वक्ते, अभिनेते आणि लेखक ! यापूर्वी असा झंझावाती दौरा कुणी अनुभवला नसेल बहुदा.
ज्या ब्रिटीश साम्राज्याविरोधात सावरकर पाय रोवून उभे राहिले, त्याच इंग्रजांच्या देशात सावरकर असे कानाकोपऱ्यापर्यंत पोहोंचवले जात आहेत, आणि तेही एका बेधडक व्यक्तीकडून ही गोष्टच तुम्हा- आम्हाला अभिमान वाटवा अशी आहे.
मँचेस्टर, एडनबर्ग, न्यूकॉस्टल, लीड्स, बर्मिंगहॅम, अशा ११ शहरांमध्ये ही सावरकर व्याख्याने शरदजी देणार आहेत. त्यांच्या आधीच त्यांनी लिहिलेली पुस्तकं लंडनला पोहोंचली आहेत. जिथे लेखक बोलतो तिथे पुस्तक मिळायला हवं ना त्याचं ! अशी ही दुहेरी मेजवानी !
आतापर्यंत अंदमान बोलावतंय या आमच्या उपक्रमातून आम्ही दोघे सलग १५ वाऱ्या अंदमानच्या केल्या, पुढेही करणार आहोत, पण आज शरदजी सातासमुद्रपार ब्रिटिशांच्या देशात सावरकर सांगायला जाताहेत ही खूप खूप अभिमान आणि आनंद देणारी गोष्ट !

शरदजी,
इंग्लंड बोलावतंय !

दिग्विजय करून या !

प्रवासासाठी खूप शुभेच्छा !

- पार्थ बावस्कर

असा होता का ‘आमचा आदीपुरुष’ ? आदिपुरुषच्या संवादांवर जवळपास सगळेच जण निराशाजनक प्रतिक्रिया देताहेत. काल चित्रपट बघितला. ...
18/06/2023

असा होता का ‘आमचा आदीपुरुष’ ?

आदिपुरुषच्या संवादांवर जवळपास सगळेच जण निराशाजनक प्रतिक्रिया देताहेत. काल चित्रपट बघितला.
एकदा तर रावणाने ‘कामधंदा’ अशा टपोरी शब्द वापरलाय.
बुआ का बगीचा, कपडा तेरे बाप का, लंका लगा देंगे, डोली बारात, फिसद्द, असे बरेच शब्द आणि वाक्य आहेत चित्रपटात.

या सगळ्याला म्हणून ‘आजच्या तरुणांना आवडायला हवं म्हणून अशी भाषा, असे संवाद, असे सीन्स’ अशी मखलाशी केली जातेय.’ क्रिति सेनेन ने तशी पोस्टही केलीये. याबद्दल मला मुळात आक्षेप आहे.

एक मुद्दा लक्षात घेतोय का आपण ? तरुणांची भाषा, तरुणांची भाषा म्हणजे तरी काय ? आपल्या संस्कृती मधील आदर्श म्हणून रामायण पहायचं ना ? मग हे असे सुमार भाषिक दर्जाचे कसे आदर्श ठेवायचे तरुणांपुढे ? उलट उत्तम भाषेतूनही रंजन होऊ शकतेच. त्याचे अनेक दाखले देत येतील.

आजची तरुण मुलं विज्ञानाच्या दृष्टीने प्रत्येक प्रश्न विचारतात. त्यांच्यासाठी करायचा होता सिनेमा तर मग नसते दाखवायचे फुकाचे चमत्कार. वाल्मिकी रामायणात चमत्काराला वाव नाही फारसा.

१. लक्ष्मणाने रेखा मारली, आणि ती ओलांडली म्हणून सीतेचे हरण झाले, असा उल्लेख वाल्मिकी रामायणात कुठेही नाही. चमत्कार दाखवून मुलांना रामायण आवडणार आहे का ?

२. सेतू बांधतांना राम लिहिलं आणि दगड पाण्यावर तरंगला असा उल्लेख मूळ रामायणात कुठेही नाही. तरुणाई सतत याबद्दल विचारत असते. कसा तरंगला हो दगड ? तरुणांना आवडायला म्हणून जर सिनेमा बनवला तर मग मूळ रामायणात जे आहे ते आणि तसंच दाखवलं असतं तर विज्ञानाच्या कसोटीवर रामायण आहे. त्यात चमत्कार फारसे नाहीत, पाच दिवस दगड, झाडे, वेली, यांच्या सहाय्याने सेतुबंधन कैसे झाले याचे उत्तम चित्रण करता नसते का आले ?

३. बाकी काहीही असूदेत, एक बाब अजिबात समजली नाहीये,
लक्ष्मण मुर्छीत पडतो, तेंव्हा त्याला संजीवनी बुटी वाचवू शकेल हे सांगणारी एक बाई सिनेमात दाखवलीये. बहुदा ती बिभीषणाची पत्नी असावी असा अंदाज. सिनेमॅटिक लिबर्टी वगैरे ठीक, पण वैद्यराज सुशेळ यांचा रामायणात उल्लेख असतांना अशी एखादी माया आणि तिने केलेला अजब प्रयोग दाखवून काय साध्य केलं ?
सुशेळ वैद्यराज आणि रामाचा मूळ संवाद वाल्मिकी रामायणात आहे. रुग्णाला बरं करणारा एखादा खारखुरा वैद्यराज दाखवणं शहाणपणाचं की हे असले मायावी प्रकार ?

४. अशोक वनात असलेली चेरी ब्लॉसम ची झाडे, शिवाय त्यात घेतलेले राक्षस, पक्षी हे मुळात भारतीय वाटत नाहीत. ते भयंकर वाटायला हवेत अशी मखलाशी आहे यालाही पण मुळात तेंव्हाच्या भारतवर्षात किमान आपल्याकडच्या लोकांशी ताळमेळ साधणाऱ्या जमाती दाखवायला हव्या ना ! एलियन तद्रूप राक्षस दाखवून साध्य काय केले ?

५. राम रावणाचे युद्ध तीन-साडेतीन महिने सुरू होतं. त्यात ८० दिवस रावण रथारूढ होता आणि राम पदाती. म्हणजे ते युद्ध विषम युद्ध होतं. रावण रथावर बसून लढतोय, आणि राम मात्र एकटा जमिनीवरून. अशी गोष्ट दाखवली असती तरी रंजकता वाढली असतीच ना. पण विक्राळ स्वरुपात हा- हू आवाज काढत लढणारा रावण बघून युद्ध ही संकल्पना पार बेचिराख केल्याचं जाणवतं.

मी मध्यंतरापर्यंत मी सिनेमा नीट बघू शकलो, त्यातून हे प्रमुख मुद्दे जाणवले. मध्यंतरानंतर सिनेमात फार संवाद नाहीत, पूर्ण अंधार आहे. उजेड नाही. नुसती मारामारी, चित्रविचित्र स्टंट्स ! मुलांना आवडेल म्हणून अशी हुल्लडबाजी दाखवायची असेल तर मस्त कार्टून सीरीज काढा, पण आमचा ‘आदिपुरुष’ मात्र असा दाखवू नका रे !

अवघड आहे.
आम्ही राम कुठे वाईट दाखवला, त्याच्या तोंडी कुठेत भलतेसलते संवाद ? असं म्हणून वेळ निभावून नेली जातेय, पण मुद्दा रामाचा नाही, रामायणाचा आहे. रामायण या कथेने एक आदर्श घाकून दिलाय त्याचय. ती कथा एक आदर्श कथा आहे.
मूळ कथाच जर अशी नासवून समोर आणणे म्हणजे आपल्या आर्ष महाकव्याला, आदर्श संस्कृतीला आपण धक्का लावतोय.
ते व्हायला नको.
रावण खलनायक होताच, आहेच. पण त्याचं खलनायकपण उजळ करतांना तुम्ही रामकथा नासवली हे वाईट.
म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकवतो ना !

तुम्हाला चित्रपट बघून काय वाटलं ? कळवा, व्यक्त व्हा !

इतिश्री !

— पार्थ बावस्कर ( इतिहास अभ्यासक )






02/06/2023

अंदमान बोलावतंय या यात्रेत मी आणि पार्थ बावस्कर दररोज सावरकर आणि हिंदुत्व समजावून सांगतोय. ५५ तरुण मुलं-मुली सोबत आहेत. त्यांच्यात जे रुजवलं त्याचे परिणाम दिसू लागलेत.
मुलांनी आता पूर्णपणे हलाल वर बहिष्कार टाकायचं ठरवलंय. अंदमान युवा यात्रेचे फलित ! जास्तीत जास्त शेअर करा.
- शरद पोंक्षे

28/05/2023

ही कहाणी एका अग्नीपुरुषाची…
ही कहाणी एका कुसुमकोमल कवीची !
ही कहाणी एका राजकारण धुरंधराची…
ही कहाणी हिंदुत्वाच्या आधुनिक हुंकाराची…
ही कहाणी आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांची ! पहिल्यांदाच दूरदर्शनवर येतोय सावरकरांच्या सर्वांगीण जीवनाचा आणि विचारांचा वेध घेणारा माहितीपट…
सहस्रसूर्य सावरकर !
लेखन संशोधन - पार्थ बावस्कर
निर्मिती - शुभांगी सावंत
रविवार दिनांक २८ मे सायंकाळी ५ आणि रात्री १० वाजता, दूरदर्शनच्या संहयाद्री वाहिनीवर

शब्दामृत प्रकाशनाच्या अंदमान बोलवतंय या उपक्रमात सहभागी झालेल्या Sweet Blend By VS यांनी हा देखणा आणि अर्थपूर्ण केक तयार...
20/05/2023

शब्दामृत प्रकाशनाच्या अंदमान बोलवतंय या उपक्रमात सहभागी झालेल्या Sweet Blend By VS यांनी हा देखणा आणि अर्थपूर्ण केक तयार केला !
अंदमानच्या आठवणी मनात सतत रुंजी घालतात म्हणून ही आणखी एक साठवण !

शब्दामृत प्रकाशनाच्या अंदमान बोलवतंय या उपक्रमात सहभागी झालेल्या Sweet Blend By VS यांनी हा देखणा आणि अर्थपूर्ण केक तयार...
20/05/2023

शब्दामृत प्रकाशनाच्या अंदमान बोलवतंय या उपक्रमात सहभागी झालेल्या Sweet Blend By VS यांनी हा देखणा आणि अर्थपूर्ण केक तयार केला !
अंदमानच्या आठवणी मनात सतत रुंजी घालतात म्हणून ही आणखी एक साठवण !

17/05/2023

सावरकरांच्या ने मजसी ने कवितेचा अनुवाद आणि निरूपण हिंदीत ऐका, सांगताहेत पार्थ बावस्कर !
ऐका आणि शेअर करा !

आज मुलुंड येथे पुस्तक प्रकाशन ! अवश्य या !
01/05/2023

आज मुलुंड येथे पुस्तक प्रकाशन ! अवश्य या !

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक घटनांवर व्यक्त केलेलं जळजळीत आणि बेधडक मत म्हणजे हे पुस्तक ! आपला देश सर्वर्थाने बदलावा, ...
18/04/2023

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक घटनांवर व्यक्त केलेलं जळजळीत आणि बेधडक मत म्हणजे हे पुस्तक ! आपला देश सर्वर्थाने बदलावा, चांगल्या गोष्टी आपल्या देशात घडून याव्यात यासाठी आपण काय करायला हवं हे सांगणारं लेखन म्हणजे -
बेधडक
माझा आतला आवाज
१ मे २०२३, महाराष्ट्र दिनी धडाक्यात प्रकाशन !
लेखक - शरद पोंक्षे
प्रकाशन - शब्दामृत
नोंदणीसाठी संपर्क - 919970077255 / 919730147255

महाराष्ट्राने प्रचंड गौरवलेलं पुस्तक ! संघर्ष एका अभिनेत्याचा ! संघर्ष एका गाजलेल्या नाटकाचा ! मी आणि नथुराम आजच घरपोच म...
17/04/2023

महाराष्ट्राने प्रचंड गौरवलेलं पुस्तक ! संघर्ष एका अभिनेत्याचा ! संघर्ष एका गाजलेल्या नाटकाचा ! मी आणि नथुराम आजच घरपोच मिळवा - संपर्क 919970077255 / 919730147255

प्रत्येक संकटावर मात करायला शिकवणारं पुस्तक ! चौथी आवृत्तीही हातोहात खपतेय. एका झुंजार अभिनेत्याने कॅन्सर सारख्या दुर्धर...
17/04/2023

प्रत्येक संकटावर मात करायला शिकवणारं पुस्तक ! चौथी आवृत्तीही हातोहात खपतेय. एका झुंजार अभिनेत्याने कॅन्सर सारख्या दुर्धर रोगाशी दिलेल्या यशस्वी लढ्याचे शहारे आणणारे लिखाण-
दुसरं वादळ
लेखक - शरद पोंक्षे
प्रकाशन - शब्दामृत
आवृत्ती - चौथी
नोंदणीसाठी संपर्क 919970077255 / 919730147255

असे भीमराव भेटायला हवेत ना !—कोकणात काप- दापोली या खेड्यात रामजी सपकाळ राहत. त्याच गावात त्यांचा चौदावा मुलगा वाढत होता,...
14/04/2023

असे भीमराव भेटायला हवेत ना !
—कोकणात काप- दापोली या खेड्यात रामजी सपकाळ राहत. त्याच गावात त्यांचा चौदावा मुलगा वाढत होता, मनसोक्त दंडगाई करत होता. सगळेजण भिवा म्हणत त्याला. स्वभावाने हट्टी, मनात येईल ते करणारा, कुणाचं फार न ऐकणाऱ्या भीमाचे येता जाता अनेकांशी खटके उडायचे. भिवा संतापयचा, भांडायचा, कधीकधी तर कुणाच्या वाट्याला इतका जायचा की काहीबाही नुकसान व्हायचं. आपल्या वयाच्या पोरांसोबत मारामारी नित्याची असायची, भांडणाच्या जोडीला शिव्या काही नव्या नव्हत्या त्याला ! हा इतका हुडपणा करणारा मुलगा पुढे संविधानाचे शिल्पकार म्हणून भारत ज्यांना ओळखतो ते बाबासाहेब आंबेडकर आहेत हे सांगितलं तर विश्वास बसेल ?!

विश्वास ठेवावा लागेल. कारणही तशीच आहेत.
भीमाचे बाबा अभ्यासू होते, विद्येची महत्ता जाणून होते, ज्ञानसाधना मोलाची वाटायची त्यांना !
बापाचा हा नाद वयाच्या एका टप्यात भीमाला लागला, आणि तो अंतरबाह्य बदलून गेला. पिशासारखा तो वाचत सुटला, त्याने भूतकाळातल्या आपल्या रूपाची कात टाकून दिली, वाचनाने, पुस्तकांनी त्याला समॄद्ध केलं. तारुण्याच्या त्या टप्प्यावर मोहाच्या फुलबागा येणारच ! भीम चैंनबाजीत सुरुवातीला रमला पण नंतर त्यात फारसा आडकला नाही. काही मोह त्याने जाणीवपूर्वक बाजूला सारले, आणि तिथेच त्याने पेरले भविष्याचे सोनेरी मार्ग ! वाचनातून आणि वृत्तीच्या संयमातून भिवाचा भीमराव जगापुढे आला !

एका पत्रात ते लिहितात, ‘’मी सुखासीन मनुष्य नाही. जीवनातील सुखे मला आकर्षित करत नाहीत…माझी पुस्तकं हेच माझे साथीदार आहेत. बायको मुलांहुन ते मला अधिक प्रिय आहेत.’’

आपल्या यशाचं गुपीत हे आपल्या ज्ञानसाधनेत आहे, शुद्ध आणि सात्विक अशा वागण्यात आहे हे भीमाने फार लवकर ओळखलं.
असे भीमराव वयाच्या योग्य टप्यावर आजच्या युवक मित्रांना भेटले तर काय कमाल घडेल ना !

जयंतीनिमित्त सादर….

- *पार्थ बावस्कर ( व्याख्याता, इतिहास अभ्यासक )*

30/06/2022

काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल.....
बघा, काय म्हणताहेत सौमित्र.....

Address


Telephone

+919970077255

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शब्दामृत - प्रकाशन । पर्यटन । निर्मिती posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to शब्दामृत - प्रकाशन । पर्यटन । निर्मिती:

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share