आवाज जनतेचा न्यूज

  • Home
  • आवाज जनतेचा न्यूज

आवाज जनतेचा न्यूज Live News Coverage in Thane Dist.

ब्रम्हांड चौक आझाद नगर  , ठाणे४ तारीख संध्याकाळी ७ वाजता ...
02/11/2024

ब्रम्हांड चौक आझाद नगर , ठाणे
४ तारीख संध्याकाळी ७ वाजता ...

हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विश्...
31/10/2024

हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विश्वासाने आणि माझ्या मार्गदर्शनाने चिरागनगरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक श्री. सुरेश दाजी भोईर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

ठाण्यातील कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.  यावेळी केंद्...
28/10/2024

ठाण्यातील कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, सून वृषाली शिंदे, नातू रुद्रांश हेदेखील उपस्थित होते.

मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत पालघरचे माजी खासदार मा.राजें...
27/10/2024

मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत पालघरचे माजी खासदार मा.राजेंद्र गावित, भाजपचे माजी केंद्रीय मंत्री मा. रावसाहेब पाटील दानवे यांच्या कन्या मा. संजना जाधव आणि बोईसर येथील मा. विलास तरे यांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी या सर्वांचे मुख्यमंत्री महोदयांनी पक्षात स्वागत करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी खासदार मा. नरेश म्हस्के, माजी आमदार मा. रवींद्र फाटक, शिवसेना उत्तर महाराष्ट्र सचिव मा. भाऊसाहेब चौधरी उपस्थित होते.

22/10/2024
स्मरण हुतात्म्यांचे!पोलीस स्मृतिदिनानिमित्त मा. राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन, मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र श्री. एकना...
21/10/2024

स्मरण हुतात्म्यांचे!

पोलीस स्मृतिदिनानिमित्त मा. राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन, मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र श्री. एकनाथ शिंदे, मा. पोलीस महासंचालक श्रीमती. रश्मी शुक्ला यांनी देशासाठी आपले प्राण वेचलेल्या सर्व शहीदांना सशस्त्र पोलीस मुख्यालय, नायगाव येथे भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.

21/10/2024

ठाणेकरांकडे हक्काचे धरण नाही हे दुर्भाग्य,नंतर झालेल्या नवी मुंबईकडे स्वतःचं धरण..मनसे नेते अविनाश जाधव यांनी व्यक्त केली नाराजी..!

श्वानप्रेमी ठाणेकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी मनसेचे प्रयत्न...
20/10/2024

श्वानप्रेमी ठाणेकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी मनसेचे प्रयत्न...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपचे माजी आमदार राजन तेली यांचा सेनेत प्रवेश..पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांनी राजन तेली आणि त्या...
18/10/2024

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपचे माजी आमदार
राजन तेली यांचा सेनेत प्रवेश..

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांनी राजन तेली आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं स्वागत केले. ह्यावेळी युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे,शिवसेना नेते विनायक राऊत,शिवसेना नेते,विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,सचिव आमदार मिलिंद नार्वेकर तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

भारतीय तरुणांची 'प्रज्वलित मने' घडवण्याचे मोलाचे कार्य करणाऱ्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना जयंतीदिनी मनःपूर्वक अभि...
15/10/2024

भारतीय तरुणांची 'प्रज्वलित मने' घडवण्याचे मोलाचे कार्य करणाऱ्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना जयंतीदिनी मनःपूर्वक अभिवादन!

ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक मोठी हानी आहे. आपल्या विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध अ...
14/10/2024

ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक मोठी हानी आहे. आपल्या विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले परचुरे यांनी आपल्या अभिनयाच्या कौशल्याने प्रेक्षकांच्या हृदयात कायमची जागा मिळवली होती. त्यांच्या निधनाने संपूर्ण मराठी कलाविश्वात शोककळा पसरली आहे.

भावपूर्णश्रद्धांजली

दसरा सणानिमीत्त मा.पोलीस आयुक्त ठाणे शहर, श्री.आशुतोष डुंबरे यांनी पोलीस मुख्यालय येथे शस्रपूजन  केले. सदरवेळी पो.सह आयु...
12/10/2024

दसरा सणानिमीत्त मा.पोलीस आयुक्त ठाणे शहर, श्री.आशुतोष डुंबरे यांनी पोलीस मुख्यालय येथे शस्रपूजन केले. सदरवेळी पो.सह आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पो.आयुक्त, (प्रशासन) श्री. श्रीकांत पाठक इतर अधिकारी/अंमलदार उपस्थित होते. मा.पोलीस आयुक्त यांनी सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.

09/10/2024

भारतीय उद्योगजगताचे शिल्पकार, टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचे आज दुःखद निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते, वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या महान व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण श्रद्धांजली.

" #संदीप_खांबे" यांना डॉक्टरेट पदवी..!क्यूनियो इटली आणि मेरी लँड युनिव्हर्सिटी अमेरिका यांच्या वतीने, डॉक्टरेट इन सोशल व...
04/10/2024

" #संदीप_खांबे" यांना डॉक्टरेट पदवी..!
क्यूनियो इटली आणि मेरी लँड युनिव्हर्सिटी अमेरिका यांच्या वतीने, डॉक्टरेट इन सोशल वर्क अँड फिलॉसॉफी ऑफ सोशोलॉजीमध्ये २९ सप्टेंबर २०२४ रोजी , दिल्ली येथे डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली.

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त 'राणी लक्ष्मीबाई उद्यान जेष्ठ नागरिक मंडळ' कल्याण पश्चिम येथे ज्येष्ठ नागरिक यांच्या स...
02/10/2024

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त 'राणी लक्ष्मीबाई उद्यान जेष्ठ नागरिक मंडळ' कल्याण पश्चिम येथे ज्येष्ठ नागरिक यांच्या सन्मानार्थ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक कार्यक्रमात एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक यांची पोलीस विभागातर्फे विशेष काळजी घेण्यात येईल. तसेच ज्येष्ठ नागरिकांना पोलीस ठाण्यात प्राधान्य देण्यात येईल त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येईल. शासनाकडून विविध योजनांबाबत तसेच सुरक्षा बाबत मार्गदर्शन करण्यात आले. सदर वेळी 40 ते 45 ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

देशी गायीला राज्यमाता-गोमातेचा दर्जा !! येऊर येथील गोशाळेत युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी केले गोमातेचे विधि...
02/10/2024

देशी गायीला राज्यमाता-गोमातेचा दर्जा !!

येऊर येथील गोशाळेत युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी केले गोमातेचे विधिवत पूजन..

देशी गायीला राज्यमाता, गोमाता म्हणून मान्यता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या औचित्याने आज येऊर येथील गोशाळेला युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी भेट दिली. यावेळी गोमातेची विधिवत पूजा पुर्वेश सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आली.

गाय ही आपल्यासाठी पूजनीय आहे. तिच्या गर्भात ३३ कोटी देवांचा वास असतो. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यभरात गायींचे पूजन करण्यात येईल. तसेच तिच्या देखभालीसाठी राज्य सरकारने अनुदान देण्याचा निर्णयही घेतला असून त्यामुळे गोमातेचे जतन केले जाईल.

राज्य सरकारने देशी गायीला राज्यमाता - गोमाता म्हणून मान्यता दिल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. याबद्दल पुर्वेश सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनःपूर्वक आभार मानले.

राज्यभरात युवा सैनिक गोशाळांना भेट देऊन ते गोमातेचे पूजन करतील. तसेच या शासन निर्णयाची प्रत गोशाळांना देण्यात येईल. युवासेनेच्या माध्यमातून या शासन निर्णयाची जनजागृती राज्यभरात करण्यात येईल, अशी माहिती पूर्वेश सरनाईक यांनी दिली.

यावेळी युवासेना ठाणे लोकसभा अध्यक्ष विराज निकम व नितीन लांडगे, युवासेना पालघर निरिक्षक सिद्धार्थ पांडे, ठाणे जिल्हा सचिव अभिषेक शिंदे, जिल्हा समन्वयक अर्जुन डाबी, विधानसभा निरिक्षक किरण जाधव, ओवळा माजिवडा विधानसभा अध्यक्ष देवेंद्र साळवी, युवासेना ठाणे विधानसभा अध्यक्ष जितेश गुप्ता, विधानसभा उपाध्यक्ष विकेश भोईर, अशफाक शेख, अमित यादव, राकेश जयस्वाल, युवासनेचे प्रतिक भालेराव, साई ढवळे, सागर राजपुत, संदीप तिवारी, सोहम सुर्वे, सुजय पाटील, आदेश वाघमारे, युवतीसेना कोअरकमिटी सदस्य पुजा लोंढे यांच्यासह युवासेना पदाधिकारी व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

01/10/2024

कळव्यातील सहकार विद्यालयातील ४६ विद्यार्थ्यांना आहारातून विषबाधा.. श्री.नजीब मुल्ला यांनी कळवा रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांची केली विचारपूस..

*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक संपन्न*ठाणे : ठाणे शहरात कासारवडवली य...
01/10/2024

*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक संपन्न*

ठाणे : ठाणे शहरात कासारवडवली येथील वालावलकर मैदान येथे होणाऱ्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार, दि.5 ऑक्टोबर 2024 रोजी उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान यांच्या या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी पूर्वतयारीची बैठक आज सोमवार, दि.30 सप्टेंबर रोजी ठाणे महापालिका मुख्यालय येथे झाली.
सुमारे 40 हजार नागरिकांची उपस्थिती या कार्यक्रमास अपेक्षित असून ठाणे तसेच आसपासच्या महापालिकांमधून सुमारे 1200 बसगाड्यांची ये-जा घोडबंदर रोड परिसरात होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा नियोजित दौरा शनिवार, 5 ऑक्टोबर 2024 रोजी होणार आहे. या दौऱ्यासाठी आवश्यक सर्व व्यवस्थांचे नियोजन करण्यासाठी विविध जबाबदाऱ्यांची निश्चिती करण्यात आली आहे. त्यानुसार, पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी ठाणे महापालिका मुख्यालय येथे बैठक झाली. या बैठकीस, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, महाराष्ट्र मेट्रो रेल महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे, उपनगर अभियंता शुभांगी केसवानी, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त (समाजविकास) अनघा कदम, उपायुक्त (आरोग्य) उमेश बिरारी, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी विकास गजरे, ठाणे प्रांताधिकारी उर्मिला पाटील, एमएमआरडीए, महामेट्रो अशा विविध महत्त्वाच्या विभाग/कार्यालयांचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
पावसाळ्याचे दिवस लक्षात घेवून मुख्य सभामंडप, पार्किंग व्यवस्था येथील सर्व नियोजन करण्यात यावे. त्याचबरोबर वीज पुरवठा, इंटरनेट सेवा यांची पर्यायी व्यवस्थाही उपलब्ध करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी यावेळी दिल्या. तसेच, या काळात मोठ्या प्रमाणावर वाहतूक होणार असल्याने वाहतुकीसाठी बंद होणारे रस्ते, सेवा रस्त्यांच्या वापराची स्थिती आदींबाबत नागरिकांना अवगत करण्यात यावे, असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.
मुख्य सभामंडप, हेलिपॅड, गाड्या आणि बसेस पार्किंग व्यवस्था, वीज पुरवठा, सीसीटीव्ही नेटवर्क, जोड रस्ते यांच्या सद्य:स्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. बसगाड्यांची पार्किंग व्यवस्था, अतिमहत्त्वाच्या व्यक्तीचे प्रवास मार्ग आदींबाबत या बैठकीत पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट यांनी सादरीकरण केले.
सुमारे 1200 बसगाड्यांच्या पार्किंगचे नियोजन महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे. त्या जागा ताब्यात घेण्यात आल्या असून त्यांचे सपाटीकरण आदी कामे करण्यात येत असल्याची माहिती नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांनी दिली. तर, मुख्य सभामंडप आणि हेलिपॅड यांच्या व्यवस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे यांनी माहिती दिली. या बैठकीनंतर उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळाचीही एकत्रित पाहणी केली.

Address


Telephone

+919987303908

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आवाज जनतेचा न्यूज posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share