04/10/2023
युवा उद्योजक पुनीत बालन यांना पुणे महानगरपालिकेची अशी नोटीस येणे, खूप दुर्दैवी आहे याचा आम्ही जाहिर निषेध करतो.
आणि जी व्यक्ती पुणे शहर गणेशोत्सव मंडळांना
उत्सव साजरा करण्यासाठी सहकार्य करते. अशा युवा उद्योजक पुनीतदादा बालन यांच्या मागे आपण ठामपणे उभे राहिले पाहिजे. एक बाजूला पोलीस आव्हान करतात की वर्गणी करता दुकानदार, सर्वसामान्य लोक असतील किंवा इतर कोणी असेल यांना त्रास देऊ नका, बळजबरी करू नका आणि जर एका बाजूला पुनीत बालन यांच्यासारखी व्यक्ती गणेश मंडळाच्या पाठीमागे उभी राहत असेल तर काय चुकीचे आहे. मला महानगरपालिकेला अधिकाऱ्यांना सांगायचं आहे की पुणे शहरामध्ये वर्षानुवर्ष प्रत्येक महिन्याला प्रत्येक दिवसाला कितीतरी फ्लेक्स अनधिकृतपणे पुणे शहरात लावले जातात... मग ते कोणत्यातरी नेत्याचे, कोणत्यातरी समाजसेवकाचे, कोणत्यातरी नगरसेवकाचे कोणत्यातरी आमदाराचे कोणत्यातरी खासदाराचे असतात... त्याच्यावर तुम्ही कधी कारवाई करत नाही त्यांना कधी दंड ठोठवला नाही.. आधी अगोदर अनधिकृत होर्डिंग आणि फ्लेक्स वरती कारवाई करा त्याच्यानंतर पुनीत बालन सारख्या व्यक्तीवरती कारवाई करा. आमची कारवाई करण्याला काही हरकत नाही, पण न्याय हा सर्वांना सारखा असावा आणि सार्वजनिक उत्सव मंडळाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही पुनीत बालन यांच्या सोबत आहोत. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी निर्बंध मुक्त दहीहंडी, निर्बंध मुक्त गणेश उत्सव अशा घोषणा केल्या असताना ही नोटीस कशी पाठवली ? तसेच दंड भरण्यासाठी केवळ दोन दिवसांची मुदत दिली हे कोणाच्या सांगण्यावरून होत आहे ?
याचा देखील तपास करण्याची गरज आहे.
!! गणपती बाप्पा मोरया !!
We_Support_Punit_Balan