Satya Parichit

  • Home
  • Satya Parichit

Satya Parichit खोटे पणाला सत्याचा आरसा दाखवणारे " सत्य परिचित "

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
09/04/2024

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

08/04/2024
17/03/2024

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे JP NORTH च्या नागरिकांची गैरसोय

27/02/2024

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मिरा भाईंदर महानगरपािकेतर्फे महानगरपालिका
मुख्यालय ते नगरभवन पर्यंत ग्रंथदिंडी तथा भव्य मिरवणूक #मराठीभाषादिन

15/02/2024

शेतकरी दिल्लीत येणार म्हणून सरकारने दिल्लीच्या सीमा बंद केल्या. पण शेतकरी पण फार चिवट, मिळेल त्या आडवळणी मार्गाने दिल्लीत पोहोचताय

15/02/2024

मिरा भाईंदर येथे शासकीय रुग्णालय, पोलीस ताफ्यातील वाहनांचे व विविध विकासकामांचे लोकार्पण सोहळा

06/02/2024

रस्त्यावरील अनाधिकृत पार्किंगला मिरा भाईंदरच्या वाहतूक विभागाच संरक्षण

वाशीच्या भाषणात काय ठरलं?1. 57 लाख नोंदी मिळाल्याची तसेच यातील 37 लाख जणांना प्रमाणपत्र वाटप केल्याची माहिती सरकारने मनो...
26/01/2024

वाशीच्या भाषणात काय ठरलं?

1. 57 लाख नोंदी मिळाल्याची तसेच यातील 37 लाख जणांना प्रमाणपत्र वाटप केल्याची माहिती सरकारने मनोज जरांगे पाटील यांना दिली. प्रत्येक नोंदीवर पाच जणांना जरी आरक्षण मिळालं तरी अडीच कोटी मराठ्यांना आरक्षण मिळेल असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.
2. एवढं झालं तरी शिंदे समितीचं काम थांबणार नाही, ती समिती नव्या नोंदी शोधत राहणार, या समितीला दोन महिन्यांची मुदतवाढ सरकारने दिली आहे. मनोज जरांगे यांनी या समितीला एक वर्षे मुदतवाढ देण्याची मागणी केलीय, त्यामुळे ज्यांच्या नोंदी चुकून राहिल्या आहेत त्या सापडू शकतात.
3. आंतरवली सराटीसह महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी मराठा समाजाच्या लोकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी सरकारने मान्य केलीय, त्याची प्रक्रिया देखील सुरु करण्यात आली आहे
4. कोर्टानं जे आरक्षण नाकारलंय ते मिळत नाही तोवर सरसकट सर्व मराठा समाजाला मोफत शिक्षण द्यावं. तसेच ते आरक्षण मिळेपर्यंत सरकारी नोकर भरती करु नये करायची असेल तर आमच्या जागा राखीव ठेवून करावी, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. त्यावर अद्याप निर्णय नाही.
5. *सर्वात महत्त्वाचा मुद्दा सग्यासोयऱ्यांना आरक्षण देण्याचा* यावर सरकारने भूमिका मांडलेली नाही. यासंदर्भातील अध्यादेश उद्या (दि. 27 जानेवारी) दुपारी 11-12 वाजेपर्यंत काढावा अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी. तोवर मुंबईत जाणार नाही, आजची रात्र वाशीतच थांबणार, मात्र अध्यादेश आला नाही तर उद्या आझाद मैदानावरच जाणार.

#मराठा
#मराठाआरक्षण
#मनोजजरांगे

एक साधा गावगाड्यातला माणूस सरकार हलवू शकतो...हे जरांगे पाटीलांनी दाखवून दिलय…                #मराठाआरक्षण
26/01/2024

एक साधा गावगाड्यातला माणूस सरकार हलवू शकतो...
हे जरांगे पाटीलांनी दाखवून दिलय…
#मराठाआरक्षण

मातीचा गंध आणि सुगंध शेतीकडे खेचून आणतो:-मुख्यमंत्री एकनाथ शिंदेमातीचा गंध आणि सुगंध आपल्याला शेतीकडे, आपल्या जन्मभूमीकड...
26/01/2024

मातीचा गंध आणि सुगंध शेतीकडे खेचून आणतो:
-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मातीचा गंध आणि सुगंध आपल्याला शेतीकडे, आपल्या जन्मभूमीकडे खेचून आणतो. जेंव्हा मी माझ्या जन्मभूमीत येतो तेंव्हा माझे पाय आपोआप शेतीकडे वळतात, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

महाबळेश्वर तालुक्यातील दरे येथे यात्रेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असून त्यांनी ते आज बराच वेळ आपल्या शेतात रमले.

औषधी हळद, स्ट्रॉबेरी, आंबे, काजू, चिकू, बटाटा , सफरचंद, अव्हॅकॅडो , अगरवूड अशी विविध प्रकारची फळझाडे आणि भाजीपाला यांची लागवड करण्यात आली आहे.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शेतीत रमताना एक वेगळा आनंद मिळतो. थोड्या वेळासाठी का होईना पण अन्य सर्व बाबी बाजूला राहतात. गाव , शेती गावाकडची माणसं यांचे प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगळे महत्त्व असते. माणूस गावापासून कितीही दूर गेला , कितीही मोठा झाला तरी प्रत्येकाला आपल्या माती बद्दल आपल्या गावाबद्दल, गावाकडील लोकांबद्दल प्रेम असते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी, आर्थिक उत्पन्न वाढविणाऱ्या पिकांचे उत्पादन शेतकऱ्यांनी घ्यावे, असे सांगून सातारा जिल्ह्यात मिशन सातारा जिल्ह्यात बांबू लागवड मोहीम मिशन मोडवर राबविण्यात येत आहे. जवळपास दहा हजार हेक्टर बांबू लागवडीचे प्रशासनाने उद्दिष्ट ठेवले आहे. बांबूला मोठी मागणी आहे. बांबू बरोबरच रेशीम, सुपारी लागवड अशा उत्पादनांचे क्लस्टर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन करावे. यातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती नक्की होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कादांटी खोऱ्यातील नागरिकांचे स्थलांतर रोखण्यासाठी येथे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. हे खोरे निसर्ग संपन्न आहे. या खोऱ्यात वासोटा किल्ला, उत्तेश्वर मंदिर यासारखी विविध पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांच्या विकासासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आराखडा तयार केला आहे. त्यानुसार पर्यटनाला चालना देण्यासाठी काम करण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. दरे , तालुका महाबळेश्वर या ठिकाणी ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे CMOMaharashtra

अयोध्येत एकनाथांचा बोलबाला ; ठाणेकरांच्या बॅनरबाजी शिंदेशाहीची अनोखी झलक सुमारे 500 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अयो...
19/01/2024

अयोध्येत एकनाथांचा बोलबाला ; ठाणेकरांच्या बॅनरबाजी शिंदेशाहीची अनोखी झलक

सुमारे 500 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर साकारले गेले आहे. या मंदिरातील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा येत्या 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. करोडो रामभक्तांची इच्छा श्रीराम मंदिराच्या माध्यमातून प्रत्यक्ष साकार होत आहे, याचा आनंद प्रत्येक हिंदू माणसाला आहे. गेल्या अनेक दिवसापासून देशाच्या विविध भागात अनेक कार्यक्रम सुरू आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. संपूर्ण देश राममय झाला आहे. याच राम मंदिर याच्या पार्श्वभूमीवर देशभरातील स्थानिक पातळीवर राजकीय पक्षांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर या सोहळ्यानिमित्त राजकीय पक्षांनी ठिकठिकाणी बॅनरबाजी केली आहे. अशाप्रकरे ठाणेकर नागरिक अयोध्यात पोहोचले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या स्वागतार्थ तयार सुरू करत एक- दोन नाहीतर तीन डझन म्हणजे 36 बॅनर्स लावण्यात आले आहे.

ठाणे :- मुंब्रा बायपास रोड वर ट्रेलर चा अपघात.. अथक प्रयत्नानंतर ट्रेलर बाजूला काढण्यात आपत्ती व्यवस्थापन टीम ला यश..   ...
18/01/2024

ठाणे :- मुंब्रा बायपास रोड वर ट्रेलर चा अपघात.. अथक प्रयत्नानंतर ट्रेलर बाजूला काढण्यात आपत्ती व्यवस्थापन टीम ला यश..

पोलिसांना आता गणवेशावरील नेमप्लेट लपविणे पडणार महागात!समाजसेवक अजय जेया यांच्या पाठपुराव्याला यश...ठाणे - वाहतुकीचे नियम...
18/01/2024

पोलिसांना आता गणवेशावरील नेमप्लेट लपविणे पडणार महागात!

समाजसेवक अजय जेया यांच्या पाठपुराव्याला यश...

ठाणे - वाहतुकीचे नियमन करताना अथवा, वाहनचालकांवर कारवाई करताना, बरेच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, आपल्या गणवेशाच्या खिशात मोबाईल किंवा वॉकी-टॉकी ठेवून, जाणूनबुजून आपल्या नावाची पट्टी लपविण्याचा प्रयत्न करतात. परिणामी, एखाद्या नागरिकास पोलिसांविरोधात तक्रार करायची असल्यास, ती नावाअभावी करता येत नाही. ही बाब ठाण्यातील समाजसेवक व माहिती अधिकार कार्यकर्ता अजय जेया यांच्या लक्षात येताच, त्यांनी थेट ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांच्याकडे लेखी तक्रार करताच, याप्रकरणी दखल घेण्यात आलेली असून, अशापध्दतीने खिशात मोबाईल, वॉकी-टॉकी किंवा इतर कोणतीही सरकारी कागदपत्रे अथवा वस्तू ठेवून, गणवेशावरील आपल्या नावाची पट्टी (नेमप्लेट) झाकता येणार नसल्याचे तातडीचे आदेश देण्यात आले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, यासंदर्भातील आदेश देण्यात आल्यानंतर, वाहतूक शाखेचे अधिकारी अचानकपणे कर्तव्यावर नेमलेल्या ठिकाणी भेटी देवून खात्री करणार असल्याचे, ठाणे वाहतूक शाखेच्या वतीने अजय जेया यांना पाठविलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, मध्यंतरीच्या काळात नो-पार्किंगच्या नावाखाली झालेला टोविंग घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहार उघड झाल्यानंतर, ठाणे शहरात एकच खळबळ उडाली होती. वाहनांवर कारवाई करताना ई-चालान न वापरणे, दुचाकी टोविंग केल्यानंतर, खासगी ठेकेदाराकडून दंडाची रक्कम वसूल करणे यासारखे बेकायदेशीर प्रकार बिनदिक्कतपणे घडत असल्याने, अजय जेया यांनी याप्रकरणी ठाण्यात आंदोलनाच्या माध्यमातून, वाहतूक शाखेचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर मांडला होता. याचपार्श्वभूमीवर, बरेच पोलीस अधिकारी आणि वाहतूक कर्मचारी आपल्या गणवेशावर नावाची पट्टी लपवून ठेवत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, अजय जेया यांनी याप्रकरणी पाठपुरावा करुन, यापुढे कोणत्याही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यास, आपल्या नावाची पट्टी झाकता येणार नाही, असे आदेश जारी करण्यात भाग पडले. याबाबत वाहनचालक व सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

Thane Traffic Branch

ठाणे शहरातील लिटील फ्लॉवर शाळेला युवासेनेचा दणका !युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी शाळेच्या व्यवस्थापनाला धरले...
16/01/2024

ठाणे शहरातील लिटील फ्लॉवर शाळेला युवासेनेचा दणका !

युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी शाळेच्या व्यवस्थापनाला धरले धारेवर ! !

ठाणे शहरामध्ये लिटिल फ्लॉवर हायस्कुुल ही शाळा असून या शाळेमध्ये आजूबाजूच्या परिसरातील गोरगरीब पालकांचे विद्यार्थी शिकत आहेत. काही कारणास्तव पालकांनी शाळेची फी वेळेवर भरू शकत नसल्यामुळे ते टप्या-टप्याने फी भरत होते. परंतू, शाळेच्या व्यवस्थापनाला एकरकमी फी पाहिजे असल्यामुळे शाळेकडून मुलांवर अत्याचार करीत शाळेने अंदाजे ३५० विद्यार्थ्यांना परिक्षेला बसू न दिल्याबद्दल पालकांनी युवासेनेच्या पदाधिकार्यांकडे तक्रार केली असता युवासेनेचे कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्यासह युवासेना सचिव राहुल लोंढे, युवासेना महाराष्ट्र समन्वयक नितिन लांडगे, विराज निकम, ठाणे विधानसभा अध्यक्ष जितेश गुप्ता, कोपरी-पाचपाखाडी विधानसभा अध्यक्ष ऋषिकेश माने तसेच सुशांत मयेकर,अखिल माळवी हे त्वरीत शाळेच्या व्यवस्थापनाला जाब विचारण्यासाठी शाळेत पोहचले.

यावेळी पालकांकडून शाळेच्या व्यवस्थापनाच्या वतीने विद्यार्थ्यांना कश्या प्रकारे अमानुष वागणुक दिली जाते याचा पाढाच पालक युवासेनेपुढे वाचू लागले. यावेळी पालकांनी असे सांगितले की, शाळेच्या व्यवस्थापनाकडून ज्या मुलांची फी बाकी आहे त्या मुलांना वॉशरूमला न पाठविणे, वॉशरूमला जायचे असल्यास पन्नास रूपये फाईन लावणे, मुलींनी कपाळाला टिकली लावली असल्यास पन्नास रूपये फाईन, विद्यार्थी मराठीत बोलताना दिसल्यास पन्नास रूपये फाईन, विद्यार्थ्यांना मानसिक त्रास देणे, अश्या पध्दतीने शाळेच्या व्यवस्थापनाचा मनमानी कारभार चालू असल्याचे निर्दशनास येत आहे. तसेच हा व्यवहार कॅशने होत असल्यामुळे त्याचा कुठेही लेखी हिशोब नाही. अश्या एक ना अनेक तक्रारी युवासेनेकडे करण्यात आल्या.

पालकांकडून या सर्व तक्रारी ऐकल्यानंतर पुर्वेश सरनाईक व त्यांच्या सहकार्यांनी शाळा व्यवस्थापन व मुख्याध्यापकांची भेट घेतली. वरील सर्व तक्रारींबाबत जाब विचारला व कोणत्याही विद्यार्थ्यांला शाळा व्यवस्थापन परिक्षेपासून वंचित ठेवू शकत नाही, अश्या शब्दात ठणकावून सांगण्यात आले. यावर शाळेने दिलगिरी व्यक्त करत व पालकांच्या नावे माफीनामा देत ज्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा घेतल्या नव्हत्या त्या सर्व विद्यार्थ्यांना आजच्या दिवशीचा बुडलेला पेपर सोमवार दि. २२ जानेवारी, २०२४ रोजी घेण्यात येणार असल्याचे माफीनाम्यात कबुल केले व उद्यापासूनचे नियमित पेपर घेण्यात येतील, असे शाळेच्या व्यवस्थापनाने सांगितले. तसेच शाळेला फी घेण्याचा जसा अधिकार आहे तसचा उत्तम शिक्षण व सुविधा मिळणे हा विद्यार्थ्यांचा मुलभुत अधिकार आहे याची जाणिव पुर्वेश सरनाईक यांनी शाळा व्यवस्थापनाला करून दिली.

शाळेच्या वतीने पालक व विद्यार्थ्यांना जो मानसिक त्रास देण्यात आला यासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर साहेब यांच्याकडे निवेदन देऊन संबंधित शाळेवर योग्य ती कारवाई करण्यासाठी मागणी पुर्वेश सरनाईक यांनी केली आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आंदोलन केले त्यांच्या पाल्यास शाळेतर्फे कोणताही त्रास होणार नाही यासाठी युवासेना कायम कटिबध्द असेल असा शब्द पुर्वेश सरनाईक यांनी पालकांना दिला.

यावेळी युवासेनेचे साई ढवळे, सतीश आंब्रे, प्रमोद भिसे, राकेश जैस्वाल,विशाल कुडिया,विनय कलगुटकर व युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. Purvesh Pratap Sarnaik

नवीन शहर अध्यक्ष नियुक्ती नंतर मनसेचे जुने कार्यकर्ते देणार राजीनामा?
16/01/2024

नवीन शहर अध्यक्ष नियुक्ती नंतर मनसेचे जुने कार्यकर्ते देणार राजीनामा?

14/01/2024

मिरा भाईंदर शहरात दिव्यांगाचे भवितव्य अंधारात | प्रशासनाने दिव्यांगावर कारवाई करत आपल्या प्रामाणिकतेचे दिले प्रमाणपत्र

मनःपूर्वक अभिनंदन !
10/01/2024

मनःपूर्वक अभिनंदन !

मनःपूर्वक अभिनंदन !
10/01/2024

मनःपूर्वक अभिनंदन !

मनसेच्या वतीने मराठी कामगार सेना' ह्या संघटनेची आणि त्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आ...
10/01/2024

मनसेच्या वतीने मराठी कामगार सेना' ह्या संघटनेची आणि त्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

30/12/2023

मुख्यमंत्र्याच्या आगमनाचे ठिकठिकाणी बॅनर ? सामान्य जनतेला शिक्षा व राजकारण्यांना सूट

30/12/2023

मुख्यमंत्र्याच्या आगमनाचे ठिकठिकाणी बॅनर ? सामान्य जनतेला शिक्षा व राजकारण्यांना सूट

28/12/2023

Thane district COVID 19 report 27 dec 2023
Todays positive.17 / 753015
Todays Death. 0/ 11990
Active positive patients 48
Total recovered 741748

1. Tmc
Positive. 13/ 200207
Death 0/ 2177
Active 39
Recovered 197991

2. Kdmc
Positive. 02/ 170822
Death. 0/ 2967
Active 5
Recovered 167850

3. Nmmc.
Positive. 02/ 167392
Death 0 / 2057
Active. 04
Recovered 165331

4. Umc
Positive /27488
Death. 0 /666
Active 00
Recovered 26823

5. Bnmc.
Positive. 0 /13003
Death 0 / 487
Active 00
Recovered 12514

6. Mbmc
Positive. 0/ 72472
Death 0 / 1407
Active 01
Recovered 71064

7. Amc
Positive *not recieved*/24438
Death *not recieved* /580
Active *not recieved*
Recovered 24611

8. Kbmc
positive. 0/26063
Death 0/389
Active 0
Recovered 25693

9. Rural
positive. 0/ 51129
Death 0 / 1258
Active 0
Recovered 49871

14/12/2023

घोडबंदर - ठाणे मार्गावर गायमुख जकात नाका येथे 2 अवजड वाहनांचा भीषण अपघात... वाहतूक ठप्प

14/12/2023

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय समोर सरकारी
कर्मचाऱ्यांचे बेमुदत संप..!

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Satya Parichit posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Satya Parichit:

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share