Shabdamudra Live

  • Home
  • Shabdamudra Live

Shabdamudra Live लडेंगे.... जितेंगे!
हेच ध्येय घेऊन आम्ही
(1)

10/03/2024

LIVE 🔴 | महिला दिना निमित्त, जिजाऊ हळदी कुंकू समारंभ || कल्याण शहर ||

02/03/2024

LIVE 🔴 | जिजाऊ संघटना महाराष्ट्र आयोजित "भव्य निर्धार मेळावा २०२४"| रत्नागिरी 📍

25/02/2024

LIVE 🔴 | जिजाऊ संघटना महाराष्ट्र आयोजित "निर्धार मेळावा २०२४"| ठाणे - कल्याण लोकसभा क्षेत्र मर्यादित📍

24/02/2024

LIVE 🔴 | स्वर संध्या | आदर्श सरपंच सोहळा २०२४ | जिजाऊ संघटना व दै.पुढारी यांच्या संयुक्त विद्यमाने

27/01/2024

जिजाऊ संघटना महाराष्ट्र आयोजित "भव्य निर्धार मेळावा व कृतज्ञता सोहळा" वाशिंद, ता. शहापूर .

14/01/2024

LIVE - महायुती जिल्हास्तरीय कार्यकरता मेळावा

12/09/2023

जागर परंपरेचा उत्सव मंगळागौरीचा, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था,महाराष्ट्र (ठाणे शहर विभाग) आयोजित

12/09/2023

07/09/2023


जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था , महाराष्ट्र आयोजित दहीहंडी उत्सव २०२३

इथे नाही लाखोंची बक्षिसे, नाही उंच थर ....!
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, ठाणे शहर विभाग घेऊन येत आहे,
उत्सव परंपरेचा ... !
चला तर मग घेऊया
पूर्वीचाच आनंद,
पूर्वीचीच मज्जा .....

ठिकाण : येउर गाव , ठाणे महानगरपालिका शाळेच्या जवळ , ठाणे ( प )

01/09/2023

एक भाऊ हजारो बहिणी; तिसऱ्या दिवशीही झडपोलीत साजरा होतोय अनोखा रक्षाबंधन सोहळा !

15/08/2023

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र आयोजित ठाणे शहरातील कचऱ्यावरील शाळेचा स्वातंत्र दिन.

07/08/2023

LIVE :- शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांच्या विभागातील शाखाप्रमुख राजेश सोनावळे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

01/08/2023

जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था महाराष्ट्र संस्थापक श्री निलेश सांबरे व जिल्हा महिला व बाल विकास विभाग ठाणे यांच्या संयुक्त माध्यमातून ठाणे शहरातील विधवा महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप

नोकरीसाठी वणवण भटकणार्‍या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज - निलेश सांबरेठाणे (प्रतिनिधी) - नोकरीसाठी वणवण भटकणार...
27/07/2023

नोकरीसाठी वणवण भटकणार्‍या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज - निलेश सांबरे

ठाणे (प्रतिनिधी) - नोकरीसाठी वणवण भटकणार्‍या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. म्हणून जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक या सेवाभावी संस्था आदिवासी, डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांची पायपीट व होणारी वणवण थांबविण्यासाठी शैक्षणिक मार्गदर्शना शिबिरे घेत आहे. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व मदतीचा हात जिजाऊ नक्कीच देईल असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी ठाण्यातील एनकेटी हॉल येथे आयोजित भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिरात व्यक्त केला.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरातील गरीब, गरजू आणि उच्च शिक्षित विद्यार्थ्यांसाठी मोफत विशेष भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन एन. के. टी. हॉल, खारकर आळी, ठाणे येथे करण्यात आले होते. या शिबिरात, तलाठी, वनरक्षक, कृषिसेवक, जिल्हा परिषद अशा विविध ठिकाणी असलेल्या भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले या शिबिरात ठाण्यातील गरीब, गरजू दहावी-बारावी आणि उच्चशिक्षित विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या निलेश सांबरे यांनी केले होते त्याला विद्यार्थ्यांनी उस्फुर्त असा प्रतिसाद दिला आहे. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक ही झडपोली, विक्रमगड येथील सेवाभावी संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागातील अत्यंत गरीब, गरजू शालेय विद्यार्थी, होतकरू तरुण, दिव्यांग मुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी कार्यरत आहे. तसेच संस्थेचे रुग्णालय झडपोली येथे असून आदिवासी डोंंगराळ भागातील रुग्णांच्या सेवेसाठी संस्था कार्यरत आहे. आज तरुण शासकीय नोकरीसाठी वणवण भटकताना दिसतात. त्यांना योग्य सल्ला, मार्गदर्शनाच्या अभावाने निराशा पदरी येते. अशा गरजवंत मुलांच्या विकासासाठी, त्यांना योग्य दिशा व मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. म्हणूनच जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष निलेश भगवान सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरातील गरीब, गरजू आणि उच्च शिक्षित विद्यार्थ्यांसाठी मोफत विशेष भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन एन. के. टी. हॉल, खारकर आळी, ठाणे येथे करण्यात आले होते. या शिबिराततील मुद्दे वर्षभरात गट (क) व (ड) संवर्गातील होणार्‍या सर्व परीक्षांची पूर्व तयारी करून घेण्यात येईल. गणित, इंग्रजी विषयांची तयारी कमी दिवसात कशी करावी?
विविध पदे, परीक्षा पद्धती अभ्यासक्रम. वरील परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी अत्यंत अनुभवी, तज्ज्ञ, विद्यार्थीप्रिय शिक्षक यांच्या मदतीने तयारी करता येईल. त्यासाठी आज ठाणे शहरातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

रात्री पावसाचा जोर असल्यास यंत्रणांनी सतर्क रहावे आयुक्त अभिजीत बांगरठाणे, 27 :  ठाणे शहरात दुपारपासून पावसाची संततधार स...
27/07/2023

रात्री पावसाचा जोर असल्यास यंत्रणांनी सतर्क रहावे

आयुक्त अभिजीत बांगर

ठाणे, 27 : ठाणे शहरात दुपारपासून पावसाची संततधार सुरू असून सायंकाळ नंतर पावसाचा जोर वाढला असल्याने शहरातील सखल भागात पाणी ठिकठिकाणी पाणी साचले असून नागरिकांच्या तक्रारी ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे येत आहेत. या पार्श्वभूमीवर सायंकाळी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाची पाहणी करुन शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला. आज दुपारी 1.30 वाजल्यापासून सायं. 7.30 पर्यत या सहा तासात ठाणे शहरात 127.77 मि.मी पाऊस पडला असून पावसाचा जोर उशिरापर्यत कायम होता. आज आणि उद्या शहरामध्ये ऑरेज ॲलर्ट जारी करण्यात आला असून उद्याही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व यंत्रणा सतर्क रहावी यासाठी आयुक्तांनी सूचना दिल्या. आज दिवसभरात प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षात शहरात पाणी साचणे, झाडांच्या फांद्या उन्मळणे, वाहतूक वळविल्याच्या तक्रारींचा आढावा आयुक्तांनी घेतला तसेच प्रलंबित तक्रारी विनाविलंब निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त तक्रारींची नोंद झाल्यानंतर त्या तक्रारींचे निराकरण होईपर्यत तक्रारीचा सतत आढावा घेतला जावा अशाही सूचना आयुक्तांनी दिल्या. ठाणे शहरात दिवसभरात पडलेल्या पावसाची नोंद घेत असतानाच शहरातील प्रभागनिहाय किती पाऊस झाला याचीही आकडेवारी उपलब्ध होईल या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना आपत्ती व्यवस्थापनाला दिल्या. आपत्ती व्यवस्थापन कक्ष, एनडीआरएफची टीम व टीडीआरएफची टिम यांनी परस्पर समन्वय ठेवून आवश्यक त्या ठिकाणी टिम पाठविण्याच्या सूचना दिल्या.

वृंदावन, भास्कर कॉलनी, चिखलवाडी व इतर काही परिसरात पाणी साचल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यामुळे संबंधित उपायुक्तांशी संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली व आवश्यक उपाययोजना त्वरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. रात्रीही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्यामुळे सर्व यंत्रणा सतर्क तर असावीच व आवश्यकतेप्रमाणे फिल्डवर उपस्थित रहावे अशाही सूचना दिल्या.

तसेच प्राप्त झालेल्या तक्रारीचे निवारण होईपर्यत सतत तक्रारीचा आढावा घेतला जावा. तसेच तीन शिफ्टमध्ये काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांनी आपली ड्यूटी संपताना तक्रारीच्या निराकरणाबाबत एकमेकांशी समन्वय साधावा. तसेच प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कामकाज हे लवकरात लवकर डिजीटलायजेशन पध्दतीने सुरू करण्याचे निर्देशही आयुक्त श्री. बांगर यांनी दिले. यावेळी अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्‌त जी.जी. गोदेपुरे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवीउपस्थित होते.
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका

गडकरी रंगायतनचे  नुतनीकरण होणार ठाणे (२७) : ठाणे शहराची ओळख मानल्या जाणाऱ्या आणि नाट्यकर्मी व नाट्य रसिकांची पहिली पसंती...
27/07/2023

गडकरी रंगायतनचे नुतनीकरण होणार

ठाणे (२७) : ठाणे शहराची ओळख मानल्या जाणाऱ्या आणि नाट्यकर्मी व नाट्य रसिकांची पहिली पसंती असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहातील नूतनीकरणासाठी मा. मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
गडकरी रंगायतनमध्ये रंगकर्मींना तसेच प्रेक्षकांना काही असुविधा जाणवत होत्या. त्याबद्दल, तक्रारी आणि सूचना मा. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्याकडेही नागरिकांनी व्यक्त केल्या होत्या. त्यानुसार, महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच रंगायतनच्या वास्तूचे स्ट्रक्चरल ऑडिटही करण्यात आले. त्यात, मूळ वास्तू सुस्थितीत असून अंतर्गत रचना आणि सुविधा यात आमूलाग्र बदल करण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले.
त्याप्रमाणे, गडकरी रंगायतनच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव ठाणे महापालिकेने राज्य सरकारकडे दिला होता. त्यास मंजुरी मिळाली असून त्यासाठी आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे आयुक्त श्री. बांगर यांनी सांगितले. सन १९७८मध्ये बांधण्यात आलेल्या रंगायतनची २००५ मध्ये मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता १८ वर्षांनी नुतनीकरण होत आहे. रंगायतनची आसनक्षमता १०८० एवढी आहे.
गडकरी रंगायतनमधील सुधारणा करताना रंगायतनचे पारंपरिकपण जपले जाईल. तसेच, काळानुरुप अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. कलाकार आणि रसिक या दोघांनाही सुखद अनुभव मिळेल, हा उद्देश नजरेसमोर ठेवून रंगायतनचे नूतनीकरण केले जाणार असल्याचे आयुक्त श्री. बांगर यांनी सांगितले.
गडकरी रंगायतनचे नूतनीकरण करताना कलाकार आणि प्रेक्षक यांच्या अपेक्षा समजून त्यानुसार अंतर्गत सुविधांची रचना केली जाणार आहेत. त्यात प्रामुख्याने, मुख्य वास्तूचे मजबुतीकरण, तालीम हॉलचे नुतनीकरण, मुख्य प्रेक्षागृहातील संपूर्ण आसनव्यवस्था बदलणे, रंगकर्मी यांच्यासाठी असलेल्या ग्रीन रूममध्ये आवश्यक सुधारणा, रंगमंच-फ्लोरिंग अद्ययावत करणे, वातानुकूलन यंत्रणेत सुधारणा, शौचालयांचे संपूर्ण अद्यावतीकरण आदी कामांचा समावेश असल्याचे आयुक्त श्री. बांगर यांनी नमूद केले.
रंगायतनच्या तारखांचे बुकिंग लक्षात घेवून नूतनीकरण कामे केली जातील. जेणेकरून कोणाचीही गैरसोय होणार नाही. तसेच, कमीत कमी कालावधीत काम पूर्ण करण्याकडे लक्ष दिले जाईल, असेही आयुक्त श्री. बांगर यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नुतन कार्यालयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन
26/07/2023

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नुतन कार्यालयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

18/07/2023
कृषी दिनानिमित्त शेतकरी सन्मान सोहळाठाणे - महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्राती...
01/07/2023

कृषी दिनानिमित्त शेतकरी सन्मान सोहळा

ठाणे - महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल त्यांच्या जन्मदिनी अभिवादन करून ठाणे जिल्हा परिषद तर्फे कृषी दिन व कृषी संजीवनी मोहिम सप्ताह समारोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी आणि उत्तम दर्जाचे पीक घेऊन जिल्ह्यात एक वेगळा आदर्श निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला.

शेतकऱ्यांच्या विविध योजनांची माहिती तसेच पर्यटन क्षेत्रातील विकासाची दिशा वाढावी म्हणून माहितीपर घडी पत्रिका प्रकाशन मा. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते यांच्या हस्ते झाले.

यावेळी प्रगतशील शेतकऱ्यांचे कौतुक करत जिल्हा परिषद ठाणे तर्फे आयोजित या सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने 'शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत योजनांचा पुरेपूर वापर करून घ्यावा.' असे आवाहन मा. विभागीय कृषी सहसंचालक कोकण विभाग, डॉ अंकूश माने यांनी केले.

'शेतकरी महिलांच्या घरी भेट देण्यासाठी जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं हे घर मी माझ्या कष्टाने उभं केलं. महिला शेतकरी विविध योजनाचा वापर करत पुढाकार घेत आहेत.' असं म्हणत माने यांनी शेतकऱ्यांनी योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेत उत्पादन वाढवावं असं आवाहनही केलं.

आज ज्या शेतकऱ्यांनाचा सन्मान करण्यात आला त्यांचे खूप कौतुक. तसेच शेतकऱ्यांनी फळबाग लागवड व फुलं शेती करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दिपक कुटे यांनी केले.

'कृषी दिनानिमित्त प्रथम सर्वांना खुप शुभेच्छा. गेल्या वर्षी १२ ठिकाणी उपसा सिंचन योजना राबविण्यात आली. पडीक जमिनीवर शेतकरी भाजीपाला पीक घेत आहेत. इ कार्ड योजना, मधुमक्षिका पालन व कृषी पर्यटन क्षेत्रात शेतकऱ्यांना भरारी घेण्यासाठी नावीन्यपूर्ण योजना यावर्षी राबविण्यात येणार आहे. यासाठी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक श्री मनुज जिंदल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. आज कृषी दिनानिमित्त मला महिला शेतकऱ्यांचा सन्मान आज करण्यात आला याचा मला आनंद आहे. शेती क्षेत्रात महिलांनी यावं, योजनांचा लाभ घ्यावा उत्पन्न वाढवत आर्थिक प्रगती करावी.' असे प्रतिपादन मा. कृषी विकास अधिकारी सारीका शेलार यांनी केले.

यावेळी कृषीतज्ञ डॉ. नामदेव म्हसकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. भात पिकांवर आधारित एकात्मिक पीक पध्दती या विषयावर माहिती देताना त्यांनी सांगितले की 'उत्पादन वाढविण्यासाठी वेगवेगळ्या मोहिम राबवायला हव्यात. ज्यावेळी आपण उपाययोजना आणि आपलं उत्पादन वाढतं त्यावेळी पैशाच्या स्वरूपात वाढ होण्यासाठीही आपण प्रयत्नशील व प्रगतशील असणे गरजेचे आहे. उत्पादन खर्च वाढला की उत्पादन कमी होते. अशावेळी शासकीय योजनांचे लाभ घेणे गरजेचे आहे.'

आपल्या रोजच्या आहारात तृणधान्य असायला हवं. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढाकार घेत तृणधान्य वाढीसाठी कार्य करावं असं आहारतज्ञ डॉ. महेश पाटील यांनी सांगितले. तसेच भात पिक लागवडीची SRT पद्धतीने शेती करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. SRT शेती संदर्भातील माहिती देताना सांगितले की, एका वर्षात भात शेती करण्यासाठी दहा हजार रुपये खर्च करून उत्पादन वाढीसाठी SRT पद्धतीने शेती करण्यात यावी असेही आवाहन त्यांनी केले.

शेतकऱ्यांचा संघर्ष वर्षानुवर्षे चालत आहे. पण आमच्याकडे कृषी विभागाकडून महत्त्वाचे सहकार्य लाभले आहे. शेतकरी आज आधुनिक शेती करतोय त्यामुळे उत्पादन वाढत आहे. म्हणूनच शिक्षण घेऊन नोकरी न करता मी शेती करतोय याचा मला अभिमान आहे. शेतकरी म्हणून आज सन्मानित केल्याबद्दल मी आभार मानतो - निलेश वाळिंबे, शेतकरी

या सगळ्यात मोलाचे योगदान देणारे व शेतकऱ्यांच्या मागे कायम भक्कम उभे राहणाऱ्या कृषी विभागातील अधिकाऱ्यांचाही यावेळी तुळशी रोपं देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते, मा. विभागीय कृषि सहसंचालक, कोकण विभाग डॉ. अंकुश माने, मा. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दिपक कुटे, कृषी विकास अधिकारी सारीका शेलार, सचिन थोरवे, आहार तज्ञ डॉ. महेश पाटील, कृषी तज्ञ डॉ. नामदेव म्हसकर, तालुका स्तरावरील सर्व कृषी विकास अधिकारी, शेतकरी, अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.

28/06/2023

कळव्यातील टाकोली येथील मकबा हाईट इमारतीत शॉक सर्किटमुळे अनेक स्फोट! घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान; कळवा पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात

27/06/2023

LIVE:- युतीतील घटक पक्षातील नेत्यांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Shabdamudra Live posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shabdamudra Live:

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share