अंबरनाथ गोळीबार प्रकरणी दोघांना अटक #ambernath
अंबरनाथच्या वांद्रपाडा परिसरात १८ जानेवारी रोजी एका व्यक्तीवर गोळीबारचा प्रयत्न करण्यात आला होता. आता याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केलीय.
संजय जाधव हे आपल्या मित्राच्या घरासमोर बसले असतांना रात्री 9:30 वाजताच्या दरम्यान आपल्यावर गोळीबार झाल्याची तक्रार संजय जाधव यांनी अंबरनाथ पश्चिम पोलिसांकडे केली होती त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेतला असता यामध्ये निशांत खच्ची आणि राहुल कुडिया या दोन आरोपींना अटक केली. आरोपी निशांत खच्ची याचे वडील नवीन खच्ची यांनी फिर्यादी संजय जाधव याना पैसे दिले होते आणि ते परत केले नाहीत या गैसमजातुन निशांत खची याने आपल्या दोन साथीदारांसह हा गोळीबार केल्याचं पोलीस तपासात समोर आलाय.
संजय जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी घटनास्थळावरू
उल्हासनगर : आयोध्या से आये हुंए ध्वज की निकाली गयी रॅली ! स्वामी विश्र्वातमानंद सरस्वती महाराज !
उल्हासनगर : म्हारळ खदाणीत जय भोले कन्स्ट्रक्शनने उभारला 60 क्यूबिक मीटर प्लांट ! #ulhasnagar #news
उल्हासनगर शहराला दर्जेदार रस्ते आणि मजबूत काँक्रिट मिळण्यासाठी उल्हासनगर जवळील म्हारळ खदाणीत 60 क्यूबिक मीटर प्लांटची उभारणी करण्यात आलीय,जय भोळे कंपनीच्या माध्यमातून हा प्लांट उभारण्यात आला असून प्रभू श्रीराममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून आज ह्या प्लांटचं उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उल्हासनगर महापालिकेत शेकडो ठेकेदार असून काही मोजक्याच ठेकेदारांकडे स्वतःचे प्लांट आहेत,आता आणखी एक भर जय भोळे कंपनी च्या माध्यमातून पडलीय.त्यामुळे उल्हासनगर शहराला दर्जेदार रस्ते मिळतील अशी अपेक्षा ठेकेदारांनी व्यक्त केलीय ,यावेळी प्लांट ला शुभेच्छा देण्यासाठी शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती ,ठेकेदार उपस्थित होते.
उल्हासनगर : प्रभाग 15 मध्ये आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते विकासकामांचं भूमिपूजन ! 34 लाखांच्या निधीतून पायवाटा आणि भुयारी गटार ! #ulhasnagar #news
उल्हासनगर महापालिका अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक १५ मधील सेक्शन 29 आणि 30 परिसरातील विकासकामांचं भूमिपूजन आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झालंय. बॅरेक क्रमांक १५२६,१५२७ आणि १४८८,१४८९ मधील नागरिकांना अनेक दिवसांपासून समस्यांना सामोरे जावे लागत होते.याविषयी सिंधी सेल चे संजय रामरख्यानी यांनी आमदार गणपत गायकवाड यांच्याकडे पाठपुरावा करून ३४ लाखांचा निधी मंजूर करून आणलं आणि आज विविध मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलंय,त्यामुळे येथील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध होणार असून नागरिकांनी आमदार गणपत गायकवाड यांचे आभार मानले आहे.
बदलापूर : रिंग रोडवर स्टंटबाजी करताना अपघात ! स्टंटबाजीचा थरार मोबाईल मध्ये कैद #badlapur #stunt
बदलापूर पूर्वेच्या रिंग रोडवर स्टंटबाजी करताना एका कारचालकाचा अपघात झालाय. सुदैवानं या अपघातात जीवित हानी झाली नाही. या रोडवर मोठ्या प्रमाणात दुचाकी आणि कारचालकांकडून स्टंटबाजी केली जाते. असाच प्रकार या रोडवर प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका कारचालकाकडून स्टंटबाजी करून केला जात होता.तेव्हा हा अपघात झाला.अपघातानंतर स्थानिकांनी या चालकाला पकडून ठेवले होते.रस्त्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात इमारती असल्याने नागरिकांची आणि वाहनांची वर्दळ या रस्त्यावर असते. त्यामुळे अशा प्रकारच्या स्टंटबाजांना जर आवर घातला नाही तर एक मोठा अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.पोलिसांनी देखील याची दाखल घेऊन हे जीवघेणे स्टंट बंद करून कायदेशीर कारवाई करण्या
अंबरनाथमध्ये एमआयडीसी कंपनीला भीषण आग #ambernath
अंबरनाथमध्ये एका कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडलीय.एमआयडीसी परिसरात असलेल्या कॅनरा इंजीनियरिंग वर्क या कंपनीला सायंकाळच्या सुमारास आग लागली. आगिमध्ये कंपनीचे साहित्य जळून खाक झाले आहे. त्याचबरोबर कंपनीच्या परिसरात जे काही साहित्य ठेवण्यात आले होते त्याला देखील आग लागल्याने आगीचा आणखीन भडका उडाला. अंबरनाथ नगरपालिकेचे अग्निशमन दलाला याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत घेतली आहे.सध्या आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.दरम्यान शेजारी असलेल्या कंपन्यांना या आगीची झळ बसू नये यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचे प्रयत्न सुरू आहेत. आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळते आहे. गेल्या एक आठवडाभरात अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात कंपनीला लागलेली ही दुसरी आगीची मोठी घटना आहे.
उल्हासनगर : गोलमैदान मध्ये उभारली 85 फूट उंच श्रीराम मंदिराची प्रतिकृती ! राम कथेचे भव्य चित्र प्रदर्शन !
उल्हासनगर शहरात सात दिवस राम महोत्सवाचा आयोजन गोलमैदान परिसरात करण्यात आलं आहे, या महोत्सवात राम मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे, 70 फूट लांब आणि 85 फूट उंच अशी ही प्रतिकृती पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत, तसेच या महोत्सवात राम कथेवर आधारित भव्य असे चित्र प्रदर्शन ही येथे ठेवण्यात आले आहे , या चित्र प्रदर्शनात राम जन्मापासून सीता हरण असे सर्व प्रसंग यात दाखवण्यात आले आहेत.22 जानेवारी ते 1 फेब्रुवारी पर्यंत नागरिकांना राम भगवानचं दर्शन घेता येणार आहे.
बदलापूर : पिंपळाच्या पानावर साकारलं प्रभू रामचंद्राच पेंटिंग ! चित्रकार दीपा शिंगारे यांनी साकारलं पेंटिंग ! पिंपळाच्या जाळीदार पानावर बदलापूरच्या चित्रकार दीपा शिंगारे यांनी साकारलं प्रभू रामचंद्राचं पेंटिंग !
चित्रकार दीपा शिंगारे यांनी पिंपळाच्या पानावर प्रभू रामाचं चित्र साकारलं आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात आपलं योगदान असावं यासाठी त्यांनी हे चित्र साकारलं आहे.
अयोध्येत उद्या रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. मागील पाचशे वर्षांपासून प्रत्येक भारतीयाला या क्षणाची आतुरता होती. आणि उद्या प्रत्यक्षात आयोध्येत रामल्ललाची मूर्ती स्थापन होणार आहे. या अविस्मरणीय सोहळ्यात आपलं काहीतरी योगदान असावं यासाठी प्रत्येक जण धडपड करत आहे. बदलापूर मधील चित्रकार दीपा शिंगारे यांनी पिंपळाच्या जाळीदार पानावर प्रभू रामचंद्राचं च
कल्याण : शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने "महाआरती व दिपोत्सवचे" आयोजन ! ५ हजार दिव्यांनी उजळणार ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला !
श्री क्षेत्र आयोध्या नगरी येथील प्रभू श्री रामजन्मभूमी मंदिरात मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त २२ जानेवारी रोजी शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने "महाआरती व दिपोत्सवचे" भव्य आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सायंकाळी ६ वाजता दुर्गाडी किल्यावर दिपोत्सव करण्यात येणार असून सुमारे ५ हजार दिव्यांनी दुर्गाडी किल्ला उजळून निघणार आहे. तर सायंकाळी ७ वाजता कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने शनिवार पासूनचे महाआरतीचे आयोजन करण्यात आले असून शनिवारी वडवली, आंबीवली याठिकाणी महाआरती आणि साखर व चणाडाळ वाटप करण्यात येणार आहे. रविवार
उल्हासनगर : जय श्रीराम झेंडा हवा आहे, आमदार कार्यालय गाठा !
अंबरनाथ : वडोल गावात अतिक्रमणावर एमआयडीसीने केली तोडक कारवाई ! 24 तासांच्या आतच कारवाई केल्याने अनेक संसार उघड्यावर ! एमआयडीसी प्रशासनाविरोधात स्थानिकांनी व्यक्त केला रोष !
अंबरनाथमच्या वडोल गावातील अतिक्रमणावर एम आय डी सी प्रशासनाने आज सकाळी तोडक कारवाई केली आहे. एक दिवस आधी नोटीस देऊन दुसऱ्या दिवशी सकाळीच हि कारवाई केल्याने अनेक संसार उघड्यावर पडलेत. तर स्थानिकानी या जागेच्या मालकीबाबत एम आय डी सी प्रशासनाकडून मालकी हक्काबाबत माहिती अधिकारातून माहिती मागितली असता एम आय डी सी प्रशासनाकडे ती उपलब्ध नसल्याचं उत्तर स्थानिक गावकर्यांना एम आय डी सी प्रशासनाने दिलय. मात्र मांगवारी सायंकाळी नोटीस देऊन बुधवारी सकाळी पोलीस बळासह हि कारवाई केल्याने अनेक संसार उघड्यावर पडलेत. प्रशासनाने आम्हाला २४ तासांचाही वेळ न देता थेट जेसीबीच्या साह्याने आमचे
बदलापूर च्या केमिकल कंपनीत भीषण स्फोट ! ४ किमीपर्यंत हादरे, एका कामगाराचा होरपळून मृत्यू !
बदलापूरच्या खरवई एमआयडीसीमधील विके केमिकल कंपनीत पहाटेच्या सुमारास मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली. या स्फोटामुळे तीन ते चार किलोमीटर परिसरात असणाऱ्या इमारतींना मोठे हादरे बसले आहेत. या केमिकल कंपनीला आग लागल्याने बाहेर असणाऱ्या दोन टेम्पोमधील केमिकलमध्ये प्रथम आग लागली त्यानंतर ही आग कंपनीमध्ये पसरली, अशी माहिती कंपनीतील कामगारांनी दिलीय.या स्फोटात चार ते पाच कामगार गंभीर जखमी झाले असून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी बदलापूर, अंबरनाथमधील अग्निशमन गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश आलं आहे. आता कुलिंगचे काम सुरू आहे.
उल्हासनगर मधून निघाली राममंदिर प्रतिकृती रथयात्रा ! भुल्लर महाराज यांच्या प्रभागात जल्लोष ! दर्शनासाठी नागरिकांची तुफान गर्दी
अयोध्येत २२ जानेवारीला राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यासाठी सर्वांना जाणं शक्य नाहीय ,घर बसल्या सामान्य नागरिकांनाही प्रभू श्रीरामाचं दर्शन घेता यावं यासाठी उल्हासनगर शहरात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून राम मंदिराची प्रतिकृती हुबेहूब मंदिर रथ आणण्यात आलंय,आज या मंदिर रथाची संपूर्ण उल्हासनगर शहरात भव्यदिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती,यावेळी शहरप्रमुख भुल्लर महाराज यांच्या प्रभागात ह्या रथाचं आगमन होताच मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं,तसेच ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती ,नागरिकांनी दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती,यावेळी भुल्लर महाराज यांनी श्रीकांत श
उल्हासनगर : रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात ! वाहतूक नियमांचं पालन करण्यासंदर्भात मार्गदर्शन ! #ulhasnagar #news #traffic_police #road_safety Dr. Balaji Kinikar Dr Shrikant Eknath Shinde Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Thane Police Commissionerate Team Omie Kalani Ulhasnagar Citizen Group Ulhasnagar Aditya Thackeray Kisan Kathore Kapil Patil Dipesh Mhatre Mahesh Gaikwad Shivsena - शिवसेना Dombivli Rocks Narendra Pawar Ajit Pawar Badlapurkar - बदलापूरकर Kumar Ailani Aditi Tatkare Ulhasnagar District Congress Committee Bachhu kadu fan club Kamlesh Nikkam
उल्हासनगर शहरात रस्ता सुरक्षा अभियानाला सुरु करण्यात आली आहे. वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून दुचाकी चालकांसह चारचाकी चालकांचे प्रबोधन केले जाणार आहे. शहर वाहतूक शाखेबरोबर शहरातील वेगवेगळ्या संस्था, संघटनाच्या मदतीने ही जनजागृती सुरु करण्यात आलीय,सडक सुरक्षा सप्ताह अंतर्गत उल्हासनगर वाहतूक स्टेशन मध्ये वाहन चालकांमध्ये वाहतुकीच्या नियमांची जनजागृती करण्यासाठी म्हणजेच दुचाकी वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करा, चार चाकी वाहन चालवताना सीट बेल
उल्हासनगर : भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्या वार्ड अध्यक्षाला 50 हजाराची खंडणी घेताना रंगेहात अटक ! #ulhasnagar #news #crime #extortion Dr. Balaji Kinikar Dr Shrikant Eknath Shinde Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Team Omie Kalani Thane Police Commissionerate Ulhasnagar Ulhasnagar Citizen Group Kapil Patil Aditya Thackeray Kisan Kathore Dipesh Mhatre Mahesh Gaikwad Dombivli Rocks Shivsena - शिवसेना Narendra Pawar Ajit Pawar Kumar Ailani Badlapurkar - बदलापूरकर Badlapur's People Kamlesh Nikkam Aditi Tatkare Ulhasnagar District Congress Committee Bachhu kadu fan club
उल्हासनगरात बांधकामाची तक्रार मागे घेण्यासाठी ५० हजारांची खंडणी मागणाऱ्या भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्या वार्ड अध्यक्षाला ठाणे खंडणी पथकाने रंगेहाथ अटक केलीय.
उल्हासनगर कॅम्प एक मधील हार्दिक ज्वेलर्सच्या पाठीमागे आर.सी.सी. दोन मजली बांधकाम सुरू आहे. या बांधकामाची तक्रार भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्या वार्ड अध्यक्ष शांताराम शेळके याने महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना केली होती. ही तक्रार मागे घेण्यासाठी तक्रारदार शेळके
ठाणे : मकर पोंगल महोत्सवानिमित्त मानपाडा येथील टिकुजिनीवाडी जवळील श्री कोडुंगल्लूर अम्मा मंदिरात पोंगल अर्पण करताना महिला !
उल्हासनगर : राम मंदीर प्राणप्रतिष्ठा निमित्त खासदार शिंदे मार्फत साखर व डाळचे मोफत वाटप ! २२ जानेवारीला सर्वांच्या घरी दिवाळी साजरी होणार !
अयोध्येत नव्याने उभारण्यात आलेल्या राममंदिराची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी रोजी होणार आहे.त्यासाठी संपूर्ण देशभरात दिवाळी साजरी केली जाणार आहे,यासाठी कल्याण लोकसभेतही खासदार श्रीकांत शिंदे यांनी सर्व नागरिकांच्या घरात २२ जानेवारी हा दिवस दिवाळी सारखा सण साजरा झाला पाहिजे यासाठी साखर आणि डाळ चं मोफत वाटप केलय जातंय, आज खासदार श्रीकांत शिंदे यांनी उल्हासनगर शहरप्रमुख राजेंद्र सिंग भुल्लर महाराज यांच्या प्रभागात महिलांना साखर आणि डाळ चं वाटप केलय,संपूर्ण लोकसभेत असाच प्रकारे वाटप केल जाणार असल्याचे खासदार यांनी सांगितले.
शहापूर : दप्तर घ्या, बकऱ्या द्या,' म्हणत विद्यार्थ्यांची शहापूर पंचायत समितीवर धडक ! पंचायत समिती कार्यालयात भरली शाळा ! शाळेत शिक्षक नसल्याने केलं आंदोलन !
वारंवार मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्याने शिक्षण आमच्या हक्काचे असा नारा देत विद्यार्थी आणि पालकांनी आज शहापूर पंचायत समितीवर धडक दिली , "दप्तर घ्या आणि बकऱ्या द्या" अशी अजब मागणी त्यांनी यावेळी प्रशासनाकडे केली , तसेच यावेळी पालक आणि विद्यार्थ्यांनी पंचायत समितीतच शाळा भरवली, शहापूर तालुक्यातील साकडबाव, कोळी वाडी आणि अंबरवाडी या तीन शाळांमध्ये शिक्षकाची नेमणूक नसल्याने विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होत होतं ,त्यामुळे विद्यार्थ्यांनी पालकांनी हे अजब आंदोलन केलं, या आंदोलनानंतर शिक्षण विभागाला जाग येऊन तत्काळ या तिन्ही शाळांवर शिक्षकाची नेमणूक करण्यात आली , आणि त्यानंतर विद्यार्थी आण
अंबरनाथ ओर्डनन्स कामगारांचं नवीन पेन्शन विरोधात उपोषण
केंद्रसरकारच्या नवीन पेन्शन योजनेला विरोध करण्यासाठी देशातील दोन राष्ट्रीय कामगार संघटनांनी चार दिवस साखळी उपोषण सुरु केलय.
केंद्र सरकारने १ जानेवारी २००४ नंतर केंद्रीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना लागू केलीये. मात्र या नवीन पेन्शन योजनेला ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन आणि इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस या दोन राष्ट्रीय कामगार संघटनाणी तीव्र विरोध केला असून सध्या ८ जानेवारी ते ११ जानेवारी असे चार दिवस या कामगार संघटनांच साखळी उपोषन सुरु आहे, अंबरनाथ ओर्डनन्स मधील या दोन्ही कामगार संघटनांच्या कर्मचाऱ्यांनी साखळी उपोषण सुरु केलय. जे कर्मचारी २००४ नंतर नोकरीला लागलेत त्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यां
कल्याण : छ्त्रपती शिवारायांची वैशिष्ट्ये दैनंदिन आचरणात आणणे हीच खरी महाराजांना आदरांजली - माजी आमदार नरेंद्र पवार ! माजी आमदार पवार यांच्या संकल्पनेतील अनोख्या दिनदर्शिकेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन !
कल्याण पश्चिमेचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या अनोख्या अशा हिंदवी स्वराज्याच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ही दिनदर्शिका लोकांना योग्य दिशा दाखवण्याचे काम करेल अशी भावना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त करत नरेंद्र पवार यांना शुभेच्छा दिल्या.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्षे पूर्ण होत आहेत. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर एका हिंदू राजाचा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा