14/09/2022
*बँकर्स साहित्यिकांनो लिहिते व्हा!!*
*व्यास क्रिएशन्स्* प्रकाशन संस्थेचा प्रतिवर्षी बँकिंग विषयाला वाहिलेला *पासबुक आनंदाचे* हा दिवाळी वार्षिकांक प्रकाशित होत असतो. यंदा या अंकाचे *दहावे वर्ष* आहे. यंदा *पैसा – उत्क्रांती ते वित्तव्यवस्था* असा विशेषांकाचा विषय आहे. पैसा हे जगण्याचे साधन आहे. *पैशाच्या उत्क्रांतीपासून* मुद्रा, चलन, नाणी, नोटा ते अगदी *प्लॅस्टिक मनीपर्यंतचा* प्रवास यात मांडण्यात येणार आहे. बँकेचे आजी माजी अधिकारी, अध्यक्ष, संचालक, कर्मचारी, शिपाई, बँकिंग विषयाचे लेखक अभ्यासक यांना यात सहभागी होता येईल. बँकेत काम करीत असताना पैसा या संकल्पनेत वेळोवेळी होत गेलेले बदल, नाणी, नोटा यांचे व्यवहार करताना, कॅश काऊंटर सांभाळताना आलेले *रंजक, विनोदी, हृदयस्पर्शी अनुभव, आठवणी,* किस्से, लिहून आम्हाला पाठवा!
हा अंक आपल्यातील सुप्त गुणांना वाव देणारा आहे.
तेव्हा लगेच उचला लेखणी आणि लिहून पाठवा भन्नाट, अफलातून किस्से आणि अनुभव!
फक्त पैसा या विषयाला धरुनच! *मेल आयडी* [email protected]
अधिक माहितीसाठी संपर्क - *7030616622*