Maharashtra Majha News

Maharashtra Majha News TV Media | Local News-Best News Its TV News | Broadcasting IN Digital Network Thane City | Channel Number 274 @9:30pm

03/06/2023

ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

02/06/2023

News Update :
ठाण्यातील जय जोशी याला दहावीच्या परीक्षेत मिळाले 98% मार्क्स

News Update : 350 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सजलेल्या दुर्गराज रायगड किल्ल्याच शिव स्वरूप
02/06/2023

News Update : 350 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सजलेल्या दुर्गराज रायगड किल्ल्याच शिव स्वरूप

01/06/2023

➤ शुक्रवारी ठाण्यातील काही भागाचा पाणीपुरवठा राहणार बंद

: महाराष्ट्र माझा न्यूज

01/06/2023

➤ अर्धवट कामांचे फोटो दाखवून; पालिकेच्या डेड लाईनची काँग्रेसकडून पोलखोल

: महाराष्ट्र माझा न्यूज

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे आमदार निरंजन डावखरे यांच्याकडून आभारठाणे, दि. 1१ (प्रतिनिधी) : मुंबई- गोवा रेल्व...
01/06/2023

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे आमदार निरंजन डावखरे यांच्याकडून आभार

ठाणे, दि. 1१ (प्रतिनिधी) : मुंबई- गोवा रेल्वेमार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचे आश्वासन पूर्ण केल्याबद्दल रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी आभार मानले आहेत. त्याचबरोबर कोकणातील स्थानिक नागरिक व पर्यटनाच्या दृष्टीने वंदे एक्सप्रेस वरदान ठरेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 3 जून रोजी वंदे भारत एक्सप्रेसला मडगाव येथे हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. या एक्सप्रेसच्या माध्यमातून मुंबई-गोव्याबरोबरच कोकणातील प्रवाशांचा प्रवास सुकर होणार आहे, याबद्दल आमदार डावखरे यांनी आनंद व्यक्त केला.

कोकणातील रेल्वेच्या विविध प्रश्नांसंदर्भात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील यांची मुंबईत 3 मार्च रोजी भाजपाच्या आमदारांनी भेट घेतली. या आमदारांमध्ये सर्वश्री प्रविण दरेकर, निरंजन डावखरे, गणपत गायकवाड, प्रसाद लाड आदींचा समावेश होता. त्यावेळी कोकणातील प्रवाशांचा प्रवास वेगाने होण्यासाठी शिर्डी व सोलापूरप्रमाणेच गोव्यापर्यंत वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली होती. त्यावेळी रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून, या मार्गाची पाहणी करण्यात येईल. त्यानंतर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचे आश्वासन राज्यमंत्री दानवे यांनी दिले होते. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांतच मुंबई-गोवा मार्गावर वंदे भारत धावणार असल्यामुळे आमदार निरंजन डावखरे यांनी समाधान व्यक्त केले.

01/06/2023

News Update :
शिवसेनेचे खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे मुंबईतील शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी शाखा निहाय भेट देऊन साधणार आज संवाद

31/05/2023

➤ जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त तंबाखूजन्य वस्तूंचे दहन

: महाराष्ट्र माझा न्यूज

31/05/2023

➤ क्लालिटी स्पोर्ट्स क्लबच्या क्रिकेट प्रशिक्षण वर्गाची सांगता

: महाराष्ट्र माझा न्यूज

31/05/2023

➤ जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त ठाण्यात जनजागृती रॅली

: महाराष्ट्र माझा न्यूज

31/05/2023

LIVE । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । निळवंडे धरणातून पाणी सोडण्याच्या प्रथम चाचणीचा शुभारंभ

: महाराष्ट्र माझा न्यूज ।

31/05/2023
News Update | ओटीटी माध्यमांसाठी तंबाखूजन्य पदार्थांच्या विरोधात नवे नियम; तंबाखू उत्पादनाचा उपयोग करण्यात आलेल्या कार्य...
31/05/2023

News Update | ओटीटी माध्यमांसाठी तंबाखूजन्य पदार्थांच्या विरोधात नवे नियम;
तंबाखू उत्पादनाचा उपयोग करण्यात आलेल्या कार्यक्रमांच्या सुरुवातीला आणि मध्ये कमीत कमी तीस सेकंदांसाठी तंबाखू विरोधातील चेतवाणी देणारी जाहिरात दाखवणे अनिवार्य असणार आहे.

30/05/2023

➤ THANE | आयआयआयडी इंटेरिअर डिझाईन परिषद ठाणे येथे संपन्न होणार

: महाराष्ट्र माझा न्यूज

30/05/2023

News Update :
काँग्रेसचे चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन, दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास; काँग्रेसचे राज्यातील ते एकमेव खासदार होते.

29/05/2023

IPL 2023 | चेन्नई सुपर किंग्स ने जिंकली पाचव्यांदा आयपीएलची ट्रॉफी; फायनल मॅच मध्ये गुजरातचा केला 5 विकेटने पराभव

29/05/2023

➤ THANE | घोडबंदर विभागात राष्ट्रवादीच्या मोफत दाखले वाटप शिबिराला उदंड प्रतिसाद

: महाराष्ट्र माझा न्यूज

News Update :कल्याण : माळशेज घाटात टेम्पो व ST बसची धडक,15 जण जखमी
29/05/2023

News Update :
कल्याण : माळशेज घाटात टेम्पो व ST बसची धडक,15 जण जखमी

26/05/2023

THANE | विविध मागण्यांसाठी महिलांचे ठिय्या आंदोलन

: महाराष्ट्र माझा न्यूज

26/05/2023

Shahaji Bapu Patil | संजय राऊत यांच्यावर शहाजी बापू पाटील यांची खरमरीत टीका

: महाराष्ट्र माझा न्यूज

News Update : बारावीचा निकाल जाहीर, राज्याच्या यंदाच्या निकालाची टक्केवारी 91.25 यंदाही निकालात कोकण विभागाने बाजी मारली...
25/05/2023

News Update : बारावीचा निकाल जाहीर, राज्याच्या यंदाच्या निकालाची टक्केवारी 91.25 यंदाही निकालात कोकण विभागाने बाजी मारली आहे. 96.01 टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल ठरलाय

IPL 2023, Eliminator Mumbai Indians vs Lucknow Super Giants :  मुंबई इंडियन्सने दणदणीत विजय मिळवताना क्वालिफायर 2 मध्ये ...
24/05/2023

IPL 2023, Eliminator Mumbai Indians vs Lucknow Super Giants : मुंबई इंडियन्सने दणदणीत विजय मिळवताना क्वालिफायर 2 मध्ये केला प्रवेश; पुढचा सामना गुजरात सोबत

शुक्रवारी ठाण्यात पाणी पुरवठा नाही; स्टेमची जलवाहिनी आणि मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी शट डाऊनठाणे (24) : स्टेम प्राधि...
24/05/2023

शुक्रवारी ठाण्यात पाणी पुरवठा नाही; स्टेमची जलवाहिनी आणि मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी शट डाऊन

ठाणे (24) : स्टेम प्राधिकरणाच्या जल वाहिनीची देखभाल दुरुस्ती आणि ठाणे महापालिकेच्या जल वाहिनीची साकेत पुलावरील दुरुस्ती या कामांमुळे शुक्रवार 26 मे रोजी सकाळी 9:00 ते शनिवार 27 मे रोजी सकाळी 9:00 वाजेपर्यंत ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

स्टेम प्राधिकरणाच्या जल वाहिनीची देखभाल, दुरुस्ती यांची कामे या अवधीत केली जाणार आहेत. तसेच, ठाणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जल वाहिनीची साकेत पूल येथे दुरुस्ती तसेच व्हॉल्व बदलेले जाणार आहेत. या कामांसाठी हा 24 तासांचा शट डाऊन घेण्यात येणार आहे.

या काळात घोडबंदर रोड, लोकमान्य नगर, वर्तक नगर, साकेत, ऋतू पार्क, कारागृह परिसर, गांधी नगर, रुस्तमजी, इंदिरा नगर, रुपादेवी, श्रीनगर, समता नगर, सिध्देश्वर, इटरनिटी, जॉन्सन, मुंब्रा आणि कळवा या भागातील पाणी पुरवठा शुक्रवार 26 मे रोजी सकाळी 9:00 ते शनिवार 27 मे रोजी सकाळी 9:00 वाजेपर्यंत बंद राहील. तसेच, पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.

● गुरूवारी कोपरीत पाणी नाही

कोपरी येथील ठाणे महापालिकेच्या धोबीघाट जलकुंभाची 500 मीमी व्यासाची मुख्य जलवितरण वाहिनी विकास कामात बाधित असल्याने स्थलांतरीत करण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी क्रॉस कनेक्शन घेण्यात येणार असल्याने गुरूवार, 25 मे सकाळी 9:00 पासून ते शुक्रवार 26 मे रोजी सकाळी 9:00 पर्यंत 24 तासांसाठी कोपरी परिसरातील धोबीघाट व कन्हैयानगर जलकुंभावरुन होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच, पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.

या काळात नागरिकांनी पाण्याचा योग्य साठा करून ठेवावा आणि महापालिकेस सहकार्य करावे अशी विनंती प्रशासनाने केली आहे.

: महाराष्ट्र माझा न्यूज

शहरातील तलावांमध्ये बोटिंगसाठी पर्यटकांना सुरक्षा साधने न दिल्यास ठेकेदारावर होणार कारवाई : आयुक्त अभिजीत बांगर ठाणे, [2...
24/05/2023

शहरातील तलावांमध्ये बोटिंगसाठी पर्यटकांना सुरक्षा साधने न
दिल्यास ठेकेदारावर होणार कारवाई : आयुक्त अभिजीत बांगर

ठाणे, [24] - ठाणे शहरातील विरंगुळ्याचे ठिकाण म्हणजे मासुंदा तलाव. सध्या शाळांना असलेल्या सुट्टयांमुळे बोटिंग सुविधा उपलब्ध असलेल्‌या तलावांवर सायंकाळच्या वेळेस नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. मासुंदा, उपवन, आंबे-घोसाळे व खारीगांव या तलावांवर महापालिकेच्यावतीने बोटींग सुविधा उपलब्ध असून याचा लाभ आबालवृद्ध घेत आहेत. बोटिंग करताना आवश्यक ती काळजी घेऊन सुरक्षेची साधने नागरिकांना उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे, जेणेकरुन अपघात होवून दुर्देवी घटना घडणार नाही, याकामी नियुक्त ठेकेदाराकडे सुरक्षा साहित्य उपलब्ध असताना देखील ते वापरले जात नाही किंबहुना मर्यादेपक्षा जास्त पर्यटकांची संख्या बोटिंगसाठी घेतली जाते ही अत्यंत गंभीर बाब आहे, याची महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी तातडीने दखल घेवून बोटिंग दरम्यान सुरक्षा जॅकेट व नियमांचे पालन न केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

मासुंदा तलाव हे ठाणेकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू. शनिवार, रविवार तसेच सुट्टयांच्या दिवशी या तलावांवर बोटींगसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी असते. सध्या महापालिका क्षेत्रात प्रमुख चार तलावांमध्ये बोटिंग सेवा ठेकेदारामार्फत सुरू आहे. परंतु पर्यटकांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा न पुरविता पेडल बोट उपलब्ध करुन दिल्या जातात. तसेच प्रवासी बोटीत क्षमतेपेक्षा जास्त पर्यटक बसविले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत आवश्यक ती खातरजमा करुन योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी महापालिकेच्या पर्यावरण विभागाला दिले होते.

त्यानुसार मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी मासुंदा व उपवन तलावाला भेट देवून प्रत्यक्ष वस्तुस्थितीची पाहणी केली. दरम्यान मासुंदा तलावात बोटिंग करताना क्षमतेपेक्षा जास्त पर्यटकांना प्रवासी बोटीत बसविणे, तसेच बोट तलावात असताना बोटीमध्ये सुरक्षा जॅकेटस् व इतर सुरक्षिततेची साधने दिसून आली नाहीत. ही बाब गंभीर स्वरुपाची असून पर्यटकांचा जीव धोक्यात घालणारी आहेत याबाबत संबंधित ठेकेदाराला सक्त सूचना देण्यात आल्या असून बोटींगमध्ये सुरक्षा जॅकेट घातल्याशिवाय बोट पर्यटकांच्या ताब्यात देवू नये, तसेच याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी बोटींग परिसराच्या दर्शनी भागात नियमावली लावण्याच्या सूचना आयुक्त श्री. बांगर यांच्या निर्देशानुसार प्रदुषण नियंत्रण अधिकारी मनिषा प्रधान यांनी मासुंदा व उपवन तलाव येथील बोटिंग सेवा चालविणाऱ्या ठेकेदाराला दिल्या आहेत.

तसेच शहरातील आंबे-घोसाळे तलाव व खारीगांव तलाव येथेही पाहणी करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. बोटिंग सेवेचा ठेका देताना सर्वसाधारण सभेने केलेल्या कराराचा भंग ठेकेदार करीत असल्यास ही बाब अत्यंत गंभीर व नागरिकांच्या जीव धोक्यात टाकणारी आहे. महापालिकेने दिलेल्या सूचनांचा भंग झाल्यास सार्वजनिक हिताचा विचार करुन संबंधित ठेकेदाराची बोटिंग सेवा बंद करण्याचा इशाराही आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिला आहे.

● नागरिकांना देखील सुरक्षेबाबत सतर्क रहावे

महापालिकेच्या तलावांमध्ये बोटिंगसाठी जाताना नागरिकांनी देखील नियमांचे पालन करावे तसेच यासंबंधी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक साधनसामुग्रीचा वापर करावा असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे. तसेच याबाबत काही उणीवा दिसून आल्यास महापालिकेच्या तात्काळ निदर्शनास आणून द्याव्यात असेही आयुक्तांनी नमूद केले आहे.

: महाराष्ट्र माझा न्यूज

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कसा मिळवावा ?मुख्यमंत्री सहाय्यता निधी टोल फ्री क्र. : ८६५०५६७५६७WebSite:- *https://w...
24/05/2023

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कसा मिळवावा ?

मुख्यमंत्री सहाय्यता निधी टोल फ्री क्र. : ८६५०५६७५६७
WebSite:- *https://www.mahacmmrf.com*
Email id:- [email protected]

राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील शिंदे-फडणवीस सरकारने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष अंतर्गत अर्थसहाय्य करण्यात येणाऱ्या आजारांच्या यादीत अनेक नवीन आजारांचा समावेश केला आहे.

*जास्तीतजास्त शेअर करा, गरजू रुग्णांपर्यंत पर्यंत पोहोचवा!*

■ मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
१. अर्ज ( विहीत नमुन्यात)
२. निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. (खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हील सर्जन यांचेकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे.)
३. तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला.
(रु. १.६० लाख पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.)
४. रुग्णाचे आधारकार्ड (महाराष्ट्र राज्याचे) लहान बाळासाठी (बाल रुग्णांसाठी) आईचे आधारकार्ड आवश्यक
५. रुग्णाचे रेशनकार्ड (महाराष्ट्र राज्याचे)
६. संबंधीत आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे.
७. अपघातग्रस्त रुग्णांसाठी चङउ रिपोर्ट आवश्यक आहे.
८. प्रत्यारोपण रुग्णांसाठी नढउउ / शासकीय समितीची मान्यता आवश्यक आहे.
९. रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी.

● अर्थसहाय्याची मागणी ई मेल व्दारे केल्यास अर्जासह सर्व कागदपत्रे PDF स्वरुपात (वाचनीय) पाठवावी.

Email id:- [email protected]

● व त्याच्या मुळ प्रती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कडे टपालाव्दारे तात्काळ पाठविण्यात यावेत.

■ *मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळणाऱ्या आजारांची नांवे.*

१. कॉकलियर इम्प्लांट ( वय वर्ष २ ते ६),
२. हृदय प्रत्यारोपण
३. यकृत प्रत्यारोपण
४. किडणी प्रत्यारोपण
६. बोन मॅरो प्रत्यारोपण
५. फुफ्फुस प्रत्यारोपण
७. हाताचे प्रत्यारोपण
८. हिप रिप्लेसमेंट
९. कर्करोग शस्त्रक्रिया
१०. अपघात शस्त्रक्रिया
११. लहान बालकांचे शस्त्रक्रिया
१२. मेंदूचे आजार
१३. हृदयरोग
१४. डायलिसिस
१५. अपघात
१६. कर्करोग (केमोथेरपी/ रेडिएशन)
१७. नवजात शिशुंचे आजार
१८. गुडघ्याचे प्रत्यारोपण
१९. बर्न रुग्ण
२०. विद्युत अपघात रुग्ण
================================================================================
या अशा *एकूण २० गंभीर आजारांसाठी* उपरोक्त तीनही योजनांचा लाभ मिळू न शकणाऱ्या आणि राज्यातील या योजनेत नोंदणीकृत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पात्र रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकीय समितीमार्फत तपासून अर्थसहाय्य दिले जाते.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी टोल फ्री क्र. : *८६५०५६७५६७*
*https://cmrf.maharashtra.gov.in/applicantEnquiryForm.action*
संपर्क क्र. ०२२-२२०२६९४८ मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष अंगीकृत असलेल्या रुग्णालयांची सविस्तर माहिती व *https://cmrf.maharashtra.gov.in/pdf/CMRFHospitalsList.pdf* रुग्णालयांची यादी वेबसाईटवर आहे.

: मंगेश नरसिंह चिवटे,
कक्ष प्रमुख,
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष, तथा विशेष कार्य अधिकारी, मुख्यमंत्री सचिवालय.
फोन - ९६१९९५१५१५
संपर्क - ०२२ - २२०२५५४०

Sent via needly.in/app

Sent via needly.in/app

24/05/2023

➤ आमदार जितेंद्र आव्हाड

➤सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सत्तासंघर्षाच्या निर्णयावरील आव्हाडांची भूमिका
➤महाविकास आघाडीने केले होते आयोजन

: महाराष्ट्र माझा न्यूज

23/05/2023

➤ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण

: महाराष्ट्र माझा न्यूज

22/05/2023

➤ मुख्यमंत्र्यांनी केली पावसाळ्यापूर्वीच्या कामांची पाहणी

: महाराष्ट्र माझा न्यूज । ठाणे

22/05/2023

➤ हुक्कापार्लरवर कारवाई;आमदार संजय केळकर यांची प्रतिक्रिया

IPL 2023 | Update :● मंगळवारी, 23 मे 2023 रोजी चेपॉक स्टेडिअमवर गुजरात आणि चेन्नई यांच्यामध्ये क्वालियाफाय 1 सामना ● बुध...
21/05/2023

IPL 2023 | Update :

● मंगळवारी, 23 मे 2023 रोजी चेपॉक स्टेडिअमवर गुजरात आणि चेन्नई यांच्यामध्ये क्वालियाफाय 1 सामना

● बुधवारी, 24 मे 2023 रोजी चेपॉक स्टेडिअमवर लखनौ आणि मुंबई यांच्यामध्ये एलिमिनेटरचा सामना

● नंतर क्वालिफायर 1 मध्ये पराभूत झालेला संघ ELIMINATOR मधील विजेत्या संघासोबत क्वालिफायर 2 मध्ये सामना खेळेल.

शिवसेना चित्रपट सेनेच्या अध्यक्ष पदी शिवसेना सचिव सुशांत शेलार यांची नियुक्तीशिवसेना मुख्य नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंद...
20/05/2023

शिवसेना चित्रपट सेनेच्या अध्यक्ष पदी शिवसेना सचिव सुशांत शेलार यांची नियुक्ती

शिवसेना मुख्य नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना चित्रपट सेनेची स्थापना करण्यात आली असून निर्माता/लेखन/अभिनय क्षेत्रातील मान्यवरांची कार्यकारिणीत नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्ष : सुशांत शेलार, उपाध्यक्ष : अभिनेता राजेश भोसले,शेखर फडके, केतन क्षीरसागर, भरत भानूशाली, शंतनु कुलकर्णी
सरचिटणीस : योगेश शिरसाठ, शर्मिष्ठा राऊत
चिटणीस : कु. अलका परब, अमित कुलकर्णी, विजय सुर्यवंशी, वैभव विरकर तर खजिनदार : शरद राणे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे शिवसेना प्रसार माध्यम समनव्यक दिनेश शिंदे यांनी कळवले आहे

: महाराष्ट्र माझा न्यूज

19/05/2023

➤ एकनाथ शिंदे यांचा पाहणी दौर्‍यानंतर पत्रकारांशी संवाद;

➤ मुंबई शहर व उपनगरातील नालेसफाई कामांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

: महाराष्ट्र माझा न्यूज

News Update :भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थान...
17/05/2023

News Update :
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी सी. टी. रवी, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, खासदार मनोज कोटक हेदेखील उपस्थित होते.

17/05/2023

➤ ठाणेकरांनी अनुभवला शून्य सावलीचा दिवस

घाडीगावकर यांचा शिंदे गटावर कार्टून वार, बेकायदेशीर व्हीप आणि गटनेता हे दोन पत्ते काढले तर बेकायदेशीर बंगला कोसळण्याचा इ...
17/05/2023

घाडीगावकर यांचा शिंदे गटावर कार्टून वार, बेकायदेशीर व्हीप आणि गटनेता हे दोन पत्ते काढले तर बेकायदेशीर बंगला कोसळण्याचा इशारा!

ठाणे:- ठाकरेंच्या शिवसेनेचे ठाणे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांनी शिंदे गटावर कार्टूनच्या माध्यमातून हल्लाबोल केला असून बेकायदेशीर व्हीप आणि बेकायदेशीर गटनेता हे दोन पत्ते काढले तर शिंदेंचा सत्तेचा बेकायदेशीर बंगला कोसळेल असा इशाराच घाडीगावकर यांनी कार्टूनच्या माध्यमातून दिला आहे.

आपल्या ट्विटर हँडल वरून घाडीगांवकर यांनी प्रसिद्ध केलेल्या कार्टून मध्ये म्हटले आहे की, बेकायदेशीर व्हीप आणि बेकायदेशीर गटनेता हे तळाला असलेले दोन पत्ते काढल्यास त्याच्यावर उभारण्यात आलेला सत्तेचा बंगला कोसळेल असे या कार्टून मध्ये दर्शविण्यात आले आहे. बेकायदेशीर बंगला हे कार्टून काढताना त्यात सर्वात तळाला बेकायदेशीर गटनेता, बेकायदेशीर व्हीप, त्याच्या वरच्या मजल्यावर शिंदेंनी पळवून नेलेला शिवसेना पक्ष, त्याच्या वरच्या मजल्यावर मंत्रीपदे आणि शेवटच्या मजल्यावर सरकार दर्शवण्यात आले आहे. तळाला असणारे बेकायदेशीर गटनेता व बेकायदेशीर व्हीप हे दोन पत्ते काढण्यासाठी हात पुढे सरसावलेले या कार्टून मध्ये दाखवण्यात आले आहेत.बेकायदेशीर व्हीप आणि बेकायदेशीर गटनेता हे दोन पत्ते काढल्यास सत्तेचा बेकायदेशीर बंगला कोसळेल असे घाडीगांवकर यांनी प्रसिद्ध केलेल्या या कार्टून मध्ये दर्शवण्यात आले आहे.

संजय घाडीगावकर यांनी आपल्या ट्विटर हँडल वरून हे कार्टून प्रसिद्ध करून शिंदे गटाला जोरदार टोला हाणला आहे.

17/05/2023

➤ आज ठाणेकरांना अनुभवता येणार शून्य सावली

: महाराष्ट्र माझा न्यूज

Address

Thane

Telephone

+919930608000

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maharashtra Majha News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category