Thane Newsmakers

Thane Newsmakers Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Thane Newsmakers, Media/News Company, Saket Road Thane West, Thane West.

*Kashmir: A 'Heaven on Earth'.._(Conditions Apply)*Kashmir is witnessing an unprecedented rush of tourists. Every single...
10/04/2024

*Kashmir: A 'Heaven on Earth'.._(Conditions Apply)*

Kashmir is witnessing an unprecedented rush of tourists. Every single hotel is fully booked. All tourist spots are teeming with hordes of tourists. At some places, even walking is difficult. Surprisingly, most of the tourists were of higher age groups.
Apparently, every Indian is keen to get a first-hand experience of the changed environment. All were happy to observe that J&K had been rescued from the abyss in which it had been sliding.
CRPF personnel are doing an admirable job through regular patrolling, to instil confidence in the populace.
The natural beauty of the valley is unparalleled. It is truly a heaven on earth...but then…whereas the Centre has made immense efforts to promote tourism, the local administration has failed miserably. It appears to have washed its hands off all the responsibilities.

Here are the grey areas which we felt that desperately need correction:

*Dal Lake*

The Dal Lake desperately needs dredging and cleaning up. The water has become dark black in colour. To live in the House Boats is hell because of the foul smell of the water and mosquitoes.
And one is literally trapped on the boats as you cannot go anywhere without the Shikara.
The gates for getting into the Shikara and the steps need urgent attention - they are slippery and broken at places.

*Mughal Gardens*

The garden is under renovation. Sadly, the upkeep and maintenance are not up to the mark. At many places, the steps need urgent repairs. There are no railings. Toilets are too far away and poorly kept. There is always a local goon demanding money for their use. There are no garbage bins. At one garden, security staff at the entry gate was retaining the entry tickets for recycling, thereby pocketing the money.

*Doodhpathari*

Although an excellent tarred road exits, taxies are stopped 2 km short of the tourist spot (Shaliganga river site) and the tourists are asked to get down. They are given three options to reach the site – walk both-ways in high-altitude area (8,957 feet); or hire a pony, by paying the demanded charges; or ride an ATV (a four wheeled all-terrain vehicle) for a fee of Rs 1,000-1,500 per person. With a single pillion rider straddled behind the driver, it is is an adventure and only the young can dare. As all the three options are unviable for most tourists, especially the elderly, they never reach the river site. The State Government is guilty of succumbing to the local hoodlums and thereby depriving the tourists of reaching Doodhpathari.

*Sonmarg*

It is an example of human ingenuity to mint money at the cost of others’ helplessness. The area was teeming with thousands of tourists. Heavy snowfall had covered the ground with a thick white blanket and the tourists were enjoying playing in the snow. However, lack of basic facilities made the visit a nightmare for most. There were no toilets at all. A few enterprising hotels had erected a tent in their backyard with a solitary pot, common for men and women. Even the path to the tent was terribly slippery, as it had not been cleared of snow. Users had to pay Rs 10 each. As it was freezing cold, the queues were long and the wait unbearable for some. It defies logic as to why the local authorities cannot build adequate toilet facilities.

*Pahalgam*

It is around 90 kms from Srinagar. Srinagar taxies are not allowed to take tourists to Aru Valley, Betaab Valley and Chandanwari. They have to hire a local taxi-union cab for Rs: 2,000. Thus, the tourists end up paying for two taxies – one, that they had brought from Srinagar (lying idle in Pahalgam) and the second one from the local union. Although the whole circuit is scheduled to take about 4-5 hrs, the local union drivers keep hurrying up the tourists to save time for the second trip. Worse, they never take the tourists to Chandanwari, stopping few km short and turning back. It is outright cheating. They charge for Chandanwari but go just one Km beyond Betaab Valley. There are no officials or policemen to help. The local drivers unite to act as bullies. All through the above trip, we did not come across a single toilet or a garbage bin or parking areas. It is chaos all around.

*Gulmarg*

It is around 60 kms from Srinagar. It is a beautiful place, famous for its gondola and the ski slopes. On reaching the place, one is attacked by hordes of guides, ponywalas and other vendors. Once again, to visit Bhutaphatri and the Maharaja Palace, one has to hire a local union taxi for Rs: 2500 as Srinagar taxies are not allowed to go there. Gondola tickets are sold on line. Mysteriously, they get sold out within minutes of the opening of sale. A ride in a gondola, is an experience of a lifetime. One is mesmerised by the sheer expanse of the glaciers. Last year gondolas hosted over 10 Lakh riders.
There are long queues for gondola, entailing wait for up to three hours. There were no shelters or benches for the tourists. Even the snow had not been cleared. Tourists had to hold hands to prevent slipping and falling. One is angered at the callousness of the administration. They make no effort to ensure safety and comfort of the tourists.

As Kashmir has recently emerged from the decades-long turmoil, it enjoys high curiosity
quotient. Understandably, tourists are rushing to Kashmir in lakhs. But beware.
All tourist places in Kashmir, are in mountainous/high-altitude areas, where the weather remains unpredictable. Bright sun-shine can suddenly turn into heavy rains or snowfall and even blizzards. Not one place has any shelter or benches for such eventualities. There are no rescue teams or medical aid posts. The Government has promoted Kashmir in a big way but infrastructure has not matched with the requirements.Are we going to wake up from the slumber only after a major tragedy.

The Government must get its act together and make sure that the tourists are not used as easy
prey by the local goons that dominate the tourism business in the *‘Heaven on Earth’*

Dayanand Nene

23/02/2024

मागण्यांची शेपूट आणि प्रसिद्धीची हाव असलेल्या एका माणसाचा देवा लवकरच उचल अशी भावना १२ कोटींपैकी किमान ८ कोटी महाराष्ट्रीयन जनतेच्या भावना...

श्री साई सार्वजनिक मंडळ आणि मिलिंद साटम आयोजित राबोडी ठाणें येथील माघी गणेशोत्सवाला जाऊन श्रींपुढे नतमस्तक झालो.. त्याप्...
16/02/2024

श्री साई सार्वजनिक मंडळ आणि मिलिंद साटम आयोजित राबोडी ठाणें येथील माघी गणेशोत्सवाला जाऊन श्रींपुढे नतमस्तक झालो.. त्याप्रसंगी...

आकाशगंगा कॉम्प्लेक्स समोरील सत्य नारायण पूजेला जाऊन नतमस्तक झालो. त्या प्रसंगी १९९२ साली कारसेवेला गेल्या बद्दल ज्येष्ठ ...
28/01/2024

आकाशगंगा कॉम्प्लेक्स समोरील सत्य नारायण पूजेला जाऊन नतमस्तक झालो.
त्या प्रसंगी १९९२ साली कारसेवेला गेल्या बद्दल ज्येष्ठ नगरसेवक आणि कारसेवक मिलिंद पाटणकर यांनी माझा सत्कार केला. तेव्हां सुरेश पाटील, प्रविण रानडे, योगेश भोईर, राजेंद्र पाटील, सुनील बोरसे आणि इतर कार्यकर्ते ही उपस्थित होते.
यामधील प्रविण रानडे योगेश भोईर आणि राजेंद्र पाटील यांनी सुध्दा त्यावेळी कारसेवेत भाग घेतला होता..

*काल सायंकाळी आम्ही सर्व रामभक्त साकेत मध्ये दयानंद नेने यांच्या निवासस्थानी  "चाय पे चर्चा " साठी भेटलो. त्याप्रसंगी का...
28/01/2024

*काल सायंकाळी आम्ही सर्व रामभक्त साकेत मध्ये दयानंद नेने यांच्या निवासस्थानी "चाय पे चर्चा " साठी भेटलो. त्याप्रसंगी कारसेवकांचा सत्कार करण्यात आला आणि राजेंद्र पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याची क्षणचित्रे..*

*अयोध्येत राम लल्ला मंदिराची प्राण प्रतिष्ठा - ठाण्यात वृंदावन सोसायटीत राम मंदिर प्रतिकृती ची रथ यात्रा, राम भजन आणि जल...
26/01/2024

*अयोध्येत राम लल्ला मंदिराची प्राण प्रतिष्ठा - ठाण्यात वृंदावन सोसायटीत राम मंदिर प्रतिकृती ची रथ यात्रा, राम भजन आणि जल्लोष*
(उत्तरार्ध )

रामाय तस्मै नमः च्या जयघोषाने अयोध्येत श्री रामलल्ला विराजमान झाले. ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात अन् साधू- संतांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सोमवारी (ता. २२) रामलल्लांची मंदिरातील गर्भगृहात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

या ऐतिहासिक सोहळ्याचा जल्लोष संपूर्ण देशभर करण्यात आला. रामनामाच्या गजराने संपूर्ण ठाणें शहर सुध्दा भक्तिरसात तल्लीन झाले होते.

या प्रसंगी वृंदावन सोसायटीत तर कार्यक्रमांची रेलचेल होती.
वृंदावन येथील रहिवासी किरण जोशी तसेच रामायण सेवा समिती आणि संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

प्राणप्रतिष्ठा होण्याच्या आदल्या दिवशी सकाळीं वृंदावन वासियांसाठी अयोध्येतील मंदिराची जशी च्या तशी अतिशय सुबक आणि भव्य अशी प्रतिकृती दर्शनासाठी आणण्यात आली होती.
प्रतिकृती पाहून जणू अयोध्येचे मंदिर आपल्या दारी आल्याचा भास होत होता.
खऱ्या मंदिराला आहेत तेवढेच आणि तसेच खांब, गर्भगृह कळस, नक्षीकाम या प्रतिकृतीला होते. ती पाहून अनेकांच्या नेत्रांचे पारणे फिटले.
शेकडो रहिवाश्यांनी खाली उतरुन या प्रतिकृतीचे स्वागत केले - आतील गर्भ गृहात असलेल्या प्रभू रामचंद्र, सीता माता आणि बंधू लक्ष्मण यांच्या मुरत्यांचे पूजन व आरती केली.
रामाच्या स्वागताचा भाग म्हणून वृंदावनात दिव्यांच्या माळा, आकाश कंदील लावून रोषणाई करण्यात आली होती. प्रभू रामाचे २१ फूट उंच कट आऊट हे मोठे आकर्षण होते.

जय श्री रामाची शाल हनुमानाला अर्पण:

प्रभू रामचंद्र यांच्या स्वागतात सर्व लोकांचा सहभाग असावा यासाठी किरण जोशी आणि आयोजकांनी शक्कल लढविली - प्रभू रामाच्या २ छोट्या कट आऊट जवळ त्यांनीं एक शालीने गुरफटलेला बोर्ड ठेवण्यात आला होता. लोकं यायचे , कट आऊट ला नमन करून फुले व्हायचे आणि शाली वर जय श्री राम असे लिहायचें. दोन दिवसात अशा ४ शाली प्रभू श्रीराम नावाने भरल्या.

प्राण प्रतिष्ठा सोहळाच्या दिवशी वृंदावन रहिवाशांनी सकाळीं रामाची आरती करुन या शाली मोठया भावूक्तेने शेजारच्या हनुमान मंदिरात जाऊन मारुती रायाला समर्पित केल्या.

२२ जानेवारी रोजी १२.२९ मिनिटांनी जशी मोदींच्या हस्ते प्राण प्रतिष्ठा संपन्न झाली तसा एकच जल्लोष करण्यात आला. फटाक्यांची आतिषबाजी करुन वृंदावन येथे आनंद व्यक्त करण्यात आला.

भजन संध्या

त्या दिवशी संध्याकाळी सर्व वृंदावन राम मय झाले होते.
सर्वप्रथम लहान मुलांसाठी एक राम रथ आणण्यात आला होता ज्यामध्ये बसून छोट्या राम सीता लक्ष्मण आणि हनुमान यांची संपूर्ण कॉम्प्लेक्स मध्ये मिरवणूक काढली गेली. या मिरवणुकीला तेथील बच्चे कंपनीने प्रचंड प्रतिसाद दिला.

त्यानंतर महिलांनी पुढाकार घेत वृंदावन बागेत एक छान दीपोत्सव करून दिवाळी साजरी करण्यात आली.

दीपोत्सव नंतर सर्वजण राम भक्ती संगमात डूबले.. K3 Entertaiment चे केतन कुमार, अमृत ठाकूर आणि सुमन यादव यांनी त्यानंतर दोन तास लोकांपुढे राम स्तुती भजने सादर केली ज्यामध्ये लोकं अक्षरशः भक्तिभावांत न्हाहुन निघाले.
महिला, पुरुष, तरूण, मध्यम वयाचे आणि अगदी ज्येष्ठ नागरिक सुध्दा भजन गंगेच्या तालावर थिरकत नाचत आनंद घेत होते.
यासर्वात आलेल्या भाविकांसाठी वृंदावनातील जनता, दुकानदार यांनी प्रसाद आणि इतर खाद्य पदार्थ यांची चंगळ ठेवली होती.
कार्यक्रमाच्या शेवटी किरण जोशी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि वृंदावन कॉम्प्लेक्स आणि तेथील रहिवाशांसाठी सुख शांती आरोग्य आणि समृद्धीचे साकडे श्रीरामाला घालून हा यादगार कार्यक्रम संपला.

जय श्रीराम 🙏

दयानंद नेने

राम लल्ला मंदिर प्रतिष्ठापना सोहळा - देशभरात हर्शोल्लास - ठाण्यात विविध कार्यक्रमात राबोडी येथे महायज्ञ तर वृंदावन सोसाय...
24/01/2024

राम लल्ला मंदिर प्रतिष्ठापना सोहळा - देशभरात हर्शोल्लास - ठाण्यात विविध कार्यक्रमात राबोडी येथे महायज्ञ तर वृंदावन सोसायटीत मंदिराची रथयात्रा, भजन संध्या व जल्लोष:

पूर्वार्ध - राबोडी

अयोध्येतील राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी रोजी होणारं अशी घोषणा नोव्हेंबर महिन्यात कऱण्यात आली आणि देश पूर्णपणे राममय होऊ लागला.
जसजशी तारीख जवळ येत होती तशी लोकांची उत्कंठा शिगेला पोचली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठानिमित्त घरोघरी श्री राम ज्योती प्रज्वलित करण्याचे आवाहन केले. हा ऐतिहासिक क्षण सुदैवाने आपल्या सर्वांच्या जीवनात आला आहे. या निमित्ताने सर्व 140 कोटी देशवासीयांनी 22 जानेवारी रोजी आपल्या घरी, अंगणात , पटांगणात श्री राम ज्योती प्रज्वलित करून दिवाळी साजरी करावी, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
तसेच मकरसंक्रांत ते २२ जानेवारी या कालावधीत देशवासीयांनी देशभरातील मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान राबवावे असे आवाहन त्यांनी केले.

मोदींच्या आवाहनानंतर सर्व देशवासी कामाला लागले. राजकारणी नेते यांनी कधी नव्हेते हातात झाडू पोच्छा घेतला आणि आपापल्या कॅमेरा वाल्याला घेऊन मंदिरात पोचले. काही क्षण का होईना पण त्यांनीं झाडू लगावला - फुल्ल टाईमपास - हातात ग्लोव, अंगाभोवती apron, तोंडाला मास्क, केसांवर प्लास्टिक टोपी - मजा आली बघायला.
याव्यतिरिक्त सर्वच जनता २२ तारखेला वेगवेगळे कार्यक्रम ठरवू लागलें - ठाण्यात अभिषेक,हवन,पूर्णाहुती, महाआरती, महाप्रसाद, कीर्तन, भजन, असे भरगच्च कार्यक्रम पार पडले.
प्रतिष्ठापना निम्मित जे कार्यक्रम झाले ते सगळेच रंगतदार होतें. लोकांचा सहभाग सर्वकडेच अति उत्तम होता. राम भक्तीने जणू सर्व झपाटले होते.

महायज्ञ

ठाणे शहरात दोन कार्यक्रम जे मी निवडले आहेत ते मी अतिशय जवळून अनुभवले, मी त्याच्या आयोजनाचा मध्ये थोडाबहुत सामील होतो.
पहिला कार्यक्रम म्हणजे राबोडी येथे आयोजित महायज्ञ आणि दुसरा म्हणजे वृंदावन सोसायटीत आयोजलेले वेगवेगळे कार्यक्रम.
तेथे तर तीन कार्यक्रम झाले - तीन ही उच्च दर्जाचे.

या दोनही विभागातील कार्यक्रमांचे एक समान धागा पकडायचा झाला तर तो म्हणजे हे कार्यक्रम खऱ्या अर्थाने जनतेच्या सहभागाने अयोजण्यात आले होते - ना कोणा नेत्याचा वरदहस्त ना लुडबुड. सर्वकाही त्या त्या भागातील उत्साही होतकरू तरुण होऊ घातलेले उद्याचे नेते आणि त्यांना खंबीरपणे साथ देणारे त्यांचें सहकारी, भागातील दुकानदार, होटेलवाले, छोटे मोठे उद्योजक आणि तेथील रहिवासी.
या परीसरात ऋतू पार्क, श्रीरंग, राबोडी - पंचगंगा, रुस्तमजी, साकेत - सगळीकडे खूप छान कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
पण आजच्या भागात आपण राबोडीतील महायज्ञाबद्दल माहिती घेणार आहोत.
राबोडी हा एकेकाळचा ठाण्यातील राहण्यासाठी भीतीदायक परिसर. धार्मिक तेढ, दंगे यासाठी प्रसिध्द. पण हळुहळू काळ बदलला आणि या परीसरात बऱ्यापैकी सलोखा निर्माण झाला आहे - पण कोणत्याही धार्मिक कार्यक्रमावेळी कधी काय घडेल, कोठे ठिणगी पडेल हे सांगता येत नाही. कारणं दोन्ही बाजूंना काही माथेफिरू असतात.

राम लल्ला मंदिराच्या प्राण्रतिष्ठापने निम्मित राबोडीत स्थानिक नेते प्रविण रानडे, योगेश भोईर, राजेंद्र पाटील, योगेश भुजबळ आणि अभिषेक कोलावडे यांनी महायज्ञ करण्याचे ठरवले.

राबोडी परिसरातील तब्बल १०८ जोडपी घेऊन होम हवन करायचे, रामाची आरती आराधना आणि महाआरती आणि त्यानंतर महाप्रसाद वाटप असा भरगच्च कार्यक्रम ठरला.
माजी नगरसेविका रत्नप्रभा पाटील यांनी त्यांचें मैदान उपलब्ध करून दिले आणि पहिला अडसर दूर झाला.
मुख्य काम होते निधी संकलनाचे. ते काम राजेंद्र पाटील, योगेश भुजबळ यांनी अंगावर घेतलें.
कार्यक्रमाच्या तंबू, महाप्रसाद, इतके सारे होमकुंड तयार करणे, गुरुजींशी संपर्क, लॉजिस्टिक्स, पोलिसांशी co-ordination, वीज कनेक्शन या सर्व गोष्टी - "जेथे काहीं कमी तेथें आम्ही फेम" प्रविण रानडे आणि योगेश भोईर यांनी चोख सांभाळल्या. त्यांच्या समवेत जशी रामासोबत वानर सेना होती तसे यांच्याबरोबर अभिषेक कोलावडे व स्थानिक कार्यकर्ते आणि रहिवाशांची पूर्ण टीम उभी होती.

राबोडी मध्ये महायज्ञ, ती मंत्राग्नी, गौमातेचे पूजन, राम नामाचा घोष, भगव्या ध्वजानी सजलेले रस्ते आणि घरे, श्री रामाचे मोठ्ठे कटाऊट, येताजाता जय श्री राम म्हणतं एकमेकांना भेटणारी माणसे हे तेथील वातावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत.
१२.२९ मिनिटांनी जशी प्राण प्रतिष्ठा पार पडली तसा उस्फूर्तपणे झालेला जय श्री रामाचा गजर, घोषणा, फटाके, वाटले जाणारे पेठे - यासर्वांनी भावनांच्यात राबोडी आणि राबोडीकर न्हाहून निघाले. तेथे असलेल्या सर्वांच्याच डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले.

राबोडी येथे एवढ्या मोठ्या प्रमाणावर महायज्ञ पहिल्यांदाच घडले असावे. हे यज्ञ करण्याचा विचार कसा आला याबाबत सांगताना प्रविण रानडे म्हणाले की - यज्ञ हि अतिशय सूंदर आणि दिव्य कल्पना आहे.. हजारो वर्षापासून तत्कालीन अखंड अशा भारतीय भूप्रदेशावर.. यज्ञ नियमित होत होते.. राम मंदिर झाले - ५०० वर्षांनी प्रभू रामचंद्र आपल्या घरी आले मग आता .. मंदीर.. तीर्थक्षेत्र... भक्ती.. .मूर्तीपूजा ...एकादशी.. सण उत्सव.. यज्ञ, आरत्या.. हया सर्वच्या सर्व घटकांचा आज जिर्णोद्धार होण्याची गरज आहे...... एखादी गोष्ट हजारो वर्ष टिकून राहते. त्यात नक्कीच नाही काहीतरी तथ्य असणार..

यज्ञ..

यज्ञ हा संस्कृतात शब्द आहे.. आणि तोही अतिप्राचीन..मग... त्याचा अर्थ शोधणे.... समजणे.... भारी अवघड... परंतू अशक्य तर नाहीच..यज्ञ हा शब्द यज ह्या धातूपासून... तयार झालेला आहे...ज्याचा अर्थ होतो मैत्रीकरण. संगतीकरण... आणि पूजा...... आता पूजा म्हणजे अगरबत्ती.. नारळ फुल नव्हें.... तर पूजनीय... आदरणीय... कृतज्ञता व्यक्त करता येईल असे....... वे ऑफ थिंकींग.. वे ऑफ लाईफ... अँड वे ऑफ वर्शिप... विचारप्रणाली... जिवनपणाली....पूजाप्रणाली..

यज्ञ करणाऱ्या वैदीकांनी..... वसूधैव कूदूंबकम.... संताचा तोच शब्द विश्वची माझे घर..... स्वधर्मसूर्य पाहो....( स्वधर्म म्हणजे स्वचा धर्म) एकच धर्म..... पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात उभा केला...... अगदी इतिहासात गेल.. तर मूर्तिपूजेच्या सहाय्याने .... हे निर्देशित होत की....( पोलीस जसे एखादा धागा पकडून अगदी थेट गुन्हेगारापर्यंत पोहोचतात..) . ... जगभरात जिथे जिथे मूर्तीपूजा होती ती केवळ न केवळ प्राचीन भारतीयांनी दिली... त्यासाठी ते जगभर फिरले..... मैत्री केली.... संगती केली.. त्यांना पूजाप्रणाली दिली... अखंड.. अखंड.. प्रचार आणि प्रसार त्यांनी केला... असो.

प्रभु श्रीराम घरी परतण्याचे आता देशात सुकाळ येईल - रामराज्य येईल अशी सर्वांना खात्री आहे. या महायज्ञाने पूनित झालेला राबोडी परिसर आणि तेथील जनतेच्या सुजलाम सुफलाम पणासाठी यज्ञाद्वारे प्रभू कडे प्रार्थना केली असे प्रविण रानडे यांनी शेवटीं व्यक्त केले.

(पूर्वार्ध समाप्त)

- दयानंद नेने

कार्यकर्त्यांच्या उत्साहात खडा?काल सायंकाळी ठाण्यात दोन महत्त्वाचे सार्वजनिक कार्यक्रम पार पडले.एक म्हणजे भाजपा शिवसेना ...
15/01/2024

कार्यकर्त्यांच्या उत्साहात खडा?

काल सायंकाळी ठाण्यात दोन महत्त्वाचे सार्वजनिक कार्यक्रम पार पडले.

एक म्हणजे भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा आगमी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मेळावा आणि दुसरा आनंदनगर परीसरात भाजपा प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी आयोजित केलेला व तीन दिवस सूरु असलेला राम कथा पठण आणि कारसेवक सन्मान कार्यक्रम.

रामकथा कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावून उपस्थितांशी संवाद साधला. त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील उपस्थित होते.

लोकसभेच्या जिल्ह्यातील तिन्ही जागा जिंकण्याचा निर्धार महायुतीच्या मेळाव्यात रविवारी करण्यात आला. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे, शिवसेना नेते नरेश म्हस्के, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमोद हिंदूराव आणि आनंद परांजपे यांच्यासह महायुतीच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी एकमुखाने व एकदिलाने कार्य करण्याचा निर्धार यावेळी केला.

मात्र या दोन्ही कार्यक्रमांच्या नंतर ठाण्याच्या राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू आहे. साधारण एकाच वेळी थोडे पुढे मागे असे हे दोन्ही कार्यक्रम होतें.
एकच शहर, ठिकाणे ही तशी जवळच. एक पाहुणे दोन्ही कार्यक्रमांना हजर राहणार होते असे असताना उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या मेळाव्याला बगल दिली - जेथे महायुतीचे हजारो फिल्डवर कार्यरत असलेले योद्धे जमले होते त्यांचा उत्साह द्विगुणित करण्याची संधी डावलून प्रदेशातील नेत्यांचा थ्रू नियुक्त पदाधिकाऱ्यांच्या पर्सनल कार्यक्रमात उपस्थित राहून फडणवीस यांनी काय संदेश ठाण्याच्या कार्यकर्त्यांना दिला अशी कुजबूज सुरू झाली आहे.

भाजपा कडून पक्षाने मेळाव्यासाठी २५ मंत्र्यांसह ५२ नेत्यांना वेगवेगळे भाग वाटून दिले आहेत त्यानुसार ते जाणारं असे स्पष्टीकरण पुढें येऊं शकते. कदाचित प्रोटोकॉल चे कारणं सुध्दा दिलें जाईल.
तरीपण कार्यकर्त्यांसाठी केवळ काहीं वेळ जर फडणवीसांनी काढला असता तर अधिक बरे झाले असते असा सुर अनेक कार्यकर्त्यांशी बोलताना मिळाला.

दयानंद नेने

*CHANEL perfume बद्दल राज ठाकरे यांनी सांगितलेली महत्त्वाची माहिती - जरुर बघा..*
08/01/2024

*CHANEL perfume बद्दल राज ठाकरे यांनी सांगितलेली महत्त्वाची माहिती - जरुर बघा..*

*गीत रामायण - दिवस १७**जेथे राघव तेथे सीता*
30/12/2023

*गीत रामायण - दिवस १७*

*जेथे राघव तेथे सीता*

Provided to YouTube by Sa Re Ga MaNirop Kasla Majha Gheta · Sudhir PhadkeGeet Ramayan Volume 3 And 4℗ Saregama India LtdReleased on: 1983-01-12Auto-generated...

*मुंबईपासून 50 किमी अंतरावर - आय.एस.आय.एस. (ISIS)**धक्का बसला?*भिवंडीजवळ एक गाव आहे. पडघा. येथील लोकसंख्या ९०% मुस्लिम आ...
26/12/2023

*मुंबईपासून 50 किमी अंतरावर - आय.एस.आय.एस. (ISIS)*
*धक्का बसला?*

भिवंडीजवळ एक गाव आहे. पडघा. येथील लोकसंख्या ९०% मुस्लिम आहे. एके दिवशी त्या गावाचे नाव बदलून अल शाम म्हणजेच ग्रेटर सीरिया असे ठेवले गेले . स्वत:ला स्वतंत्र घोषित करून गावाने शरियाची अंमलबजावणी केली.

गेल्या आठवड्यात NIA आणि 400 पोलिस कर्मचाऱ्यांनी गावात छापे टाकले आणि घरोघरी झडती घेतली. झडतीमध्ये मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांचे नकाशे, झाकीर नाईकचे व्हिडिओ, बंदुका, तलवारी, ६८ लाखांची रोकड, ३८ मोबाईल, ५१ हमासचे ध्वज, मुंबईतील ज्यू कम्युनिटी सेंटरसह ३ हार्डडिस्क, चबड हाऊस आणि ड्रोन सापडले. 400 ठिकाणी हवाई स्फोट घडवण्याची योजना होती.

युनूस, शाहनवाज आणि इम्रान या तीन दहशतवाद्यांच्या चौकशीदरम्यान दिल्लीतून पकडलेल्या आणि त्यांच्यावर 5 लाखांचे बक्षीस होते, असा खुलासा पुण्यात कार्यरत असलेल्या आयटी अभियंता जुल्फिकारने केला आहे.

झुल्फिकार हा त्यांचा नेता आणि फायनान्सर ठरला. पुण्यातून मुलांना भरती आणि प्रशिक्षणासाठी पाठवणाऱ्या डॉ.अदनानला ताब्यात घेण्यात आले. अदनान च्या चौकशी दरम्यान त्याचा दहशतवादी साकिब नाचन याला अटक करण्यात आली. ज्याने पडघाचे नाव अल शाम केले.

IED तज्ज्ञ साकिब नाचन यांना 1991 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. दयाळू SC ने त्याची शिक्षा कमी करून 10 वर्षे केली आणि 2001 मध्ये त्याची सुटका झाली.

तो सुधारला का? नाही.
मुंबई बॉम्बस्फोटात त्याला 10 वर्षांची शिक्षा झाली होती आणि 2017 मध्ये त्याची तुरुंगातून सुटका झाली होती.

तो सुधारला का? नाही.
तो प्रत्येक क्षणी भारताविरुद्ध कट रचत आहे.

एकदा दहशतवादी, नेहमीच दहशतवादी.

आमच्या सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत, एजन्सींना पुरावे गोळा करण्यासाठी खूप धडपड करावी लागते पण न्यायालये छोट्या छोट्या गोष्टींवरही संशयाचा फायदा देऊन दहशतवाद्यांना सहज सोडतात. किंवा सुधारणेच्या नावाखाली शिक्षा माफ करातात.

अनेक वेळा मतांसाठी त्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळतो.
राष्ट्र हिताचा विचार विरोधी पक्ष कधी करणार?

Maharashtra ISIS Module Padgha Bhiwandi |No Entry Media | Al-Sham|ISIS Amir Saquib Nachan |NIA |ATS|

https://youtu.be/ehfvvKrFY4Q

*Beware. रात्र वैऱ्याची आहे.*

-INSPIRED -K

*गीत रामायण - दिवस १२ वा**स्वयंवर झाले सीतेचे...*
25/12/2023

*गीत रामायण - दिवस १२ वा*

*स्वयंवर झाले सीतेचे...*

गीत रामायण मधील सुधीर फडके यांनी गायलेले स्ववरेडे सीतेचे ऐका. फक्त वरSong - Swayamvar Zale SitecheArtist - Sudhir Phadke, ChorusMusic Direct...

राबोडी तील ठाणें भाजपा चा चेहरा - प्रविण रानडेFace of Thane BJP in Rabodi - Praveen Ranade प्रसंग १:धाडसी वृत्तीसन १९९५....
24/12/2023

राबोडी तील ठाणें भाजपा चा चेहरा - प्रविण रानडे
Face of Thane BJP in Rabodi - Praveen Ranade

प्रसंग १:

धाडसी वृत्ती

सन १९९५. स्थळ: ईदगाह मैदान, हुब्बळी, कर्नाटक.

हुब्बली येथील ईदगाह मैदानात तेथील मुसलमान लोकं १५ ऑगस्ट किव्वा २६ जानेवारी ला राष्ट्रीय ध्वज फडकावून देत नसत. विश्व हिंदू परिषद तथा अन्य संघटनांनी परवानगी मागितली तरी कर्नाटक सरकार कधी परवानगी देत नसे.
या वर्षांपूर्वी आधी दोन वेळा यासाठी आंदोलने झाली होती.
१९९५ मध्ये भाजप नेत्या उमा भारती यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनं करायचे ठरले. त्यावेळचे मुख्यमंत्री काँगेस चे वीरप्पा मोईली यांनी १५ ऑगस्ट रोजी सकाळी ईदगाह परीसरात जमाव बंदी लावली. जमावबंदी चा तो हुकूम तोडून भाजपाचे कार्यकर्ते भारतीय तिरंगा फडकवण्यासाठी मैदानात घुसले. त्यात दोन विशीतले तरूण होतें.

मैदानात घुसलेल्या तरुणांवर पोलिसांनी लाठी हल्ला, अश्रू धूर आणि शेवटीं गोळीबार सुरू केला. त्यात त्या दोन तरुणांपैकी एकाला - २० वर्षांच्या प्रसन्न ला गोळी लागून तो शाहिद झाला तर दुसरा तेवीस वर्षाच्या त्याचा मोठा भाऊ जायबंदी झाला.
मोठया भावाच्या डोळ्यासमोर धाकटा भाऊ बळी पडतो - का तर पोलीस आणि कर्नाटकातले काँग्रेस सरकारला त्यांना स्वतंत्रता दिवशी तिरंगा फडकावून द्यायचा नसतो.

आपल्या डोळ्यासमोर धाकट्या भावाला - प्रसन्न ला मृत्यू मुखी पडताना पाहणारा आणि स्वतः जायबंदी होणारा तो मोठा भाऊ होता प्रविण रानडे.

प्रसंग २:

निडर, धडाडी, गो-मातेवर प्रेम

साल २०००. स्थान: ठाणें राबोडीत ला कत्तलखाना. काही बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना कुणकुण लागली की त्या कत्तलखान्यात गाईंची कत्तल होणारं आहे.
गौहत्या थांबवण्यासाठी मुंबई हायकोर्टात एक याचिका दाखल केली होती. कोर्टाला पुरावे हवे असतात. ते मिळवण्यासाठी एक तरूण धाडस करतो. तो आपली गाडी राबोडीतल्या त्या चिंचोळ्या गल्लीत घालतो. गल्लीच्या दुसऱ्या टोकाला कत्तलखाना आहे. तेथे तो उतरतो आणि तेथील एका खिडकीच्या फटीतून मोठया हिंमतीने आतले फोटो काढू लागतो.
अचानक आवाज येतो - वो देखो काफिर क्या कर रहा है - पकडो मारो साले को..
तो तरूण वळतो, गाडीच्या दिशेने धावतो, ड्राइव्हर ला सांगतो जलदी गाडी निकालो.. पण...
एक हातगाडी वाला आपली हातगाडी मध्ये घालून गाडी अडवतो. तरूण गाडीत बसण्यासाठी दार उघडतो तेवढ्यात मागून येणाऱ्या घोळक्यातील एक जण त्याच्या डोक्यात रॉड मारतो.
तरूण खाली कोसळतो आणि मग तो घोळका त्याला लाथा बुक्क्यांनी तुडवत त्याच्या गाडीवर हल्ला करून तिची तोडफोड करतात. रक्तबंबाळ तरुणाला ड्राइव्हर कसाबसा गाडीत कोंबतो आणि वाटेत अडथळा असलेल्या हातगाडीला उडवत गाडी वेगाने क्रांतीनगर मधून बाहेर काढतो.
तेथे पोलिस असतात. बेशुद्ध रक्तबंबाळ तरुणाला ते तत्काळ सिव्हिल हॉस्पिटल मध्ये नेतात. उपचार सुरू होतात.

देव तारी त्याला कोण मारी - तो तरूण त्या जीवघेण्या हल्ल्यातून वाचतो.
त्याच्यावर उपचार सुरू असताना तेथे आनंद दिघे साहेब पोचतात.
हा तरूण कसाही करुन वाचलाच पाहिजे असे डॉक्टरना सारखे सांगत असतात.
तो धोक्याच्या बाहेर आहे हे समजल्यावर त्याची भेट घेऊन दिघे साहेब निघतात.
गोहत्या थांबवण्यासाठी स्वतःच्या जीवावर खेळणाऱ्या त्या तरुणाला दिघेसाहेब "वीरपुत्र" असे संबोधतात.

तो तरूण म्हणजे प्रविण रानडे.

प्रसंग ३:

रामभक्त

"अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी चे आंदोलनं"
सन १९९० व १९९२.

१९८९ मध्ये विश्व हिंदू परिषदेने अयोध्येत बाबरी ढाचा जेथे होता तीच प्रभू श्री राम यांचे जन्मस्थान आहे आणि त्या ठिकाणीच राम मंदिर उभारण्यासाठी आंदोलनं छेडले. पुढें आंदोलनाला भाजपाने समर्थन दिले.
या आंदोलनाने देशला झपाटून टाकले होते. आंदोलनातील टप्पे म्हणून १९९० आणि १९९२ मध्ये अयोध्येत कारसेवा आयोजण्यात आली होती. देशातली लाखो लोकांप्रमाणे ठाण्यातील एक तरूण सुध्दा कार्सेवेत सहभागी झाला होता. १९९२ मध्ये बाबरी ढाचा पाडल्यानंतर अयोध्ये हून ठाण्याला परत आल्यानंतर त्या तरुणाला आणि त्यांच्या तुकडीला अटक करण्यात आली आणि ७ दिवस जेल मध्ये काढावे लागले होते.
(बघा त्यावेळचे सरकार आणि राज्यकर्ते किती नीच आणि हिंदू द्वेष्टे होते).
हे तरूण ठाण्यात परतल्यानंतर प्रसिध्द पत्रकार अनिल थत्ते यांनी गगनभेदी मध्ये "आज या तरुणांच्या हातात बेड्या असतील पण उद्या सोन्याच्या कड्या असतील असे कौतुक केले होते.
तो तरुण म्हणजे प्रविण रानडे.

प्रसंग ४

देशासाठी

सन १९९२:
मुरली मनोहर जोशी यांची कन्या कुमारी ते काश्मिर एकता यात्रा.

काश्मीर बचाव आंदोलनाच्या निमत्ताने भाजपा नेते मुरली मनोहर जोशी यांनी कन्या कुमारी ते काश्मिर एकता यात्रा काढली होती.
हेतू होता की २६ जानेवारी रोजी काश्मीर मध्ये लाल चौकात तिरंगा फडकवायचा. ठाण्यातून एक तुकडी जम्मू ला पोचली आणि तेथून पोलिसांची नजर चुकवून काश्मीर मध्ये प्रवेश करण्याआधी त्यांना आर. एस. कॅम्प येथे अटक करण्यात आली.
त्या तरुणांच्या तुकडीमध्ये प्रविण रानडे होता.

प्रसंग ५

जागरूक नागरीक

सन २००२

स्थळ सरस्वती शाळा, राबोडी, ठाणें

ठाणें महानगर पालिका निवडणुक

त्यावेळी मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही नेते आणि कार्यकर्ते शेजारील राबोडीतील अनेक लोकांना बोगस मतदान करण्यासाठी आणत होते. त्या सर्वांना शाळेच्या गेटवर रोखणारा आणि नडून त्यांना आत प्रवेश न देणारा भाजपाचा निडर कार्यकर्ता होता - प्रविण रानडे.

प्रसंग ६

धर्मा साठी

सन २००८

राबोडीतील धार्मिक दंगल

नवरात्र सणाच्या दरम्यान उसळलेल्या या दंगलीत वातावरण शांत करण्यासाठी जीवाची पर्वा न करता घरातून बाहेर पडला, अडकून पडलेल्या बांधवांना आपल्या बिल्डिंग मध्ये आसरा आणि संरक्षण दिले, निष्पाप लोकांना त्रास होऊ नये म्हणून स्वतः वर केस घेतली आणि २७ दिवस तुरुंगवास भोगला - ती व्यक्ती म्हणजे प्रविण रानडे.

प्रसंग ७

सृजनशील

सन २००५ आणि २०१७

स्थळ राबोडी ठाणें.
या दोन वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे राबोडीत पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्या वेळी स्थानिकांना दिलासा, स्थलांतर करून सहारा, त्यांची भोजन व्यवस्था, निवाऱ्यासाठी सतरंज्या आणि चादरी ची सोय हे सर्व स्वतः च्या घराकडे प्रसंगी दुर्लक्ष करून आपल्या सहकाऱ्यांसह करणारा प्रविण रानडे.

प्रसंग ८

सामजिक बांधिलकी

सन २०२०-२१

कोविड महामारी

कोविड महामारीत आपल्या सहकाऱ्यांसह लोकांना मास्क, sanitizer, स्वच्छता अभियान, औषध फवारणी, अन्नधान्य व्यवस्था, गरजूंना ambulance उपलब्ध करून देणे, इस्पितळात भरती करण्यात मदत, लसीकरण अशी सर्व व्यवस्था प्रविण रानडे यांनी केली.

अजातशत्रू व्यक्तिमत्त्व

प्रविण "अण्णा" रानडे म्हटले की, सर्वसामान्यांचा मित्र आणि छोट्या कार्यकर्त्या पासून मोठ्या राजकीय नेत्यांना आपलेसे करू शकणारा मेहनती आणि धडपडणारा एक प्रखर राष्ट्रवादी आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ता हे चित्र डोळ्यासमोर येते.

प्रविण रानडे कधीही 'मी' पणा किंवा अहंकार बाळगून वागत नाही. म्हणूनच लहानातल्या लहान मुलापासून समवयस्क आणि वयोवृद्ध सर्वांना प्रविण रानडे आपला वाटतो!

प्रविण आज इथपर्यंत आला याचे कारण संघर्ष हेच त्याच्या जीवनाचे सूत्र असे समजून येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाण्याचे धाडस त्यानी आपल्या अंगी बाळगले आहे.

हिम्मत आणि परिस्थितीला सामोरे जाण्याचे, आव्हान स्वीकारण्याचे प्रविणचे व्यक्तित्व आहे. प्रसंग कोणताही असो, त्याच्याशी समरस होत समाजातील प्रत्येक घटकाचे सुखदुःख आपले मानून तो धडपडत असतो.
खरेतर प्रविण गर्भश्रीमंत बिलकूल नाही, आर्थिक दृष्ट्या तो मध्यमवर्गीयच आहे. परंतु गर्भश्रीमंत व्यक्तीलाही लाजवेल एवढे औदार्य आणि मोठेपणा त्याच्या मनामध्ये आहे.

प्रविण म्हणजे अगदी सहज ' ए अण्णा' म्हणून एकेरी हाक मारता यावी, एवढा सर्व स्तरातील जाती धर्माच्या पलीकडे जाऊन मैत्री जपणारा मित्रांचा हक्काचा मित्र ! राबोडी परिसरातील उद्योजक, व्यापारी व कार्यकर्ते यांच्यात कमालीचा लोकप्रिय मित्र व कार्यकर्ता!
गणेशोत्सव असो की नवरात्री की दिवाळी की महापुरुषांची जयंती की पक्षाकडून आलेला कोठचाही कार्यक्रम - प्रविण अगदी स्वतःला झोकून - अगदी तल्लीन होऊन कार्यरत होऊन जातो.

लहान मुलांसाठी जादूचे प्रयोग, त्यांच्यावर योग्य संस्कार व्हावे यासाठी कीर्तन, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी खाऊ वाटप, सामजिक बांधिलकी ओळखून दरवर्षी सफाई कामगारांना दिवाळी फराळ, १० वी व १२ वी तील यशस्वी मुलांचा सत्कार असे समाजोपयोगी उपक्रम त्याचबरोबर वीज बील घोटल्यासंबंधी, शिधा वाटप करण्यात उडणारा गोंधळ, लोकांना बस सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवाज उठवणे अशी आंदोलनात्मक कामे प्रविण रानडे करतं असतो.

• आजचा तारखेला राजकीय विश्लेषक आणि अभ्यासक म्हणून मी सांगतो की निर्विवादपणे प्रविण रानडे त्याच्या पक्षाचा राबोडी मधिल सर्वात लोकप्रिय 'चेहरा ' आहेत.
He is the most popular face of his party in Rabodi.

त्याचे विचार

• गाय ही हिंदूंकरता अत्यंत पवित्र आहे असे प्रविण मानतो. गोरक्षणाकरता हिंदु सहज प्राण देतो. आजही रस्त्याने जातांना गाय दिसली, तर नकळत अगदी सहज भक्तीभावाने गायीला तो स्पर्श करतो, वंदन करतो.
• गोहत्या थांबवण्यासाठी भारतीय गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करा. जर हा निर्णय अवघड असेल तर, गायी कत्तलखान्याला विकणाऱ्या शेतकऱ्यांकडून गायी खरेदी करण्यासाठी निधी तयार करा. शेतकर्‍यांना सरकारकडून तेवढीच रक्कम मिळाली तर ते गायी कत्तलखान्यात विकणार नाही अशी सूचना प्रविण ने केली.

• एकता यात्रेसंबंधी आठवण सांगताना प्रविण म्हणाला की 1992 मध्ये मुरली मनोहर जोशी हे भाजपच्या 'एकता यात्रे'चे प्रमुख शिल्पकार होते, पण त्यांच्या यात्रेची खरी कमान नरेंद्र मोदी यांच्याकडे होती. तेव्हा जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद शिगेला पोहोचला होता आणि लाल चौकात तिरंगा फडकावणे इतके सोपे नव्हते.
• त्यावेळी काश्मिरात तिरंगाही मिळत नव्हता, 26 जानेवारीला तिथे झेंडा फडकवायचा होता कारण हिवाळ्यात राजधानी बदलायची. तिथे लोकांकडे तिरंगाही नव्हता. मी लोकांना तिरंगा कसा फडकवला जातो असे विचारले असता त्यांनी सांगितले की, तिथे तिरंगा अजिबात मिळत नाही. १५ ऑगस्टला ही बाजारपेठेत ध्वज उपलब्ध नव्हता.
तिरंग्याचा मान राखला जावा आणि काश्मीर भारतापासून वेगळे होऊ दिले जाणार नाही, हा त्या एकता यात्रे मागचा उद्देश होता.

आज पर्यंतचा प्रवास

प्रविण रानडे हा बालपणापासून संघाचा कार्यकर्ता. त्यानें विश्व हिंदू परिषदेचे प्रखंडप्रमुख ही जबाबदारी ५ वर्ष पेलली आहे.
भाजपा मध्ये २०१० साली ठाण्यात मध्य मंडळ अध्यक्ष आणि पुढें शहर सचिव म्हणून काम पाहिले आहे. त्यानें दोन वेळा ठाणें महानगर पालिका निवडणुक राबोडी तून लढवली आहे.

योग्य संधीच्या शोधात

राजकारणात प्रत्येक योग्य व्यक्तीला राजकीय महत्वकांक्षा असतेच, मात्र ती महत्वकांक्षा सर्वांचीच पूर्ण होत नाही.

तशीच काहीशी अवस्था प्रवीण रानडे यांची आहे.

एक तर मुस्लिम बहुल विभाग. त्या परीसरात भाजपाचे संगठन आणि काम तसे मर्यादित. दुर्दैवाने आपल्या समाजात राजकरण हे एकतर धर्मावर, नाहीतर लाटेवर नाहीतर पैशांवर चालते.
प्रविण रानडे यांच्या दुर्दैवाने त्यांच्या विभागात वर दिलेल्या पैकी पहिला आणि तिसरा पर्याय जोरात चालतात.

मात्र आपली राजकीय महत्वकांक्षा पूर्ण झाली नाही म्हणून, हताश न होता. एक सामाजिक बांधिलकी म्हणून प्रविण समाजसेवेला प्राधान्य देऊन कार्य करतात. या कार्यामुळेच त्यांची लोकप्रियता आहे.

• हल्लीचे राजकीय लोक 'कार्यकर्ता' हा शब्द वापरू लागले, तेव्हापासून हा शब्द बदनाम झाला आहे.
त्याग, प्रामाणिकपणा, आत्मसन्मान, कल्पकता, चिकाटी या गुणांशी या शब्दाची असलेली नाळ तुटली आणि राजाश्रय, लुच्चेगिरी, चमचेगिरी, गुन्हेगारी, दिखावा, उद्दामपणा, लोचटपणा, यांच्याशी तो जोडला गेला..

• प्रविण रानडे मात्र या सगळ्यांपेक्षा वेगळा - खरा कार्यकर्ता आहे. राबोडी तील जनता हे जेवढ्या लवकर ओळखेल आणि त्यांना अवलंबेल तेवढं त्यांच्या साठी चांगले होईल.

प्रविण ला गरज आहे एका राजकीय संधीची. ती संधी वॉर्ड पुनर्रचनेतून मिळू शकते. किंवा एक चांगल्या कार्यकर्त्याचा पक्षाला उपयोग व्हावा म्हणून पक्षाने त्यांना नवा वॉर्ड लढायला दिला तर... पण हा पर्याय सध्या तरी अशक्य दिसतोय.

• आता एक राजकीय अभ्यासक म्हणून मी बोलतो - आहे त्या परिस्थितीत राबोडी जिंकताच येणार नाही असे नाही. मात्र त्यासाठी खूप तयारी आणि काही धाडसी निर्णय घ्यावे लागतील.
(या लेखाचा विषय तो नाही म्हणून इथेच थांबतो)

प्रविण रानडे सारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यांची समाजाला आज गरज आहे तशीच पक्षांना सुध्दा गरज आहे. बाहेर हून लोकं त्यांच्या मागण्या पूर्ण करून आयात करण्यापेक्षा पक्षाने प्रविण रानडे आणि त्याच्यासारख्या इतरत्र ही अन्य चांगल्या कार्यकर्त्याना बळ दिले तर भाजपा ची स्थिती ठाण्यात नक्कीच सुधारेल.

- दयानंद नेने

Address

Saket Road Thane West
Thane West

Alerts

Be the first to know and let us send you an email when Thane Newsmakers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Thane Newsmakers:

Videos

Share


Other Media/News Companies in Thane West

Show All