स्वराज्यस्वामिनी महाराणी येसूबाई

  • Home
  • India
  • Solapur
  • स्वराज्यस्वामिनी महाराणी येसूबाई

स्वराज्यस्वामिनी महाराणी येसूबाई स्वराज्यस्वामिनी महाराणी येसूबाई

प्रबोधन पर्व १ जानेवारी २०२३ पासून छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती या आपल्या फेसबुक पेजवरून छत्रपती संभाजी महाराजांच्या...
28/12/2022

प्रबोधन पर्व

१ जानेवारी २०२३ पासून छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती या आपल्या फेसबुक पेजवरून छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील घडलेल्या घटनांवर केलेल्या पराक्रमावर आणि जीवनातील असंख्य अश्या अनेक पैलूंवर उजाळा टाकणारे शंभू दिनविशेष व्हिडीओ स्वरूपात छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीच्या माध्यमातून चालू करत आहोत...
आजपर्यंत आपण सर्वांनी छत्रपती शिवरायांचे दिनविशेष विविध संघटनांच्या माध्यमातून पाहिले आहेत पण स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील दिनविशेष कोणीही केले नाहीत, छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीच्या माध्यमातून आपण शंभू दिनविशेष चालू करत आहोत शंभू दिनविशेष सर्व शिवशंभू भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे...
https://www.facebook.com/SambhajiMaharajSevaSamiti

मला जायचंय नाही, मला गेलच पाहिजेमाझा शंभू राजा माझी वाट पाहतोयंमरणाला न घाबरता कस जगायचंहे माझा राजा मला सांगू पाहतोयंत्...
07/01/2022

मला जायचंय नाही, मला गेलच पाहिजे
माझा शंभू राजा माझी वाट पाहतोयं
मरणाला न घाबरता कस जगायचं
हे माझा राजा मला सांगू पाहतोयं

त्याच्या रक्ताने जी माती न्हाऊन निघाली
तीच तर खरी अमर झाली
नाहीतर आजही स्वतःला शिवभक्त म्हणणारी
लोक मात्र तुळापूरला विसरली

राजं जरा चुकलच आमचं,
एकदा माफी असावी,
मनामनात पोहोच करू आम्ही इथली माती
बस त्याआधी तुम्ही एकदाच माफी द्यावी

महाराज, नेहमीच लीन असेल
तुमच्या चरणी ही सेवा समिती
देखावा म्हणून नाही तर मनापासून
करतील सारे शिलेदार एकमेकांशी सोबती

#छत्रपती_संभाजी_महाराज_सेवा_समिती #

22/12/2021

शंभू चरणी अर्पण _२

माथ्यावरून छत्र आईचे केव्हाच हरवले
दुसर्‍याच वर्षी शंभुराजे मायेला मुकले
जिजाऊंचे संस्कार अन धाराऊचा पान्हा
वाढतोय रायगडी शिवबाचा लेक तान्हा

@सीनाकन्या शिवानी, सोलापूर

शंभू चरणी अर्पण _१जन्मला सईच्या उदरीशिवपुत्र शंभू पुरंदरीकित्येक वार झेलले त्यानेस्वराज्याच्या रक्षणापरी@ सीनाकन्या शिवा...
03/12/2021

शंभू चरणी अर्पण _१

जन्मला सईच्या उदरी
शिवपुत्र शंभू पुरंदरी
कित्येक वार झेलले त्याने
स्वराज्याच्या रक्षणापरी

@ सीनाकन्या शिवानी, सोलापूर

06/03/2021

बलिदान स्फूर्ती दिन बहादूर (धर्मवीर) गडावर का यावे??

व्हिडीओ स्क्रिप्ट लेखन :- धनश्रीताई निंबाळकर (काळे)
व्हिडीओ सादरीकरण कलाकार :-
1) संदेश पाटील
२) रमेश भगत
३) संग्राम क्षिरसागर
४) ओंमप्रसाद नाचन

* #छत्रपती_संभाजी_महाराज_सेवा_समिती_तुळापूर🚩*

03/03/2021
स्वतःस गुंतवून घ्यावे सदा तुझ्याच विचारात मला वाटेपन माहिती आहे मला यामार्गातले सारेच काटे@ सौ धनश्री निंबाळकर काळे, सोल...
16/12/2020

स्वतःस गुंतवून घ्यावे सदा
तुझ्याच विचारात मला वाटे
पन माहिती आहे मला या
मार्गातले सारेच काटे

@ सौ धनश्री निंबाळकर काळे, सोलापूर

फितुरी केली आजमाझ्यासोबत माझ्याच शब्दांनीकदाचित अडवल असेल त्यांनामाझ्या मनातील भावनांनी@ सौ धनश्री निंबाळकर काळे, सोलापू...
16/12/2020

फितुरी केली आज
माझ्यासोबत माझ्याच शब्दांनी
कदाचित अडवल असेल त्यांना
माझ्या मनातील भावनांनी

@ सौ धनश्री निंबाळकर काळे, सोलापूर

जन्म हा लाभला स्त्रीचाभाग्य माझे उजळलेदोन्ही घरी प्रकाश देण्याचेसुख काय असत? हे कळले@ सौ धनश्री निंबाळकर काळे, सोलापूर
16/12/2020

जन्म हा लाभला स्त्रीचा
भाग्य माझे उजळले
दोन्ही घरी प्रकाश देण्याचे
सुख काय असत? हे कळले

@ सौ धनश्री निंबाळकर काळे, सोलापूर

मी तुझीच आहे, तुझीच असेलयात तिळमात्र शंका नाहीपण तू माझाच आहेसयावर माझा विश्वास नाही@सौ धनश्री निंबाळकर काळे, सोलापूर३१ ...
31/07/2020

मी तुझीच आहे, तुझीच असेल
यात तिळमात्र शंका नाही
पण तू माझाच आहेस
यावर माझा विश्वास नाही

@सौ धनश्री निंबाळकर काळे, सोलापूर
३१ जुलै २०२०
११:३८

भावावरच प्रेम अन मायाआज जराशी शब्दांत मांडतेआजवर जपलेलं हे नातशब्दांनी काव्यात जोडतेकधी हसत, कधी रडतआनंदाने गेले बालपणशह...
04/06/2020

भावावरच प्रेम अन माया
आज जराशी शब्दांत मांडते
आजवर जपलेलं हे नात
शब्दांनी काव्यात जोडते

कधी हसत, कधी रडत
आनंदाने गेले बालपण
शहाणपणाचे धडे घेता घेता
नकळत मागे पडले बालपण

पुन्हा एकदा करावासा वाटतो
तोच दंगा, मस्ती, अन अल्लडपणा
अस वाटत पुन्हा एकदा स्वतःला त्यातच
हरवून घ्यावं अन विसरावा तरुणापणा

दिवसामागून दिवस गेले
अत्तरासारखे सारे क्षण उडून गेले
तो त्याच्या अन ती तिच्या व्यापात
यातच बहीण भावाचे नाते अडकले

भविष्य लिहिताना भूतकाळ
न विसरता बांध पाठीशी
तोच सोबती असेल तुझा
लढताना तू या जीवनाशी

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा याची
भरभराट होऊ दे तुझ्या मनी
पैसा असो किंवा नसो तरीही
नाही कशाची कमतरता भासे जीवनी

याच नाही तर पुढच्या
सार्‍या जन्मी हो भाऊ तूच माझा
मला प्रेरणा, आशीर्वाद अन् आधाराचा
हात दे मला आयुष्यभरासाठी तुझा

औचित्य आज तुझ्या
जन्मदिवसाचे
खूप खूप आशीर्वाद तुला
अखंड आयुष्याचे अन प्रगतीचे......

जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भैय्या साहेब ( दोघांनाही)

@ सौ धनश्री निंबाळकर काळे, सोलापूर

तुझ्यातला माणूस आजवरलोकांना कधीच दिसला नव्हतापण जेव्हा जेव्हा देव लपलातेव्हा मात्र तूच रक्षक होतादेवाचाही ठरलेला असतोनित...
29/04/2020

तुझ्यातला माणूस आजवर
लोकांना कधीच दिसला नव्हता
पण जेव्हा जेव्हा देव लपला
तेव्हा मात्र तूच रक्षक होता

देवाचाही ठरलेला असतो
नित्याचा एकच वार
पण हा वर्दीतील देव मात्र
रोजच उन्हातान्हात असतो हजर

कधीतरी चुकून कुठे तो दिसला
एखाद्याला मायेने जवळ घेताना
तर म्हणू नका चुकूनही
माणूसपण आम्हाला समजेना

हातात त्याच्या असते काठी
कर्तव्य बजावताना नेहमी
पण मनात असते तुमचीच फिकीर
हे विसरू नका तुम्ही

एकदा जाणून बघा वर्दी मध्ये झाकलेला
चेहरा तो माणुसकीचा
गोरगरिबांना घास भरवताना
अवतार दिसेल तो देवाचा

@सौ धनश्री निंबाळकर काळे, सोलापूर

तकदीर का रचा हुआँ खेल सारा उससे आज मुलाकात हुई थीउसके परछाई से भी अभ नफरत हैजिसके लिये कल तक रोती थी
30/03/2020

तकदीर का रचा हुआँ खेल सारा
उससे आज मुलाकात हुई थी
उसके परछाई से भी अभ नफरत है
जिसके लिये कल तक रोती थी

आज पुन्हा एकदाएक ज्योत विझलीमर्दानगीची लायकीदाखवून गेलीअंकिता सारख्या कोवळ्यापिल्लावर घारीने झडप घातलीत्यातच एक लेक लाडक...
10/02/2020

आज पुन्हा एकदा
एक ज्योत विझली
मर्दानगीची लायकी
दाखवून गेली

अंकिता सारख्या कोवळ्या
पिल्लावर घारीने झडप घातली
त्यातच एक लेक लाडकी
आई वडिलांची संपली

क्रूर कृत्य करणारे हे
कलंक मानव जातीला
आता भार सोसवत नसेल
त्या अंध न्याय देवतेला

प्रत्येकवेळी चूक केली
दोन मेणबत्त्या जाळून
म्हणून तर आज अंकिता
निघाली पुन्हा होरपळून

स्वप्ने भरली होती
तिच्या त्या डोळ्यात
पण लिंग पिसाटांनी
उध्वस्त केल तिला आयुष्यात

क्षण क्षण जपलेली
इज्जत त्या बापाने
क्षणार्धात मातीमोल
केली त्या हैवानाने

काल एक परवा दोन तरीही
आज अजून एक संपली
अन आम्ही मात्र काय केल
पुन्हा एकदा श्रद्धांजली वाहिली

📝 धनश्री निंबाळकर काळे, सोलापूर

 #दादासाहेब _शब्दात तुम्हास वर्णावेअसे शब्द मजकडे नाहीतबोलण्यात तुमची कृती भासवावीअसे बोल माझ्या वदनी नाहीतचित्रांमध्ये ...
29/08/2019

#दादासाहेब _
शब्दात तुम्हास वर्णावे
असे शब्द मजकडे नाहीत
बोलण्यात तुमची कृती भासवावी
असे बोल माझ्या वदनी नाहीत
चित्रांमध्ये तुम्हास रेखाटावे
कलाकुसर अशी मला नाही जमत
आभाळइतकी तुमची छाया
साठवाया अपुरी जागा माझ्या मनात
तुमची आकृती असे विशाल
त्यास जागा ना पुरे माझ्या नयनात
पण तुम्ही कितीही मोठे असले तरी
रहाल कायम माझ्या छोट्याशा हृदयात

आदरस्थान... आधारस्तंभ... प्रेरणास्थान...आशीर्वाद... खंबीर साथ...

आमचे मोठे बंधू _मदन राजे निंबाळकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा....

📝 धनश्री निंबाळकर काळे

अभिमानाने मान वर निघते ती राजे तुमच्यामुळेच... मनगटात जी ताकद आहे ती राजे तुमच्यामुळेच... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे...
25/08/2019

अभिमानाने मान वर निघते ती राजे तुमच्यामुळेच...
मनगटात जी ताकद आहे ती राजे तुमच्यामुळेच...

जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराजे 🚩 🚩 🚩

📝 धनश्री निंबाळकर काळे

 #वेध_स्त्री_जीवनाचा
14/08/2019

#वेध_स्त्री_जीवनाचा

  attitude
26/06/2019

attitude

@ एक मराठी मुलगी...वेध वास्तविकतेचा, जोड शब्दांची, साथ आपल्या माणसांची...ध्येय अस्तित्व मराठी भाषा जपण्याच,प्रयत्न संस्क...
24/06/2019

@ एक मराठी मुलगी...
वेध वास्तविकतेचा, जोड शब्दांची, साथ आपल्या माणसांची...ध्येय अस्तित्व मराठी भाषा जपण्याच,प्रयत्न संस्कृती जतन करण्याची...
मनामनात मराठी बोलीबोलीत मराठी.. महाराष्ट्रात मराठी...
जय जिजाऊ 🚩🚩🚩
जय शिवराय 🚩 🚩 🚩
जय शंभुराजे 🚩🚩🚩
मराठी असाल तर नक्की फॉलो करा page la.... (personal blog... 📝 DNK)

No caption because .... It's reality
22/06/2019

No caption because .... It's reality

जीवनयात्रा... वेध वास्तविकतेचा, जोड शब्दांची, साथ आपल्या माणसांची.... 📝 धनश्री निंबाळकर काळे (DNK)
21/06/2019

जीवनयात्रा... वेध वास्तविकतेचा, जोड शब्दांची, साथ आपल्या माणसांची.... 📝 धनश्री निंबाळकर काळे (DNK)

मुलगी अभिमान... वेध वास्तविकतेचा, जोड शब्दांची, साथ आपल्या माणसांची... 📝 धनश्री निंबाळकर काळे
20/06/2019

मुलगी अभिमान... वेध वास्तविकतेचा, जोड शब्दांची, साथ आपल्या माणसांची... 📝 धनश्री निंबाळकर काळे

मी मराठी...
18/06/2019

मी मराठी...

वडील म्हणजे कोण???प्रत्येकाला वडील म्हंटल की घाम फुटतोप्रत्येक मुलगा वडिलांना जाम घाबरतोत्याच्या डोळ्यात असते वडिलांची क...
15/06/2019

वडील म्हणजे कोण???
प्रत्येकाला वडील म्हंटल की घाम फुटतो
प्रत्येक मुलगा वडिलांना जाम घाबरतो
त्याच्या डोळ्यात असते वडिलांची कठोरता
कधीच दिसत नाही कोणाला बापाची दडलेली ममता
आई काय अश्रू ढाळून
मोकळी होते येता जाता
पण बापाच्या अश्रूंना नाही
सापडत कधीच रस्ता
बाप तो बाप असतो जगासाठी
बेफिकीर जगणारा दिसतो
पन कोणालाच नाही दिसत लेकरांसाठी त्याचा जीव किती तुटतो
आई दिसते स्वैपाक करताना
पन कोरडा शिधा आणणारा तो बाप कुठे कुणाला दिसतो
एक ती पोरगीच असते जी तिच्या लग्नात
बापाच्या गळ्यात पडते
तो एकच क्षण असतो जो
बापाच्या आयुष्यात लपलेल्या भावना धुवून टाकतो
लेकरांच्या जन्मापासून त्याच्या व्यवस्थेत अडकलेला बाप
पोरीच कन्यादान केल्यावर मोकळा श्वास घेतो
पन यामध्ये सुधा तो
पोरगी जाण्याच दुःख मात्र लपवितो
गाडी पुढे गेली तरी मागे हात सारखा जोडतो
परंपरेसाठी काळजाचा तुकडा दुसर्‍या घरी सोडतो...... I love u अण्णा आबा काका....

Happy fathers day
धनश्री निंबाळकर काळे

Address

Solapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when स्वराज्यस्वामिनी महाराणी येसूबाई posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share

Category