16/05/2021
https://youtu.be/Hoi3yZhlcRc
🔴 माजी नगरसेवक जगदीश पाटील मित्र परिवाराच्या वतीने सुरू करण्यात आली हेल्पलाईन
🟧 *सोलापूर शहर व जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव व दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या यामुळे बेड,रेमडीसीवर, रुग्णवाहिका,लसीकरण याकरिता खूप पळापळ होत असताना माजी नगरसेवक जगदीश पाटील यांच्या संकल्पनेतून हेल्पलाईन सुरू करण्यात आली,याचा ग्रामीण व शहराबाहेरील नागरिकांना मोठा आधार मिळताना दिसत आहे*
🔸 *या हेल्पलाईन च्या माध्यमातून शहरातील हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून देण्याकरिता एक टीम नियुक्त करण्यात आली आहे जे प्रत्येक हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी वयक्तिक भेट घेऊन त्यांना ही मोहीम समजावून सांगून नागरिकांना मदतीसाठी आम्ही ही हेल्पलाईन सुरू केली असून आपल सहकार्य आम्हाला लागणार आहे असे भेटून सांगितलं आहे,यामुळे नागरिकांना बेड उपलब्ध करून देताना अडचण निर्माण होत नाही*
🔹 *त्याच बरोबर लसीकरनाचा मोठा गोंधळ सध्या शहरात उडाला असून यामध्ये नागरिकांना सहकार्य करण्यासाठी एक टीम नियुक्त केली गेली आहे,या टीम कडून ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करून घेण्याची जबाबदारी आहे*
🔸 *तिसरी टीम ही रेमडीसीवर च्या येणाऱ्या अडचणींचा निराकरण करण्यासाठी नियुक्त केली आहे,कारण ग्रामीण भागातील बरेच रुग्ण सध्या शहरात ऍडमिट आहेत तरी त्यांना प्रशासनाकडून रेमडीसीवर मिळून देण्याकरिता अधिकारी व डॉक्टर यांच्यात समनव्य साधून याची कशी उपलब्धता करून देण्यात येईल यावर ही टीम काम करते*
🔹 *रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी एक टीम नियुक्त केली आहे ग्रामीण भागातून शहरात रुग्ण ऍडमिट करण्यासाठी असो की शहरातून एका हॉस्पिटलमधून दुसरीकडे रुग्ण शिफ्ट करण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना मदत करण्यासाठी ही टीम काम करते*
या संपूर्ण व्यवस्थेच व्यवस्थापन स्वतः माजी नगरसेवक जगदीश पाटील हे करत आहेत,तरी कोणालाही वरील पैकी कशाची ही अडचण आली तर त्यांनीसंपर्क करावा,आम्ही संपूर्ण प्रयत्न करू आमचं उद्दिष्ट एकच आहे की रुग्ण उपचारापासून वंचीत राहू नये*........
*मा नगरसेवक जगदीश पाटील मित्र परिवार*