18/12/2024
ज्याअर्थी, बदल हा जगाचा स्थायीभाव आहे. त्याअर्थी माणसं आणि त्यांची मतं कायम बदलत असतात. नी हेच सत्य ही आहे.
परंतू आज कम्प्लीट सहा वर्षे होतायत माझा अन् तुझाही व्हाट्ॲप डी.पी. अजिबात बदलला नाही. मला सोड तुलाही कधी ते बदलण औचित्याचे वाटलं नाही; ना कधी हट्ट वा निगोशिएट!
हा विश्वास - हा सातत्य, हे प्रेम - ही निष्ठा नी त्यासोबतच या नश्वर जगाची जाणिव.. माझ्यासह तुझ्यातही वृद्धिंगत झालीये अन् तू पावलापावलावर त्याची प्रचितीही आणून देतीयेस याचं कायम मनोमन 'समाधान' वाटतं.
म्हणुनचं तर मी लिहून ही ठेवलयं..
'तू पर्याय दे कितीही, मज तू लाख दे पुरावे,
तुझीया समान 'राधे', दुनियेत कोणी नाही! ❤️
- १८/१२/२०२४ (सहाव्यावर्षी)