24taasmaharashtra

24taasmaharashtra news website

महाबळेश्वर तालुका इको सेंसिटीव्ह झोन तसंच ग्रीन झोन मध्ये येतो या ठिकाणी कोणत्या ही प्रकारच्या उत्खननाला आणि बांधकामाला ...
12/12/2022

महाबळेश्वर तालुका इको सेंसिटीव्ह झोन तसंच ग्रीन झोन मध्ये येतो या ठिकाणी कोणत्या ही प्रकारच्या उत्खननाला आणि बांधकामाला परवानगी नसताना सुद्धा काही धनाड्य मंडळी स्वत: च्या व्यावसायिक फायद्यासाठी विनापरवाना प्रचंड उत्खनन करत मोठ्या टोलेजंग इमारती उभारल्याचं पाहायला मिळतय हा गंभीर प्रकारचा गुन्हा आहे तरी सुद्धा महाबळेश्वर पाचगणी आणि भिलारच्या परिसरात हे राजरोस पणे सुरु आहे. याच्यावर नियंत्रण ठेवणारे शासकीय विभाग नक्की करतायेत काय असा प्रश्न निर्माण होत आहे....

महाबळेश्वर तालुका इको सेंसिटीव्ह झोन तसंच ग्रीन झोन मध्ये येतो या ठिकाणी कोणत्या ही प्रकारच्या उत्खननाला आणि बा....

किल्ले प्रतापगड येथे 30 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करावयाचा आहे. य...
25/11/2022

किल्ले प्रतापगड येथे 30 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करावयाचा आहे. याचे सर्व विभागांनी सुक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या आहेत. कराड येथील शासकीय विश्रामगृहात शिवप्रताप दिन उत्साहात साजरा करण्याबाबत आढावा घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते....

किल्ले प्रतापगड येथे 30 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करावय.....

भिलार (सातारा); समाज व राज्यकर्ते यांना योग्य दिशा दर्शवण्याचे काम माध्यमे प्रभावीपणे करत आहेत. यापुढेही अशाच पद्धतीचे क...
30/10/2022

भिलार (सातारा); समाज व राज्यकर्ते यांना योग्य दिशा दर्शवण्याचे काम माध्यमे प्रभावीपणे करत आहेत. यापुढेही अशाच पद्धतीचे काम माध्यमांनी करावे असे, प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.सातारा जिल्ह्यातील भिलार या पुस्तकांच्या गावात आयोजित डिजीटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र पहिले राज्यस्तरीय अधिवेशन 2022 च्या उद्घाटन प्रसंगी श्री. पाटील बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, खासदार श्रीनिवास पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समिर शेख, डिजीटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने, संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विकास भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.पत्रकारांवरील हल्ल्यांविरोधात कडक कायदे होण्यासाठी आम्ही आग्रही असल्याचे सांगून श्री....

भिलार (सातारा); समाज व राज्यकर्ते यांना योग्य दिशा दर्शवण्याचे काम माध्यमे प्रभावीपणे करत आहेत. यापुढेही अशाच पद्....

परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहाणी करुन आढावा घेण्याकरीता शेतक-यांच्या बांधावर जावुन पिकांच नुकसान‌ किती झालय या...
26/10/2022

परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहाणी करुन आढावा घेण्याकरीता शेतक-यांच्या बांधावर जावुन पिकांच नुकसान‌ किती झालय याची पाहाणी जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी केली यावेळी शेतक-यां सोबत संवाद साधत निकषाच्या बाहेर जावुन आम्ही मदत करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं. दिवाळी आहे तरी सुद्धा शेतक-यांच्या बांधावर जावा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिले आहेत त्यानुसार दिवाळी च्या दिवशी सगळे पालकमंत्री आम्ही शेतक-यांच्या बांधावर आहोत शेतक-यांच्या व्यथा आम्हाला महत्वाच्या असुन झालेल्या नुकसानी चे लवकरात लवकर पंचनामे संपवण्याचं उद्धिष्ट आमच्या समोर असुन संबंधित अधिका-यांना सुचना देण्यात आल्या असल्याचं शंभुराज देसाई यांनी माध्यमांना सांगितलं आहे. या पाहाणी वेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी , पोलिस अधिक्षक समीर शेख तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहाणी करुन आढावा घेण्याकरीता शेतक-यांच्या बांधावर जावुन पिकांच नुकसान‌ क....

दिवाळी च्या पहिल्या दिवशी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांच्या घरी दिवाळी साजरी...
24/10/2022

दिवाळी च्या पहिल्या दिवशी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांच्या घरी दिवाळी साजरी करण्यात आली पर्यावरण पुरक अशा या दिवाळी ला शंभुराज देसाई यांच्या पत्नी यांनी त्यांच औक्षण केलं. या वेळी शंभुराज देसाई यांनी शिंदे सरकारची ही पहिलीच दिवाळी असल्याचं सांगत शेतक-यांना ओल्या दुष्काळामुळं मोठा‌ फटका बसला आहे. मात्र सरकारनं याची पाहाणी करुन मदत करण्याचं धोरण हाती घेतलय जे शेतकरी निकषात बसत नाहीत त्यांना कशा पद्धतीने मदत करता येईल या बाबत विचार केला गेलाय तसंच हा महाराष्ट्र उज्वल महाराष्ट्र व्हावा हा महाराष्ट्र देशात नंबर १ असावा असा प्रयत्न कायम राहणार असुन यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत खांद्याला खांदा लावुन आम्ही करत आहोत मात्र उद्धव ठाकरे ओल्या दुष्काळी दौ-यांवरुन आमच्यावर टिका करतायेत त्यांनी त्यांचा २४ मिनीटांचा दुष्काळ दौरा तपासुन पाहावा नंतर आमच्या बद्दल बोलावं अशी टिका शंभुराज देसाई यांनी या प्रसंगी केली असुन रामराजे हे विधान परिषदेचे माजी सभापती आहे परंतु तुमचं सरकार असताना लोकशाही राहिली आणि आमचं सरकार असताना ती संपली असं असु शकत नाही....

दिवाळी च्या पहिल्या दिवशी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांच्या घरी दि...

कुख्यात गुंड गजानन मारणेला त्याचे वकील अॅड विजयसिंह ठोंबरे यांच्या वाई येथील फार्महाऊस वरुन ताब्यात घेण्यात आलय. गजा मार...
16/10/2022

कुख्यात गुंड गजानन मारणेला त्याचे वकील अॅड विजयसिंह ठोंबरे यांच्या वाई येथील फार्महाऊस वरुन ताब्यात घेण्यात आलय. गजा मारणे हा अॅड. विजयसिंह ठोंबरेंना वाई येथील फार्म हाऊसवर भेटण्यासाठी गेला होता. यावेळी पुणे पोलिसांनी त्याला मोक्का अंर्गत ताब्यात घेतलय. या अगोदर पुणे पोलिसांनी अपहरण व खंडणी प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. पुणे पोलिसांची अनेक पथके मारणेच्या शोधासाठी रवाना झाली होती. मात्र आज गजानन मारणे वाई येथे अॅड विजयसिंह ठोंबरे यांच्या फार्म हाऊस वर भेटण्यासाठी आल्यानंतर विजय ठोंबरे यांनी पोलिसांना कल्पना देवुन मारणे यांना हजर होण्याचा सल्ला दिला यावेळी गजानन मारणे पोलिसांना शरण गेल्यानंतर पोलिसांनी गजानन मारणे याला ताब्यात घेत पुण्याच्या दिशेने कुच केली.

कुख्यात गुंड गजानन मारणेला त्याचे वकील अॅड विजयसिंह ठोंबरे यांच्या वाई येथील फार्महाऊस वरुन ताब्यात घेण्यात आल.....

पांचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्यावर बाजारातील स्वच्छतेबाबत पाहणी करत असताना बुधवार बाजारपेठेत काळे ...
13/10/2022

पांचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्यावर बाजारातील स्वच्छतेबाबत पाहणी करत असताना बुधवार बाजारपेठेत काळे द्रव्य अंगावर टाकून हल्ला केल्याची घटना घडल्याने पाचगणीत खळबळ झाली होती. याबाबत पांचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पांचगणी पोलीस आरोपीचा शोध सुद्धा घेत आहेत. मात्र या प्रकारानंतर पाचगणी नगरपालिका कर्मचारी चांगलेच आक्रमक झाले असुन आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी कर्मचा-यांनी केली आहे. शाईफेक केलेल्या आरोपीचा नगरपालिकेत कर्मचा-यांना कायम त्रास होत असतो....

पांचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्यावर बाजारातील स्वच्छतेबाबत पाहणी करत असताना बुधवार बाजा...

: सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांची चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी या पदावर नियुक्ती. डी.एस. खि...
12/10/2022

: सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांची चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी या पदावर नियुक्ती. डी.एस. खिलारी सातारा जिल्हापरीषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी

: सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांची चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी या पदावर नियुक्ती. ड...

पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीष दापकेकर यांच्यावर एका व्यक्तीने शाई फेकली . मात्र शाईफेक नेमक्या कोणत्या कारणातून ...
12/10/2022

पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीष दापकेकर यांच्यावर एका व्यक्तीने शाई फेकली . मात्र शाईफेक नेमक्या कोणत्या कारणातून फेकली हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. यामुळे पाचगणी, महाबळेश्वर नगरपालिका कर्मचारी संघटना आक्रमक झाली असून या घटनेच्या निषेधार्थ कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केलय कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यामुळे वेण्णा लेक आणि त्याच बरोबर इतर पर्यटन स्थळे बंद पडली आहेत.पाचगणी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्याचे काम सध्या सुरू असून मोठ्या संख्येने कर्मचारी पाचगणी पोलिस स्टेशनला एकत्र आलेत

पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीष दापकेकर यांच्यावर एका व्यक्तीने शाई फेकली . मात्र शाईफेक नेमक्या कोणत्या...

मुंबई : कराड ते चिपळूण राष्ट्रीय महामार्गच्या प्रलंबित कामाबाबत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज मंत्रा...
06/10/2022

मुंबई : कराड ते चिपळूण राष्ट्रीय महामार्गच्या प्रलंबित कामाबाबत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज मंत्रालयात आढावा घेतला.नाडे, मल्हारपेठ, आडूळ, म्हावशी या गावातील अपूर्ण राहिलेली कामे तात्काळ पूर्ण करावी. हेळवाक ते ढाणकल रस्त्याचे डांबरीकरणाचे काम तातडीने पूर्ण करावे. पाटण ते संगमनगर नव्याने होणाऱ्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे. तसेच कराड ते चिपळूण या राष्ट्रीय महामार्गावरील प्रलंबित रस्त्याची कामे एल अँड टी कंपनीने तातडीने पूर्ण करा अशा सूचना संबंधितांना मंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.या बैठकीस जिल्हाधिकारी सातारा रूचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, मुख्य अभियंता संतोष शेलार, अधीक्षक अभियंता संभाजी धोत्रे तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुंबई : कराड ते चिपळूण राष्ट्रीय महामार्गच्या प्रलंबित कामाबाबत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी ....

सातारा शहरालगत असणाऱ्या खिंडवाडी जवळ रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहना...
04/10/2022

सातारा शहरालगत असणाऱ्या खिंडवाडी जवळ रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झालाय ही माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाची कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता मृत्यू झालेला बिबट्या हा नर जातीचा असून याचे वय अंदाजे दोन वर्ष आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी याला तात्काळ गाडीत घालून शवविच्छेदनासाठी वनविभागाच्या वैद्यकीय विभागात ठेवण्यात आले.. अजिंक्यतारा किल्ला या ठिकाणाहून राष्ट्रीय महामार्गापर्यंत या बिबट्याचा आधिवास होता.रात्री शिकारीच्या शोधात हा बिबट्या या रस्त्यावर आला असावा असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय

सातारा शहरालगत असणाऱ्या खिंडवाडी जवळ रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर .....

सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरदजी कणसे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अतिशय विश्वासातले मानले जातात. शरद कणसे हे साता...
04/10/2022

सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरदजी कणसे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अतिशय विश्वासातले मानले जातात. शरद कणसे हे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आहेत मात्र सध्या ते ठाण्यामधुन नगरसेवक पदावर निवडून येतात अत्यंत विश्वासू व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांना श्री एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्ह्याचे संपर्कप्रमुख पद दिले असून या दिलेल्या जबाबदारील पेलत जिल्ह्यात एकनाथ शिंदेंचे विचार पोहचवुन भगवे वादळ निर्माण करण्याचा प्रयत्न कणसे करताना पाहायला मिळतायेत....

सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरदजी कणसे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अतिशय विश्वासातले मानले जातात. शरद कण.....

पाचगणी नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण 2022 अभियानाअंतर्गत मार्च ते एप्रिल दरम्यान सर्वे झाला होता. या सर्वेनुसार पांचगणी श...
01/10/2022

पाचगणी नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण 2022 अभियानाअंतर्गत मार्च ते एप्रिल दरम्यान सर्वे झाला होता. या सर्वेनुसार पांचगणी शहराला संपूर्ण देशामध्ये एक लाख लोकसंख्येच्या आतील शहरामध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवला आहे. याबरोबरच पाचगणी नगर परिषदेस वॉटर प्लस घोषित केले आहे. पाचगणी शहरास राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त होणे हे सर्व शहरावासीयांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे.सदर पुरस्काराचा कार्यक्रम दिनांक १ ऑक्टोबर 2022 रोजी महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू, व केंद्रीय मंत्री हरदिप सिंग पुरी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम वरती संपन्न झाला....

पाचगणी नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण 2022 अभियानाअंतर्गत मार्च ते एप्रिल दरम्यान सर्वे झाला होता. या सर्वेनुसार पा....

सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी महिला राखीव झाले असुन याबाबत राज्यसरकारनं रात्री उशिरा जाहीर केलं. राज्यातील जिल्...
01/10/2022

सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी महिला राखीव झाले असुन याबाबत राज्यसरकारनं रात्री उशिरा जाहीर केलं. राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण अचानक जाहीर केल्यामुळं अनेकांना धक्का मिळाला आहे. सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव झाल्या नंतर आता जिल्ह्यात राजकीय चर्चांना वेग येताना पाहायला मिळेल .

सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी महिला राखीव झाले असुन याबाबत राज्यसरकारनं रात्री उशिरा जाहीर केलं. राज्.....

सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या नावाची घोषणा…मुख्यमंत्री एकनाथ शिंद...
24/09/2022

सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या नावाची घोषणा…मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली यादी…ना.शंभूराज देसाई यांच्याकडे ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा अतिरिक्त पदभार… जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय) नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा मुंबई दिनांक 24: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील....

सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या नावाची घोषणा…मुख्यमंत्र...

सातारा - दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला शिवाजी पार्क वर परवानगी देण्यात आल्यानंतर या न्यायालयाच्या मी निर्णयाचा आदर करतो अस...
24/09/2022

सातारा - दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला शिवाजी पार्क वर परवानगी देण्यात आल्यानंतर या न्यायालयाच्या मी निर्णयाचा आदर करतो असं राज्य उत्पादन मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे.या दसरा मेळाव्याला ज्या ठिकाणी आम्हाला परवानगी मिळेल त्या ठिकाणी आमची ताकद दाखवून देवू असं देखील सांगितले शंभुराज देसाई म्हणाले.

सातारा - दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला शिवाजी पार्क वर परवानगी देण्यात आल्यानंतर या न्यायालयाच्या मी निर्णयाचा आ.....

सातारा - मॉल मध्ये वाईन विक्री बाबत पुण्यात मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असल्याचे राज्याचे उत्पादन शुल्क मं...
24/09/2022

सातारा - मॉल मध्ये वाईन विक्री बाबत पुण्यात मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असल्याचे राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे.या वाईन विक्री बाबतच्या हरकती सूचना मागविण्यात आल्या असून त्या खात्याचा मी मंत्री असल्याने या बाबत सर्व बाबी मंत्रिमडळासमोर ठेवून मगच निर्णय घेतला जाणार असल्याचे मी सांगितले होते मात्र ते वेगळ्या पद्धतीने सांगितले गेल्याचे देसाई यांनी साताऱ्यात सांगितले आहे.

सातारा - मॉल मध्ये वाईन विक्री बाबत पुण्यात मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असल्याचे राज्याचे उत्पादन ...

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गोर गरीब मुलांच्या शिक्षणासाठी सुरु केलेल्या रयत शिक्षण संस्थेने आता मोठा नावलौकिक मिळवला असु...
21/09/2022

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गोर गरीब मुलांच्या शिक्षणासाठी सुरु केलेल्या रयत शिक्षण संस्थेने आता मोठा नावलौकिक मिळवला असुन संस्थेची अनेक शाखा महाराष्ट्रात पहायला मिळतात या रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य म्हणून संभाजीराव गायकवाड यांची नियुक्ती रयत चे अध्यक्ष मा.खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांनी केली आहे. अनेक वर्षांपासुन शरद पवार यांच्या सोबत संभाजीराव गायकवाड हे समाजकारणात काम करतायेतसर्वसामान्य लोकांच्या हितासाठी सहकार क्षेत्रा सोबत शैक्षणिक क्षेत्रात कार्य करण्याची जबाबदारी गायकवाड यांनी लिलया पेलली असुन त्याच कामगिरीचा बहुमान करत संभाजीराव गायकवाड यांची रयतच्या जनरल बाॅडीच्या सदस्यपदी नियुक्ती केली आहे....

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गोर गरीब मुलांच्या शिक्षणासाठी सुरु केलेल्या रयत शिक्षण संस्थेने आता मोठा नावलौकिक .....

एकनाथ शिंदे गटाच्या आमदार महेश शिंदे यांनी जिंकली खेड ग्रामपंचायत निवडणुक खेड ग्रामपंचायतीत परिवर्तन आमदार महेश शिंदे गट...
19/09/2022

एकनाथ शिंदे गटाच्या आमदार महेश शिंदे यांनी जिंकली खेड ग्रामपंचायत निवडणुक खेड ग्रामपंचायतीत परिवर्तन आमदार महेश शिंदे गटाची बाजी आमदार शशिकांत शिंदे गटाला मोठा धक्का 1)वनवासवाडी वॉर्ड- महेश शिंदे गट विजयी ( 3-0) 2)कृष्णानगर वॉर्ड- आ.महेश शिंदे गट विजयी(3-0) 3)खेड गावठाण वार्ड आ. महेश शिंदे गट विजयी(2-0) 4)प्रतापसिंह नगर वार्ड आ.शशिकांत शिंदे गट विजयी (2-1) 5)विकास नगर वॉर्डआ.शशिकांत शिंदे गट विजयी (3.0)...

एकनाथ शिंदे गटाच्या आमदार महेश शिंदे यांनी जिंकली खेड ग्रामपंचायत निवडणुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमीत्त १७ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर दरम्यान सेवा पंधरावड्याच्या निमित्ताने फलटण शहर...
18/09/2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमीत्त १७ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर दरम्यान सेवा पंधरावड्याच्या निमित्ताने फलटण शहरात संवाद मेळाव्याचं आयोजन भाजपाच्या वतीने करण्यात आलं होतं. यामध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि भाजपा चे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे हे उपस्थित होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तुफान फटकेबाजी करत रामराजेंवर जोरदार हल्ला चढवला रामराजे खुप खालच्या थराला जावुन राजकारण करत असुन मला अडचणीत आनण्यासाठी रामराजेंनी अनेक षड्यंत्र रचली मात्र त्यांना मी पुरुन उरलोय असा इशारा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रामराजेंना दिला आहे....

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमीत्त १७ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर दरम्यान सेवा पंधरावड्याच्या निमित्त.....

रणजितसिंह भोसले यांनी एकनाथ शिंदें यांच्या शिवसेना गटात प्रवेश केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या official फेसबुक अकाऊंट वरु...
10/09/2022

रणजितसिंह भोसले यांनी एकनाथ शिंदें यांच्या शिवसेना गटात प्रवेश केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या official फेसबुक अकाऊंट वरुन रणजितसिंह भोसले यांच्या प्रवेशाबद्दल भाष्य करत रणजितसिंह यांच्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे पश्चिम महाराष्ट्रात शिंदे सरकारचे बळ वाढले असुन त्यांनी ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंच्या पाठिशी उभं राहण्याचा निर्धार केला असल्याचं या पोस्ट मधुन पाहायला मिळतय. यामुळे रणजितसिंह भोसले यांना एकनाथ शिंदे ताकत देणार हे या वरुन स्पष्ठ होताना पाहायला मिळतय....

रणजितसिंह भोसले यांनी एकनाथ शिंदें यांच्या शिवसेना गटात प्रवेश केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या official फेसबुक अकाऊं....

साता-याचे जिल्हाधिकारी शेखर सिंग यांची बदली होवुन तब्बल एक महिना उलटला तरी सुद्धा त्यांनी अजुन शासकीय बंगला खाली केला ना...
07/09/2022

साता-याचे जिल्हाधिकारी शेखर सिंग यांची बदली होवुन तब्बल एक महिना उलटला तरी सुद्धा त्यांनी अजुन शासकीय बंगला खाली केला नाही यामुळे नुतन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना सातारा रेस्ट हाऊस मध्ये राहावं लागत आहे यामुळे या प्रश्नाकडे पत्रकारांनी उदयनराजेंच लक्ष वेधलं असता खासदार उदयनराजेंनी तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंग यांना हात जोडत आता तरी बास करा बंगला खाली करुन नवीन जिल्हाधिकारी यांना द्या....

साता-याचे जिल्हाधिकारी शेखर सिंग यांची बदली होवुन तब्बल एक महिना उलटला तरी सुद्धा त्यांनी अजुन शासकीय बंगला खाली...

साताऱ्याचे खा.उदयनराजे भोसले यांनी त्याचे बंधू आ.शिवेंद्रराजे यांच्यावर पुन्हा एकदा नगरपालिका निवडणुकीवरून टीकाटिप्पणी स...
07/09/2022

साताऱ्याचे खा.उदयनराजे भोसले यांनी त्याचे बंधू आ.शिवेंद्रराजे यांच्यावर पुन्हा एकदा नगरपालिका निवडणुकीवरून टीकाटिप्पणी सुरू झाली आहे.माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांनी हिम्मत असेल तर पुरावे द्यावेत.जर भ्रष्टाचार सिद्ध झाला तर अजिंक्यतारा किल्ल्यावरून कडेलोट पॉइंट वरून मी उडी मारेन आणि पुरावे देवू शकला नाही तर त्यांनी उडी मारावी असं आव्हान उदयनराजे यांनी शिवेंद्रराजे यांना दिलं आहे. या वेळी बोलताना सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकत हिम्मत असेल मी बोललेल्या गोष्टींना उत्तर द्या फक्त मिशीवर हात फिरवून काही होत नसतं अशी टीका करत यावेळी 50 च्या 50 नगरसेवक सातारा विकास आघाडीचे निवडून येतील असा विश्वास उदयनराजे यांनी व्यक्त केला आहे....

साताऱ्याचे खा.उदयनराजे भोसले यांनी त्याचे बंधू आ.शिवेंद्रराजे यांच्यावर पुन्हा एकदा नगरपालिका निवडणुकीवरून टी....

शिवसेना सेलचे ४ जिल्हाप्रमुख आणि १० उपजिल्हाप्रमुख प्रमुखांसह शेकडो‌ कार्यकर्ते शिंदे गटात सामील होणार साता-यात उद्धव ठा...
06/09/2022

शिवसेना सेलचे ४ जिल्हाप्रमुख आणि १० उपजिल्हाप्रमुख प्रमुखांसह शेकडो‌ कार्यकर्ते शिंदे गटात सामील होणार साता-यात उद्धव ठाकरेंना आता पर्यन्तचा सर्वात मोठा धक्का बसला असुन शेवसेनेचा युवा नेता रणजितसिंह भोसले हे एकनाथ शिंदेंच्या शवसेना गटात सामील होणार असुन उद्या त्यांचा जाहीर प्रवेश मुंबई मध्ये होतं आहे. शंभुराज देसाई , आमदार महेश शिंदे आणि पुरुषोत्तम जाधवांच्या प्रयत्नांना या ठिकाणी यश आल्याचं पाहायला मिळतय रणजितसिंह भोसले यांच्या सोबत जिल्ह्यातील युवकांचा मोठा गट प्रवेश करणार आहे....

शिवसेना सेलचे ४ जिल्हाप्रमुख आणि १० उपजिल्हाप्रमुख प्रमुखांसह शेकडो‌ कार्यकर्ते शिंदे गटात सामील होणार

05/09/2022

म्हसवड येथे प्रस्तावित असलेल्या एम आय डीसी वरुन सातारा जिल्ह्यात मोठं वादंग उठल्याचं पहायला मिळतय. म्हसवड च्या MIDC करिता विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांचा वाद रंगलेला असताना शेखर गोरे यांनी यात आपली भुमीला मांडत रामराजे आणि जयकुमार गोरे हे खोटं खोटं भांडत असुन आतुन हे एकच असल्याचा आरोप शिवसेनेचे युवा नेते शेखर गोरे यांनी केलाय शेखर गोरे यांनी ही एम आय डीसी म्हसवडलाच होणार आहे असं शेखर गोरे यांनी दिलेल्या पत्रकात सांगितलं आहे....

म्हसवड येथे प्रस्तावित असलेल्या एम आय डीसी वरुन सातारा जिल्ह्यात मोठं रणकंदन चाललेलं पहायला मिळतय म्हसवड ची एम आय डीसी क...
05/09/2022

म्हसवड येथे प्रस्तावित असलेल्या एम आय डीसी वरुन सातारा जिल्ह्यात मोठं रणकंदन चाललेलं पहायला मिळतय म्हसवड ची एम आय डीसी कोरेगाव तालुक्यात व्हावी यासाठी रामराजेंसह तालुक्यातील राष्ट्रवादी चे नेते प्रयत्न करताना पहायला मिळतायेत तर दुस-या बाजुला जयकुमार गोरे हे एम आय डीसी म्हसवडलाच व्हावी या करिता प्रयत्नशील आहेत. मात्र या सगळ्या चढाओढीत एकमेकांवर जोरदार टिका करण्याचं काम सुद्धा नेत्यांमध्ये सुरु आहे....

म्हसवड येथे प्रस्तावित असलेल्या एम आय डीसी वरुन सातारा जिल्ह्यात मोठं रणकंदन चाललेलं पहायला मिळतय म्हसवड ची एम आ...

02/09/2022

वाद पेटला| आमदार जयकुमार गोरे यांची रामराजेंवर जहरी टिका.. पाहा काय म्हणाले आमदार जयकुमार गोरे

म्हसवड ला होणारी एम आय डीसी कोरेगावला स्थलांतरीत झाली आहे आणि माण चे आमदार जयकुमार गोरे यांच्या निष्क्रियतेमुळेच हे घडल्...
01/09/2022

म्हसवड ला होणारी एम आय डीसी कोरेगावला स्थलांतरीत झाली आहे आणि माण चे आमदार जयकुमार गोरे यांच्या निष्क्रियतेमुळेच हे घडल्याचा आरोप होत असताना रामराजेंनी कोरेगावला एम आय डिसी का व्हावी हे समजवुन सांगण्यासाठी एक बैठक कोरेगाव मध्ये बोलावली होती. या बैठकीत रामराजेंना कडाडुन विरोध झाला या विरोधाचं खापर रामराजेंनी आमदार जयकुमार गोरे यांच्यावर फोडलं होतं. या नंतर दोन्ही नेत्यांमध्ये वादाची ठिणगी पडली असुन रामराजेंच वय झालय त्यामुळे त्यांच्या बुद्धीवर त्यांच संतुलन राहिलं नाही यामुळेच ते काही ही वक्तव्य करत असल्याचा गंभीर आरोप जयकुमार गोरे यांनी रामराजेंवर केलाय....

https://24taasmaharashtra.com/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%9a-%e0%a4%b5%e0%a4%af-%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b3%e0%a4%82%e0%a4%9a/

म्हसवड ला होणारी एम आय डीसी कोरेगावला स्थलांतरीत झाली आहे आणि माण चे आमदार जयकुमार गोरे यांच्या निष्क्रियतेमुळे....

कास पठार हे जागतीक वारसा स्थळाच्या यादीत आल्यानंतर या ठिकाणं पर्यटन अचानक वाढल्याचं पहायला मिळालं मात्र पर्यटन वाढल्या न...
25/08/2022

कास पठार हे जागतीक वारसा स्थळाच्या यादीत आल्यानंतर या ठिकाणं पर्यटन अचानक वाढल्याचं पहायला मिळालं मात्र पर्यटन वाढल्या नंतर या ठिकाणी हाॅटेल्स,रेस्टाॅरंन्ट उभे राहिले मात्र कास पठार जागतीक वारसा स्थाळात गेल्यामुळे या ठिकाणी काही नियम तयार झाले आहेत या नियमा नुसार या ठिकाणी बांधकामांना परवानगी नाहीये. यामुळे सातारा ते कास पठार रोड वरील हाॅटेल्स, बंगले याच्यावरुन सध्या साता-यात चांगलच वादंग उठलं‌ असुन सातारा प्रशासनाने या ठिकाणी हॉटेल व्यवसायिकांना अनधिकृत च्या नोटिसा बजावल्या आहेत....

https://24taasmaharashtra.com/%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%96%e0%a4%82-%e0%a4%b8%e0%a5%8c%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%95%e0%a4%be/

कास पठार हे जागतीक वारसा स्थळाच्या यादीत आल्यानंतर या ठिकाणं पर्यटन अचानक वाढल्याचं पहायला मिळालं मात्र पर्यटन ....

Address

Satara

Alerts

Be the first to know and let us send you an email when 24taasmaharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to 24taasmaharashtra:

Videos

Share