19/11/2025
हस्त बहार 2025 अनेक ठिकाणी फेल गेला आहे.
या ठिकाणी पुन्हा पानगळ करावी लागणार आहे. गुजरात व महाराष्ट्र मध्ये सारखीच परिस्थिती आहे.
साहजिक, या सर्व बाग आंबे बहार मध्ये जाणार आहे. सोबतच, जे दरवर्षी आंबे बहार घेतात ते पण घेणार आहेतच. परिणाम — 2026 मध्ये आंबे बहार साठी अधिक जास्त गर्दी राहणार आहे.
त्यातही फेब्रुवारी मध्ये अधिक पानगळ राहतील असा अंदाज आहे..
⭐ पानगळ करायची असेल तर खालील दोन–तीन मुद्दे लक्षात घ्या
• तेलकट / अधिक पावसाचे भाग / काळी जमीन
ज्या बागांमध्ये तेलकट चा प्रादुर्भाव आहे,
किंवा ज्या ठिकाणी अधिक पाऊस होतो,
जमीन काळी आहे
अशा ठिकाणी अर्ली आंबे बहार घ्या.
म्हणजे जानेवारी मध्ये बागेला पहिले पाणी जाईल असे बघा. लेट जाऊ नका.
• हस्त बहार मध्ये फुल निघाले नाही, पण आता लेट फुल येत असेल
अशा बागांना आता बहार सुरू ठेवायला हरकत नाही.
डबल पानगळ चा विचार करू नका.
• हस्त बहार बागांमध्ये बिलकुल फुल नाही
पाने लवकर पक्व होतील याकडे लक्ष द्या.
विश्रांती काळ नीट नियोजन करूनच पानगळ करा.
• बाजारभाव बघणारे, तेलकट नसलेले, पावसाळ्यात बाग सांभाळू शकणारे
यांनी –
➡ अर्ली आंबे बहार
किंवा
➡ डायरेक्ट मार्च एंड ला पानगळ
हे पर्याय योग्य राहतील.
⚠ विशेष सूचना : तेलकट ग्रस्त बागा
अतिरिक्त पाऊस, अवकाळी पाऊस सर्व ठिकाणी वाढत आहे.
अशा वेळी तेलकट ग्रस्त बागांमध्ये विशेष काळजी आवश्यक आहे.
त्यांनी —
✔ बाजारभावकडे लक्ष न देता,
✔ जेवढ्या लवकर बाग पकडता येईल त्याकडे लक्ष द्यावे.
✔ झाडांच्या पोषणावर योग्य काम करावे.
👨🌾 नविन शेतकरी / वैयक्तिक मार्गदर्शन
जे शेतकरी नवीन आहेत, ज्यांना वैयक्तिक मार्गदर्शन,
स्प्रे व ड्रिप शेड्युल ची गरज आहे—
त्यांना आपण योग्य ते कमी खर्चिक मार्गदर्शन करुयात.
📌 हे मार्गदर्शन सशुल्क असेल.
ज्यांना जोडले जाण्याची इच्छा असेल ते मेसेज करू शकतात…
📌 निष्कर्ष
पानगळ २०२६ साठी वरील मुद्दे लक्षात घ्या.
आपण कधी पानगळ करणार आहात, हे कमेंट मध्ये आवर्जून सांगा.
धन्यवाद
श्री सुशांत हिरालाल सुर्वे
डाळिंब शेती मार्गदर्शक
संगमनेर
#अनार #डाळिंबवार्ता #अनारकिंग #महाराष्ट्र #शेती #डाळिंबशेती