महाड हे महाराष्ट्रतील कोकणातले महत्वाचे एक शहर आहे.
महाड हे मुंबईपासून १८० की. मी. तर पुण्यापासून १२० की.मी. वर आहे. आसपासचे रम्य व सुंदर वातावरणामुळे महाड हे आकर्षणाचे ठिकाण झाले आहे. पौराणिक, ऐंतिहासिक, सामाजिक व पारंपारीक महत्त्व असल्यामुळे महाडचे वैशिष्ट्य वाढीले आहे.
महाड हे सह्याद्री रांगांने घेरलेले व सावित्री आणि गांधारी नद्यानी पावन आहे. कोंकणातील महाड हे विकसित शहर असल्यामुळे ते आधुनिक
औद्योगिक व पौराणिक भारतीय संस्कृति चा आगळा वेगळा संगम आहे.
महाड मधील काही प्रेक्षिणीय स्थळे:
चवदार तळे
रायगड किल्ला
श्री वीरेश्वर महाराज मंदिर (शिवकालिण मंदिर)
गरम पाण्याचा झरा
पौराणिक बौद्धकालीन गुफा
शिवथरघळ (संत रामदास यांनी दासबोध या गुफेत लिहिला).
रम्य धबधबा व नैसर्गिक हिरवळ
डां.बाबासाहेब आंबेडकर यांची क्रांति भूमि.
जुने नदी बंदर जया वाटे छोटे व्यापारी किंवा प्रवासी अरब सागरात जात.