07/09/2024
शेतकऱ्यांना नैसर्गिक, अपघाती धोक्यापासून संरक्षण देण्यासाठी शासनाने ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ सुरू केली आहे. याद्वारे २ लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येत असून २०२३-२४ मध्ये ४००३ शेतकरी कुटुंबांना ७८ कोटी ५४ लाख रुपये अनुदान वाटप झाले आहे.