26/11/2022
फोन तिसऱ्यांदा वाजला होता आज रात्रीचा..
भारती ने फोन उचलला: पप्पा कशी परिस्थिती आहे तिकडे.
पप्पा: मी गिरगाव चौपाटी ला नाकाबंदी ला आहे. अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आहे सिएसटी जवळ आणि मोकाट सुटले आहेत ते. वैशाली ला सांग उद्या काॅलेज ला जायचे नाही. मी आता फोन करणार नाही. सकाळी येतो लवकरच घरी. ठेवतो मी फोन, तुझ्या आईला पण सांग.
पण नियतीला ते मंजुर नव्हते. पप्पा सकाळी घरी आलेच नाहीत, तसे ते त्यांनतर कधीच घरी आले नाहीत. भारतीला माहीत नव्हते की हे तिचे तिच्या पप्पांशी शेवटचे संभाषण होते.
ते पप्पा होते अशोक चक्र पुरस्कृत मुंबई पोलिस श्री. तुकाराम ओम्बळे.
हिंदुस्तान के इतिहास में अमर रहेगा तेरा नाम.....
नहीं ज़रूरत कोई स्मारक की, स्मारक ही तेरा नाम.....
२६ नोव्हेंबर २००८ रोजी रात्री पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात नंतर मुंबई पोलिसांनी सगळी कडे नाकाबंदी केली. एएसआय तुकाराम ओम्बळें ची ड्युटी गिरगाव चौपाटी भागातील नाक्यावर लागली.
हल्ल्या दरम्यान रात्री नाक्यावर एक स्कोडा आली. ओम्बळें च्या सहकाऱ्यांनी गाडी थांबविली आणि लाईट बंद करण्यास सुचविले. पण आतील ड्रायव्हर लाईट बंद करत नसल्याने, ओम्बळे आणि सहकारी गाडी च्या दिशेने जावु लागल्यावर गाडीतुन बेछूट गोळीबार चालु झाला. पोलिसांनी इकडुन प्रति उत्तरात गोळीबार केला त्यात गाडीतील पॅसेंजेर जागीच ठार झाला. पण कार मधील दुसरा अतिरेकी अत्याधुनिक एके-४७ मधुन गोळीबार करतच होता. निशस्त्र असणाऱ्या तुकाराम ओम्बळे नी पळत जावुन त्यांच्या दिशेने होणाऱ्या गोळीबाराची पर्वा न करता आणि एक नाही, दोन नाही चक्क तेवीस गोळ्या छाती वर छेलुन त्या अतिरेक्याची बंदुक पकडुन त्याला बाकी सहकाऱ्यांच्या साथीने जेरबंद केले. फक्त ओम्बळें च्या बहादुरी मुळे त्या अतिरेक्याला थाबंविणे शक्य झाले होते. त्याच अतिरेक्याला-अजमल कसाब ला पुढे जावुन फाशी देण्यात आली.
दुसऱ्या दिवशी सकाळी २७ नोव्हेंबर ला तुकाराम ओम्बळे जी हे जग सोडुन गेले. या वीराला भारत सरकारचा उत्त्युच्य पुरस्कार अशोक चक्र देवुन २६ जानेवारी २००९ रोजी मरणोत्तर सम्मानीत केले गेले.
तो पुरस्कार भारतीने आपल्या परिवारा सोबत स्वीकारला. तीचा त्या दिवसाचा इटरव्ह्यु मी १५ वेळेपेक्षा जास्ती बघितला. प्रत्येक वेळेला तुकाराम ओम्बळेंच्या पराक्रमाने छाती भरुन येते आणि या परिवारा बद्दलचा आदर वाढतच जातो.
आपले आयुष्य सैनिक सेवे नंतर पोलिस सेवेत वाहुन टाकले होते त्यांनी.
या वीराला माझा कडक सॅल्यूट ...🇮🇳🙏🏼