15/01/2025
आंतरजिल्हा बदलीतील अतिरिक्त 747 शिक्षक संदर्भातून....... श्री धस यांचा काळा चेहरा.
बीड.. 2014 पूर्वी युतीचे सरकार येण्याच्या अगोदर काँग्रेसचे सरकार होते. या सरकारमधील सहभागी सुरेश धस,- विजय राजे पंडित तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष, संदीप क्षीरसागर - तत्कालीन शिक्षण सभापती
श्रीमान जेवळीकर साहेब - तत्कालीन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या सर्वांच्या समन्वयातून बीड जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्या,आंतरजिल्हा बदलीने प्रचंड मोठा पैशाचा बाजार करून देवाणघेवाण करून अगदी चौका चौकात रस्त्यामध्ये गाडी उभा करून प्रिंटर सह सोबत ठेवून श्रीमान जेवळीकर यांनी जिल्ह्यातील शिक्षकांच्या सुद्धा बदल्या केल्या. त्या बदल्या ऑनलाइन पद्धतीने नव्हत्या. आंतर जिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांच्या बदल्या ह्या नियमानुसार व्हाव्या लागतात. परंतु बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाला कधीही नियम किंवा नियमावली पाळावीशी वाटली नाही. त्यातली त्यात सुरेश धस यांनी आज जी खोटी माहिती देणे सुरू केलेले आहे ते धंदात खोटे असून त्यांनीच केलेले हे पाप आहे. मा ना.पंकजाताई मुंडे ह्या 2014 नंतर महाराष्ट्राच्या ग्रामविकास मंत्री झाल्या. धस ने केलेले हे पाप त्यांना निस्तारण्यासाठी जवळ जवळ दोन वर्षे लागली. अर्थात ह्या अंदाधुंद पद्धतीने केलेल्या बदल्या यांना पोस्टिंग देण्यासाठी दोन वर्षे लागली. सुरेश धस म्हणजे बीड जिल्ह्याच्या राजकारणात एक कलंक आहे. मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली... हे जे माननीय पंकजाताई वर सद्यस्थितीला आरोप करीत आहेत. ते म्हणतात की 747 शिक्षक मा.पंकजाताई मुंडे यांनी चुकीच्या पद्धतीने आणून बसवले. पब्लिकने गाव गावच्या शिक्षकांना विचारून घ्यावे कोण खोटे बोलतो.
माननीय ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी अगदी ऑनलाईन पद्धतीने एन आय सी पुणे मार्फत बदल्या केलेल्या आहेत. त्या बदल्या महाराष्ट्र शासनाच्या पोर्टल वरून करण्यात आलेले आहे. सुरेश धस आका ला कदाचित ही माहिती नसावी. त्यांनी ज्या वेळेस राज्यमंत्री होते, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समोरील ऑनलाइन बदल्या प्रसंगी संगणक उचलून स्वतःच्या घरी नेऊन ठेवले.!
ही माहिती खुद्द तत्कालीन जिल्हाधिकारी सदानंद कोचे यांनी आपल्या पुस्तकात लिहून ठेवली आहे. या पुस्तकाचा आधार घेऊन कदाचित सुरेश धस यांच्यावरती गुन्हा नोंद करता येईल.
अशा प्रकारचा महाप्रताप करणारे सुरेश धस. यांचा एक काळाकुट्ट इतिहास आहे. या काळ्या कुट्ट इतिहासाला आम्ही सातत्याने मोर्चे आंदोलने व धरणे करून प्रत्युत्तर दिलेले आहे. हा मस्तवाल माणुस सद्यस्थितीला नागपूर वाल्याच्या मदतीने मा.पंकजाताई मुंडे यांना बदनाम करण्यासाठी टपलेला आहे. परंतु या सुरेशधसाला आम्ही चॅलेंज करू इच्छितो की, 747 शिक्षकांच्या बदल्या या गैर कशा? यासंबंधी सभागृहात आवाज उठवावा. मीडियामध्ये, पब्लिक मध्ये, सत्य झोपेतून उठेपर्यंत असत्याचा बोल बाला ज्या पद्धतीने सुरू असतो. त्या पद्धतीने सुरेश धस मस्तावलेल्या, तराळलेल्या माणसा प्रमाणे आरोप करीत आहे. परंतु आम्हाला माहित आहे की लगाम कसा घालावा? कळवा कसा घालावा?
सुरेश धस यांना कसलीच साधन सुचिता, न्यायनीतीची चाड नाही. पक्षांमध्ये काम करताना सेवा,समर्पण व बांधिलकी तर त्याला माहितीच नाही. आज जरी नागपूरवाल्यांनी फुस दिली असली तरी त्यांची फुसफूस फार काळ टिकणार नाही.कारण वर प्रधानमंत्रीमोदी व गृह मंत्री...शहा बसलेले आहेत. फार काळ असली, नको नको ती बडबड महाराष्ट्राला परवडणार नाही. अशा पद्धतीचा दम शिर्डी येथील दोन दिवसाच्या अधिवेशनामध्ये देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा यांनी भरला आहे. यावरून सुरेश धस यांनीही जरा तोंडाला चिकटपट्टी लावून घ्यावी. आणि मुंडे बंधू-भगिनीवरील आरोप पुराव्यानिशी करावेत. अन्यथा आष्टीत आम्हाला तळ मांडून आपली खरडपट्टी करायला काहीही वेळ लागणार नाही. आपला पुढचा राजकीय प्रवास आपणच स्वतः नको नको ते आरोप करून स्वतःच संपवीत आहात हे लक्षात ठेवा. सुरुवातीपासूनच्या व कालच्याच निवडणुकीमध्ये आपल्याला मुंडे बंधू-भगिनीचा हात असल्याशिवाय यश प्राप्त झालं नाही हे त्रिवार सत्य आहे. परंतु आपली दानत किंवा आपली
फित्रत सत्यवादी नाही हे आम्हाला माहित आहे. आपण दल बदलू आहेत. सत्य स्वीकारणे आपल्या स्वभावात नाही. जो स्वतः तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समोरचे ऑनलाइन बदल्याचे संगणक उचलून पळतो, जो स्वतः राज्यमंत्री असतो, तो मा.ना.पंकजाताई मुंडे ग्रामविकास मंत्री यांच्या ऑनलाइन बदल्या अतिशय शिस्तबद्ध, महाराष्ट्र शासनाच्या सचिव पातळीवरील अधिकाऱ्यांनी केलेल्या बदल्यास चुकीचं म्हणतो त्यास
बये तुला बुरगुंडा होईल गं "... या उक्तीनुसार बीड जिल्ह्यात जन्मलेले हे काळ कार्ट... जिल्ह्याचीच जेव्हा बदनामी करतो. केव्हा पेराल ते उगवते. परळीच्या वैद्यनाथ ने प्रचंड मोठ्या प्रमाणात विष पचवलेले आहे. तू तर काय -किस झाड की पत्ती.
ज्या वैद्यनाथाच्या पावन भूमीत येऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या सभेत येऊन स्वतः त्यांच्या चरणी नतमस्तक होणारा धस वेगळा नंतर त्यांच्या वर आरोप करणारा धस वेगळा, त्यांचेच फोटो लावून मते मागणारा धस वेगळा, आज मा.पंकजाताई वरती आरोप करणारा धस वेगळा, स्वर्गीय पंडितांना मुंडे यांच्या पाया पडणारा धस वेगळा,आणि लागलीच माननीय धनंजय मुंडे यांच्या जि प अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दगाबाज दिसून आलेला धस वेगळा. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी दुसऱ्यांदा तिकीट नाकारल्यानंतर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या घरी तासन्तास बसून त्यांच्यापुढे सातत्याने पायावर लोळण घेणारा धस परळीकरांनी पाहिलेला आहे.! अगदी कालच्या निवडणुकीमध्ये पंकजाताई मुंडे यांच्या सभा लावण्यासाठी परळी तळ मांडलेला व सभी प्रसंगी मुजरा करणारा धस बीड जिल्ह्याने पाहिलेला आहे.असा हा नवटंकीबाज दारुड्या आणि गारुड्या धस वेगळा!!
परळी ही वैद्यनाथाची भूमी, पंचम ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध असलेली भूमी. इथं जगमित्र नागाणाथाचे वास्तव्य आहे! इथे संतांचा वारसा आहे...
खरंतर परळीकरांना काशी वर्ज आहे.... मांजर जरी मारली तरी पळीकरांना काशीला जायची कसलीच गरज नाही! हा पळीकरांचा इतिहास आहे!! नवरात्र मध्ये जर काली मातेने अशा नराधमाला यम सदनी पाठवले तरी काहीही हरकत नाही.
वैद्यनाथाचा जीर्णोद्धार लोककल्याणकारी राणी अहिल्या राणी होळकर यांनी बांधकाम करून केलेला आहे.. वैद्यनाथाचे दर्शन झाल्यावर अहिल्यादेवी राणीचे दर्शन येथील भक्तांना आपोआपच होते!
वैद्यनाथाच्या पायथ्याशी अन्नपूर्णा देवी भोजनालयामध्ये
नित्यनेमाने पाच हजार पर्यंत माणसे दररोज जेवण करीत असतील! परळी ही दानसुरांची आहे.... धस यांनी सर्व प्रकारचे दान परळी वैद्यनाथ कडून घेऊन वैद्यनाथाचीच ते बदनामी करत आहेत.
त्यांनी कदाचित वैद्यनाथाचे दर्शन घेतले नसेल, धस यांना अहिल्या राणी देवी, ज्योतिराव फुले - सावित्री फुले
आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जरा वावडे दिसून येत आहे. अंगविक्षेप करून माळी-- माळी करत आहेत.धस हे सन्माननीय भुजबळ साहेबांवरती जेव्हा वाकडया नजरेने आज बोलत आहेत, तेव्हा आम्हाला लक्षात येते की धस हा नागपूरकरांच्या फूस -तंत्रामुळे बोलत आहे. अन्यथा धस ची औकात आम्हाला सर्वांना माहीत आहे.
खरंच धस यांची औकात आहे का की भुजबळ साहेब वर त्यांनी बोलावं. खरंच धस यांची औकात आहे का की माननीय पंकजाताई मुंडे यांच्या वरती बोलावं. खरंच धस यांची औकात आहे का की माननीय धनंजय मुंडे साहेबांवरती बोलावं. त्यांनी असंही म्हटलं की परळीमध्ये राष्ट्रसंत भगवान बाबा यांचा नारळी सप्ताह सुद्धा झालेला नाही, खरंच या धस यांना लाजना लज्जा.... हे काळं स्वतःला लोकनेता समजत आहे.
त्यांनी कालच्या मीडिया माध्यमातून जे झुटा बाजार बोलण्यास सुरुवात केली त्यापैकी परळीतील व्यपारी दुबे यांच्या अपहरणाविषयी खोटे बोलले... त्याचे उत्तर व्यापारी दुबे यांनी ताबडतोब दिले. नंतर प्राजक्ता माळी यांच्या संदर्भात अंगविक्षेप करून माळी माळी असा जातीय द्वेष बाहेर ओकला ... त्यात त्यांची एवढी नाचक्की झाली की त्यांना जाहीर माफी मागावी लागली.
त्यांनी धाराशिव च्या सभेमध्ये असं म्हणाले की, परळी वाल्यांनी कधी राष्ट्रसंत भगवान बाबा यांचा नारळी सप्ताह सुद्धा घेतला नाही. अरे गधड्या धस तुला काय माहित??
सुरेश धस यांनी परळीची बदनामी करण्यासाठी परळीत 109 गुण घडले झाले अशी बदनामी केली. दुसऱ्याच दिवशी परळीतील पोलीस प्रमुखांनी या संदर्भामध्ये खुलासा करून सांगितले की, बीड जिल्ह्यात केवळ 41 खून नोंद झालेले आहेत. इतर नोंदी ह्या आकस्मात मृत्यूच्या झालेल्या आहेत.
या व्यक्तीचा ना कुठला अभ्यास ना कुठली साधन सुचिता. हा अस्सल दारुड्या - नौटंकी बाज आणि गारुड्या आहे.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी 2004 च्या दरम्यान नारळी सप्ताह परळी येथील वैद्यनाथ कॉलेजच्या मैदानावरती घेतलेला होता. त्या नारळी सप्ताहामध्ये त्यांनी ह भ प नामदेव शास्त्री,पंडित यादव राज, अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर, अजित कडकडे असे ख्यातनाम गायक- पखवाज वादक आणलेले होते.
धस असे म्हणतात की 30% वंजारी सोबत आहेत, त्यांनी खरंच येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आता मुंडे बंधू भगिनीला शरण जाऊ नये. स्वतःच्या हिमतीवरती आता प्रत्येक निवडणूक लढावी. अन्यथा पुन्हा मुंडे बंधू भगिनी समोर पायावर लोळण घेऊ नये.
कालच शिर्डी येथे झालेल्या महा अधिवेशनामध्ये माननीय नामदार पंकजाताई मुंडे समोर येऊन गडगडा लोळण घेऊन नमस्कार केलेला आम्ही पाहिलेला आहे. अशा ह्या नौटंकी बाजने
आता जो त्यांनी स्टॅन्ड घेतलेला आहे तो नागपूरकरांच्या फुस लावल्यामुळे घेतला आहे हे परळीकर यांना ज्ञात झाले आहे. मुंडे बंधू-भगिनींनीही आता लक्षात ठेवावे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस समन्वय असणे गरजेचे आहे.
देवेंद्र फडणवीस यांना कितीही वाटले तरी, त्यांनी स्वतःच कबूल केले आहे की ओबीसी आमचा डीएनए आहे. ते ओबीसीला एवढ्या तात्काळ सोडून देतील असे आम्हास वाटत नाही. कारण त्यांनी कितीही मराठा नेतृत्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी, सुरेश धस सारखे नेते फडणवीस यांच्या हातावर तुरी देऊन कधीही ते त्यांना दगा देऊ शकतात. त्यांनाही माहित आहे की, सुरेश धस ही व्यक्ती दगाबाज आहे.!
देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय गुरू लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना दगा देणारा सुरेश धस हा फडणवीस यांना दगा देणार नाही याची खात्री कोण देऊ शकतो?? देवेंद्रजी फडणवीस चाणक्य आहेत. या दारुड्याच्या ती नादी लागणार नाहीत. याची आम्हाला खात्री आहे.सुरेश धस च्या एकूण राजकारणामध्ये दगाबाजी चा संचार वावरलेला आहे. तो जो राणा भीमदेवी थाटामध्ये अंगविक्षेप करून, नौटंकी करून, हा दारुड्या गारुड्याप्रमाणे मराठवाड्यातील माणसांची करमणूक करीत आहे. ही अशी माणसे अल्पजीवी असतात.