
15/01/2025
श्री सिध्दीविनायक परिवार तर्फे आयोजित मकर संक्रांत हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न
श्री सिध्दीविनायक परिवार यांच्या वतीने आयोजित मकर संक्रांत हळदी-कुंकू कार्यक्रम शहरातील महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यशस्वीपणे पार पडला.
हा कार्यक्रम १५ जानेवारी २०२५ रोजी धाराशिव येथील सोनाई फंक्शन हॉल, छत्रपती संभाजी महाराज नगर येथे पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात महिलांसाठी विविध सांस्कृतिक उपक्रम आणि अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते.
तिळगुळ वाण, पारंपरिक भेटवस्तू वाटप, तसेच सणाच्या महत्त्वाबद्दल मार्गदर्शन हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. या समारंभामध्ये श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक श्री. दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या सुविद्य पत्नी सौ. दीपाली कुलकर्णी व कुटुंबातील महिला सदस्य सौ माधुरी कुलकर्णी, सौ प्राची कुलकर्णी व श्री सिध्दीविनायक परिवारातील महिला भगिनी यांचे हस्ते वाण देण्यात आले.
उपस्थित महिलांनी आपली मते व्यक्त करताना आयोजकांच्या कौतुकास्पद प्रयत्नांचे अभिनंदन केले. श्री सिध्दीविनायक परिवाराच्या वतीने सर्व उपस्थितांचे आभार मानले असून, अशा प्रकारच्या कार्यक्रमांद्वारे समाजातील बंधुभाव वृद्धिंगत करण्याचे वचन दिले आहे.यांच्या वतीने आयोजित मकर संक्रांत हळदी-कुंकू कार्यक्रम शहरातील महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यशस्वीपणे पार पडला.