29/11/2024
संकेत भासे... मूर्ती लहान पण राजकारण मोठं...AI च्या युगातील vision असणारा युवा नेता...
*संग्राम हा चेहरा लक्षात ठेव*
*आज कर्जत नगरपरिषदचे नगरसेवक वकील संकेत भासे यांचा वाढदिवस... संकेतजी मनापासून अभिष्टचिंतन...*
*संग्राम हा चेहरा लक्षात ठेव* या टॅग लाईन खाली सह्याद्री दर्पण न्यूज चॅनेल वर निकालाच्या दिवशी एक व्हिडीओ टाकला होता आणि त्याच्या रिऍक्शन भन्नाट आल्या...
अक्षरशः हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि तो केलाही विरोधकांनी... कारण त्यात चेहरा होता की ज्या चेहऱ्याने अपक्ष उमेदवार यांची झोप उडवली होती... कर्जत शहरात विशेष लक्ष याच संकेत भासे यांनी दिले होते. आणि जातीने शहर सांभाळलं आणि यश मिळवून दाखवलं... भले भले विरोधक जे करू शकले ते अचूकपणे संकेत भासे यांनी करून दाखवलं आणि निकालात ते सर्वाना पाहायला मिळालं...
आमदार महेंद्र थोरवे यांनी मोठ्या विश्वासाने संकेत भासेंवर जबाबदारी दिली ती जबाबदारी काटेकोर पाळली असा हा नेता नाही, पदाधिकारी नाही तर तुमच्या आमच्यातला हाडाचा शिवसैनिक म्हणा...
संकेत भासे हे वयाने लहान आहेत पण राजकारण असं करतात की जे मुरलेल्या पक्क्या राजकारणी पैलवाणाला जमतं त्याच्या पेक्षा अधिक पटीने कमी वेळात संकेत भासे यांना जमत हे कसब त्यांनी आत्मसात केलंय त्या साठी त्यांचं कौतुकच करावं लागल.
प्रचारात त्यांनी कर्जत शहरात स्वतःला झोकून दिलं होतं आणि त्यांची *पत्नी करिष्मा संकेत भासे* यांनीही खालापूर मध्ये प्रचारात आघाडी घेतली होती अश्या या नवराबायको जोडीने जे योगदान प्रचाररुपी दिलंय त्याच वर्णन शब्दात मांडण अवघड आहे...
कल्पक, तल्लख, अचूक निरीक्षण, परीक्षण, अभ्यासू, वक्तशीरपणा, प्रोटोकॉल जाणणारा, वक्तृत्व, धाडसी अश्या विविध गुणांनी त्यांनी आपली ओळख वेगळी करून दिलीय... कर्जत शहराच्या विकासाचं नवं मॉडेल हातात नाही तर डोळ्यांत, डोक्यात तर हृदयात ठेऊन संकेत भासे नेहमी काम करताना पाहायला मिळतात.
आमदार साहेबांच नंदनवनरुपी विकासाचे स्वप्न त्यांनी पाहून त्यांच्या मार्गदर्शनाखाली संकेत भासे आपलं कार्य करीत आहेत...
नेत्याकडे व्हिजन असावे असं म्हंटले जाते आणि ते आपल्याला कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांचेकडे पाहायला मिळते... आपलें मामा राजकारणात यशस्वी झालेत त्यांच्याकडून राजकीय बाळकडू घेणारे संकेत भासे यांच्याकडे पाहिल्यावर, त्यांच्याशी बोलल्यावर किंवा त्यांच्या संपर्कात आल्यावर व्हिजन असणारा हा नेता प्रत्येकाला वाटतो...
तरुणांनी राजकारणात यायला हवं याच उत्तम उदाहरणं संकेत भासे हे होय... घरात कोणतीही राजकीय पार्शवभूमी नसताना संकेत भासे यांनी अल्पवधित जी राजकीय झेप घेतलीय त्याच कौतुक करावं तितकं कमी आहे.
पिढी बदललीय... Artificial intelligent चा युग आलय आणि अश्या आधुनिक जगात राजकारण ही नव्या पिढीला जस हवंय तसं करणारा हा नेता आहे.तरुणांच्या अपेक्षा बदलल्यात आणि विकासाचे मॉडेल बदललंय त्याच उत्तम जाण ठेऊन काम करणारा हा युवानेता आहे. इतिहास, संस्कृती, परंपरा टिकवून नव्या पिढीला आपला वारसा शहरांतल्या सुजान नागरिकांना पाहायला मिळेल याची काळजी घेऊन आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून त्यांनी ऐतिहासिक असे प्रकल्प उभे केलेत.
राजकारणात तुम्ही किती वर्ष आहात याच्या पेक्षा तुमचं राजकारणात काय वजन आहे किंवा तुमचं राजकारण किती समाजाभीमुख आहे आणि जनतेला त्याचा लाभ होणार आहे का? याची काळजी घेऊन तरुण पिढीतील नव्या दमाचा नेता म्हणून संकेत भासे यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूक मध्ये करून दाखवलंय त्याला तोड नाही...
विरोधकांना स्वतःहून अंगावर न घेता जर आलेच अंगावर तर घेणार शिंगावर अशी ओळख त्यांनी निर्माण केलीय. फेक नरेंटिव्हच्या माध्यमातून अनेक आरोपांना परतावून उलट तेच आरोप विरोधकांवर बुमराँग करणारा हा नेता आहे.
*संग्राम हा चेहरा लक्षात ठेव हे तुम्ही दाखवून दिलंत* आणि माउलींच्या आशीर्वादाने यशस्वी झालात त्या यशा बद्दल ही आपलं गोड कौतुक.
*संकेत जी आपला आज वाढदिवस....* उद्याचं कर्जत शहराचे भविष्य तळहातावर घेऊन तुम्ही विकासात्मक जे स्वप्न पाहिलंय ते आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याहातून पूर्ण होओ हीच यादिनी शुभेच्छा!!!
*आप जिओ हजारो साल...*
😊💐💐💐💐💐💐🚩😊
आपला...
*ऍड. अमोलराजे बांदल-पाटील*