15/06/2023
हा खरा गांधीमार्ग !अशा वैज्ञानिक सत्याग्रहास माझा पूर्ण पाठिंबा आहे मी म्हणाल तिथे असा सत्याग्रह करण्यास तयार आहे - प्राणीमित्र विलास भाई शहा
महामार्गविकास व शेती यांचे सहअस्त्तित्व शक्य आहे ! खालून महामार्ग व वाहने पण वरून अत्याधुनिक शेती शक्य आहे ! त्यासाठी शेतीचे व शेतकऱ्यांचे विस्थापन खरोखरच गरजेचे नाही !विज्ञानग्राम सोला र पूर अंकोली येथील गांधीवादी वैज्ञानिक अरूण देशपांडे हे शेतीबाबत मूलभूत क्रांतीकारक संकल्पना मांडत असून ठोस पर्यायही उभा करीत आहेत ! रस्तेविकासात जमिनी गमावणाऱ्या शेतकऱ्यांनी सत्याग्रह करून या पर्यायाचा पाठपुरावा करावा व शासनास सर्व रस्ते व महामार्ग सदाहरित करायला भाग पाडावेच! कुरूल - पंढरपूर रस्त्यावरील वैज्ञानिक सत्याग्रह प्रात्यक्षिकास जेष्ठ गांधीवादी प्राणीमित्र विलासभाई शहा यांनी भेट दिली आणि हे उद्गार काढले व आशीर्वाद दिले !!
याप्रसंगी सुमंगला देशपांडे प्रोजेक्ट स्कूलचे संचालक श्रीकांत सुतार .आ्किटेक्ट अतुल कोटा , सामाजिक कार्यकर्ते गोपालक रूद्रप्पा बिराजदार गोपालकआश्विनी कुलकर्णी आदी उपस्थित होते
रस्ता बंद होणार नसल्याने जाणारे येणारे वाहनचालक खूष होते
अरूण देशपांडे यांनी या प्रात्यक्षिकाची माहिती दिली
५ जूनपासून जागतिक पर्यावरण दिनापासून विज्ञानग्रामात या प्रात्यक्षिकाची सुरूवात झाली झटपट उभे करता येईल अशा एक पोर्टेबल ग्रीनहाऊसचा सांगाडा तयार झाला आहे जिथे महामार्गाचे आखणी काम चालू आहे व शेतकरी संघटित होऊन या वैज्ञानिक प्रात्यक्षिकाच्या गांधीमार्गी सत्याग्रहास तयार आहेत अशा ठिकाणी हे पोर्टेबल ग्रीनहाऊस उभे करून सत्याग्रह करता येईल !
आमचा रस्ते विकासास मुळीच विरोध नाही परंतु शेतीच्या क्षेत्रफळाप्रमाणे होणाऱ्या बिनडोक व कृषीनिरक्षर मूल्यमापनास विस्थापनास आहे ! खरे तर शेतीचे घनफळ महत्वाचे ! शेतीच्या वैज्ञानिक व्याख्येनुसार ( ॲग्रीकल्चर मीन्स कल्चर्ड फोटोसिथेसिस - मानवाने अक्कलहुशारीने मुद्दाम जोपासलेल्या वनस्पतींद्वारे घडवून आणलेले सूर्यप्रकाशसंश्लेषण ) शेतीची महाराष्ट्रात भविष्यकाळात शक्य असणारी उंची व खोली ६०० फूट असल्याने स्पेस इंडेक्स ६० मजल्याएवढी आहे ! त्यातील रस्त्यासाठी २० फूट -२ मजलेच आवश्यक आहेत ! एकतर साठपटीने नुकसानभरपाई मिळायला हवी नाहीतर त्या मानाने स्वस्तात रस्त्याच्या वर २० फूट उंचीवर ग्रीनहाऊसची शेती विकसित होऊ शकते ! शेतीस पाऊस व ऊन आवश्यक तर रस्ता व वाहने यांना सूर्यप्रकाश पाऊस यांपासून संरक्षण हवे आहे ! वाहनांची कार्यक्षमता वाढेल ! कूलींग चांगले होईल तसेच वाहनातून निघणारा कार्बनडायॲाक्सॅाईड व पाण्याची वाफ ग्रीनहाऊसमधील शेतीस फायदेशीरच ठरेल !अशी ही विनविन पार्टनरशिप आहे ! शेतकऱ्यांना ग्रीन टोल वाटा वसूल करता येईल ! फेरोक्रीट सिपोरेक्स एरेटेड कॅांक्रीट स्लॅब टेक्नॅालॅाजी वापरून हे स्वस्तात करता येईल ! खुळचट विकासामुळे शेतकऱ्यांचे होणारे उच्चाटन विस्थापन व त्यातून निर्माण होणारा असंतोष परवडणार नाही !
सुमंगला देशपांडे