Xtralarge News

  • Home
  • Xtralarge News

Xtralarge News xtralargenews (XXL News) web portal Is all about giving othentic information. We are commited for Real Journalism, no parciality and not ajenda driven news.

only pure NEWS.

28/01/2025

GBS रुग्णांसाठी शासकीय रुग्णालयांत विशेष व्यवस्था.

मुंबई, दि. २८ जानेवारी;

गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) आजाराबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर आढावा घेतला. शासकीय रुग्णालयांमध्ये या रुग्णांसाठी विशेष सुविधा निर्माण करण्यात याव्यात, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
#दूषितपाणी #पिंपरीचिंचवड #पुणे #फडणवीस #मंत्रीमंडळबैठक #महाराष्ट्र #मुख्यमंत्री #शासकीयरुग्णालय

28/01/2025

कोरेगाव तालुक्यातील दर्जेदार रस्त्यांचा आराखडा सादर करा.

मुंबई, दि. २८ जानेवारी :-

सातारा जिल्ह्रातील कोरेगाव शहरासह तालुक्यात सातत्याने होणारी वाहतूककोंडी, संभाव्य रस्तेअपघात टाळण्यासाठी ल्हासुर्णे ते कुमठे बाह्यवळण रस्ता, तसेच ल्हासुर्णे-कुमठे-वडाचीवाडी बाह्यवळण रस्त्यांची कामे पुढील तीस वर्षांचा विचार करून दर्जेदार पद्धतीने करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
#अजितपवार #उपमुख्यमंत्री #कुमठे #कोरेगाव #फलटण #रस्ते #रेडेघाट #ल्हासुर्णे #सातारा

28/01/2025

मलेशियाच्या पर्यटकांनी महाराष्ट्रात यावे..

मुंबई, दि. २८ जानेवारी :

महाराष्ट्र आणि मलेशियादरम्यान विविध सांस्कृतिक बाबींमध्ये समानता आहे. महाराष्ट्र कृषी उत्पादने, पर्यटन अशा विविध क्षेत्रांमध्ये आघाडीवर असून सांस्कृतिक आणि व्यापारी क्षेत्रातील परस्पर संबंध वृद्धींगत करण्यासाठी महाराष्ट्र मलेशियाचे स्वागत करेल. महाराष्ट्र पर्यटन स्थळांनी समृद्ध आहे.

28/01/2025

ST ची भाडेवाढ तात्काळ रद्द..

मुंबई, दि. २८ जानेवारी २०२५;

विधानसभा निवडणुकीत जनतेवर सवलतींचा वर्षाव करणाऱ्या भाजपा युती सरकारने सत्तेत येताच जनतेला लुटण्याचे काम सुरु केले आहे. आधीच महागाईवर नियंत्रण मिळवण्यात भाजपा युती सरकार सपशेल अपयशी ठरले असताना आता राज्यातील सर्वसामान्य जनतेची जीवन वाहिनी असलेल्या एसटीच्या तिकिटदरात १५ टक्के वाढ करून सरकार जनतेला लुटत आहे.

28/01/2025

आई-वडीलांच्या काबाडकष्टाचे पांग फेडा...

दापोली, दि. २८ जानेवारी; -

आपले आई-वडील काबाडकष्ट, मेहनत घेत असतील तर त्यांचे पांग फेडण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची आहे, असा मोलाचा सल्ला भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी दिला. तसेच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून याठिकाणी लवकरच पी. जी. इन्स्टिट्युट सुरू करणार, असे आश्वासनही दरेकरांनी दिले.
#कोकण #दापोली #पीजीइन्स्टिट्युट #प्रविणदरेकर #भाजपा #शाळा

28/01/2025

सोयाबीन खरेदीला सात दिवस मुदतवाढ !

मुबई दि. २८ जानेवारी :-

राज्यात सोयाबीनची खरेदी वेगाने चालू असून ३१ जानेवारी नंतर सोयाबीनची खरेदी पुढे काही दिवस चालू राहावी, अशी मागणी होत आहे. त्या मागणीच्या अनुषंगाने सोयाबीन खरेदीसाठी आणखी सात दिवस मुदतवाढ मिळावी यासाठी केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

28/01/2025

मुंबई, नाशिक,कोल्हापूरातील ठाकरेंचे सैनिक शिंदेसेनेत..



ठाणे, दि. २८ जानेवारी २०२५ :

मुंबई महापालिकेतील उबाठा गटाच्या माजी नगरसेविका आणि महिला संघटक राजूल पटेल यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. याचबरोबर राज्यभरातील उबाठा गटाच्या शेकडो पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांनी आनंद दिघे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ठाण्यातील आनंद दिघे यांचे समाधीस्थान असलेल्या शक्तीस्थळावर शिवसेना मुख्यनेते आणि

28/01/2025

AI विद्यापीठासाठी समिती गठीत..

मुंबई, दि २८ जानेवारी:-

विकसित भारत 2047 मिशनच्या यशस्वी पूर्ततेसाठी आणि भारताच्या 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचालीसाठी शिक्षण आणि तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ लवकरच स्थापन करण्यात येणार आहे.यासाठी समिती गठीत करावी अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.
िद्यापीठ #उच्चवतंत्रशिक्षण #कृत्रिमबुद्धीमत्ता #चंद्रकांतपाटील #महाराष्ट्र

27/01/2025

गोड्या पाण्यातील मासेमारी धोरण तयार करा..

मुंबई, दि. २७ जानेवारी -

राज्यात गोड्यापाण्यातील खंडांतर्गत मासेमारीला मोठा वाव आहे. सध्याच्या खंडाअंतर्गत मासेमरिमध्ये वाढ करण्यासाठी धोरण निश्चित करावे. तसेच मत्स्यबीज मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होण्यासाठीही धोरण तयार करावे अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.सह्याद्री

27/01/2025

सहा हजार काॅलेजमध्ये 'संविधान गौरव महोत्सव'!

मुंबई,दि. २७ जानेवारी :-

भारतीय राज्यघटनेच्या ७५ वर्षांच्या ऐतिहासिक पर्वानिमित्त राज्यातील सहा हजार पेक्षा अधिक महाविद्यालयांमध्ये फेब्रुवारीमध्ये संपूर्ण महिनाभर "संविधान गौरव महोत्सव" निमित्ताने विविध उपक्रमाचे आयोजन करणार असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

27/01/2025

एसटी भाडेवाढ तात्काळ मागे घ्या.

मुंबई, दि. २७ जानेवारी :

एसटी भाडेवाढीच्या निर्णयावर प्रखर टीका करत ती तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते व मुंबई युवक अध्यक्ष अमोल मातेले यांनी केली आहे. त्यांनी या निर्णयामागील गोंधळावर आणि सरकारच्या भूमिकेवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
#एसटीभाडेवाढ #परिवहनमंत्री #भाजपायुती #महामंडळ #सरकार

26/01/2025

मनोहर जोशी, अशोक सराफ, चित्तमपल्लींना पद्मपुरस्कार.

दिल्ली, दि. २६ जानेवारी;

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारात महाराष्ट्रातील तिघांना पद्मभूषण तर 11 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व पंकज उदास यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.नागपूरचे प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ.

26/01/2025

उद्धव ठाकरेंनीच राज्याच्या अस्मितेचा ठेका घेतलेला नाही.

मुंबई, दि. २६ जानेवारी ;

महाराष्ट्राच्या अस्मितेचा ठेका संजय राऊत किंवा उद्धव ठाकरेंनी घेतलेला नाही. आम्हीही महाराष्ट्राच्या अस्मितेचे पाईक असणारी लोकं आहोत. केवळ ठाकरे सेना नाही तर सगळ्या पक्षांत महाराष्ट्राची अस्मिता आहे. भावनिक राजकारण करून लोकांना भुलवण्याचे दिवस संपले, हे दुर्दैवाने संजय राऊत यांना समजून येत नाही.
#उद्धवठाकरे #जरांगेपाटील #प्रविणदरेकर #भाजपा #शिवसेना #संजयराऊत

26/01/2025

राष्ट्रीय मतदार दिनी काँग्रेसचे राज्यभर आंदोलन.

मुंबई, दि. २६ जानेवारी;

राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधत लोकशाहीचे रक्षण व मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी काँग्रेस पक्षाने राज्यभर आदोलन केल तसेच पत्रकार परिषदाही घेतल्या. नागपूरमध्ये प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपा सरकार व निवडणूक आयोगावर तोफ डागली.
#आंदोलन #काँग्रेस #निवडणूकआयोग #भाजपा #राजीवकुमार #राष्ट्रीयमतदारदिन

26/01/2025

सहा महिन्यात ४८ लाख मतदार कसे वाढले याचे पुरावे द्या:

मुंबई, दि. २६ जानेवारी २०२५;

लोकशाही व्यवस्थेत निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी स्वायत्त संस्था असलेल्या निवडणूक आयोगाकडे आहे परंतु आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत त्याला हरताळ फासला आहे. विधानसभेला मतदार याद्यांमध्ये मोठा घोटाळा केल्याने त्याचा फायदा भाजपा युतीला झाला आहे.
#काँग्रेस #निवडणूकआयोग #महाराष्ट्र #लोकसभा #लोणी #विखेपाटील #विधानसभा #शिर्डी

26/01/2025

मविआच्या १०० पराभूत उमेदवारांची न्यायालयात याचिका:

मुंबई, दि. २६ जानेवारी;

राष्ट्रीय मतदार दिनी निवडणूक आयोगाला शुभेच्छा दिल्या पाहिजेत पण महाराष्ट्रातील जनता त्यांना शुभेच्छा देऊ इच्छित नाही, निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केली आहे. विधानसभा निवडणुकी संदर्भात मतदार याद्यांमधील घोळ हा एक महत्वाचा मुद्दा आहे. यासंदर्भात काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाच्या भूमिकेविरोधात लढत आहे.
#उच्चन्यायालय #काँग्रेस #निवडणूकआयोग #पृथ्वीराजचव्हाण #मविआ #विधानसभानिवडणूक

26/01/2025

झोपेचे सोंग घेतलेल्या निवडणूक आयोग व सरकारला जागे करा:

मुंबई, दि. २६ जानेवारी २०२५ :
लोकांनी लोकांसाठी निवडून देण्याच्या लोकशाही व्यवस्थेलाच निवडणूक आयोग व भाजपा सरकारने बगल देत मतदारांच्या मतदानावर दरोडा टाकण्याचे काम केले आहे, हा प्रकार लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे.
#अरविंदकेजरीवाल #काँग्रेस #निवडणूकआयोग #प्रजासत्ताकदिवस #भाजपा #राहुलगांधी

25/01/2025

स्वतः घरात बसू पण दुसऱ्याला म्हणतात रुसू बाई रुसू !

जालना, दि २५ जानेवारी :-

माझ्यातला कार्यकर्ता खुर्ची शोधत नाही काम शोधतो, सतत कार्यरत राहणे हेच माझे ध्येय असून रक्ताच्या शेवटच्या थेंबा पर्यंत सर्वसामान्य माणसासाठी काम करत राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. जालना येथील आझाद मैदानावर पार पडलेल्या विराट आशा आभार सभेला संबोधित करताना त्यांनी हे मत व्यक्त केले.
#अमितशाह #उद्धवठाकरे #एकनाथशिंदे #जालना #नरेंद्रमोदी #पंतप्रधान #शिवसेना

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Xtralarge News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Xtralarge News:

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share