Nashik On Web

  • Home
  • Nashik On Web

Nashik On Web NashikOnWeb.com
Nashik On Web is Nashik's Leading Online News Channel. We Cover Politics, Crime, Sp We deliver News content from Nashik, North Maharashtra.
(32)

NashikOnWeb.com is a new age initiative of Positive Media Production which has a formidable track record in the domain of Media and Entertainment. NashikOnWeb.com is made for providing unbiased news, views and clean entertainment.

19/06/2024
वंदन युगपुरुषाला  #डॉबाबासाहेबआंबेडकरजयंती
13/04/2024

वंदन युगपुरुषाला

#डॉबाबासाहेबआंबेडकरजयंती

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि. (मल्टी-स्टेट)प्रस्तुतसंज्या छायालेखक- प्रशांत दळवी & दिग्दर्शक- चंद्रकांत कुलकर्ण...
30/11/2023

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि. (मल्टी-स्टेट)

प्रस्तुत

संज्या छाया
लेखक- प्रशांत दळवी & दिग्दर्शक- चंद्रकांत कुलकर्णी

प्रायोजक - कोटस आणि दिपक बिल्डर
सहप्रायोजक - चांदुकाका सरफ
रेडिओ पार्टनर - MY FM

कलाकर-

वैभव मांगले , निर्मिती सावंत,
सुनील अभ्यंकर, योगिनी चौक बो-हाडे, अभय जोशी, आशीर्वाद मराठे, मोहन साटम, संदीप जाधव, राजस सुळे.

तारीख : रविवार, 03 डिसेंबर वेळ : संध्या. 5.30 वाजता

स्थळ : महाकवी कालिदास कलामंदिर, नाशिक

तिकीट विक्री 21 नोव्हेंबर पासून कालिदास कलामंदिर

आणि लोकमान्यच्या नजीकच्या शाखेत सुरु

संपर्क: 8668322852 / 9422776384

कार्यक्रमातील नफा लोककल्प फाउंडेशनला दान केला जाईल.

Online Booking Book my show
Link - http://bit.ly/3G7CpYP

T&C* Apply

BookMyShow offers showtimes, movie tickets, reviews, trailers, concert tickets and events nearby. Also features promotional offers, coupons and mobile app.

Advance Booking सुरू ! आई-मुलाच्या दृढ नात्याची आणि निस्सीम प्रेमाची हृदयस्पर्शी गोष्ट 'श्यामची आई,' सहकुटुंब पाहण्यासाठ...
10/11/2023

Advance Booking सुरू !
आई-मुलाच्या दृढ नात्याची आणि निस्सीम प्रेमाची हृदयस्पर्शी गोष्ट 'श्यामची आई,' सहकुटुंब पाहण्यासाठी तुमची तिकिटं आताच बुक करा.
#श्यामचीआई उद्यापासून सर्व चित्रपटगृहांत!


BMS - https://bit.ly/ShyamchiAai_BMSTickets

PayTm - https://bit.ly/ShyamchiAai_PaytmTickets



A Film By : Sujay Sunil Dahake
Written By : Sunil Sukthankar

Produced By : Amruta Films - Amruta Arun Rao & Pune Film Company
Presented By : Almonds Creation - Ajay-Aniruddha |
Kirti Mehendale - Pendharkar | Aakash Pendharkar | Vikram Dhaktode

Starring : Gauri Deshpande | Sharva Gadgil | Om Bhutkar | Mayur More | Sandeep Pathak | Sarang Sathaye | Akshayaa Gurav | Urrmila Jagtap | Deesha Katkar | Gandhar Joshi | Aniket Sagvekar | Jyoti Chandekar

DOP - Vijay Mishra
Editor - B. Mahanteshwar
Music - Ashok Patki
Background Music - Saket Kanetkar | Aabha Soumitra
Music On - Panorama Music
Sound Design - Kunal Lolsure
Art Director - Ameya Bhalerao
Executive Producer - Dinesh Mapari
Associate Director - Azam Karnik
Makeup - Mahesh Barate
Costumes - Namdev Waghmare
Digital Agency - Vizual Junkies
Publicity Design - Saurabh Sadanand Chandekar
Media Director - Pradnyaa Sumathi Shetty ( Friends In Corporate)
Distributor - Panorama Studios
Murli Chhatwani, Ravindra Auti,
Darshan Shah
Advertisement 😭😀❤️

नाशिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा.सूर्यकांत रहाळकर सर यांचे अल्पशा आजाराने नुकतेच दुःखद निधन झाले आहे. आदरणीय सरांच...
13/09/2023

नाशिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा.सूर्यकांत रहाळकर सर यांचे अल्पशा आजाराने नुकतेच दुःखद निधन झाले आहे. आदरणीय सरांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन आज दुपारी ४.०० ते ६.०० या वेळेत पेठे हायस्कूल ,रविवार कारंजा येथे होईल व अंत्यविधी पंचवटी अमरधाम नाशिक येथे आज संध्याकाळी ७.०० वाजता होईल.. आदरणीय सरांच्या चरणी विनम्र आदरांजली🙏🙏

  तुमच्या शिफारसीनुसार जवान आजच पाहून टाकला सहकुटुंब… स्पॉइलर देणारे रिव्ह्यू वगैरे येण्याच्या आतच.फुल पैसा वसूल सिनेमा ...
08/09/2023

तुमच्या शिफारसीनुसार जवान आजच पाहून टाकला सहकुटुंब… स्पॉइलर देणारे रिव्ह्यू वगैरे येण्याच्या आतच.

फुल पैसा वसूल सिनेमा आहे… त्यापलीकडेही बरंच काही आहे.

मेनस्ट्रीम हिंदी सिनेमाने सध्या आणि पुन्हा एकदा दक्षिणेचा हात पकडला आहे, हे उत्तम काम झालेलं आहे.

लेखक-दिग्दर्शक ॲटलीमध्ये इंडियन, नायक, शिवाजी द बॉसचा शंकर संचारला आहे. गंभीर समस्यांची सुटसुटीत सोपी आणि झटपट सोडवणूक हा फॉर्म्युला घिसापिटा असला तरी रंजक आहे, प्रेक्षकांना खोटं खोटं का होईना समाधान देणारा आहे. हा सिनेमा कमलहासन किंवा रजनीकांत यांच्यासाठी लिहिला असावा, असाच प्रचंड मोठ्या कॅनव्हासवरच्या बोल्ड स्ट्रोक्सचा मेगा मासी सिनेमा आहे. त्या प्रकारच्या मांडणीत शाहरूख परफेक्ट फिट बसतो, हे त्याचं क्रेडिट. शिवाय कथानकातले ट्विस्ट अँड टर्न, शाहरूखचे अवतार, त्याचा सर्वार्थाने कडक परफॉर्मन्स, सातही पोरींची अफलातून साथ, ईशान्य भारताचा रेफरन्स, खतरनाक सिनेमॅटोग्राफी, अंगावर येणारं पार्श्वसंगीत हे सगळं आहेच. मला खास आवडला तो कावेरी अम्माचा उल्लेख… शाहरूखने स्वदेस रिलीझ झाला तेव्हा जवळपास डिसओन केला होता. नंतर अनेक वर्षांनी त्याने करण जोहरच्या शोमध्ये दोन सिनेमांपैकी आवडता सिनेमा निवडताना स्वदेसची निवड केली होती, तेव्हा छान वाटलं होतं, आता आणखी छान वाटलं.

या सिनेमाचं सबटेक्स्ट, कितीही बटबटीत वाटलं तरी, आजच्या वातावरणात फार महत्त्वाचं आहे. इथे मी अमुक बनवलं, तमुक बनवलं, केवढी प्रचंड प्रगती केली, असं रेकून रेकून धादांत खोटं बोलणारा राजकीय नेता आहे. काफिल खानशी उत्तर प्रदेशाच्या बुलडोझर सरकारने केलेल्या गैरवर्तणुकीची आठवण करून देणारी कहाणी आहे, शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न आहे, फोर्थ वॉल भेदून लोकांना मताधिकाराचा योग्य वापर करा, जात, धर्म, पंथ याच्या आधारावर मतदान करू नका असं पोटतिडिकीने सांगणारा शाहरूख खान आहे… या सिनेमात बऱ्याच काळाने सगळ्या देशभरातले, सर्व धर्मपंथांचे लोक ‘गर्दी’ म्हणून का होईना दिसतात, हे फार महत्त्वाचं आहे. दक्षिणेत व्यावसायिक सिनेमे थेट राजकीय भाष्य करणारे असण्याची परंपरा आहे. हिंदी व्यावसायिक सिनेमा मधल्या काळात (बहुतेक बहिष्कारी कावळे, सनातनी, ट्रोल गँग यांना घाबरून) एकदम तकलादू परीराज्यात, इतिहासाच्या कंटाळवाण्या पोषाखी मांडणीत, कॉमिक बुक्समध्ये शिरला होता. तो पठाण आणि जवानमधून शाहरूखने व्यवस्थित जमिनीवर आणलेला आहे. त्याला रंजक आणि समकालीन बनवून टाकलं आहे.

पडद्यावर कोणी सिगरेट ओढणारी व्यक्तिरेखा असली तर सतत खाली वैधानिक इशारा येतो. त्याची खिल्ली उडवण्यासाठी की काय सिनेमात सतत धूम्रपानाचे प्रसंग आहेत. त्यात विनोद म्हणजे शेतकरी आत्महत्यांच्या प्रसंगात सेन्सॉर बोर्डाने आत्महत्या करणं हा समस्या सोडवण्याचा योग्य मार्ग नाही, असं सांगणारी पाटी लावली आहे. तुमचं काम आहे का हे? कसल्या बिनडोक पाट्या लावत फिरता? सर्वसामान्य लोक मूर्ख आहेत की शेतकरी? हिंमत असेल तर सरकारने शेतकऱ्यांवर आत्महत्येची पाळी आणता कामा नये, अशी पाटी लावा राव! उद्या हे किसिंग सीनच्या खाली चुंबन घेण्याआधी शक्यतो ब्रश करावे, अशी पाटी लावतील.

असो.

शाहरूखने दोनच सिनेमांमध्ये तो काय चीज आहे, ते दाखवून दिलं आहे. फक्त आता क्लीन शेव्हन लुकमध्ये (इथे गरज होती, याची कल्पना असली तरी) त्याने येता कामा नये, एवढीच एक विनंती आहे. आता त्यात वय लपत नाही आणि वय लपवण्याचा प्रयत्न झाला तर तो लैच केविलवाणा दिसतो.

अमिताभने ‘आखरी रास्ता’ आणि ‘हम’सारख्या सिनेमांतून आपल्या वयाला सुसंगत वयाच्या व्यक्तिरेखांकडे वळण्याचा मार्ग फार चतुराईने पत्करला होता (नंतर लाल बादशहा, हिरवा अर्जुन, नारिंगी मेजर साहब वगैरे सप्तरंगी माती खाल्ली तो विषय वेगळा…) शाहरूखने त्या दिशेने पावलं उचलायला सुरुवात केली आहे… मुरलेल्या मद्यासारखा मुरत चालला आहे हा भिडू. तो जवान आहे, तोवर आम्ही पण जवान राहणार आहोत. मोअर पॉवर टु हिम!

Mukesh machkar

" मला १० कोटी रूपयांची लाॅटरी लागली तर ...."अचानक आपला बेधुंद जगण्याचा माज उतरवणारा निबंध.. #निःशब्द
02/09/2023

" मला १० कोटी रूपयांची लाॅटरी लागली तर ...."
अचानक आपला बेधुंद जगण्याचा माज
उतरवणारा निबंध..

#निःशब्द

01/09/2023

भारतासारख्या मोठा विस्तार असलेल्या आणि प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात निवडणूक घेणे हे आव्हानात्मक काम असते. मात्र, सतत कुठल्या ना कुठल्या निवडणुका होत असल्याने देशात कायम निवडणुकीचेच वातावरण असते. त्यामुळे निर्णय प्रक्रियेत अडथळे येतात. तसेच सरकारी पैशाचाही अपव्यय होते. हे टाळण्यासाठी एक देश एक निवडणूक ही कल्पना पुढे आली आहे. यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा...

नाशिकची शान आहे बिबट्या. आपल्या जंगलाचे वैभव. मग जसे राजस्थान येथे जवाई येथे बिबट्याचे जंगल राखीव असून सफारी आहे. तसेच न...
26/08/2023

नाशिकची शान आहे बिबट्या. आपल्या जंगलाचे वैभव. मग जसे राजस्थान येथे जवाई येथे बिबट्याचे जंगल राखीव असून सफारी आहे. तसेच नाशिक जिल्ह्यात नक्कीच करता येईल. उत्तर महाराष्ट्र यामुळे ओळखला जाईल. पर्यटन वाढेल. काय वाटतं तुम्हाला. त्याळव त्याचे घर मिळेल.
कोठे हवे असे जंगल जिल्ह्यात CMO Maharashtra
Chandrakant Patil BJP Maharashtra Devendra Fadnavis
द्या नाशिकला भेट..करा राखीव जंगल ..

चांद्रयान चंद्रावर उतरले अभिनंदन ISRO आणि आनंदी आनंद जय हिंद !चंद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरवत भ...
23/08/2023

चांद्रयान चंद्रावर उतरले अभिनंदन ISRO
आणि आनंदी आनंद जय हिंद !

चंद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरवत भारताने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. चंद्राच्या दक्षिण पृष्ठभागावर यशस्वीपणे यान उतरविणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे. इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ, सर्व शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि ही मोहीम यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येकाचे मनःपूर्वक अभिनंदन!

समस्त भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण असून या निमित्ताने आपल्या देशाने विज्ञान क्षेत्रातील एका नव्या पर्वाकडे दमदार पाऊल टाकले आहे. भारताचे हे यश जागतिक पटलावर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताचा दबदबा वाढविणारे ठरणार आहे. या नव्या पर्वाचे स्वागत करूया. उत्तरोत्तर भारताने अशीच प्रगती करावी, याच सदिच्छा!

Chandrayaan-3 Mission:Here are the images of Lunar far side area captured by the Lander Hazard Detection and Avoidance C...
21/08/2023

Chandrayaan-3 Mission:

Here are the images of
Lunar far side area
captured by the
Lander Hazard Detection and Avoidance Camera (LHDAC).

This camera that assists in locating a safe landing area -- without boulders or deep trenches -- during the descent is developed by ISRO at SAC https://sac.gov.in


20/08/2023

⚡ गुड न्यूज! नाशिकची पाणीकपात टळली, गंगापूर धरणातील उपयुक्त पाणीसाठा ९० टक्क्यांवर...

लुना 25 चा चंद्रावर  अपघात ,रशिया ची चांद्रयान मोहीम अपयशी !रशियाचं लुना-25 यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग ...
20/08/2023

लुना 25 चा चंद्रावर अपघात ,रशिया ची चांद्रयान मोहीम अपयशी !
रशियाचं लुना-25 यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणार होतं. पण शेवटच्या टप्प्यात तांत्रिक अडचणींमुळे लुना 25 वरचं नियंत्रण सुटलं. फायनल डी-बुस्टिंग च्या वेळी कॉन्टॅक्ट तुटला आहे. स्पेसक्राफ्ट चंद्रावर आदळल असावं याचीही शक्यता आहे.

भारताचे चंद्र्यान यशस्वी होणार 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳इस्रोच्या मेहनतीचे फळं चांगलेच मिळणार. आता जगाचे डोळे आपल्या चंद्र्यान वर आहेत. किती अभिमानाची गोष्ट आहे. आपण सगळे प्रार्थना करूया ही मोहीम यशस्वी होण्यासाठी. जय भारत🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


14/08/2023

महाराष्ट्राला काका पुतणे दूधखुळे समजू लागलेत
का....?
( Heramb Kulkarni यांची पोस्ट)
पवारांचे चिडणे व जरब बघुन पत्रकार खूपच नरमाईने प्रश्न विचारतात. त्यामुळे कितीही विसंगती असल्या तरी इतर नेत्यांना जसे पत्रकार भंडावून सोडतात तसे काका पुतण्याना करत नाहीत.
कालची भेट ही कौटुंबिक होती व काका पुतण्याला भेटू शकत नाही का इतके हास्यास्पद विधान पवारांनी केले. त्यावर
१) कौटुंबिक भेट घेण्यासाठी सुरू असलेला कार्यक्रम सोडून यावे लागते ?
२) कौटुंबिक भेटीचे ठिकाण घर असते. दोघेही मुंबईत असताना तिथे पुतण्या घरी का येत नाही ?
३) अगदी पुण्यात भेटायचे तर बारामती हॉस्टेल किंवा ज्या सर्किट हाऊस ला गाड्या लावल्या तिथे का नाही ?
४) ताफा सर्किट हाऊस ला सोडून एकटीच गाडी का ?
५) वडिलांच्या खिशातून पैसे चोरले तरी बापासमोर पोरगा जायला घाबरतो. इथे अख्खा पक्ष चोरला. गंभीर आरोप केले तरी ४ वेळा कौटुंबिक भेटी झाल्यात...अशा पुतण्याचा राग का नसेल येत ?
६) काका बाहेर गेल्यावर उपमुख्यमंत्री म्हणून अतिशय व्यस्त वेळापत्रक असलेले पुतणे उद्योगपती शी अर्धा तास काय बरे बोलत असतील ?
७) कौटुंबिक भेटीत जयंत पाटील का लागतात ?

हे खरे प्रश्न असतात. पण इतर नेत्यांसारखे पवार काका पुतणे यांना धारेवर धरले जात नाहीत म्हणून गेले कित्येक महिने त्यांना हवे तसे वागत हे फुटेज खात आहेत
आणि आपणही बावळट होऊन यांच्या लीला बघत आहोत...

दोन्ही पवारांनी भेटी थांबवून अंतिम निर्णय जो असेल तो घोषित करावे म्हणजे महाराष्ट्रातील विरोधी पक्षाला भूमिका नक्की करता येईल...
सत्तेचे फायदे आणि विरोधी पक्षाची स्पेस घ्यायची असे दोन्ही कसे चालेल.. ?

हेरंब कुलकर्णी

*भावी पत्नीशी मोबाईलवर बोलता बोलता बेन पोहोचलं थेट जंगलात आणि वाट चुकला, तब्बल सात तासानंतर…*गारबर्डी धरणानजीकची घटना : ...
14/08/2023

*भावी पत्नीशी मोबाईलवर बोलता बोलता बेन पोहोचलं थेट जंगलात आणि वाट चुकला, तब्बल सात तासानंतर…*

गारबर्डी धरणानजीकची घटना : सहा तास शोधमोहीम, रात्री साडेदहाला सुखद शेवट

जळगाव : भ्रमणध्वनीमुळे मजेशीर किस्सेही घडतात. असा किस्सा रावेर तालुक्यातील वनक्षेत्रातील गारबर्डी धरणाजवळ घडला. पाल येथील ग्रामीण रुग्णालयातील लग्न जमलेला तरुण कर्मचारी सुटी असल्यामुळे गारबर्डी धरण परिसरात फिरण्यासाठी गेला होता. त्यावेळी भावी पत्नीशी भ्रमणध्वनीवर बोलतांना तो इतका दंग झाला की, आपण जंगलात कधी शिरलो, हेही त्याच्या लक्षात आले नाही. त्याच्या सहकार्‍यांसह वनविभागाच्या कर्मचारी व ग्रामस्थांनी तब्बल सात तासानंतर त्याला शोधून आणले.

पाल ग्रामीण रुग्णालयातील काही कर्मचारी रविवारी सुटी असल्यामुळे गारबर्डी धरणावर फिरण्यासाठी गेले होते. त्यात लग्न जुळलेला एक तरुण कर्मचारीही होता. तेथे सर्व कर्मचारी गप्पागोष्टींमध्ये रंगले असताना, तरुण कर्मचार्‍याला भावी पत्नीने भ्रमणध्वनीवरून संपर्क केला. त्यावेळी इतरांना त्रास नको म्हणून तो भ्रमणध्वनीवर बोलत बोलतच दुचाकीवरून निघाला. बोलता बोलता कुठे जात आहोत, याचे त्याला भानच राहिले नाही. तो एकटाच घनदाट जंगलात पोहचला. भानावर आला, त्यावेळी आपण कुठे पोहोचलो, हेही त्याला स्वतःला समजले नाही. तोपर्यंत अंधार झाला होता. वनक्षेत्रात अस्वल, बिबटे, रानडुकरांसह इतर हिंस्त्र प्राण्यांचा वावर असल्याने तो घाबरला. इकडे आपल्यासोबत असलेला कर्मचारी दिसत नसल्याने त्याच्या सहकारी कर्मचार्‍यांनाही काळजी वाटू लागली. त्यांनी इकडेतिकडे शोधाशोध केली. अंधार असल्यामुळे त्यांनीही शोधमोहीम थांबविली. त्यांनी पाल येथील ग्रामस्थांसह वनविभागाला या प्रकाराची माहिती दिली. तरुण कर्मचाऱ्याने भ्रमणध्वनीवरून इतरांशी संपर्क साधला. मात्र, त्याला आपण कुठे आहोत, हे सांगता येत नव्हते.

काही ग्रामस्थांसह वनमजूर, वनरक्षक आदी २५ ते ३० जणांनी बेपत्ता तरुणाच्या शोधासाठी रात्री वनक्षेत्रात मोहीम सुरू केली. त्यांनी वनविभागाकडे असलेल्या आधुनिक विजेरीच्या मदतीने शोध घेताना गारबर्डी धऱणाच्या पलीकडे असलेल्या नाल्यात जखमी अवस्थेत तरुण कर्मचारी मिळून आला. त्याला पाल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता तो कर्मचारी १५ दिवसांच्या रजेवर गेला असून, तो अमरावती येथील मूळ रहिवासी आहे. त्या कर्मचार्‍याची दुचाकी दुसर्‍या दिवशी सोमवारी दुपारी आदिवासी तरुणाने आणून दिली.

त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट देवस्थान ट्रस्ट श्रावण महिन्यासाठी सज्ज. व्हीआयपी दर्शन  बाबत असा झाला  निर्णय !त्र्यंबकेश...
13/08/2023

त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट देवस्थान ट्रस्ट श्रावण महिन्यासाठी सज्ज. व्हीआयपी दर्शन बाबत असा झाला निर्णय !
त्र्यंबकेश्वर ता.11 ऑगस्ट 2023
श्रावण महिन्यात त्रंबकेश्वरला मोठी गर्दी होईल हे लक्षात घेऊन त्रंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट सज्ज झाले आहे. भाविकांना सुलभ दर्शन व्हावे म्हणून पुढील नियोजन करण्यात आले आहे.
त्यात व्हीआयपी लगाम लावण्यात येणार आहे.
श्री त्रंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने श्री
श्रावण महिन्यात vip मंडळींसाठी
दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्रंबकेश्वर देवस्थानचे चेअरमन तथा जिल्हा न्यायाधीश वर्ग दोन जिल्हा व सत्र न्यायालय नाशिक चे न्यायाधीश नितीन जीवने यांचे मार्गदर्शनाखाली झालेल्या निर्णयानुसार तसे पत्र ट्रस्ट कडून जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.
केंद्रीय स्तरावर अथवा राज्य स्तरावर येथे vip भेट दर्शन साठी देत असतात. अशा राज्य शिष्टाचार पत्राशिवाय पत्राव्यतिरिक्त जे व्हीआयपी आहेत त्यांना त्र्यंबकेश्वर मंदिरात 12 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या दरम्यान vip दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. जिल्हाधीकारी यांनी सर्व सरकारी निमसरकारी वर्गाला जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत वरील निर्णय कळवावा अशी अपेक्षा ही पत्रात व्यक्त करण्यात आली आहे. या पत्राची प्रत पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण व उपविभागीय अधिकारी त्र्यंबकेश्वर इगतपुरी यांना देण्यात आली आहे.

13/08/2023

Nashik : त्र्यंबक राजाचं दर्शन झालं सोप्प, त्र्यंबकेश्वर मंदिरात आजपासून व्हीआयपी दर्शन बंद; ट्रस्टचा निर्णय

12/08/2023

भामरे मिसळ परिसर/बडदे नगर परिसरातील नवीन सोसायटीत रहिवासी सोसायटीत पूर्णवेळ वॉचमन हवा आहे. अपेक्षे सह कळवा .
9689754878.

Address

Gangapur Road

422005

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nashik On Web posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nashik On Web:

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share

Nashik’s Own News Portal NOW

ww.nashikonweb.com

नाशिकचे स्वत:चे विश्वसनीय वार्ता देणारे डिजिटल न्यूज पोर्टल

नमस्कार नाशिककर,

www.nashikonweb.com तर्फे आपले डिजिटल जगात स्वागत आहे.आज आपल्याला आवर्जून महिती देण्याचे प्रयोजन असे की , आता सोशल मिडीया आणि हातातील मोबाईल यामुळे इंटरनेटच्या सहाय्याने माहिती सहज आदान-प्रदान तर होतेच मात्र ती काही शून्य वेळेत इतर ठिकाणी पोहचवता येते. यामुळे आजच्या डिजिटल जगात कोणतीही माहिती लपवून ठेवता येणे शक्य नाही. त्यामुळे माहिती किती खरी येते आणि तिचा तपशील किती बरोबर आहे? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. पत्रकारीतेत असल्याने गेले ८ वर्षे आम्ही बातमी अर्थात वार्ता देताना प्रत्येक गोष्ट तपासून,तिचा समाज जीवनावर होणारा परिणाम आणि इतर गोष्टी आम्ही तपासतो आणि प्रसिद्ध करतो. मात्र आता जसे माध्यम बदलत आहेत तशीच तिची अर्थात महिती किती विश्वसनीय आहे हे तपासणे गरजेचे होते, अर्थात कोणी ती पुरवली याकडेही लक्ष देणे गरजेचे ठरते. यामध्ये आम्ही आमची टीम अश्या प्रकारे बनविली आहे की सर्व पत्रकार आणि इतर सहकारी माध्यम क्षेत्रात कार्यरत असून आम्ही मुख्य प्रवाहातील पत्रकारिता करतो. तर आमचे सहकारी अनेक वर्षापासून अनेक नामंकित वृत्तपत्रे,२४ तास वृत्त वाहिनी या ठिकाणी काम केलेले आहोत. विशेष म्हणजे आम्ही पत्रकारितेतील पूर्ण वेळ शिक्षण घेतले आहे. त्यामुळे महिती देताना आम्ही विवेक बुद्धीचा उपयोग करतो.