Trimbakeshwar Nashik

  • Home
  • Trimbakeshwar Nashik

Trimbakeshwar Nashik News updates, photos and videos from Trimbakeshwar, Nashik.

16/01/2025

बोरीपाडाच्या आश्रम शाळेला फरशी वाले बाबा

आयुर्वेदाचार्य रघुनाथ महाराजांचे नाव.
त्र्यंबकेश्वर ता.16जाने.2025.प्रतिनिधी
बोरीपाडा आश्रम शाळेला फरशी वाले बाबा आयुर्वेदिक महाराजांचे नाव देण्यात आले आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यात बोरीपाडा येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आदिवासी आश्रम शाळा बोरीपाडा कार्यरत आहे. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना यातून मार्गदर्शन शिक्षण मिळते. तसेच तांत्रिक शिक्षण मिळते.
या आश्रम शाळेस @ आयुर्वेदाचार्य रघुनाथ महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
( आदिवासी आश्रम शाळा)तालुका त्र्यंबकेश्वर #असे नामकरण करण्यात आले आहे.
शासन निर्णयाच्या जीआर नुसार वरील नामकरण करण्यात आले आहे.
प्रसिद्ध महामंडलेश्वर रघुनाथ दास उर्फ आयुर्वेदाचार्य महामंडळेश्वर उर्फ देव बाप्पा माऊली धाम उर्फ फरशीवाले बाबा या नावाने रघुनाथ महाराज प्रसिद्ध आहे धार्मिक बरोबर सामाजिक उपक्रम आरोग्यदायी सेवा देखील त्यांची संस्था मोठ्या प्रमाणावर राबवत असते याची दखल घेऊन वरील वरील नामकरण करण्यात आले आहे फरशीवाले बाबा हे आदिवासी ग्रामीण आदिवासी व दुर्गम भागातून कार्यरत असतात रुग्नेसेवेचे मोठे वरदान त्यांना लाभले.आहे.
सद्या महामंडलेश्वर रघुनाथ महाराज हे आपल्या भक्तांसह शिष्यांसह प्रयागराज कुंभमेळ्यात सामील झालेले आहे. वरील बद्दल अनेकांनी त्यांना मोबाईल द्वारे शुभेच्छा दिल्या आहेत अभिनंदन केले आहेत.

त्र्यंबकेश्वराच्या चरणी सव्वा किलो सोन्याचे दान!रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्हाईस चेअरमन मनोज मोदी यांनी संकल्प सत्यात आणला.!...
16/01/2025

त्र्यंबकेश्वराच्या चरणी सव्वा किलो सोन्याचे दान!
रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्हाईस चेअरमन मनोज मोदी यांनी संकल्प सत्यात आणला.!
त्र्यंबकेश्वर ता.16 जाने.2025
त्र्यंबकेश्वराच्या चरणी सव्वा किलो सोने आज दान करण्यात आले. प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर सुवर्णदान त्रंबकेश्वरला मिळाले आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्हाईस चेअरमन मनोज मोदी यांनी गत महिन्यात त्रंबकेश्वर येथे देवदर्शनार्थ भेट दिली होती. त्रंबकेश्वर मंदिराचे पुजारी मनोज तुंगार यांचा मनोज मोदी यांच्याशी परिचय झालेला होता.मागील भेटीत मोदी यांनी त्र्यंबकेश्वरसाठी सुवर्ण दान करण्याचा संकल्प केला होता हा संकल्प आज त्यांनी आपले सहकारी हितेशभाई यांच्या
मार्फत सव्वा किलो सोने दान देत पूर्ण केला. दरम्यान सुवर्णदानाची माहिती विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी दिली.
जवळपास 200 वर्षांपूर्वी असलेला त्र्यंबकेश्वरचा सुवर्ण मुखवटा नवीन बनवण्याचा संकल्प श्री त्रंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट कडून करण्यात आला होता.
यापूर्वी मनोज मोदी त्रंबकेश्वर मंदिरात आले असताना त्यांना या संदर्भाने माहिती देण्यात आली होती. कार्य बाहुल्यामुळे मनोज मोदी यांनी येथे उपस्थित न राहता येथे त्यांचे प्रतिनिधी हितेश भाई यांना पाठवून हे दान दिले. सुवर्ण पट्टी आणि नाणे स्वरूपात हे दान आहे. जवळपास एक कोटी रुपये या सोन्याची किंमत आहे. मंदिरात हितेश भाई यांनी सपत्नीक अभिषेक केला.
याप्रसंगी मनोज तुंगार आर्यन तुंगार यांनी हितेश भाई यांना आशीर्वाद दिला. मंदिरातील पुरोहितांनी देखील त्यांना आशीर्वाद दिला हितेश भाई यांना सुवर्णदनाची पावती देत श्री त्रंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट कडून त्यांचा सत्कार विश्वस्त मंडळाकडून करण्यात आला. यावेळी विश्वस्त पुरुषोत्तम कडलग कैलास घुले रूपाली भुतडा मनोज थेटे, श्री सत्यप्रिय शुक्ल , स्वप्निल शेलार प्रदीप तुंगार मंदिर पुजारी मनोज तुंगार तसेच देवस्थानचे अधिकारी समीर वैद्य रश्मी जाधव हे उपस्थित होते.
देशभरातील भाविकांच्या सुवर्णदानतून सड़ेआठ किलो चा सुवर्ण मुकुट बनावन्याचा संकल्प विद्यमान ट्रस्ट मंडळाने वर्षभरापूर्वी केला होता.
सदर सुवर्णदानास पाच किलो पेक्षा जास्त सोने देवस्थान कडे जमा झालेले आहे श्री मनोज मोदी यांनी उरलेले सोने मी स्वतः देतो अशी भावना व्यक्त केली होती परंतु अजूनही काही भाविक महाशिवरात्रीपर्यंत सोने दlन करण्यासाठी इच्छुक असल्याने त्यांना 125 तोळे दान करू शकतात असे त्यांना ट्रस्ट कडून सांगण्यात आले होते. त्या अनुषंगाने आज त्यांचे सहकारी हितेश भाई सपत्नीक येऊन त्यांनी रीतसर संकल्प करून सदर सव्वा किलो सोने देवस्थानकडे सुपूर्द केले.

श्री श्री रविशंकर त्र्यंबकेश्वराच्या दरबारात.!त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी ता. 15 जानेवारी 2025आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्र...
15/01/2025

श्री श्री रविशंकर त्र्यंबकेश्वराच्या दरबारात.!
त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी ता. 15 जानेवारी 2025
आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी आज त्रंबकेश्वर मध्ये देवदर्शनार्थ भेट दिली. प्रथम कुशावार्तावर जाऊन गोदावरीस वंदन केले नंतर त्र्यंबकेश्वर गर्भगृहात जाऊन पूजन केले अभिषेक आरती केली. त्रंबकेश्वर भागात श्री रविशंकर यांचे आर्ट ऑफ मोठें लिव्हिंगचे केंद्र सुरू करावे असे त्यांना भाविकांकडून सुचवण्यात आले. यावेळी रविशंकर यांचा शिष्य परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
रविशंकर हे त्रंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्यात सामील होतील असे दिसून आले.
मंदिरात पूजा पौरोहित्य सुयोग देवकुटे, शिखरे ,जोशी ,मुळे यांनी केले.त्रंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने विश्वस्त मंडळाकडून कैलास घुले रूपाली भुतडा यांनी त्यांचे स्वागत केले. त्रंबकेश्वर मंदिराचे पुजारी मनोज तुंगार आर्यन तुंगार यांनी त्यांना प्रसाद, आशीर्वाद दिला. विजय हाके सुनिल बिरारी अनिल बिरारी संतोष कदम सौ योगिता घुले त्रंबकेश्वर देवस्थानचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्रंबकेश्वर पोलिसांनी बंदोबस्त ठेवलेला होता. यापूर्वी देखील श्री श्री रविशंकर यांनी त्र्यंबकेश्वरी देवदर्शन घेतलेले आहे त्यांची त्र्यंबकेश्वर मोठी श्रद्धा असून सद्या प्रयागराज मध्ये कुंभमेळा देखील असताना त्यांनी त्र्यंबकेश्वर मध्ये भेट दिली हे विशेष मानले जाते. त्यांनी विश्व कल्याण साठी देवाला प्रार्थना केली.

कुंभमेळा आराखडा विविध विषयांवर बैठकीत चर्चा.त्रंबकेश्वर ता. 14 प्रतिनिधी. त्रंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा आराखडा स्थानिकांन...
14/01/2025

कुंभमेळा आराखडा विविध विषयांवर बैठकीत चर्चा.
त्रंबकेश्वर ता. 14 प्रतिनिधी.
त्रंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा आराखडा स्थानिकांना विश्वासात घेउन करण्यात यावा अशी जोरदार मागणी त्रंबकेश्वरचे नागरीक यांनी नगरपालिका मुख्याधिकारी व आमदार हेमंत खोसकर यांच्याकडे केली.यावर नागरिकांची कमिटी स्थापन करून समिती नागरिक यांना विश्वासात घेऊन आराखडा कामकाज करावे असे आमदार हिरामण खोसकर यांनी सांगितले .
सोमवारी सायंकाळी त्रंबकेश्वर पालिका सभागृहात अचानक कुंभमेळा २०२७ सालची तयारी व त्या बाबतचे नियोजन व्यवस्थेसाठी बैठक संपन्न झाली.
साडे तीन तास चाललेल्या बैठकीत नगरीतील विविध पस्तीस मान्यवरांनी कुंभमेळा संदर्भात अभ्यासपूर्ण सूचना केल्या. यात काही नागरिकांनी त्र्यंबकेश्वर म्हणून मधील दुरावस्था आणि विविध विषयांवर नागरिकांच्या व भाविकांच्या समस्या मांडत पालिका प्रशासनावर टीका केली.
त्रंबकेशर मधील काही नागरिकांनी अशी बैठक आमदारांनी घ्यावी अशी सूचना करण्यात आली होती त्यानुसार ही बैठक घेण्यात आली. ही बैठक फक्त नागरिकांची होती. माजी नगराध्यक्ष सुरेश गंगापुत्र व सहकारी यांनी बैठकीसाठी आमदारांना गळ घातली होती.*या बैठकीला साधू महंत तसेच विविध अधिकारी व पोलीस प्रशासन यांना पाचारण करण्यात आले नव्हते *नागरिकांच्या सूचनांसाठी बैठक झाली.
स्थानिक जेष्ठ नागरिक व माजी नगरसेवक, विविध पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सामाजिक मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
गत दोन कुंभमेळा कालावधीत ऐनवेळी निधी मंजूर करुन घाईने कामे करण्यात आली. करोडो रुपये खर्ची पडुन ना स्थानिक अथवा भाविक याचा फायदा झाला. उलटपक्षी राजकारणी लोकांच्या हेव्यादाव्याने स्थानिकांच्या घरे व व्यवसायांची तोडफोड करण्यात येऊन त्यांना व्यवसायास मुकावे लागले होते.तक्रारी व सूचनांचा पाऊस पडला.
कुंभमेळा फायद्याचा नाही झाला तरी चालेल पण नुकसान नको असे सुचवण्यात आले. नगरपालिकेकडून काही अपेक्षा होत्या कोणत्या देखील फेल झाल्याचा दावा करण्यात आला.
दरम्यान मुख्याधिकारी प्रशासक श्रिया देवचके यांनी यापूर्वी नगरपालिकेने बैठक घेतली होती असे सांगत प्रस्तावित कुंभमेळा योजनांची माहिती दिली. प्रामुख्याने दर्शन पथ विकास होणार असल्याचे सांगितले
दरम्यान मेन रोड गंगा स्लॅब लक्ष्मीनारायण चौक ते सत्यनारायण मंदिर या भागात गंगा मोकळी करू नये असे देखील.प्रशासनाला ठामपणे जाणे झाले सांगण्यात आले नागरिक आणि भाविकांच्या सुविधेसाठीच 75 वर्षापासून गंगा स्लॅब टाकण्यात आलेला आहे असे स्पष्ट करण्यात आले.
ज्येष्ठ कार्यकर्ते संपतराव सकाळे माजी नगरसेवक गोविंद मुळे, त्रंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक स्वप्निल शेलार , कार्यकर्ते दिनकर काळे.संतोष भुजंग ,शांताराम बागुल, अतुल जोशी लक्ष्मीकांत थेटे सागर ऊजे विजू पुराणिक ,प्रशांत गायधनी ,डॉक्टर राजेश पवार राष्ट्रवादीचे बंडू खोडे. ज्येष्ठ नागरिक संघटनेचे प्रतिनिधी,
प्रहार संघटनेचे दोंदे, हरिभाऊ आंबापुरे असे कार्यकर्ते यांनी सूचना मांडल्या. चर्चा करताना परस्परांना चिमटे देखील काढण्यात आले.रस्त्यांची वाढलेली ऊंची व घराघरात शिरणारे गटारी व पावसाचे पाणी , रस्त्यात पावसाळ्यात येणारे पाणीपुर कमी करण्यासाठी रिव्हर सिव्हर योजना ब्रह्मगिरी चा विकास त्रंबकला जोडणारे मार्ग वाढवणे
क्रीडांगण करणे कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लावणे पालिकेच्या जागा मिळवणे पाणीपुरवठा योजनेत वाढ करणे आरोग्यवस्था वाढवणे यावर चर्चा झाली.
39 कोटीच्या भुयारी योजनेतील पाईपलाईनवर नाराजी व्यक्त करण्यात आली निवृत्तीनाथ श्री संत निवृत्तीनाथ मंदिर देवस्थान विश्वस्तांनी बैठकीत विविध मागण्या नगरपालिकेकडे केल्या आहेत.नगरपालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी तसेच इंजिनीयर स्वप्निल काकड हे उपस्थित होते.दरम्यान दुपारी मुख्याधिकारी आणि प्रांताधिकारी पवार मॅडम यांनी मेनरोडची पाहणी करत असताना पालखीचे दर्शन योग साधला.

संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा काळात सुविधा  # यात्रेवर परिणाम होणार नाही.त्र्यंबकेश्वर ता.14 जाने 2024.संत निवृत्तीनाथ म...
14/01/2025

संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा काळात सुविधा
# यात्रेवर परिणाम होणार नाही.
त्र्यंबकेश्वर ता.14 जाने 2024.
संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा काळात भाविकांसाठी वारकऱ्यांसाठी मोठ्या सुविधा द्याव्यात अशी मागणी श्री संत निवृत्तीनाथ महाराज मंदिर विश्वस्त मंडळाकडून नगरपालिकेला निवेदन देऊन करण्यात आली आहे.
तर नगरपालिकेकडून शक्य तेवढ्या सुविधा दिल्या जातातच असे स्पष्ट करण्यात आले आहे.
मूलभूत सुविधा पालिका पुरवते असे सांगण्यात आले.यापूर्वी देखील पालिकेने यात्रेयाकाळात सुविधा दिल्या होत्या.
प्रयागराज कुंभमेळा ; यात्रेवर परिणाम होणार नाही !
प्रयागराज येथे कुंभमेळा असला तरी श्री संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेवर कोणताही परिणाम होणार नाही या यात्रेला परंपरेने येणारी वारकरी भाविक मोठ्या संख्येने येतीलच. दिवसेंदिवस वारकरी भाविकांची संख्या वारकरी संप्रदायाचा विस्तार होत आहे वारकरी दिंड्या परंपरेने येत असतात. यंदा प्रयागराजला दुसरे शाही स्नान 29 जानेवारीला आहे तर त्र्यंबकेश्वरची संत निवृत्तीनाथ यात्रा पंचवीस जानेवारीला आहे यापूर्वी देखील वरील प्रसंगामध्ये त्र्यंबकेश्वरच्या संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेवर परिणाम झालेला नाही त्यामुळे वारकरी भाविक मोठ्या संख्येने येतील.वारकरी संप्रदायाचा वारी प्रथेवर मोठा विश्वास असतो आहे त्यामुळे यात्रा नेहमीप्रमाणे भरेल उलट गर्दी वाढेल. कुंभमेळ्याचा यात्रेवर परिणाम होईल अशी शक्यता अंदाज चुकीची आहे.
यात्रा नियोजनात उणीव राहणार नाही याची दक्षता ट्रस्टने घ्यावी.दरम्यान मंदिर ट्रस्टने यात्रेनिमित्ताने संत निवृत्ती नाथाच्या चांदीच्या रथाला पॉलिश करून चकाकी दिली आहे. फोटो संग्रहित.

त्रंबकेश्वर मंदिर परिसरात एटीएम सुरू करावे यात्रेकरू भाविकांची मागणी. त्रंबकेश्वर ता.14 जानेवारी 2025त्रंबकेश्वर मंदिर प...
14/01/2025

त्रंबकेश्वर मंदिर परिसरात एटीएम सुरू करावे यात्रेकरू भाविकांची मागणी.
त्रंबकेश्वर ता.14 जानेवारी 2025
त्रंबकेश्वर मंदिर परिसरात एटीएम सुरू करावे सूचना भाविकांकडून केली जात आहे.
80टक्के भाविकांकडे एटीएम कार्ड असते मंदिर परिसरात आल्यानंतर किरकोळ खरेदीसाठी
तसेच. दानधर्म करण्यासाठी पैशांची गरज पडते .
त्यामुळे एटीएम साठी त्यांना वण वण करावी लागते.
त्र्यंबकेश्वर मंदिर पूर्व दरवाजा अथवा दक्षिण दरवाजा
परिसर येथे अशी सुविधा दिल्यास एटीएम यात्रेकरूंना इतरत्र फिरायला लागणार नाही.
त्रंबकेश्वर मध्ये जे काही एटीएम सध्या कार्यरत आहे ते मंदिरापासून थोडे दूर आहे . परंतु शनिवार रविवार सोमवार अथवा लागून तीन चार दिवस सुट्ट्या आल्या तर यात्रेकरूंची मोठी गर्दी होते एटीएम मध्ये पैसे शिल्लक राहत नाही त्यामुळे अडचण येते त्यामुळे गर्दी आणि सुट्ट्या लक्षात घेऊन एटीएम वर मध्ये भरपूर पैसे असणे आवश्यक आहे संबंधित बँकांनी याकडे लक्ष घेतले पाहिजे.
त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात कायमच रांगा असतात त्यात वाहनांची देखील गर्दी असते त्यामुळे जवळच.मंदिर भागात एटीएम असणे अपेक्षित आहे. भाविकांना अशी सूचना केल्या असून त्रंबकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट मंडळांने देखील लक्ष घातले पाहिजे.
विशेष म्हणजे येथील प्रसिद्ध स्वामी समर्थ गुरुकुल प्रकल्प स्वामी समर्थ केंद्र येथे देखील अशी एटीएम सुविधा बँकेकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
त्या धरतीवर येथेही सुविधा द्यावी अशी मागणी आहे.
काही लोक मोबाईल बँकिंग मधून पैसे घेण्यास नाखुश असतात तेव्हा यात्रेकरूंना रोख रकमेची गरज भासते.

मकर संक्रांत ; दिवसभर पर्वकाळ.त्र्यंबकेश्वर ता.14 जाने.2025.यंदा मकर संक्रात 14 जानेवारी, मंगळवारी आज साजरी केली जाणार आ...
14/01/2025

मकर संक्रांत ; दिवसभर पर्वकाळ.

त्र्यंबकेश्वर ता.14 जाने.2025.
यंदा मकर संक्रात 14 जानेवारी, मंगळवारी आज साजरी केली जाणार आहे. सकाळी 8 वाजून 55 मिनिटांनी सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे. यामुळं 14 जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाईल
या दिवशी गंगा स्नान करने.सूर्याला अर्ध्य देणे आणि दान धर्म.करणं याला विशेष महत्त्व आहे.
उत्तरायण सुरू झालेले असताना सूर्याचे तेज आपल्याला मिळावे अशी भावना यातून असते.
दिवस मोठा व्हायला सुरुवात होते थंडी कमी होते
गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 9.03 पासून सुरू होईल आणि संध्याकाळी 5.46 पर्यंत आहे.
मकर संक्रांतीला महिला भगिनी काळे साडी परिधान करतात यावर्षीची संक्रांत घेऊन येणारे देवी ही पिवळे वस्त्र परिधान केलेले असल्याने पिवळी साडी महिला
भगिनींनी शक्यतो टाळावी असे संकेत देण्यात दिले आहे. लाखेच्या बांगड्या देखील पाटल्या स्वरूपात आज महिला वापरतात.
मकर संक्रांतीला तिळगुळ देतात . गुळ दिल्याने राहू केतू हे ग्रह अनकुल होण्यास मदत होतात असे काही श्रद्धाळूना वाटते.
आज पासून पंधरा दिवस महिला संक्रांत वाण सुहासिनी देतात. मकर संक्रांति मुळे बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण आहे.
प्रथम देवाला तिळगुळ देऊन इतरांना तिळगुळ देण्याची प्रथा आहे.
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
आमचे तीळ सांडू नका आमच्याशी भांडू नका
गोड रहा असा यामागे संकेत आहे.
#सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा !

कुंभमेळ्यातील शाही स्नानाला आता अमृत स्नान राजसी स्नान असे नामकरण. त्रंबकेश्वर मधून प्रमुख महंत सहभागीत्र्यंबकेश्वर ता.1...
12/01/2025

कुंभमेळ्यातील शाही स्नानाला आता अमृत स्नान राजसी स्नान असे नामकरण.
त्रंबकेश्वर मधून प्रमुख महंत सहभागी
त्र्यंबकेश्वर ता.12 जानेवारी 2025.प्रतिनिधी
भारतभरातील कुंभमेळ्यातील शाही स्नानाला आता अमृत स्नान, राजसी स्नान असे नामकरण करण्यात आले आहे. प्रयागराज कुंभमेळ्याच्या बैठकीत वरील निर्णय झाला आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यातील पर्वणीला शाहीस्नान पर्वणी असे म्हटले जात होते. परंतु अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या प्रयागराज येथे झालेल्या बैठकीत यापूर्वीच ठरल्याप्रमाणे आता शाही स्नान ऐवजी अमृत स्नान राजसी स्नान असे म्हटले जाणार आहे . हरिद्वार उज्जैन प्रयाग त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी अमृताचे थेंब देव दानवांच्या युद्धात पडलेले आहे. त्यामुळे अमृत स्नान असा शब्दप्रयोग पुढे आला तर राजसी स्नान असा देखील शब्द पुढे आला आहे.सरकारी पातळीवर देखील या विषयी कळवण्यात आले आहे.
प्रयागराज कुंभमेळ्यातील त्र्यंबकेश्वर येथील विविध आखाड्यांचे साधू महंत प्रमुख श्रीमंहंत ठानापती सामील झाले आहेत. पौष पौर्णिमा तेरा जानेवारी रोजी पहिले राजसी स्नान अमृत स्नान पर्वणी प्रयागराज त्रिवेणी संगमा वर आहे.

संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेपुर्वी 91संत निवृत्तीनाथ मंदिर सभामंडपकामाला चालना.*प्रसाद योजनेचे रखडलेले काम मार्गी लावा ...
09/01/2025

संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेपुर्वी
91संत निवृत्तीनाथ मंदिर सभामंडपकामाला चालना.
*प्रसाद योजनेचे रखडलेले काम मार्गी लावा मागणी
त्र्यंबकेश्वर ता.8जाने.2025.
संत निवृत्तीनाथ महाराज मंदिर सभा मंडपासाठी काळ्या पाषाणात सभा मंडप जीर्णोद्धार बांधकाम
करणे साठी श्रीसंत निवृत्तीनाथ मंदिर ट्रस्ट यांनी
गती देण्यास सुरुवात केली आहे यंदा आता 25 जानेवारी रोजी श्री संत निवृत्तीनाथ महाराजयात्रा आहे. यात्रेपर्वी रेंगाळल्या कामाला गती मिळत आहे.
श्री संत निवृत्तीनाथ महाराज मंदिर सभा मंडप
जवळपास 24 खांब असलेला दगडी उभारला जात आहे. यात्रेपूर्वी दहा फूटउंचीचे खांब तयार उभे राहिलेले दिसतील असे नियोजन आहे. पाच कोटी रुपये खर्चाच्या या कामासाठी वारकरी भाविकांनी यात्रेकरूंनी निधी द्यावा असे आवाहन ट्रस्ट मंडळांने यापूर्वीच भावीक भक्तांना दानशुरांना केलेले आहे.
अगोदर 32 खांब यात उभारले जाणार होते
तसे नियोजन देखील सुरू झाले होते. परंतु
खांबांनी जागा जास्त व्यापली जाईल तसेच वारकरी भाविकांना मंदिरात उभे राहण्यासाठी मोकळी जागा राहणार या कडे वारकऱ्यांनी ट्रस्ट मंडळाचे लक्ष वेधले होते.अखेर यासाठी नवीन आराखडा करण्यात आला. आता कामाला चालना मिळत आहे.
केंद्र शासनाच्या प्रसाद योजनेतून जवळपास नऊ कोटी रुपये श्री संत निवृत्तीनाथ महाराज मंदिर परिसर विकासासाठी घोषित झाले होते. 05 मे 2022 रोजी
भूमिपूजन आणि काम सुरू झाले. महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाकडे हे काम आहे. सरासरी 80 टक्केच्या वर काम झालेले आहे. परंतु पुढे निधी न मिळाल्याने लोकसभा विधान सभा निवडणुका मुळे
तसेच निधीच्या आभावी ठेकेदाराने देखील काम थांबवले. मार्चपासून वरील काम बंद आहे.
दरम्यान प्रसाद योजना कामांना गती द्या अशी मागणी ट्रस्ट व वारकरी भाविक करू लागले आहे.आता पुन्हा ट्रस्ट मंडळ विश्वस्त मंडळ प्रसाद योजने विभागाचे तसेच खासदारांचे लक्ष या कामा साठी वेधत आहे.
प्रसाद योजनेच्या कामातून भाविकांसाठी प्रामुख्याने दर्शनबारी भक्तनिवास खोल्या तत्सम कामे येथे होत आहे
प्रसाद योजनेच्या कामातून मंदिर सभा मंडपासाठी निधी मिळालेला नाही. दरम्यान वरील कामातून ऍडजस्टमेंट सभा मंडपसाठी करावी अशी चर्चा पुढे आली होती. अखेर आता हे काम भविकाच्या देणगीतून होत आहे
त्या मुळे ट्रस्टने सभामंडप जीर्णोद्धार साठी भाविकांना देणगी आव्हान केले आहे. मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सचिव विश्वस्त मंडळ यात्रा नियोजनात गर्क झाले आहे

नवीन वर्ष ; सिंहस्थ कुंभमेळा पायाभरणी वर्ष.कामांना कधी प्रारंभ होणार ?त्रंबकेश्वर साठी 775 कोटीचा आराखडा.*त्रंबकेश्वर सि...
09/01/2025

नवीन वर्ष ; सिंहस्थ कुंभमेळा पायाभरणी वर्ष.
कामांना कधी प्रारंभ होणार ?
त्रंबकेश्वर साठी 775 कोटीचा आराखडा.
*त्रंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा शाही स्नान पर्वणी तारीख .
त्र्यंबकेश्वर ता 9 जानेवारी 2025.
त्र्यंबकेश्वर आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2026, 2027 शाही स्नान पर्वणी तारखा यापूर्वीच जाहीर करण्यात आल्या आहेत. त्रंबकेश्वर साठी 775 कोटीचा आराखडा देखील तयार करण्यात आला आहे. परंतु प्रत्यक्षात कामांना कधी प्रारंभ होणार ?
अडीच वर्षांपूर्वी 30जून 22 रोजी सिंहस्थ कुंभमेळा तारखा जाहीर झाल्या होत्या. अखिलभारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री हरीगिरीजी महाराज,तसेच ब्रह्मलीन स्वामी सागरानंद महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत या तारखा जाहीर झालेल्या आहेत. त्या वेळी पुरोहित संघाचे प्रतिनिधी त्रंबकेश्वर मधील नागरीक उपस्थित होते. आता नवीन वर्ष 2025 कुंभमेळा पायाभरणी वर्ष म्हणून या वर्षाकडे शासन आणि जनता पाहत आहे. या मार्च 25 अखेर निधी उपलब्ध झाल्यास मार्च 26 अखेर सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे पूर्ण करून द्यावी लागणार आहेत. पुढे जून मध्ये त्रंबकेश्वर पावसाळ्यात कामे होत नाही.
त्यामुळे कुंभमेळा पूर्वतयारीसाठी अवघे पंधरा महिने आहे 2025 च्या प्रारंभी देखील कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. अगदी मंत्रालयात एक जानेवारी रोजी मुख्य सचिव यांचे उपस्थितीत बैठक झाली निधी जाहीर झाला .निधी येणार कधी कामे होणार कधी कामे झाले तर ती दर्जेदार होणार का टिकाऊ होणार का मार्च अखेर 2026 कामे पूर्ण न झाल्यास शासनाचा निधी दरवेळेस परत जातो तसा परत जाणार का असे अनेक प्रश्न आहे
दरम्यान एकीकडे साधूंची मिरवणूक येत असते दुसरीकडे रस्त्याचे काम चालू असते अशी स्थिती यावर्षी नसावी देखील मागणी त्रंबकेश्वरचे नागरिक साधू महंत देखील करत आहे.
# सिंहस्थ कुंभमेळा तारखा वेळापत्रक #
*सिंहस्थ ध्वजारोहण सुरवात 31 ऑक्टोबर 26
* प्रथम शाही स्नान आषाढ अमावस्या 2 ऑगस्ट 27
*द्वितीय शाही स्नान 31 ऑगस्ट 27
* तृतीय शाही स्नान 12 सप्टेंबर 27.
* सिंहस्थ समाप्ती 24 जुलै 2028.
पुरोहित संघ त्र्यंबकेश्वर यांच्यावतीने वतीने वरील तिथी ज्योतिष शास्त्रानुसार काढण्यात आलेल्या आहे.
मार्च 26 पूर्वी संस्था कुंभमेळा कामे पूर्ण होणे गरजेचे आहे. कुंभमेळ्यासाठी विकास कामांसाठी कामे पूर्ण होण्याच्या दृष्टीने अवघे 15 महिने बाकी आहेत.
कासवा पेक्षा देखील कमी गती यंत्रणेची आहे.
फोटो संग्रहित. 775 कोटीचा आराखड्यात
विविध सुविधा रस्ते पाणी आरोग्य असे नियोजन आहे.
दर्शन पथ निर्माण केला जाणार आहे
सविस्तर माहिती उपलब्ध नाही. फोटो संग्रहित.

भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनी मंगळवारी धार्मिक स्थळांवरील व्हीआयपी व्यवस्थेबाबत वक्तव्य केले. व्हीआयपी व्यवस्था ...
07/01/2025

भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनी मंगळवारी धार्मिक स्थळांवरील व्हीआयपी व्यवस्थेबाबत वक्तव्य केले. व्हीआयपी व्यवस्था ही समानतेच्या तत्त्वाच्या विरोधात असून ती धार्मिक स्थळांवरून पूर्णपणे रद्द करण्यात यावी, असे ते म्हणाले.
वाचा बातमी.

भारत के उपराष्ट्रपति जगदीप धनखड़ ने धार्मिक स्थलों पर वीआईपी कल्चर को समाप्त करने की बात कही है. उन्होंने कहा कि ध.....

पत्रकारदिन सतीश दशपुत्र यांचा सत्कार.त्र्यंबकेश्वर ता.6 जाने 2025आजच्या पत्रकार दिनी दैनिक भ्रमरचे त्रंबकेश्वर येथील प्र...
06/01/2025

पत्रकारदिन सतीश दशपुत्र यांचा सत्कार.
त्र्यंबकेश्वर ता.6 जाने 2025
आजच्या पत्रकार दिनी दैनिक भ्रमरचे त्रंबकेश्वर येथील प्रतिनिधी सतीश दशपुत्र यांचा श्री पंचदश नाम जुना आखाड्याच्या महतांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला.
नील पर्वतावरील निलांबिका देवीचे पुजारी असलेले हे पत्रकारितेचा छंद देखील जोपासत आहे. धार्मिक क्षेत्रातील पुजारी असताना वृत्तपत्राचे प्रतिनिधी असल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.
या आखाड्याचे सचिव अजयपुरी महाराज यांच्या मार्गदर्शनाने ठानापती महंत छबिरामपुरी महाराज, सतीशपुरी महाराज, दत्त गिरी महाराज यांच्या हस्ते शाल देत आशीर्वाद देत सत्कार करण्यात आला.यावेळी येथील साधू पुजारी तसेच सेवक उपस्थित होते.

प्रयागराज कुंभमेळा श्री पंचायती  आनंद आखाड्याकडून  पेशवाई मिरवणूक प्रयागराज मध्ये संपन्न. आयुर्वेदाचार्य महंत रामानंद सर...
06/01/2025

प्रयागराज कुंभमेळा श्री पंचायती आनंद आखाड्याकडून पेशवाई मिरवणूक प्रयागराज मध्ये संपन्न.
आयुर्वेदाचार्य महंत रामानंद सरस्वती कुंभ पर्वात सामील.
त्र्यंबकेश्वर ता.6 जानेवारी 2025. प्रयागराज कुंभमेळा श्री पंचायती आनंदा आखाड्याकडू छावणी प्रवेश भव्य मिरवणूक प्रयागराज मध्ये संपन्न झाली.कुंभमेळा पर्व काल जाहीर झालेले आहे. जानेवारी व फेब्रुवारी मध्ये प्रयागराज कुंभमेळा आहे. सिंहस्थातील श्री पंचायती आनंद आखाडा हा महत्त्वाचा आणि मोठा आखाडा आहे. पेशवाई मोठ्या उत्साहात झाल्याची माहिती ब्रह्मदर्शन आश्रमाचे प्रमुख व या आखाड्याचे महंत आयुर्वेदाचार्य रामानंद सरस्वती महाराज यांनी दिली. आनंद आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष: स्वामी शंकरानंद सरस्वती महाराज महामंडलेश्वर गणेशानंद सरस्वती सरस्वती महाराज गिरीजानंद सरस्वती महाराज तसेच आचार्य महामंडलेश्वर साध्वी सामील आहेत.
छावणी प्रवेश प्रसंगी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महंत यांनी उपस्थित राहून छावणी प्रवेशाला शुभेच्छा दिल्या.
आयुर्वेद रत्न ब्रह्मलीन स्वामी शिवानंद सरस्वती महाराज यांचे रामानंद सरस्वती महाराज हे शिष्य असून धार्मिक सेवेत देखील ते अग्रेसर असतात.
ब्रह्मदर्शन या आश्रमातून ते रुग्णांना सेवा देत असतात. अचूक नाडी निदान मध्ये ते प्रसिद्ध आहेत. कुंभमेळ्यात तीर्थक्षेत्रिय वातावरणाने साधू सत्संगाने देखील भाविकांना ऊर्जा मिळते असे ते म्हणाले.

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ  वृत्तपत्रे मीडिया !  पत्रकार दिन: शुभचिंतन!!त्र्यंबकेश्वर ता.6 जानेवारी 2024. लोकशाहीचा चौथा आ...
06/01/2025

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ
वृत्तपत्रे मीडिया ! पत्रकार दिन: शुभचिंतन!!
त्र्यंबकेश्वर ता.6 जानेवारी 2024.
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ वृत्तपत्रे मीडिया आहे. आधुनिक काळातील इलेक्ट्रॉनिक मीडिया बरोबर आज ही बारकाईने वृत्तपत्र वाचन केले जाते. महिला भगिनी देखील पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे.
आता या क्षेत्रात सोशल मीडिया देखील चमकू लागला आहे.
कलियुगात पत्रकारांची जबाबदारी दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. सोशल मीडिया देखील समाज प्रबोधन करताना दिसते. विश्वासनीय, संयमी तत्त्वांना धरून असलेली पत्रकारिता, शोध पत्रकारिता , राजकीय सामाजिक पत्रकारिता
या सगळ्यांवर वाचक आणि प्रेक्षक यांचे लक्ष असतेच.
सर्व वृत्तपत्रकारांना मीडिया प्रतिनिधींना पत्रकार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार शास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ; *सर्व जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा !.

प्रयागराज कुंभमेळा श्री पंचायती निरंजनी आखाड्याकडून प्रवेश भव्य मिरवणूक प्रयागराज मध्ये संपन्न. नाशिकच्या ढोल पथकाने मिळ...
04/01/2025

प्रयागराज कुंभमेळा श्री पंचायती निरंजनी आखाड्याकडून प्रवेश भव्य मिरवणूक प्रयागराज मध्ये संपन्न. नाशिकच्या ढोल पथकाने मिळवली वाहवा.
त्रंबकेश्वर ता.04 जानेवारी 2025 प्रयागराज कुंभमेळा श्री पंचायती निरंजनी आखाड्याकडून छावणी प्रवेश भव्य मिरवणूक 4 जानेवारी रोजी प्रयागराज मध्ये संपन्न.
झाली.कुंभमेळा पर्व काल जाहीर झालेले आहे. जानेवारी व फेब्रुवारी मध्ये प्रयागराज कुंभमेळा आहे. सिंहस्थातील श्री पंचायती निरंजन आखाडा हा महत्त्वाचा आणि मोठा आखाडा आहे. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहंत रवींद्र पुरी महाराज हे या या आखाड्यातील.प्रमुख श्री महंतदेखील आहेत.
या सोहळ्यात सामील होण्यासाठी #त्र्यंबकेश्वरचे श्री पंचायती निरंजनी आखाड्याचे ठानापती महंत धनंजयगिरी महाराज हे तसेच भाविक सामील झाले होते. छावणी प्रवेश मिरवणुकीत या आखड्याचे आचार्य महामंडलेश्वर श्रीमंहत साधू तसेच कुंभमेळासाठी आलेले रमता पंच महंत भाविक सामील होते. तीन हत्ती त्यावर बसलेले महंत तसेच साधूंचे कसब असे मोठे लक्षवेधी दृश्य होते.
सवाद्य मिरवणुकीत इतर वाद्यां सह नाशिक मधील ढोल पथकाने देखील हजेरी लावत मोठी वाहवा मिळवली.
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री हरीगिरीजी महाराज यांनी छावणी प्रवेश मिरवणुकीसाठी
मिरवणूक पूर्व शुभेच्छा दिल्या.पहा फोटो..

प्रयागराज  कुंभमेळ्यातील फरशीवाले बाबांच्या आश्रमामध्ये मध्ये भाविकांची मोठी गर्दी.25 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमप्रयाग...
04/01/2025

प्रयागराज कुंभमेळ्यातील फरशीवाले बाबांच्या आश्रमामध्ये मध्ये भाविकांची मोठी गर्दी.
25 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम
प्रयागराजमध्ये गुंजणारा अखंड हरिनाम सप्ताह गजर
त्र्यंबकेश्वर ता.4 जानेवारी 2025.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज सिंहस्थ कुंभमेळा येथे प्रसिद्ध फरशीवाले बाबा उर्फ 1008 महामंडलेश्वर रघुनाथदास महाराज उर्फ आयुर्वेदाचार्य उर्फउ वारकरी संप्रदायातले देव बाप्पा माऊली धामचे रघुनाथ महाराज यांचा आश्रम स्थापन झाला आहे. चलो प्रयागराज अशी भावना भाविकांमध्ये निर्माण झाली आहे.
आश्रम पेंडॉलमध्ये विष्णुसहस्रनाम पठण तसेचरासलीला अखंड हरिनाम सप्ताह असे भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन आहे. हे कार्यक्रम 12 जानेवारी पासून तर 3 फेब्रुवारी 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. 25 दिवस फरशीवाले बाबांचे वास्तव्य प्रयागराज मध्ये राहणार आहे. पर्यावरण पूरक असा पेंडोल त्यांनी निर्माण केला आहे. निसर्गातील वस्तू वापरून केलेला पेंडॉल बघून भाविक आश्चर्यचकीत होत आहे.माऊली धाम खालसा नावाने त्यांचा आश्रम सुरू झाला आहे.
मागील सिंहस्थकुंभमेळ्यात देखील त्यांनी प्रयागराज मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळेस फॉरेनर यात्रेकरू देखील भाविक तेथे दर्शनासाठी आले होते सामील झाले होते.
*14 जानेवारी 29 जानेवारी आणि 3 फेब्रुवारी
2025*अशा सिंहस्थ तारखांना पर्वकाळ फरशीवाले बाबा भक्तांसह प्रयागराज सिनेमा स्नानात सामील होणार आहे.
सद्या प्रयागराज मध्ये यात्रेकरू भाविकांची गर्दी वाढलेली आहे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना देखील अन्नदानाचे कार्य माऊली धाम खालसाकडून सुरू सुद्धा झाले आहे.
विशेष म्हणजे वरील सर्व काळात फरशीवाले बाबांचा त्र्यंबकेश्वर येथील आश्रम भाविकांसाठी रुग्णांसाठी बंद राहणार आहे. अंतर्गत पूजन सुरू राहील.
पूर्णवेळ बाबा त्यांचे भक्त स्वयंसेवक प्रयागराजच्या सेवेत चरणा जवळ राहणार आहे. माणुसकीचे धर्माचे कार्य करणार आहे.आदिवासी आणि डोंगरदऱ्या दुर्गम भाग,जंगल निसर्ग आणि आयुर्वेद यांचे सूक्ष्म माहिती असलेले. व दिव्य अशी फरशी रुग्णांच्या डोक्यावर ठेवून परफेक्ट निरीक्षण करून.रुग्णाचा आजार अचूक निदान करून औषध उपचार करण्याच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीमुळे फरशीवाले बाबांचे ख्याती भारतभर असून गेले 40 वर्षे ते वरील क्षेत्रात असताना साधुसंत सेवा, वारकरी सेवा ,अध्यात्मिक जोड . तसेच सामाजिक उपक्रम त्यांनी आपल्या सेवेला दिलेला आहे त्यामुळे देखील भावीक त्यांच्याकडे दर्शनासाठी जातात. भाविकांनी आश्रमात धार्मिक पुजनात सहभागी व्हावे दररोज होणाऱ्या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन फरशीवाले बाबा भक्त मंडळाकडून करण्यात आले आहे. ह भ प संदीप जाधव व सहकारी जातीने लक्ष देत आहे. चलो प्रयागराज.

नगरपरिषदांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेस नाशिक मध्ये प्रारंभ.श्रिया देवचाके यांच्या हस्ते उद्घाटनत्र्यंबकेश्वर ता.3 जाने ....
03/01/2025

नगरपरिषदांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेस नाशिक मध्ये प्रारंभ.
श्रिया देवचाके यांच्या हस्ते उद्घाटन
त्र्यंबकेश्वर ता.3 जाने .2025
आज पासून नाशिक जिल्ह्यातील नगर परिषदांच्या वार्षिक क्रिडा स्पर्धस MCC क्रिकेट मैदान नाशिक येथे क्रिकेट स्पर्धेने सुरुवात झाली.
विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथील नगर विकास विभागाचे सह आयुक्त डॉ श्री नितिन पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या व नाशिक जिल्ह्या सह आयुक्त डॉ सौ श्रीया देवचके यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.सदर स्पर्धा दि 03 ते 06 पर्यंत चालणार असून यादरम्यान विविध क्रिडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणेत आलेले आहे.
नाशिक जिल्ह्यातील नगरपालिकांचे मुख्याधिकारी या स्पर्धांना उपस्थित होते. स्पर्धकांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला.

Address


Telephone

+919011964380

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Trimbakeshwar Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Trimbakeshwar Nashik:

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share