08/03/2024
जागतिक महिला दिनाच्या सर्व माताभगिनींना हार्दिक शुभेच्छा.....
स्ञी ही पुरुषाहुन कधीही श्रेष्ठच म्हणावी लागेल कारण प्रत्येक स्त्री किंवा पुरूषाने स्ञीपोटीच जन्म घेतला आहे माझा हा युक्तीवाद कोणीही खोडु शकनार नाही. स्ञी ही आई, बहिण, पत्नी, मुलगी, सुन ह्या रुपात मातृत्व, वात्सल्य आणि मायेचा जो इंद्रधनुष्य तयार करते, त्याला जगात जोड आणि तोड नाही.
आज जागतिक महिला दिन म्हणून व्यक्त होताना प्रकर्षाने नमुद करावेसे वाटते की बालविवाह, सतिप्रथा व चुल आणि मुल ह्या प्रथांविरूध्द प्रचंड संघर्ष करुन ह्या पुरूषप्रधान संस्कृतीत आपली गुलामीची साखळदंड तोडुन प्रधानमंत्री, राष्ट्रपती, खासदार, आमदार, महापौर ही संविधानीक पदापर्यंत ते डाॅक्टर, इंजीनिअर, वकिल, शिक्षक,पायलट अश्या अनेक सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात मारलेली मजल वाखानन्याजोगी आहे. त्यासाठी स्ञी शक्तीला माझा ञिवार मानाचा मुजरा
पण ह्यात फुले, शाहु, आंबेडकर विचाराची मोलाची भूमिका आहे. फुले दाम्पत्याने स्ञी शिक्षणासाठी खालेले दगड धोंडे, सोसलेला शेणाचा मारा, अपमान, बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान, दिलेला हिंदू कोडबिलसाठी लढा त्यासाठी त्यांनी दिलेला स्वतंत्र भारताच्या प्रथम कायदेमंञीपदाचा राजीनामा ह्याचा स्ञी शक्तीला पडलेला विसर दुर्दैवी आहे. गुलामीतुन बाहेर काढून आणलेल्या महापुरुष व साविञीमाईसारख्या माता-भगीनींना स्ञीशक्तीने विसरु नये एवढीच माफक अपेक्षा.......
✍🏽......प्रविण दिलीप जाधव
गंगापूर ता. जि. नाशिक
9850304382........