14/10/2024
*दुष्काळी आणि अविकसित येवल्याला जलसमृद्ध आणि विकसित करणाऱ्या जलनायक मा.ना. छगनरावजी भुजबळ साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*
*साहेब आपण येवल्याला उपमुख्यमंत्री पदाचा बहुमान प्राप्त करून दिला राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आपण विराजमान व्हावं व येवल्यालाच नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्राला हा बहुमान आपल्या माध्यमातुन प्राप्त करून द्यावा हीच निर्मिका चरणी प्रार्थना....*
मा.ना. छगनरावजी भुजबळ साहेब 2004 मध्ये येवला मतदार संघात आले. साहेब येवल्यात येण्याआधीची येवल्याची परिस्थिती बिकट होती. दुष्काळी तालुका आणि पिण्याच्या पाण्यासाठी रोजचीच पायपीट... धड रस्ते नव्हते.. शाळांची संख्या कमीच होती.. ना आरोग्याच्या व्यवस्थित सुविधा होत्या....
2004 ला भुजबळ साहेब येवल्यात आले आणि येवल्याचं रूपडं पलटायला सुरुवात झाली. स्वप्नातही विचार केला नव्हता एवढं रस्त्यांचं जाळ या मतदारसंघात निर्माण झालं. गटाच्या गणाच्या गावांमध्ये शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र उभारली.येवल्यात उपजिल्हा रुग्णालय झालं. वाडा वस्त्यांवर शाळा निर्माण झाल्या. शासकीय कार्यालयाच्या इमारती दिमाखात उभा राहिल्या.. येवल्याची अस्मिता असणारे असणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मुक्ती भूमीचे स्मारक, महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी, सेनापती तात्या टोपे यांचा भव्य पुतळा, अहिल्यादेवी होळकर घाट, नुकतेच भूमीपूजन झालेले अण्णाभाऊ साठेंचे स्मारक, महात्मा फुले नाट्यगृह यांनी येवल्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घातली.आणि भविष्यात होणारी महापुरुषांचे सर्व स्मारके अजूनही या वैभवात वाढ करतील ...
कांद्याच्या प्रश्नावर सतत आवाज उठवला त्यासोबतच येथील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दुष्काळी अनुदान मिळून देण्यात नेहमीच अग्रेसर भूमिका घेतली.
पैठणी ही येवल्याची ओळख आणि याच बैठकीला मानाच स्थान मिळवून देण्यासाठी पैठणी पर्यटन केंद्राची निर्मिती केली. त्याचप्रमाणे नेहमीच वीनकर बांधवांच्या समस्यांचे निराकरण केले.
38 गाव पाणीपुरवठा योजना निर्माण करून आता ती 64 गावांना पाणीपुरवठा करू शकेल इतकी समृद्ध व सक्षम बनविली. आणि आत्ताच प्रगतीपथावर असणारे आणि या येवला तालुक्याला टँकर मुक्त करणाऱ्या जलनायक छगनरावजी भुजबळ राजापूर व 40 गावे पाणीपुरवठा योजना, जलनायक छगनरावजी भुजबळ धुळगाव व 16 गावे पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात आहे या योजनांच्या माध्यमातून मायभगिनिंच्या डोक्यावरचा हंडा उतरून घराघरात नळाने पाणी पोहोचले जाणार आहे....
160 किलोमीटर वरून अतिशय कल्पक बुद्धीने मांजरपाड्याचा प्रकल्प साकारून येवल्याच्या उत्तर पूर्व भागामध्ये जलसंजीवनी आणून आमच्या कपाळावर असणारा दुष्काळी शेतकरी हा दुर्दैवी शिक्का पुसून आम्हाला बागायतदार बनवलं...
चीचोंडी येथे एमआयडीसीसाठी जागा मिळवून एमआयडीसीचा विकास केला आता कुठलाही उद्योग आला तरी त्यासाठी सर्व पायाभूत सुविधा या ठिकाणी सज्ज आहेत...
शहरातील आणि ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय कार्यालयात एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून तहसील, प्रांत पंचायत समिती नगरपालिका, पोलीस स्टेशन, सहाय्यक निबंधक कार्यालय इत्यादी सर्व कार्यालय एकाच ठिकाणी आलो मिनी मंत्रालयासारखी संकल्पना येवल्यात राबविली..
हजारो कोटींची कामे राबवली इथे आहेत. इथे उल्लेख करायला जागा पुरणार नाही इतकी कामे आहेत.. ग्रामीण भागातील गावांमध्ये ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, पशुसंवर्धन दवाखाने, अंगणवाड्या शाळांच्या इमारती आज दिमाखात उभ्या दिसत आहे....
हे सर्व करत असताना कधीही स्थानिक राजकारणात गावगाड्यात साहेबांनी हा माझा तो परका म्हणून हस्तक्षेप केला नाही... साहेबांच्या काळात शेतकरी व्यापारी उद्योजक व्यावसायिक वकील डॉक्टर सामान्य माणूस सामान्य नागरिक सर्वजण भयमुक्त होऊन आपापल्या यशाची शिखर गाठत आहेत...
सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना राजकारणात येण्यासाठीचे अभय साहेबांमुळे मिळाले....
साहेबांनी मतदारसंघात कधीही कुणाला संधी देताना विषमता केली नाही...
येवल्याचा विकास हाच ध्यास मानून गेली 20 वर्ष सतत परिश्रम घेताना साहेब दिसत आहेत..
खरंतर साहेब येवल्यात आले तेव्हा येवल्याशी साहेबांचा फारसा भावनिक संबंध नव्हता आता मात्र साहेब येवल्याचे झाले आहे. स्वतःच्या आयुष्यातील कठीण कठोर प्रसंगातही येवल्याच्या विकासाचा ध्यास त्यांनी कधीच सोडला नाही.
साहेब आपण येवल्याप्रती दाखवलेलं प्रेम आणि येवलेकरानी आपल्यावर टाकलेला विश्वास हा असाच आचंद्रसूर्य राहील...
भविष्यात जेव्हा येवल्याचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा भुजबळ आणि येवला या दोन गोष्टी अभेद्य राहतील....
साहेब येवल्याचा विकास झाला आहे.. महाराष्ट्राच्या पटलावरती येवला हा एक विकसित तालुका म्हणून प्रचलित झाला आहे... पण येवला आम्हाला देशपातळीवरती सर्वाधिकसित तालुका म्हणून पहायचा आहे आमच्या भावी पिढ्यांचा सामाजिक सांस्कृतिक आर्थिक आणि सर्वांगीण विकास सातत्याने होत राहीला पाहिजे यासाठी येवल्याला आपली कायमच आवश्यकता असणार आहे...
साहेब आपण येवल्याला उपमुख्यमंत्री पदाचा बहुमान प्राप्त करून दिला राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आपण विराजमान व्हावं व येवल्यालाच नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्राला हा बहुमान आपल्या माध्यमातुन प्राप्त करून द्यावा हीच निर्मिका चरणी प्रार्थना....
आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 💐💐
प्रा ज्ञानेश्वर दराडे