Sevalal News

Sevalal News Registration No. MH33D0138376
Broadcasting and Programming Activities
Television Programming and B...

03/11/2025

ST आरक्षण अन्नत्याग आमरण उपोषण, चाळीसगाव (दिवस १ ला)

03/11/2025

चलो चाळीसगाव : चाळीसगावातून ST आरक्षणासाठी नक्कीच क्रांती घडेल.

ST आरक्षण अन्नत्याग आमरण उपोषण (दिवस १ ला)मी सतिष राठोड आज चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (S...
03/11/2025

ST आरक्षण अन्नत्याग आमरण उपोषण (दिवस १ ला)
मी सतिष राठोड आज चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात आरक्षण मिळावे व सर्व बंजारा समाजाला न्याय मिळावा यासाठी दि: ३ नोव्हेंबर २०२५ रोजी अन्नत्याग आमरण उपोषणाला बसलो आहे
माझी संपूर्ण बंजारा समाज बांधव , युवावर्ग, माता-भगिनी संर्वांना विनंती आहे की या ऐतिहासिक पर्वाचा साक्षीदार व्हा!

03/11/2025

चाळीसगाव येथे उपोषणकर्ते सतिषभाऊ राठोड यांची भेट घेऊन उपोषणस्थळी उपस्थित असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांसोबत चर्चा झाली असता. मा. मुख्यमंत्री महोदयांनी बोलावलेल्या उद्याच्या बैठकीत मुळ एस टी आरक्षणावर सकारात्मक चर्चा करून योग्य तो निर्णय न घेतल्यास, बैठकीवर बहिष्कार घालू असा इशारा आत्मारामभाऊ जाधव (राष्ट्रीय अध्यक्ष - राष्ट्रीय बंजारा टायगर्स ) यांनी दिला आहे.

02/11/2025

ST आरक्षणासाठी शहीद झालेल्या बांधवांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, पुरे झाले आश्वासन आता कृती करा सरकार

चलो चाळीसगाव, चलो चाळीसगाव
02/11/2025

चलो चाळीसगाव, चलो चाळीसगाव

02/11/2025

ST आरक्षणाच्या मागणीसाठी अन्नत्याग आमरण उपोषण, चलो चाळीसगाव

01/11/2025

बंजारा समाजाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, मूळ ST आरक्षणाच्या मागणीचे उल्लेख का नाही ?
सरकारने ठोस निर्णय न घेतल्यास बंजारा समाज पुन्हा रस्त्यावर उतरणार.
- भिमराव जाधव ( सामाजिक कार्यकर्ते, चाळीसगाव जि.जळगाव )

01/11/2025

आत्महत्येचे पाप सरकारच्या माथी मारून एस.टी. आरक्षणासाठी प्राणाची आहुती देणारे स्व. प्रविण भाऊ जाधव अमर रहे..🙏🌸🌺🌷🌸🙏
🏳️🏳️🏳️🏳️🏳️🏳️🏳️
बंजारा समाजाला एस टी प्रवर्गाचे आरक्षण देण्याची मानसिकता सरकार दाखवत नसल्याने, बिड जिल्हा, गेवराई तालुक्यातील रामुनगर पांगरा तांड्यातील स्व. प्रविण भाऊ जाधव या माझ्या तरूण भावांने दोन दिवसांपूर्वी सरकारला जबाबदार धरत नैराश्यातून आत्महत्या केली, या घटनेमुळे सर्वत्र समाजमन सुन्न झाले आहे.
स्व. प्रविण भाऊ जाधव यांच्या पिडीत कुटुंबियांची काल आम्ही सांत्वनपर भेट घेऊन असाह्य अशा या दुःखातून परिवाराला सावरण्याकरीता थोडा आधार देण्याचा प्रयत्न केला. पण भावांनो प्रयत्न करूनही सगळे निष्फळ ठरावेत ? असा एवढा मोठा आघात या कुटूंबावर पडलेला आहे, कारण घरातला एक कर्ता व्यक्ती निघून गेला असून आई, वडील, एक लहाण भाऊ, पत्नी, दोन तरूण मुलं, असा परिवार आणि कुटूंबाच्या पालन पोशनाची मोठी जबाबदारी प्रविन भाऊंच्या खांद्यांवर होती, एवढी मोठी टोकाची भुमिका घेऊन आत्महत्या करण्याचा विचार नेमका कसा आला ? याविषयी विचारले असता स्व. प्रविण भाऊंच्या वडीलांनी सांगितले की, जालना व बिड येथे मोर्चा निघाल्यानंतर तेव्हापासून प्रविण हा सारखा सांगत होता की मला आमरण उपोषणाला बसायचे आहे ? मी व प्रविणचे सगळे मित्र त्याला समजावत होते की , सगळीकडे बरेच आपले बांधव उपोषण करताहेत अशा परिस्थितीत उपोषणाला बसने योग्य नाही ?
नुकताच जालना येथे विजय भाऊ चव्हाण यांनी ९ दिवसाचे आमरण उपोषण केले असता सरकारने कुठलेही लेखी पत्र न देता तोंडी अश्वासन देऊन उपोषण मागे घ्यायला लावले त्या दिवशी प्रविण भाऊ हा दिवसभर उपोषणाच्या ठिकाणी जालन्यात होता.
रात्री उशिरा घरी आल्यानंतर खुप नाराज बैचन दिसत होता, नाराज का आहे असे सकाळी प्रविण ला विचारले असता, नाराजी व्यक्त करत प्रविण ने सांगितले की, वाटत होते की, जालन्यातील उपोषणाची दखल घेऊन सरकार आपल्या समाजाला आरक्षण देण्या संदर्भात ठोस भुमिका घेतील ? व तसे लेखी पत्र सरकारकडून मिळेल अशी आशा होती पण तसे काही झाले नाही.

प्रविण भाऊंचे सगळे मित्र मंडळी पण हेच सांगत होते की जालन्यातील २५ तारखेचे उपोषण संपल्यापासून प्रविण भाऊ खुप अस्वस्थ नाराज दिसत होता. पण असे दुरपर्यंत वाटले नव्हते की एवढे. मोठे टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या करेन ...

ग्रामस्थांकडून कळाले की स्व. प्रविण भाऊ हा एक हाडा मासाचा सामाजिक कार्यकर्ता होता, समाज हिताच्या प्रत्येक कार्यात तो कायम पुढे राहून कुठलीही पर्वा न करता समाजासाठी लढत होता, समाजावर कुठेही काही अन्याय झाला तर प्रविण भाऊ हा अन्याय विरोधात उभा दिसायचा..
शक्य होईल तेवढी मदत करून सगळ्यांच्या सुख दुःखात कायम मदतीला पुढे राहत होता...

स्व प्रविण भाऊला १० ते १२ एकर जमिन असून तांड्याजवळच एक छोटीशी हॉटेल चालवून स्व प्रविण भाऊ हे बर्या पैकी दोन पैसे कमवत होते, सुखी समाधानी जिवन जगत असतांना, एक चांगला हसता खेळता, परीवार सोडून प्रविण भाऊ आपल्या कुटूंबाला पोरके करून निघून गेले आहे.

सर्व सामाजिक संघटनेचे तथा राजकीय पक्षांचे नेते सामाजिक कार्यकर्ते सर्वांना हात जोडून विनंती आहे की स्व प्रविण भाऊ यांच्या कुटूंबियांना आधार देण्याची खुप गरज आहे ज्यांना जसे शक्य होईल तसे प्रत्येकांनी कुटुंबाची भेट घेऊन ...
त्यांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न करावा..🙏
आणि आरक्षणाच्या लढाई सोबतच प्रविण भाऊंच्या कुटूंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरीत सामाहून घेण्यासाठी सरकार दरबारी आपण सगळेजन मिळून मोठ्या ताकदीने पिडीत कुटूंबाला न्याय मिळवून देऊया...

- भिमराव जाधव ( सामाजिक कार्यकर्ता चाळीसगाव )

30/10/2025

ST आरक्षण मळे सारू 3 नोव्हेंबर चाळीसगाव तहसील समोर अन्नत्याग आमरण उपोषण - ॲड. भरत चव्हाण, (स्वयंसेवक - बंजारा आरक्षण, चाळीसगाव)

29/10/2025

ST आरक्षणे सारू कोई आत्महत्त्या करो मत, 30 ऑक्टोबर रास्ता रोको, 3 नोव्हेंबर नांदेड रेल रोको अन चाळीसगाव अन्नत्याग आमरण उपोषण - आत्माराम जाधव

Address


400022

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sevalal News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share