Simple Lifestyle Vlogs

Simple Lifestyle Vlogs Reviews

(1)

धन्यवाद मंडळी, आपण दिलेल्या सहकार्याबद्दल मंडळ सदैव आभारी राहील. वारंवार आपण दिलेली सूज भुज ह्यानेचा आपण पुढे वाटचाल करण...
26/12/2023

धन्यवाद मंडळी, आपण दिलेल्या सहकार्याबद्दल मंडळ सदैव आभारी राहील. वारंवार आपण दिलेली सूज भुज ह्यानेचा आपण पुढे वाटचाल करणार आहोत, तेव्हा आपली साथ अशीच सदैव राहूदे🙏

नमस्कार मंडळी, चंदेरी गडाची TTMM मोहीम आखत आहोत २६ जानेवारी २०२४, हा अत्यंत कठीण श्रेणीतील गड आहे, नवखे ट्रेकर नको, आपल्...
24/12/2023

नमस्कार मंडळी, चंदेरी गडाची TTMM मोहीम आखत आहोत २६ जानेवारी २०२४, हा अत्यंत कठीण श्रेणीतील गड आहे, नवखे ट्रेकर नको, आपल्यापैकी कोणी इच्छुक असल्या ग्रुप लिंक खाली देत आहेत त्यात सामील व्हा
https://chat.whatsapp.com/GaC8GLCVgAXFq2exjnZvYM

७ जानेवारी २०२४, श्री मलंग गड TTMM मोहिमेसाठी कोणी इच्छुक असेल तर whatsapp करा ९९६७१५२९३८
19/12/2023

७ जानेवारी २०२४, श्री मलंग गड TTMM मोहिमेसाठी कोणी इच्छुक असेल तर whatsapp करा ९९६७१५२९३८

नमस्कार महोदय, आपण TTMM ह्या तत्वावर गेली २ वर्ष नियमित यशस्वी पणे ट्रेक/ टूर आयोजित करत आहोत आणि त्याचा फायदा सगळ्यांना...
16/12/2023

नमस्कार महोदय,

आपण TTMM ह्या तत्वावर गेली २ वर्ष नियमित यशस्वी पणे ट्रेक/ टूर आयोजित करत आहोत आणि त्याचा फायदा सगळ्यांना व्हावा म्हणून हा सगळा खटाटोप बांधला आहे.

आपण ट्रेकिंग ग्रुप काही कारणास्तव बनवला आहे जेणेकरून ग्रुपमधील जाणकार ट्रेकर मंडळींचे मार्गदर्शन आपल्याला मिळेल, त्याचा फायदा नवीन ट्रेकर मंडळीनापण होईल आणि आपल्या ट्रेक/ मोहिमा कमीत कमी पैशांमध्ये सावध पणे होतील. या ग्रुपवर आपल्याला दुसरे YouTube videos, links नको पाहिजे आहेत. आपले स्वतःचे ट्रेकचे अनुभव ब्लॉग, फोटोज् स्वरूपात मांडा, जर फेसबूक लिंक असेल तर फार उत्तम होईल. आपला अनुभव इथे मांडा जेणेकरून इतरांना फायदा होईल. कमी खर्चामध्ये TTMM concept चे ट्रेक तुम्ही पण आयोजित करू शकता. YouTube व्हिडिओ आणि व्यावसाईक जाहिराती नको ही काळजी घ्या अन्यथा ग्रुप मधूंन बाहेर काढले जाईल. ग्रुप discussion वेळ सकाळी किंवा संध्याकाळी ६-१० अशी आहे. बाकी वेळेमध्ये मी सहसा सहभागी होणार नाही ह्याची नोंद घ्यावी. ग्रुप मध्ये कमी शब्दामध्ये जास्त माहिती टाका उगाचच जास्त मेसेज नको. प्रत्येक ट्रेक हा वेगवेगळ्या क्षमतेचा असतो त्यामुळे नेहमी पडताळून पहा की आपल्याला तो झेपणार आहे का तरच तो करण्याची मनीषा ठेवा. पूर्वतयारी म्हणून ट्रेकला येण्यापूर्वी रोज नियमित ५ km चाला हा मोलाचा सल्ला.

ह्या ग्रुप मध्ये एक अजून ग्रुप लिस्ट आहे, त्यात आपल्या भविष्यात आयोजित केलेल्या ट्रेकची माहिती दिली आहे, आपण ते तपासून पहा आणि जर यायचे नक्की झाले असल्यास, तर मगच ग्रुप जोडून घ्याव. त्यामुळे आपल्या सूचना वेळेत पोहोचतील आणि ट्रेकचे नियोजन चांगले होईल. जर एखाद्या वेळी आपल्याला कळते की आपण निवडलेला केलेला ट्रेक करू शकणार नाही तर त्वरित ग्रूपवर कळवा व ग्रुप सोडा ही विनंती.

काही ट्रेक साठी आपल्याला भाडोत्री गाडी किंवा मुक्काम लागेतो किंवा इतर खर्च असतो तेव्हा आपण ट्रेक नुसार ५००-१००० रुपये non-refundable deposit घेतो आणि त्याचा हिशोब ट्रेक झाल्यावर करून शिल्लक रक्कम परत केली जाते.

जे व्यक्ती ट्रेकला येत नाहीत त्यांचे deposit जप्त होते आणि आपल्या रानफुलं या संस्थेतून जंगलातील / अती दुर्गम भागातील गरजू मुलांना भेट स्वरूपात मदतीचा हात दिला जाइल. जर आपल्याला पण अशा प्रकारे मदत करायची असेल तर मला थेट संपर्क करा. ह्या कार्यात आपल्याला पण सहभागी होता येईल पण एका अटीवर, हे चांगले काम करताना कोणताही फोटो किंवा व्हिडीओ तयार करणे सक्त हे मनाईचे राहील याची नोंद घ्यावी.

कृपया आपल्या YouTube चॅनल Simple Lifestyle Vlogs ला सबस्क्राइब करा ही विनंती.

खाली पाठवलेला व्हिडिओ TTMM संकल्पना बद्दल आहे ग्रुप जॉईन करण्यापूर्वी तेवढा बघून घ्या ही आग्रहाची विनंती.

https://youtu.be/uiUPdLNxjBY

आपण आयोजित केलेले भरपुर ट्रेक व्हिडिओ ह्या चॅनल वर आठवण म्हणून संचयित केले आहेत, ते पण बघून घ्या त्यामुळे आपल्याला आमच्या कामाचा अंदाज येईल आणि खात्री पूर्वक आपण आपल्या ट्रेक मध्ये सहभागी व्हाल.

आपल्या व्हॉट्सॲप चॅनलची लिंक देत आहे नियमित माहिती साठी
https://whatsapp.com/channel/0029Va9hK5r9xVJnXYQ6yh3L

किंवा संभाषणात सहभाग दर्शवायचा असेल तर व्हॉट्सॲप ग्रुप मध्ये सामील करून घ्या.

"TTMM" असा WhatsApp मेसेज करा, आपल्याला ग्रुपची लिंक पाठवली जाईल, ती थोड्या वेळा साठी वैध राहील, नंतर ती बदलली जाईल, म्हणून लवकर क्लिक करून ग्रुप जॉईन करा ही विनंती.

मला वैयक्तिक फोन किंवा मेसेज पाठऊ नका ही विनंती. मी प्रत्येकाशी वैयक्तिक बोलू शकतं नाही म्हणून ग्रुप बनवला आहे जेणेकरून आपले संभाषण एकाच वेळी सगळ्यांशी होईल आणि कुणाचे सारखेच प्रश्न असतील तर त्याचे निरसन एकाच वेळेस होईल.

हा मेसेज आपल्या इतर ट्रेकर मित्र मंडळींना पाठवा आणि त्यांना पण हा ग्रुप जॉईन करण्यास सांगा. आपण जेवढे जास्त असू तेवढा खर्च कमी होणार, म्हणूनच TTMM ट्रेक वाढले पाहिजेत.

आपलाच मित्र,
सिद्धेश पाटील,
Simple Lifestyle Vlogs,
Borivali Hikers,
WhatsApp ९९६७१५२९३८

जय गिरनारी, गिरनार शिखर यात्रा, श्री दत्त गुरू पादुका आणि अखंड धुनीचे दर्शन, १० तास अविरत १०००० पायरींची चढण आणि उतरणनमस...
14/12/2023

जय गिरनारी, गिरनार शिखर यात्रा, श्री दत्त गुरू पादुका आणि अखंड धुनीचे दर्शन, १० तास अविरत १०००० पायरींची चढण आणि उतरण

नमस्कार मंडळी🙏

मागच्या भागात आपण श्री क्षेत्र सोमनाथ आणि वेरावल यात्रेबद्दल सविस्तर माहिती मिळवली आणि आज आपण वेरावल येथून रात्री ११ वाजता जुनागढसाठीच्या प्रवासाला सुरुवात केली.

जुनागढ रेल्वे स्थानकात आपण १ वाजता पोहोचलो, इथे भयाण शांतता होती, आम्हीच चौघे जण ट्रेन मधून उतरलो, अगदी रामसेंच्या सिनेमात दाखवतात तसे, रामसेच्या सिनेमा मध्ये जसे भुटिया स्थानक असते तसे, कारण इथे बहुतेक सगळी मंडळी दिवसा प्रवास करून येतात.

गिरनार पर्वताच्या पायथ्याच्या तलेटी गावासाठी रिक्षा मिळाली.

तलेटी मध्ये पोहोचल्यावर मोठी पंचाईत झाली, आपण ठरवलेल्या हॉटेल मध्ये जागा उपलब्ध नव्हती.

रात्री १.३० वाजता हॉटेलची शोधाशोध सुरू झाली. सगळी हॉटेल, धर्मशाळा, आखाडे पालथे घातले पण कुठेही जागा शिल्लक नव्हती.

शेवटी एक हॉटेल मालक शेवटची शिल्लक रूम विकण्याच्या प्रतीक्षेत होता, मी जाताच क्षणी तो बोलला शेवटची रूम आहे, लवकर नक्की करा, मी रूम बघून येई पर्यंत दुरे गिऱ्हाईक समोर तयार होते, मी रूम नक्की केली, सगळी दत्त गुरूंची कृपा. दुसरा गिऱ्हाइक नाराज झाला.

रात्री २ वाजता हॉटेल शोधणे म्हणजे माझ्या नाकी नऊ आले होते, परिक्रमेची तारीख जवळ आली होती म्हणून ही परिस्थिती.

थोडा वेळ झोप काढली, पहाटे ४ वाजता अंघोळ आणि नाश्ता करून आम्ही ५.३० वाजता हॉटेल सोडले.

गिरनार पर्वत जवळच होता, सकाळी ५.५० ला आम्ही चढाई सुरू केली. सर्वत्र काळा कुट्ट अंधार होता, वातावरण थंड होते, वारा जोरात वाहत होता. चढाईच्या मार्गात सुरुवातीला गर्द असे जंगल आहे त्यामुळे काहीच दिसत नव्हते.

पायरी मार्ग पण अंधारात होता, भक्तांची हलकी वर्दळ चालू होती, काही भक्त दर्शन घेऊन उतरत होते तर काही भक्त दर्शनासाठी चढत होते.

लहान मुले, तरुण, आणि तरुण वर्गाला लाजवेल असे वायो वृध्द अशी सगळी मंडळी उत्साहात चालले होते.

थोडा डोंगर चढल्यावर सूर्योदय झाला, क्षितिजावर लाली पसरली, वातावरण रम्य भासत होते. पक्षांनी किलबिलाट सुरू केला. जस जसं वर चढत होतो तस तशी हवा अधिकच वहायला लागली होती. शेवटी हवेचा जोर एवढा वाढला की थोड्या वेळासाठी उडण खटोला बंद करावा लागला होता.

आम्ही आधी दर ३० मिनिटाला एक ५ मिनिटाचा आराम असा निर्णय करून चाललो होतो, पण सुरुवातीला आम्ही दर १५ मिनिटाला २-३ मिनिटाचा आराम घेतला. थोड्याच वेळानी शरीर गरम झाले मग काय थकवा लागला नाही, आल्हाददायक वातावरण आपल्याला थकू देत नाही. हा योग जुळून आला आणि आम्ही ४००० पायरी कधी चढलो ते कळलेच नाही, इथे मंदिरे चालू होतात. इथे मंदिरात तुम्ही मोफत स्वच्छ असे टॉयलेट वापरू शकता, थंड फिल्टर केलेले पणी पिऊ शकता.

आम्ही ५००० पायरीचा टप्पा लवकरच पार केला. समोरच दिसणारे गुरू शिखराचे लोभसवाणे रूप कितीही बघितले तरी मन शांती होत नव्हती. शेवटी गुरू शिखर बघत आम्ही परत छोटा ब्रेक घेतला.

पहिला ५००० पायरी टप्पा आपल्याला डोंगराची उंची भासून देत नाही, आपण किती उंच आलो ते कळत नाही, पण जसे गुरू शिखर आणि समोरची डोंगर रांग बघितली की मनाला विश्वास होता नाही, काळेभोर डोंगरांचे सुळके आणि निळेशार आकाश आपल्याला गुरुशिखराच्या दुर्गमतेची आणि भव्यातेच जाणीव करून देते. समोरच खोल दरी परत डोंगराचा चढ परत उतार आणि शेवटचे चढ बघताना आपला प्रवास कधी संपतो ते कळतच नाही.

गुरू पादुकांचे दर्शन करून मन प्रसन्न झाले. इथे वरा जणू वेड लागल्यागत जसे नुकतेच जन्माला आलेले वासरू कसे उड्या मारत असते अगदी तसाच वेंधळा झाल्यासम भासत होता.

पादुकांचे दर्शन झाल्या नंतर आम्ही दत्त धुनी, कमंडलू तीर्थ इथे गेलो, तिकडचे वातावरण जास्तच भारावलेले मला भासले, प्रसाद म्हणून मिळालेला गरम गरम ढोकळा, कढी आणि तूप भरलेली लापशी हे खाऊन मन आणि पोट दोन्ही तुडुंब भरले, अगदी आनंद द्विगुणित झाला आणि थकवा नाहीसा झाला. पुन्हा १०००० पायऱ्या चालण्याची ताकद देऊन गेला.

परतीच्या मार्गावर आम्ही अंबाजी माता मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

एव्हाना दुपार झाली होती, तरी भक्तांची रीघ कमी होत नव्हती. उतरताना ऊनाचा तडाखा लागत होता, मधला उतरणीचा डोंगर ओका बोका आहे, एकही झाड नाही, सावली नाही आहे, तेव्हा हा भाग उतरताना जास्त जीकरीचा वाटला.

आम्ही अखेर दुपारी ४ च्या आस पास डोंगर खाली उतरलो.

उतरताच क्षणी तलाती गावात मस्त शहाळी विकत होते, गरम वातावरणात आणि वाजवी अशा ३० रुपये किमतीत ते विकत होते, पोट भरेस्तव आम्ही ती पिली आणि हॉटेल वर जाऊन थोडावेळ झोपलो.

वाटेत मस्त लाल पेरू आणि हिरवे कवळे पिस्ता पण घेतले.

रात्री तलेटी मधील सगळ्यात सुंदर अशा हॉटेल मध्ये मस्त गुजराथी थाळीचा आस्वाद घेतला आणि दिवसाची समाप्ती केली.

पुढील भटकंती क्रमशः येणाऱ्या भागात लवकरच

हा आमचा भटकंती रुपी अनुभव आपण व्हिडिओ स्वरूपात मांडत आहोत, तो नक्की बघुनं घ्या आणि आपला अभिप्राय कमेंट मध्ये नक्की कळवावा ही विनंती.

YouTube Video Link:
https://youtu.be/Vlj2nXyZu0E

ही फिरस्तीची मोहीम आखताना मी भरपूर ट्रेकर मंडळींशी सल्ला मसलत केली होती आणि त्यांनी दिलेल्या माहितीमुळे आम्हाला भरपूर फायदा झाला, त्यांचे विशेष आभार.

जर आपल्याला असे विविधतेने नटलेले किंवा विशेष सहलीची ठिकाण, धबधबे, गुहा लेण्या, किल्ले, ट्रेक, hike किंवा मंदिरांची माहिती असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्हाला जरूर आवडेल भेट द्यायला.

मला अपेक्षा आहे आपल्याला माझा अनुभव लेख स्वरुपात आपणाला आवडला असेल. सोबत फोटो फेसबूक लिंक वर ऊपलब्ध आहेत, तरीपण आपणास सध्य परिस्थिती अनुभवायची असेल तर वरील दिलेल्या YouTube लिंकला नक्की क्लिक करून व्हिडिओ पहा, जर व्हीडिओ आवडला तर लाल सबस्क्राइब बटन दाबा, सोबत असलेल्या घंटेला क्लिक करून All हे बटन दाबा म्हणजे आमचे नियमित येणारे व्हिडिओ आपणास पाहण्यासाठी उपलब्ध होतील ते ही काहीही किंमत न मोजता.

WhatsApp Channel Link:
https://whatsapp.com/channel/0029Va9hK5r9xVJnXYQ6yh3L

page Simple Lifestyle Vlogs:
https://www.facebook.com/simplelifestylevlogs?mibextid=ZbWKwL

Borivali Hikers:
https://facebook.com/groups/509955217958785/

Instagram:
https://www.instagram.com/simplelifestyle.vlogs/

TTMM Simple Lifestyle Vlogs Facebook Group: https://facebook.com/groups/496676889311754/

माझे सगळे लिखाण Blog स्वरूपात: https://simplelifestylevlogs.blogspot.com/

Whatsapp Number: Nine Nine Six Seven One Five Two Nine Three Eight 99:67:1 5:29:38

जर आपल्याला या जागेची अधिक माहिती हवी असल्यास वरील नंबर वर WhatsApp मेसेज करा.

आपण आमच्या TTMM (कमीत कमी खर्च आणि भरपूर भ्रमंती) या मोफत उपक्रमात सहभागी होऊ इच्छित असाल तर मग दिलेल्या फोन नंबर वर WhatsApp मेसेज करा. फोन करू नका तो DND वर आहे, कोणीही फोन उचलणार नाही ह्याची नोंद घ्यावी. आमचे TTMM वर आधारित भरपूर व्हिडिओ YouTube Playlist वर उपलब्ध आहेत, ते लवकरच बघून घ्या आणि आमच्या फिरस्ती मध्ये सामील व्हा. आम्ही कोणतीही किंमत आकारात नाही ह्याची नोंद घ्या.

आमची टी टी एम एम ट्रेक बद्दलची संकल्पना समजून घेण्यासाठी खालील व्हिडिओ लिंकला क्लिक करून संपुर्ण माहिती मिळवा.
TTMM concept episode link: https://youtu.be/uiUPdLNxjBY

जर आपण स्वतः काही TTMM ट्रेक करत असाल तर मला WhatsApp मेसेज वर कळवा, माझे वेळेचे गणित जुळल्यास मला तुमच्या सोबत सहभाग घ्ययला आवडेल.

कळावे लोभ असावा,
आपलाच मित्र,
सिद्धेश पाटील
Simple Lifestyle Vlogs

International Mountain Day
11/12/2023

International Mountain Day

नमस्कार मंडळी,आपल्या प्रेक्षकांसाठी आपण बजेट केदारनाथ TTMM टूर, २धाम यात्रा मे २०२४ मध्ये आयोजित करत आहोत, मोजक्या जागा ...
10/12/2023

नमस्कार मंडळी,

आपल्या प्रेक्षकांसाठी आपण बजेट केदारनाथ TTMM टूर, २धाम यात्रा मे २०२४ मध्ये आयोजित करत आहोत, मोजक्या जागा शिल्लक राहिल्या आहेत त्यामुळे त्वरा करा आणि आपली जागा नक्की करा.

TTMM म्हणजे काय समजण्यासाठी खीलील लिंक क्लिक कारा
https://youtu.be/uiUPdLNxjBY?si=hGl6sC65-Qs9t-Ho

आपण मागील २.५ वर्ष TTMM तत्वावर केलेले सर्व ट्रेक आणि टूर आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत ते ही पाहून घ्या, आणि जर चॅनल आवडला तर त्याला सबस्क्राईब पण करा ही विनंती🙏
https://youtube.com/?si=-zraXUG-niPVfJzW

|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||जय गिरनारी, श्री गुरू शिखर, श्री दत्त गुरू पादुका आणि अखंड दत्त धूनी यांची भे...
08/12/2023

|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||
जय गिरनारी, श्री गुरू शिखर, श्री दत्त गुरू पादुका आणि अखंड दत्त धूनी यांची भेट जरूर पहा🙏
https://youtu.be/Vlj2nXyZu0E?si=klhykcnKdf70ppsG

नमस्कार मंडळी, जर आपल्याला ट्रेकिंग, हायकिंग या साहसी खेळात रस असेल आणि आमच्या बरोबर TTMM तत्वावर यायला इच्छित असल्यास ख...
06/12/2023

नमस्कार मंडळी, जर आपल्याला ट्रेकिंग, हायकिंग या साहसी खेळात रस असेल आणि आमच्या बरोबर TTMM तत्वावर यायला इच्छित असल्यास खालील व्हॉट्सॲप ग्रुप मध्ये स्वतःला जोडून घ्या आणि आपल्या YouTube चॅनल Simple Lifestyle Vlogs ला subscribe पण करा
https://chat.whatsapp.com/COawAF4287QA9KAvzJSEFI

TTMM (वाजवी खर्चात जास्तीत जास्त भटकंती) बद्दल जास्त माहिती खालील लिंक वर उपलब्ध आहे

https://youtu.be/uiUPdLNxjBY?si=t5HV8E2AziAwMRbZ

नमस्कार मंडळी आपल्याला कळविण्यात आनंद होत आहे की आपण बनवलेली गिरनार पर्वतावरील एक रील तब्बल २लाख व्ह्यूज, ८हजार लाईक्स आ...
05/12/2023

नमस्कार मंडळी आपल्याला कळविण्यात आनंद होत आहे की आपण बनवलेली गिरनार पर्वतावरील एक रील तब्बल २लाख व्ह्यूज, ८हजार लाईक्स आणि भरपूर कॉमेंट्स मूळे जोरदार हिट ठरत आहे https://www.instagram.com/reel/Cz98hlvIH7v/?igshid=NTYzOWQzNmJjMA==

आपण यांना पाहिलात का? ओळखा पाहू आज कोण आहे सोबतीला
04/12/2023

आपण यांना पाहिलात का? ओळखा पाहू आज कोण आहे सोबतीला

गावरान पोपटीचा हंगाम चालू झाला आहे तेव्हा बनवा घरच्या घरी पोपटी आणि ह्या अनोख्या पद्धतीने लज्जतदार मेजवानीचा आस्वाद लुटा...
02/12/2023

गावरान पोपटीचा हंगाम चालू झाला आहे तेव्हा बनवा घरच्या घरी पोपटी आणि ह्या अनोख्या पद्धतीने लज्जतदार मेजवानीचा आस्वाद लुटा

Hi, Thanks for watching our Channel, we are creating Travel, Cooking, Trekking, Lifestyle, Public Event, and Product reviews videos on this channel. We are r...

संपूर्ण सोमनाथ दर्शन, श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग, त्रिवेणी संगम, सूर्य मंदीर, पांडव गुंफा, गीता मंदिर, गोलोक धाम, शारदा पी...
01/12/2023

संपूर्ण सोमनाथ दर्शन, श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग, त्रिवेणी संगम, सूर्य मंदीर, पांडव गुंफा, गीता मंदिर, गोलोक धाम, शारदा पीठ, भालकातिर्थ, बाणगंगा, अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेले जुने सोमनाथ मंदिर आणि रात्रीचा सोमनाथ मंदिरातील लेझर शो अशी एका दिवसात केलेली भटकंती

नमस्कार मंडळी🙏

गेली एक वर्ष मनात विचार चालला होता की आपण गुरू शिखर गिरनारला भेट द्यावी पण तो योग जुळून येत नव्हता. शेवटी दिवाळीचे औचित्य साधून आम्ही ते नक्की केले आणि १५ नोव्हेंबर साठी तिकीट काढले ते होते जुनागड साठी, तिकीट ३ महिने आधी काढले तरी RAC च होते तरीही आम्ही प्रवास करायचा असे ठरवले.

आम्ही सगळी तयारी केली होती, बॅगा बांधून घेतल्या. प्रवास कसा आणि कुठे कुठे फिरायचे ते ठरवले होते, त्यानुसार गिरुशिखर गिरनार पर्वत आणि संपूर्ण जुनागढ फिरायचे असे ठरले.

१४ तारखेला पहाटे ३ वाजता मनात विचार आला की एवढे जवळ जात आहोत तर मग सोमनाथ ज्योति्लिंगांचे दर्शन का करू नये?

मग घरातल्या मंडळींना उठऊन आणि बोलून आम्ही ५ वाजता नक्की केले की सोमनाथ दर्शन पण करायचे. लागलीच त्याच ट्रेनचे पुढील एक्स्टेन्शन रिझर्व्हेशन केले.

वेरावल एक्सप्रेस किंवा सौराष्ट्र एक्सप्रेस असे त्या ट्रेनचे नाव आहे, बोरिवली वरून दुपारी २ वाजता सुटून वेरावल इथे थेट दुसऱ्या दिवशी सकाळी ६.६० ला आपल्याला पोहोचवते.

वेरावल स्टेशन बाहेर रिक्षा स्टँड आहे, ही आखणी अनपेक्षित होती म्हणून हॉटेल बुक केले नाही, ऑनलाईन सगळी हॉटेल बुक होती आणि उरली सुरली हॉटेल अवाक्याच्या बाहेर होती, तब्बल चार ते पाच हजार भाव होता. रिक्षा पकडली २०० रू सोमनाथ मंदिरापाशी सोडणार, ती नक्की केली, व्यक्ती म्हातारी आणि मुस्लिम होती, तेव्हा विचारपूस केली ते बोलले हॉटेल मिळवून देतो २००० रुपयात. हॉटेलला पोहोचलो पण भाव चढले होते २५०० रुपयात रूम मिळाली.

चाचांना विचारले सोमनाथ दर्शन साठी किती तर बोलले १००० रुपये मग घासाघीस करून ७०० रुपयात मानले. दिवाळी मूळे भाव चढे झाले होते, एरवी बहुदा ५०० रुपयात काम झाले असते.

नंतर आम्हाला फिरताना कळले की, सोमनाथ संस्थानाची बस आहे जी आपल्याला सोमनाथ दर्शन अवघ्या ३० रुपयात करून देते, आम्ही फिरलेले सगळे स्पॉट ते दाखवते.

वातावरण मस्त थंड होते, थंडीची सुरुवात झाली होती, हॉटेल वर मस्त गरम पाणी मागवले अंघोळ आटोपली, लगेच चहा नाश्ता करून सोमनाथ दर्शन चालू केले.

चाचा एकदम वयाप्रमाणे हळुवार रिक्षा चालवत होते, मला ते आवडले, नाहीतर आजची नवीन मुले रिक्षा की विमान चालवतात तेच कळतच नाही.

आपण हे दर्शन तीन भागात विभागु कारण तुम्ही पूर्ण दिवसासाठी रिक्षा करण्यापेक्षा विभागानुसार करा ते स्वस्त पडेल.

खालील विभाग सोमनाथ मध्ये आहे.
विभाग १)
त्रिवेणी संगम
आदी शंकराचर्य यांची गुंफा
सूर्य मंदीर
पांडव गुंफा, पांडवांची कुलस्वामिनी हिंगलाज माता यांचे मंदिर आहे
गीलोक धाम, इथे श्रीकृष्णाला मोक्ष प्राप्ती झाली होती
बलराम गुंफा, इथून बलराम भुलोकात सामावून गेले होते
गीता मंदिर,
शारदा पीठ

ही मंदिर जवळ जवळ आहेत, साधारण १० मिनिटाच्या परिसरात आहेत त्यामुळे आपण चालत जाऊ शकतो.

खालील विभाग वेरावल मध्ये आहेत.
विभाग २)
भालकातिर्थ इथे श्रीकृष्णाला जरा नावाच्या भिल्लाचा बाण लागला होता.

विभाग ३)
बाणगंगा, या जागेवरून जरा नावाच्या भिल्लाने श्रीकृष्णाला बाण मारला होता.

या जागेची महती आणि इतिहास आपण लवकरच व्हिडिओ स्वरूपात मांडू तो तुम्ही बघून घ्यावा.

ह्या सगळ्या जागा बघण्यासाठी आपल्याला २-३ तास पुरे आहेत.

संपूर्ण फिरून दुपार झाली होती, मग आम्ही सोमनाथ मंदिरात दर्शन घेतले आणि मंदिरातील प्रासादालयात प्रसाद रुपी जेवण घेतले.

थकल्यामुळे आम्ही परत हॉटेल वर गेलो १ तास आराम केला.

परत संध्यकळी आम्ही अहिल्याबाई होळकरांनी बांधलेले ओल्ड सोमनाथ मंदिर बघीलते, ते मूळ सोमनाथ मंदिराच्या आवारातच आहे.

सोमनाथ मंदिरातील रात्रीचा लेझर शो बघीलता मंदिरा बद्दल भरपूर माहिती मिळाली.

मग रात्रीचे जेवण करण्यासाठी गूगल देवीचा सहारा घेतला, मग कळले जवळच सोमनाथ संस्थानाचे लिलावती अतिथी गृह आहे, हॉटेल आणि रेस्टॉरंट दोन्ही, तिकडे जेवण छान आहे.
गुजराथी थाळी अत्यंत सुंदर होती आणि रास्त भावात सुद्धा अवघे ७० रुपये.

वेरावलला जाण्यासाठी रात्री भरपूर रिक्षा उपलब्ध आहेत त्यामुळे काही त्रास झाला नाही. मग रात्री ११ वाजताची सोमनाथ ओखा एक्सप्रेस पकडुन रात्री १ वाजता जुनागढ इथे पोहोचलो.

पुढे झालेली पंचाईत पुढील भागात क्रमशः

हा आमचा भटकंती रुपी अनुभव आपण व्हिडिओ स्वरूपात मांडत आहोत, तो नक्की बघुनंघ्या आणि आपला अभिप्राय कॉमेंट मध्ये नक्की कळवावा ही विनंती.

YouTube link:
https://youtu.be/zp1WOeyo42s

ही फिरस्तीची मोहीम आखताना मी भरपूर ट्रेकर मंडळींशी सल्ला मसलत केली होती आणि त्यांनी दिलेल्या माहितीमुळे आम्हाला भरपूर फायदा झाला, त्यांचे विशेष आभार.

जर आपल्याला असे विविधतेने नटलेले किंवा विशेष सहलीची ठिकाण, धबधबे, गुहा लेण्या, किल्ले, ट्रेक, hike किंवा मंदिरांची माहिती असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्हाला जरूर आवडेल भेट द्यायला.

मला अपेक्षा आहे आपल्याला माझा अनुभव लेख स्वरुपात आपणाला आवडला असेल. सोबत फोटो फेसबूक लिंक वर ऊपलब्ध आहेत, तरीपण आपणास सध्य परिस्थिती अनुभवायची असेल तर वरील दिलेल्या YouTube लिंकला नक्की क्लिक करून व्हिडिओ पहा, जर व्हीडिओ आवडला तर लाल सबस्क्राइब बटन दाबा, सोबत असलेल्या घंटेला क्लिक करून All हे बटन दाबा म्हणजे आमचे नियमित येणारे व्हिडिओ आपणास पाहण्यासाठी उपलब्ध होतील ते ही काहीही किंमत न मोजता.

WhatsApp Channel Link:
https://whatsapp.com/channel/0029Va9hK5r9xVJnXYQ6yh3L

page Simple Lifestyle Vlogs:
https://www.facebook.com/simplelifestylevlogs?mibextid=ZbWKwL

Borivali Hikers:
https://facebook.com/groups/509955217958785/

Instagram:
https://www.instagram.com/simplelifestyle.vlogs/

TTMM Simple Lifestyle Vlogs Facebook Group: https://facebook.com/groups/496676889311754/

माझे सगळे लिखाण Blog स्वरूपात: https://simplelifestylevlogs.blogspot.com/

Whatsapp Number: Nine Nine Six Seven One Five Two Nine Three Eight 99:67:1 5:29:38

जर आपल्याला या जागेची अधिक माहिती हवी असल्यास वरील नंबर वर WhatsApp मेसेज करा.

आपण आमच्या TTMM (कमीत कमी खर्च आणि भरपूर भ्रमंती) या मोफत उपक्रमात सहभागी होऊ इच्छित असाल तर मग दिलेल्या फोन नंबर वर WhatsApp मेसेज करा. फोन करू नका तो DND वर आहे, कोणीही फोन उचलणार नाही ह्याची नोंद घ्यावी. आमचे TTMM वर आधारित भरपूर व्हिडिओ YouTube Playlist वर उपलब्ध आहेत, ते लवकरच बघून घ्या आणि आमच्या फिरस्ती मध्ये सामील व्हा. आम्ही कोणतीही किंमत आकारात नाही ह्याची नोंद घ्या.

आमची टी टी एम एम ट्रेक बद्दलची संकल्पना समजून घेण्यासाठी खालील व्हिडिओ लिंकला क्लिक करून संपुर्ण माहिती मिळवा.
TTMM concept episode link: https://youtu.be/uiUPdLNxjBY

जर आपण स्वतः काही TTMM ट्रेक करत असाल तर मला WhatsApp मेसेज वर कळवा, माझे वेळेचे गणित जुळल्यास मला तुमच्या सोबत सहभाग घ्ययला आवडेल.

कळावे लोभ असावा,
आपलाच मित्र,
सिद्धेश पाटील
Simple Lifestyle Vlogs

आज आपण भेट देणार आहोत इष्ट आणि पहिल्या ज्योतिर्लिंगाला श्री सोमनाथ मंदिर त्याबरोबर सोमनाथ आणि वेरावळ मधील श्रीकृष्णाच्या...
30/11/2023

आज आपण भेट देणार आहोत इष्ट आणि पहिल्या ज्योतिर्लिंगाला श्री सोमनाथ मंदिर त्याबरोबर सोमनाथ आणि वेरावळ मधील श्रीकृष्णाच्या प्रसिद्ध अशा मंदिरांना सुद्धा, तर मग लवकर बघून घ्या आणि तुम्ही सुद्धा भेट द्या🙏
https://youtu.be/zp1WOeyo42s

नमस्कार मित्रांनो, आपण दिलेल्या भरभरून प्रतिसादा बद्दल धन्यवाद, आपले दिवाळी पहाट गायक श्री. राहुल देशपांडे आणि गायिका कु...
23/11/2023

नमस्कार मित्रांनो,
आपण दिलेल्या भरभरून प्रतिसादा बद्दल धन्यवाद, आपले दिवाळी पहाट गायक श्री. राहुल देशपांडे आणि गायिका कु. आर्या आंबेकर यांचे व्हिडिओ दणदणीत अगदी तब्बल २०००० आणि १८००० असे views, भरपूर लाईक आणि कमेंट देऊन तुम्ही गाजवले आहेत, त्याबद्दल मंडळ आभारी आहे 🙏
जर व्हिडिओ बघितले नसतील तर लिंक खाली दिली आहे बघून घ्यावे ही विनंती🙏

भाग १ https://youtu.be/cBAUE8sfaaI

भाग दोन https://youtu.be/B7aaOVm-sZA

https://youtu.be/ce4EkGGnj2A?si=wJKRbqa1AxAS4-T7श्री सिद्धेश्वर मंदिर, तळवडे, सावंतवाडी, पालखी सोहळा, मालवणी महोत्सव, मा...
21/11/2023

https://youtu.be/ce4EkGGnj2A?si=wJKRbqa1AxAS4-T7
श्री सिद्धेश्वर मंदिर, तळवडे, सावंतवाडी, पालखी सोहळा, मालवणी महोत्सव, मालवणी जत्रा, भाग दोन

श्री सिद्धेश्वर मंदिर, तळवडे, सावंतवाडी, पालखी सोहळा मालवणी महोत्सव, मालवणी जत्राhttps://youtu.be/t--wDwhsdWA
21/11/2023

श्री सिद्धेश्वर मंदिर, तळवडे, सावंतवाडी, पालखी सोहळा मालवणी महोत्सव, मालवणी जत्रा
https://youtu.be/t--wDwhsdWA

Somnath - Girnar tour started
15/11/2023

Somnath - Girnar tour started

https://youtu.be/cBAUE8sfaaI?si=lZgCD5GXyMhcNxR7दिवाळी पहाट गायक राहुल देशपांडे आणि गायिका आर्या आंबेकर यांच्या सोबत एक ...
13/11/2023

https://youtu.be/cBAUE8sfaaI?si=lZgCD5GXyMhcNxR7
दिवाळी पहाट गायक राहुल देशपांडे आणि गायिका आर्या आंबेकर यांच्या सोबत एक स्वर्गीय सुरांची मैफिल भाग 1

एक दिवाळी पहाट श्री राहुल देशपांडे, गायिका आर्या आंबेकर आणि निवेदक संकर्षण कऱ्हाडे यांच्या समवेत...दिवाळी पहाट हा विषय ग...
12/11/2023

एक दिवाळी पहाट श्री राहुल देशपांडे, गायिका आर्या आंबेकर आणि निवेदक संकर्षण कऱ्हाडे यांच्या समवेत...

दिवाळी पहाट हा विषय गेली १० वर्ष तग धरून आहे, आज मितिला प्रत्येक गल्ली बोळात हा कार्यक्रम होतो.

मागच्या हप्त्यात काही कामा निमित्त सुगी बिल्डर यांच्या ऑफिस मध्ये गेलो होतो, तेव्हा त्यांनी मला दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे पास दिले होते.

मी घरात विचारले असता, मला कुणाचा प्रतिसाद मिळाला नाही, एकतर गड, किल्ले, धबधबे, आणि जंगल असे सगळेच बंद होते दिवाळी निमित्त.

आज अचानक पहाटे ३ वाजता काही मुलांनी फटाके लावले, जाग आली, परत झोप लागली नाही. मग ४ वाजता सगळ्यांना उठवले आणि बोललो, चला उठा आपल्याला कार्यक्रमाला जायचे आहे. तसे सगळे चटकन उठले, आवरून घेतले, कपडे इस्त्री केले, लागणारे खाण्या पिण्याचे समान गाडीत भरले, आणि दादर चौपाटी गाठली, सुदैवाने आमच्या शिवाजी पार्कवर गाडी पार्क केली.

इथे रोजचा गोंधळ असतो, कधी गाडी उजव्या बाजूला तर कधी डाव्या बाजूला पार्क करावी लागते, मला ते गणित कधीच समजले नाही. मग काय समोरच पोलिस दादा होते, त्यांच्याकडून खातरजमा केली आणि सुटकेचा नि:स्वास सोडला.

कार्यक्रमाच्या स्थाना कडे चालू लागलो, तेव्हाच प्रत्यय येऊ लागला, हा कार्यक्रम वेगळा आहे, गल्ली बोळातला नाही, सुमधुर असा आवाज आणि अप्रतिम असे वाद्यवृंद कानावर पडत होते.

इच्छित स्थळी पोहोचलो पण जागा फुल्ल झाल्या होत्या. मग बोलले की बाहेर मागे जाऊन बसा खुर्च्या टाकल्या आहेत. पण ती मजा नाही. मग काय थोड डोक वापरले आणि थेट स्टेज समोर जाऊन बसलो.

हा कार्यक्रम होता गायक श्री राहुल देशपांडे, गायिका कु. आर्या आंबेकर, आणि निवेदक श्री संकर्षण कऱ्हाडे यांचा.

एक अप्रतिम असा गायक आणि संगीत वादक यांचा समन्वय आणि जुगलबंदी, कान आणि मन दोन्ही तृप्त झाले. असा योग पुन्हा येणे नाही.

कार्यक्रम झाला, मग सिद्धिवनायक मंदिर गाठायाचे असे ठरले पण तिथे पार्किंग नसते आणि पोलिस सतत असतात. मग काय बेस्ट पकडुन प्रभादेवी गाठले. सुंदर असे दर्शन झाले, माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. कारण इथे कधी पण गर्दी असतेच आणि अंगरक्षक नेहमी धक्का बुक्की करत असतात म्हणून, मी गेली कित्तेक वर्ष अशा मंदिरांत जाणे टाळतो. पण आजचा योग चांगला होता.

एकूण एक आजच्या दिवसाची सुरुवात चांगली झाली.

गाण्याचा कार्यक्रम आपल्या चॅनल वर लवकर येईल जर copyright नाही लागला तर तो बघून घ्या, म्हणजे मी काय स्वर्गीय अनुभूती घेतली ते पण कळेल.

असो, आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या पून्हा हार्दिक शुभेच्छा🙏

शुभ दीपावली
11/11/2023

शुभ दीपावली

OFFBEAT Trekers ने TTMM तत्वावर आयोजित केलेली नाणेघाट ते भीमाशंकर ७० Km मधील तिसरा टप्पा अहुपे ते भीमाशंकरनमस्कार मंडळी🙏...
04/11/2023

OFFBEAT Trekers ने TTMM तत्वावर आयोजित केलेली नाणेघाट ते भीमाशंकर ७० Km मधील तिसरा टप्पा अहुपे ते भीमाशंकर

नमस्कार मंडळी🙏

घाटवाटा ह्या अनादी कालापासून अस्तित्वात आहेत, त्या मी किंवा ह्यांनी किंवा त्यांनी शोधल्या ह्या भानगडीत न पडता आपण त्यांचा आनंद घेणे महत्त्वाचे आहे.

जशी नामांकित किल्ल्यावर माणसांची तोबा गर्दी होते तसे इथे नसते, इथे फक्त गुर चारणारे गावकरी दिसतात आणि आमच्यासारखे खुळे ट्रेकर्स.

काहींना वाट भेटते तर काही भरकटतात, थोडी भीती, थोडे नवीन शोधण्याचा एक कसोशीने केलेला प्रयत्न.

ऑफबीट ट्रेकर्स ने आयोजीत केलेला ट्रेक हा २ दिवसांचा होता पण मी तो ३ दिवसांचा योजून केला कारण मला नाणेघाट हा ट्रेक वैशाखारे गावातून करायचा होता.

माझा नाणेघाटात फसलेला ट्रेकचा किस्सा, आणि आंबोली ते अहुपे प्रवासवर्णन मी आधीच्या भागात प्रस्तुत केले आहे ते मी परत लिहून वेळ वाया घालत नाही.

नाणेघाट ते आंबोली या ट्रेक बाबद् पण आधीच्या लेखात सविस्तर लिहिले आहे.

पुढील लेख क्रमशः

अहूपे गावातील रात्र भयानक होती, झोप झाली नाही, तो किस्सा मी माझ्या आधीच्या वर्णनात लिहिला आहे.

पहाट झाली आम्ही प्रत:विधी आटोपून घतले, सकाळचा चहा झाला, भाकऱ्या आणि बटाट्याची भाजी नाश्ता आणि दुपारच्या जेवणाला बांधून घेतल्या.

सूर्योदय अप्रतिम होता, खेडे गाव, सकाळीं सकाळी दाण्याच्या शोधात फिरणाऱ्या गावठी कोंबड्या, अन हिरवेगार माळरान, त्या पल्याड दूरवर पसरलेली डोंगर रांग, आणि त्यातून उगवलेला नारायण, अप्रतिम दृश्य, आभाळाला लाली आली होती. असे वाटत होते की इथेच खाटेवर बसून राहावे, पण नीघायाची वेळ झाली होती.

बॅगा आवरल्या, आणि चाल सुरू झाली.

अहुपे ते कोंढवळ हा पहिला टप्पा होता, गाव सोडताच आम्ही डोंगर चढायला लागलो, हळू हळू त्याचे रूपांतर गर्द अशा जंगलात झाले. हिरडा खरोता अशी वेग वेगळी औषधी झाडे दिसू लागली.

थोडी फार शेकरू या प्रणयची घरटी दिसू लागली, पण तो दिसला नाही याची खंत लागून राहिली.

हळू जंगलाचे रूपांतर खुरट्या कारवित झाले, थोडी विरळ फुले दिसली, सकाळीं सकाळी असे दर्शन झाले, छान वाटले.

जसं जसे पुढे वाटचाल चालू झाली तशी कारविची जाळी दिसू लागली, फुले तर हजारो, नाही लाखो संखे मध्ये होती, एक डोंगर, दोन डोंगर, तीन डोंगर संपले वाटले होते की डोंगर संपला की कारवी संपले पण ती कसली संपते, आमचे डोळे दिपले होते पण कारवी संपत नव्हती.

कारवीची कमान झाली होती, वरती नवीन जांभळी फुले आणि खाली जमिनीवर मावळलेली फुले असा नजारा होता, जणू सिनेमा असावा.

अखेर कारवी संपली, भरपूर चालल्या नंतर आम्ही एका गवांदेवडी गावात आलो, पुढे लगेच कच्च्या रस्त्यावरून पक्क्या रस्त्यात रूपांतर झाले.

पुढे एक मचाण दिसली, खाली धबधबा होता, बहुदा हाच तो कोंढवळ धबधबा.

असा जिवंत धबधबा बघून मन प्रसन्न झाले, आम्ही सगळ्यांनी अंघोळ करून घेतली.

आता भीमाशंकर फार जवळ होते, हातात वेळ होता म्हणून आम्ही थोडा वेळ इथे जास्त घालवला.

मला आम्ही भर उन्हाळ्यात भेट दिलेल्या काळमांडवी धबधब्याची आठवण झाली, कारण पाण्याच्या प्रवासाने रांजण खळगे फार मोठे अनिंखोल झाले होते.

पुढे भीमाशंकरची वाट धरली, हे जंगल फार गच्च होते, झाडांची दाटी झाली होती. आम्ही शेकरू दिसते का ते शोधत चाललो होतो. शेवटी तो क्षण आला, आम्हाला शेकरू दिसले, एक, दोन, तिन असा ताफा होता, त्याची घरटी होती. मुख्य म्हणजे त्यांनी आम्हाला बघितले पण ते पळाले नाहीत उलट आम्हाला छान फोटो पोझ देत होते, आमच्या ग्रुप मध्ये ज्यांचा DSLR होता त्यांनी पटापट फोटो काढले.

छान असे फोटो आणि व्हिडिओ पण आले.

आता भीमाशंकर अगदी वेशीवर होते, पण आम्ही इथे वाट भरकटलो, पण पुन्हा रस्ता मिळवला आणि श्री क्षेत्र भीमाशंकराचे दर्शन घेतली.

या वर्षातील माझी ही दुसरी भेट होती.

म्हणतात ना जेव्हा देवाची इच्छा होणार तेव्हाच तो योग जुळाऊन आणनार.

असो, आमची ही भटकंती एक वेगळाच अनुभव देऊन गेली, कधी बघीतले नाही असे नजारे बघितले आणि डोळ्याचे पारणे फेडले.

अशा ह्या भटकंतीचा हा शेवट झाला.

मुंबईवरून झालेला माझा खर्च नाणेघाट ते भीमाशंकर

५ रुपये बस बोरिवली स्टेशन
२० रुपये ट्रेन तिकीट कल्याण
९० रुपये कल्यांण ते टोकावडे एसटीने
टोकवाडे ते नाणे घाट starting point by lift police vehicle zero charges, पण आभार प्रदर्शन म्हणून २ स्पेशल चहा घेतले खर्च ३० रुपये
राहण्याची व्यवस्था होटेल रानमळा, zero charges, विशेष आभार श्री दुंडा पांडुरंग कोकणे यांचे
पहिल्या दिवशी नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण घरून आणले होते
पुढील २दिवस जेवण आणि बस प्रवास यांचे ३०० रुपये
३१५ रुपये भीमाशंकर ते जुईनगर एसटीने
२० रुपये ट्रेन जुइनगर ते बोरिवली
५ रुपये बसने घरी

ऐकून खर्च ७८५ रुपये

हा भन्नाट अनुभव शब्दात व्यक्त करता येण्याजोगा नाही, आणि एका व्हिडिओत पण पूर्ण करण्याजोगा पण नाही त्यामुळे, छोट्या छोट्या भागात आपण व्हिडिओची बांधणी केली आहे, playlist लिंक दिली आहे ते व्हिडिओ एकदा बघून घ्या आणि स्वर्ग सुखाचा अनुभवा ही विनंती आणि आपला अभिप्राय कॉमेंट मध्ये नक्की कळवावा ही विनंती.

YouTube Playlist link:

Range Trek Naneghat to Bhimashankar, : https://www.youtube.com/playlist?list=PL_bA5qimfsWgC7wjq9VwSI0EIDguE093t

या ट्रेक मध्ये सहभागी झालेल्या समस्त ट्रेकर मंडळीचे आभार, त्यांनी दिलेल्या समर्थनामुळे हा ट्रेक यशस्वी पूर्ण झाला.

ह्या ट्रेकचे आयोजन ऑफ बीट ट्रेकर्सचे सर्वे सर्वा श्री शरद बाचुटे यांनी केले होते, या ट्रेकची संपूर्ण आखणी, अभ्यास, आणि व्यवस्थापन हे वाखाणण्याजोगे होते, कुठेही चूक नाही, कुठेही संभ्रम नाही, कुठेही वेळ वाया घालवला नाही.

ऑफबीट ट्रेकर्सच्या सगळ्याच वरिष्ठ मंडळींकडून काही ना काही गुण शिकण्यासारखे होते, जंगल वाचणे ही लकब या सगळ्यांचं चांगली अवगत आहे याचा प्रत्यय वेळोवेळी आला.

कळत नकळत ऐका ट्रेकवर भेट झाली होती आणि थोड्याच वेळात एका मागोमाग एक असे भरपूर ट्रेक एकत्र झाले ते कळलेच नाही.

जर आपल्याला असे विविधतेने नटलेले किंवा विशेष सहलीची ठिकाण, धबधबे, गुहा लेण्या, किल्ले, ट्रेक, hike किंवा मंदिरांची माहिती असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्हाला जरूर आवडेल भेट द्यायला.

मला अपेक्षा आहे आपल्याला माझा अनुभव लेख स्वरुपात आपणाला आवडला असेल. सोबत फोटो फेसबूक लिंक वर ऊपलब्ध आहेत, तरीपण आपणास सध्य परिस्थिती अनुभवायची असेल तर वरील दिलेल्या YouTube लिंकला नक्की क्लिक करून व्हिडिओ पहा, जर व्हीडिओ आवडला तर लाल सबस्क्राइब बटन दाबा, सोबत असलेल्या घंटेला क्लिक करून All हे बटन दाबा म्हणजे आमचे नियमित येणारे व्हिडिओ आपणास पाहण्यासाठी उपलब्ध होतील ते ही काहीही किंमत न मोजता.

WhatsApp Channel Link:
https://whatsapp.com/channel/0029Va9hK5r9xVJnXYQ6yh3L

page Simple Lifestyle Vlogs:
https://www.facebook.com/simplelifestylevlogs?mibextid=ZbWKwL

Borivali Hikers:
https://facebook.com/groups/509955217958785/

Instagram:
https://www.instagram.com/simplelifestyle.vlogs/

TTMM Simple Lifestyle Vlogs Facebook Group: https://facebook.com/groups/496676889311754/

माझे सगळे लिखाण Blog स्वरूपात: https://simplelifestylevlogs.blogspot.com/

Whatsapp Number: Nine Nine Six Seven One Five Two Nine Three Eight 99:67:1 5:29:38

जर आपल्याला या जागेची अधिक माहिती हवी असल्यास वरील नंबर वर WhatsApp मेसेज करा.

आपण आमच्या TTMM (कमीत कमी खर्च आणि भरपूर भ्रमंती) या मोफत उपक्रमात सहभागी होऊ इच्छित असाल तर मग दिलेल्या फोन नंबर वर WhatsApp मेसेज करा. फोन करू नका तो DND वर आहे, कोणीही फोन उचलणार नाही ह्याची नोंद घ्यावी. आमचे TTMM वर आधारित भरपूर व्हिडिओ YouTube Playlist वर उपलब्ध आहेत, ते लवकरच बघून घ्या आणि आमच्या फिरस्ती मध्ये सामील व्हा. आम्ही कोणतीही किंमत आकारात नाही ह्याची नोंद घ्या.

आमची टी टी एम एम ट्रेक बद्दलची संकल्पना समजून घेण्यासाठी खालील व्हिडिओ लिंकला क्लिक करून संपुर्ण माहिती मिळवा.
TTMM concept episode link: https://youtu.be/uiUPdLNxjBY

जर आपण स्वतः काही TTMM ट्रेक करत असाल तर मला WhatsApp मेसेज वर कळवा, माझे वेळेचे गणित जुळल्यास मला तुमच्या सोबत सहभाग घ्ययला आवडेल.

कळावे लोभ असावा,
आपलाच मित्र,
सिद्धेश पाटील
Simple Lifestyle Vlogs

https://youtu.be/kzMcstX6gtIनमस्कार मंडळी, आज आपण कोकणातील ऐका सुंदर समुद्र किनाऱ्याला भेट देणार आहोत, त्यातच अनाहिसे आप...
02/11/2023

https://youtu.be/kzMcstX6gtI
नमस्कार मंडळी, आज आपण कोकणातील ऐका सुंदर समुद्र किनाऱ्याला भेट देणार आहोत, त्यातच अनाहिसे आपल्याला कोळी बांधवांनी बोटीची सफर घडवली आहे, तेव्हा आमचा हा अनुभव आपण व्हिडिओ स्वरूपात बघा आणि चॅनलला सबस्क्राइब पण करा ही विनंती.

01/11/2023
OFFBEAT Trekers ने TTMM तत्वावर आयोजित केलेली नाणेघाट ते भीमाशंकर ७० Km मधील दुसरा टप्पा आंबोली ते अहुपेनमस्कार मंडळी🙏घा...
01/11/2023

OFFBEAT Trekers ने TTMM तत्वावर आयोजित केलेली नाणेघाट ते भीमाशंकर ७० Km मधील दुसरा टप्पा आंबोली ते अहुपे

नमस्कार मंडळी🙏

घाटवाटा ह्या अनादी कालापासून अस्तित्वात आहेत, त्या मी किंवा ह्यांनी किंवा त्यांनी शोधल्या ह्या भानगडीत न पडता आपण त्यांचा आनंद घेणे महत्त्वाचे आहे.

जशी नामांकित किल्ल्यावर माणसांची तोबा गर्दी होते तसे इथे नसते, इथे फक्त गुर चारणारे गावकरी दिसतात आणि आमच्यासारखे खुळे ट्रेकर्स.

काहींना वाट भेटते तर काही भरकटतात, थोडी भीती, थोडे नवीन शोधण्याचा एक कसोशीने केलेला प्रयत्न.

ऑफबीट ट्रेकर्स ने आयोजीत केलेला ट्रेक हा २ दिवसांचा होता पण मी तो ३ दिवसांचा योजून केला कारण मला नाणेघाट हा ट्रेक वैशाखारे गावातून करायचा होता.

माझा नाणेघाटात फसलेला ट्रेकचा किस्सा मी आधीच्या भागात सांगितला आहे तो मी परत लिहून वेळ वाया घालत नाही.

नाणेघाट ते आंबोली या ट्रेक बाबद् पण आधीच्या लेखात सविस्तर लिहिले आहे.

पुढील लेख क्रमशः

श्री मिनेस्वराचे मन प्रसन्न करणारे दर्शन करून पुढचा दाऱ्या घाट, ढाकोबा डोंगर, दुर्ग किल्ला, दुर्गवाडी, डोने गाव आणि आहुपे असा प्रवास चालू झाला.

आजचा पहिला टप्पा दाऱ्या घाट होता, आंबोली गाव हे फार सूंदरतेने नटलेले आहे, चहू बाजूला भले मोठे डोंगर कातळ कडे, सुळके आणि त्या डोंगरातून वाहणारे असंख्य असे झरे आणि त्या अनेक झर्यांपासून तयार होणारी मीना नदी असा काहीसा नजारा होता आणि त्यापुढे तयार केलेला रामजेवाडी पाझर तलाव.

गावाच्या मधोमध जात असता आभाळात चौफेर उंचावलेले हिरवे गर्द डोंगर, त्याखाली मध्ये मोजकीच टुमदार कौलारू घरे आणि चहुकडे पसरलेली भात शेती दिसली अशी ही निसर्गाची कलाकृती पाहून डोळे विस्फारले होते, कारण असा देखावा न भूतो न भविष्यती असाच होता. शहरीकरणा पासून मुक्त असा परिसर परत पाहायला भेटेल की नाही असा विचार मनात रेंगाळत होता.

हिरवे गार शेत कापणीला आले होते, भाताचा दाणा टम्म् भरला होता, तो सुकला की कापणीला सुरुवात होणार होती. गावात मोजकी माणसे दिसली बहुदा सगळी माणस शहरात कामाला असावी म्हणून गाव ओस पडला होता.

आता आम्ही आंबोली गावाच्या वेशीपाशी पोहोचलो होतो, पुढे एक डोंगर पायथा होता, इथेच दाऱ्या घाटाची सुरुवात होत होती. सुरुवातीचा चढ अत्यंत कठीण श्रेणीतला ६० ते ७० अंशातला होता, अगदी दीड फूट डोंगर कडेवरील वाट निसरडी मती दगड गोट्यानी भरलेली आणि काटेरी झाडे जिकडे तिकडे वाढलेली होती.

पुढे सरळ सोट ९० अंशांतला भला मोठ्ठा कातळ होता, पण गवकऱ्यानी इथे एक पाय राहील अशा थोड्या पायऱ्या खोदल्या होत्या म्हणून चढता येत होते नाहीतर टेक्निकल सपोर्ट शिवाय हा पॅच चाढणे कठीण होणार होते.

हा पॅच चढून झाला आणि समोरच एक छोटेखानी गुहा दिसली आणि तिच्या मध्यावर मस्त असा धबधबा होता, आत्ता तो ओसरत चालला होता. पण मस्त नजरा होता. बहुदा गुहेत कोणी गावकरी राहत असावेत, एक छोटीशी कारविची झोपडी होती, तिला दर पण होते झोपडीत काहीच नव्हते. बहुदा धनगर दुपारी गाई, बकरी चरायला सोडून झोपत असत.

थोडे फार फोटो काढले, पण थांबलो अजिबात नाही, कारण आजचा पल्ला फार लांबचा होता. लगेच गुहेच्या वरच्या बाजूला आलो, खाली गुहेवर पडणारा धबधबा इथूनच जात होता. पण इथला landscape काही वेगळाच, वरच्या बाजूला जिथून झरा वाहत होता तिथे ढाकोबा डोकं काढून उभा होता जणू तो खालच्या आंबोली शहराची राखण करत असावा.

गुहेच्या वरच्या बाजूने जो रम्य असा आंबोली गावाचा नजारा दिसत होता त्याचे मी वर्णन शब्दात नाही करू शकत, त्यासाठी तुम्हाला तिथे जाऊन बघणे गरजेचे आहे.

लगेच आम्ही पुढची वाट धरली, ढाकोबाच्या पायथ्याशी पोहोचलो पण आम्हाला ढाकोबाला वळसा घालून जायचे होते, भरपूर पठारे लागली, इथे वाट चुकण्याची दाट शक्यता आहे करत पठारावर भरपूर झाडे वाढलेली आहेत त्यामुळे समोरचे काहीच दिसत नाही.

आम्ही पण एका क्षणासाठी भरकटलो पण पुन्हा मार्गावर आलो.

२-३ डोंगर, पठारे लांगुन पुढे श्री ढाकेश्वर मंदिर लागले, सगळे अचंबित झाले एवढ्या जंगल माळरानावर कुणी बरे मंदिर बांधले असावे. मंदिर फार पुरातन असावे. मनसोक्त शिवशंभूचे दर्शन झाले पुढला मार्ग पकडला.

पुढे परत मंदिरा मागील जंगलातून मार्ग जात होता, डोंगर उतरलो तोच एक छान असा धबधबा लागला. सगळे पाण्यात डुंबून निघाले, अंघोळी उरकून घातल्या.

आत्ता आम्ही डोंगर उतरत होतो, एका मागोमाग येणारी एक अशी पठारे, माळराने, डोंगर कुणास ठाऊक किती आम्ही पायदळी तुडवले.

अखेर घोड दौड संपली ती थेट दुर्ग किल्ल्याच्या पायथ्यशीच, लगेच दूर्गला वळसा मारून दुर्गादेवी मंदिर गाठले, एव्हाना संध्याकाळ झाली होती, सूर्य मावळतीला आला होता.

जुन्नरचा कणखर सुबक बलाढ्य असा कोकणकडा बघीलता, कड्यावर रानफुले दिसली पण ती आता मावळतीला आली होती.

एक विशेष बाब कोकण कड्या मागे म्हणजे पूर्वेकडे अजून ढाकोबा लांबवर डोकं काढून आम्हाला जणू बघतच होता. मनोमनी त्याला मानाचा मुजरा केला कारण इतिहासात त्याला अनन्य साधारण महत्त्व असणार ते दिसतच होते.

सूर्य मावळतीला आला होता पण धुक असल्यामुळे आम्हाला जास्त लांबपर्यंत अंधुक असे दिसत होते.

लागलीच पुढचा रस्ता पकडला, वाटेत गावकरी भेटले होते त्यांनी थोडे आड वाटेचे शॉर्ट कट सांगितले होते, त्यानुसार कोकण कड्याच्या बाजूने मार्ग आकारला.

अंधार वाढतच चालला होता, आम्ही दिवसभर चालत होतो तरी आमचा चालण्याचा वेग अजून वाढवला कारण अंधार झाला तर हाच वेग अर्धा होईल आणि अंधारात वाट चाचपडत राहावे लागेल.

परत डोंगर तुडवले आणि शेवटी डोणे गावाच्या वेशीवर डोणे दार ही घळ दिसली, घळ अगदी उभा डोंगर कापावा तशी तीक्ष्ण होती त्यात एक धबधबा अजूनही वाहत होता. कोकणातून येणाऱ्या वाऱ्याची झुळूक अगदी सुखावणारी होती, धबधब्याचे तुषार परत डोंगरावर येत होते, आणि खळखळणारा आवाज अधिकच वाढवत होता.

पुढे सगळा डांबरी रस्ता होता, पण त्यावर आपला वेग कमी होतो म्हणून गावकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही परत शॉर्ट कट घेतला, अंधार अधिकच वाढत चालला होता, सूर्य मावळला होता, एक डोंगरात अरुंद अशी वाट होती ती आम्ही धरली, एक माणूस मुश्किलीने घुसेल अशी. पण वेळ दौडवण्यात अर्थ नव्हता आणि पर्याय पण नव्हता म्हणून आम्ही सगळे तुटून पडलो आणि तो डोंगर क्षणात पार केला आणि डोणे गावात पोहोचलो, पुढे सगळा डांबरी रस्ता होता म्हणून आम्ही बस इथेच मागवली होती.

आम्ही डोणे ते अहुपे हा प्रवास बसने केला. आता गर्द रात्र झाली होती. तिकडे जेवणाची व्यवस्था केली होती, भात, डाळ, भाजी, भाकऱ्या, चटणी, मिरचीचा खर्डा, पापड, लोणचे असा गरम गरम जेवणाचा आस्वाद आस्वाद घेतला आणि झोपायला एक मोठे मंदिर होते त्यात आश्रय घेतला.

क्षणार्धात सगळे झोपले पण अमावस होती रात्र भर कुत्री भुकत होती गावकरी त्रस्त झाले होते आणि उरली सुरली कसर आमच्याच ट्रेकर मंडळीनी एका मागोमाग घोरण्याची जणू शर्यत लावली होती. मग काय रात्रभर झोप लागली नाही.

आज जे नजारे आम्ही बघितले ते आयुष्यभर डोळ्यासमोर तरळत राहतील, कारण अशी सैर परत होणे नाही.

चला आज एवढेच, बाकी पुढील लेख क्रमशः

हा भन्नाट अनुभव शब्दात व्यक्त करता येण्याजोगा नाही, आणि एका व्हिडिओत पण पूर्ण करण्याजोगा पण नाही त्यामुळे, छोट्या छोट्या भागात आपण व्हिडिओची बांधणी केली आहे, playlist लिंक दिली आहे ते व्हिडिओ एकदा बघून घ्या आणि स्वर्ग सुखाचा अनुभवा ही विनंती आणि आपला अभिप्राय कॉमेंट मध्ये नक्की कळवावा ही विनंती.

YouTube Playlist link:

Range Trek Naneghat to Bhimashankar, : https://www.youtube.com/playlist?list=PL_bA5qimfsWgC7wjq9VwSI0EIDguE093t

या ट्रेक मध्ये सहभागी झालेल्या समस्त ट्रेकर मंडळीचे आभार, त्यांनी दिलेल्या समर्थनामुळे हा ट्रेक यशस्वी पूर्ण झाला.

ह्या ट्रेकचे आयोजन ऑफ बीट ट्रेकर्सचे सर्वे सर्वा श्री शरद बाचुटे यांनी केले होते, या ट्रेकची संपूर्ण आखणी, अभ्यास, आणि व्यवस्थापन हे वाखाणण्याजोगे होते, कुठेही चूक नाही, कुठेही संभ्रम नाही, कुठेही वेळ वाया घालवला नाही.

ऑफबीट ट्रेकर्सच्या सगळ्याच वरिष्ठ मंडळींकडून काही ना काही गुण शिकण्यासारखे होते, जंगल वाचणे ही लकब या सगळ्यांचं चांगली अवगत आहे याचा प्रत्यय वेळोवेळी आला.

कळत नकळत ऐका ट्रेकवर भेट झाली होती आणि थोड्याच वेळात एका मागोमाग एक असे भरपूर ट्रेक एकत्र झाले ते कळलेच नाही.

जर आपल्याला असे विविधतेने नटलेले किंवा विशेष सहलीची ठिकाण, धबधबे, गुहा लेण्या, किल्ले, ट्रेक, hike किंवा मंदिरांची माहिती असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्हाला जरूर आवडेल भेट द्यायला.

मला अपेक्षा आहे आपल्याला माझा अनुभव लेख स्वरुपात आपणाला आवडला असेल. सोबत फोटो फेसबूक लिंक वर ऊपलब्ध आहेत, तरीपण आपणास सध्य परिस्थिती अनुभवायची असेल तर वरील दिलेल्या YouTube लिंकला नक्की क्लिक करून व्हिडिओ पहा, जर व्हीडिओ आवडला तर लाल सबस्क्राइब बटन दाबा, सोबत असलेल्या घंटेला क्लिक करून All हे बटन दाबा म्हणजे आमचे नियमित येणारे व्हिडिओ आपणास पाहण्यासाठी उपलब्ध होतील ते ही काहीही किंमत न मोजता.

WhatsApp Channel Link:
https://whatsapp.com/channel/0029Va9hK5r9xVJnXYQ6yh3L

page Simple Lifestyle Vlogs:
https://www.facebook.com/simplelifestylevlogs?mibextid=ZbWKwL

Borivali Hikers:
https://facebook.com/groups/509955217958785/

Instagram:
https://www.instagram.com/simplelifestyle.vlogs/

TTMM Simple Lifestyle Vlogs Facebook Group: https://facebook.com/groups/496676889311754/

माझे सगळे लिखाण Blog स्वरूपात: https://simplelifestylevlogs.blogspot.com/

Whatsapp Number: Nine Nine Six Seven One Five Two Nine Three Eight 99:67:1 5:29:38

जर आपल्याला या जागेची अधिक माहिती हवी असल्यास वरील नंबर वर WhatsApp मेसेज करा.

आपण आमच्या TTMM (कमीत कमी खर्च आणि भरपूर भ्रमंती) या मोफत उपक्रमात सहभागी होऊ इच्छित असाल तर मग दिलेल्या फोन नंबर वर WhatsApp मेसेज करा. फोन करू नका तो DND वर आहे, कोणीही फोन उचलणार नाही ह्याची नोंद घ्यावी. आमचे TTMM वर आधारित भरपूर व्हिडिओ YouTube Playlist वर उपलब्ध आहेत, ते लवकरच बघून घ्या आणि आमच्या फिरस्ती मध्ये सामील व्हा. आम्ही कोणतीही किंमत आकारात नाही ह्याची नोंद घ्या.

आमची टी टी एम एम ट्रेक बद्दलची संकल्पना समजून घेण्यासाठी खालील व्हिडिओ लिंकला क्लिक करून संपुर्ण माहिती मिळवा.
TTMM concept episode link: https://youtu.be/uiUPdLNxjBY

जर आपण स्वतः काही TTMM ट्रेक करत असाल तर मला WhatsApp मेसेज वर कळवा, माझे वेळेचे गणित जुळल्यास मला तुमच्या सोबत सहभाग घ्ययला आवडेल.

कळावे लोभ असावा,
आपलाच मित्र,
सिद्धेश पाटील
Simple Lifestyle Vlogs

Address

Borivali
Mumbai
400066

Alerts

Be the first to know and let us send you an email when Simple Lifestyle Vlogs posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Simple Lifestyle Vlogs:

Share

Category

Nearby media companies