Rpi Athawale press Release

Rpi Athawale press Release Hon Ramdas Athawale. Minister of State for social justice n empowerment
Govt of India

Shri Ramdas Athawale, Hon’ble Union Munister of State for Social Justice and Empowerment, govt. of India met on 2.1.2025...
03/01/2025

Shri Ramdas Athawale, Hon’ble Union Munister of State for Social Justice and Empowerment, govt. of India met on 2.1.2025 and extended invitation to Minister of Minority Affairs, Govt. of India for Conference on Buddhism, which is scheduled to be held on 2.3.2025 at Nashik, Maharashta.

03/01/2025
  ATHAWALE  #        कृपया प्रसिद्धीसाठी *रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशची उद्या गोराई,बोरीवलीत महत्वपूर्ण बैठक : केंद...
02/01/2025

ATHAWALE #

कृपया प्रसिद्धीसाठी

*रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशची उद्या गोराई,बोरीवलीत महत्वपूर्ण बैठक : केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले उपस्थीत राहणार*

मुंबई दि.2- रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशची महत्वपुर्ण बैठक उद्या शुक्रवार दि.3 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता क्रांतीज्योत सावित्रीमाई फुले यांच्या 194 व्या जयंती दिनी बोरीवली पश्चिम गोराई येथील हॉटेल बेव्हयु च्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक राज्यमंत्री ना.रामदास आठवले प्रमुख मार्गदर्शक म्हणुन उपस्थित राहणार आहेत.यावेळी मुंबई प्रदेश मधील सर्व वॉर्ड,तालुका आणि जिल्हाअध्यक्षांनी तसेच विविध आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे यांनी केले आहे.

रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशच्या या महत्वपुर्ण बैठकीत मुंबईत राहणाऱ्या राष्ट्रीय कमीटी आणि राज्य कमीटीच्या पदाधिकाऱ्यांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे ;कार्याध्यक्ष बाळासाहेब गरुड,सरचिटणीस विवेक पवार,खजिनदार सुनिल मोरे यांनी केले आहे.

हेमंत रणपिसे
प्रसिद्धी प्रमुख

  ATHAWALE  # कृपया प्रसिध्दीसाठीभिमाकोरेगाव ऐतिहासिक विजयस्तंभ  स्मारकासाठी 200 एकर जमीन आणि 200 कोटी निधीची तरतुद कराव...
01/01/2025

ATHAWALE #


कृपया प्रसिध्दीसाठी

भिमाकोरेगाव ऐतिहासिक विजयस्तंभ स्मारकासाठी 200 एकर जमीन आणि 200 कोटी निधीची तरतुद करावी - केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले*

मुंबई/पुणे दि.१ - भिमाकोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला दरवर्षी आंबेडकरी जनता दि.1जानेवारी रोजी विनम्र अभिवादन करते. देशभरातुन आंबेडकरी जनता भिमाकोरेगाव येथील विजय स्तंभास अभिवादन करण्यास एकत्र येते. यामुळे त्या स्मारक सभोवतालची 200 एकर ज़मिन ऐतिहासिक शोर्यस्तंभाच्या स्मारकासाठी देऊन २०० कोटी निधीची तरतुद महाराष्ट्र शासनाने करावी या मागणीसाठी आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांची भेट घेणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना .रामदास आठवले यांनी सांगितले. पुणे येथील भिमाकोरेगाव येथील ऐतिहासीक विजय स्तंभास ना.रामदास आठवले यांनी1 जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता विनम्र अभिवादन केले.त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ना.रामदास आठवले बोलत होते.
यावेळी रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरोदे,सरचिटणीस गौतम सोनावणे,संघटन सचिव परशुराम वाडेकर,सुर्यकांत वाघमारे,बाळासाहेब जानराव शैलेश चव्हान,आशिष गांगुर्डे,मुंबईतुन आलेले प्रकाश जाधव ,सोहेल शेख, आदी अनेक मान्यंवर उपस्थित होते.
1 जानेवारी 1818 साली पेशव्यांच्या 28 हजार सैनिकांन विरुध्द 500 शुरविर महार सैनिकांनी प्रचंड घनघोर युध्द केले.त्यात 500 महार सैनिकांनी पेशव्यांच्या 28 हजार सैनिकांचा तारुण पराभव केला.हे जगातल फार मोठ आश्चर्य असुन त्याबद्दल तत्काळीन ब्रिटीशांनी या भिमाकोरेगाव येथील या लढाईच्या स्मरणार्थ आणि महार सैनिकांच्या स्मरणार्थ त्यांच्या गौरवासाठी येथे विजय स्तंभ उभारला .या ऐतिहासिक विजय स्तंभाला दरवर्षी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर 1 जानेवारी रोजी भिमाकोरेगाव ला येऊन या ऐतिहासिक वियज स्तंभाला अभिवादन करुन आंबेडकरी समाजाला आपला गौरवशाली इतिहास हा लढाऊ योध्दयांचा गौरवशाली इतिहास असल्याचे आठवण करुन देत.आपल्या पराक्रमी पूर्वजापासुन प्रेरणा घेऊन स्वाभिमानाने जगण्याचा उपदेश महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर देत असत.तीच प्रेरणा घेण्यासाठी दरवर्षी आंबेडकरी जनता पुण्यातील भिमाकोरेगाव येथील ऐतिहासिक विजय स्तंभास भेट देऊन अभिवादन करतात.या लढाईत शहिद झालेल्या शुरविर महार सैनिकांना विनम्र अभिवादन करतात .शुरवीर महार सैनिकांनी पेशव्यांच्या 28 हजार सैनिकांचा दारुण पराभव केल्याच्या पराक्रमाची विजय गाथेचा गौरव करताना आज ना.रामदास आठवले यांनी अत्यंत उत्सर्फुत कविता सादर केली.

भीमा कोरेगावची ऐकल्यानंतर शौर्यगाथा
आमचा उंच होतो आमचा माथा.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आमचा दाता,
जो बाबासाहेब आंबेडकरांना विरोध करेल त्याला घालू आम्ही लाथा,
भीमा कोरेगाव विजयस्तंभाला मी सलाम करतो जाता जाता.
असे ना.रामदास आठवले यांनी काव्यमय शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.

हेमंत रण पिसे
प्रसिद्धी प्रमुख

अंधेरी चे नवनिर्वाचित आमदार मुरजी भाई पटेल यांनी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्...
29/12/2024

अंधेरी चे नवनिर्वाचित आमदार मुरजी भाई पटेल यांनी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले साहेब यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.ना.रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या पाठींब्याने आपण निवडून आल्याने कृतज्ञ भावनेने आमदार मुरजी भाई पटेल यांनी ना.रामदास आठवले यांची भेट घेतली.यावेळी ना.रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्षातर्फे आमदार मुरजी भाई पटेल यांचा आमदार पदी निवडून आल्या बद्दल सत्कार केला.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे संघटन सचिव परशुराम वाडेकर आणि अंधेरी तालुका अध्यक्ष संजय खंडागळे आणि मान्यवर उपस्थित होते.

  ATHAWALE  # कृपया प्रसिद्धीसाठी *मजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या कुटुबीयांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले या...
27/12/2024

ATHAWALE #

कृपया प्रसिद्धीसाठी

*मजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या कुटुबीयांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट*

माजी पंतप्रधान दिवंगत डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनाची दुःखद वार्ता कळल्या नंतर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांनी सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून थेट दिल्लीला रवाना झाले.आज सकाळी त्यांनी नवी दिल्लीतील मोतीलाल नेहरू मार्ग येथे माजी पंतप्रधान दिवंगत डॉ मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली वाहीली. यावेळी ना.रामदास आठवले यांनी दिवंगत डॉ मनमोहन सिंग यांच्या कुटुंबियांची संत्वनपर भेट घेतली.यावेळी डॉ मनमोहन सिंग यांच्या कन्येची ना.रामदास आठवले यांनी सांत्वनपर भेट घेतली.माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या निधनाने भारताचा अर्थविश्र्वाचा कोहिनूर हरपला आहे.अजातशत्रू विनम्र व्यक्तिमत्व असणारे माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या निधनाने भारताची मोठी हानी झाली आहे अशी शोकभावना ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केली.

हेमंत रणपिसे
प्रसिद्धी प्रमुख

*संघर्षनायक नामदार रामदास आठवले यांचा वाढदिवस सहकुटुंब दुबईत मरिना बिचवर साजरा….*रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संघ...
26/12/2024

*संघर्षनायक नामदार रामदास आठवले यांचा वाढदिवस सहकुटुंब दुबईत मरिना बिचवर साजरा….*

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संघर्ष नायक केंद्रीय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले साहेब सहकुटुंब दुबई दौऱ्यावर असून २५ डिसेंबरला त्यांच्या वाढदिवसा निमित्त दुबई मधील मरिना बीच वर ना.रामदास आठवले यांचे त्यांच्या पत्नी सौ.सीमाताई आठवले यांनी औक्षण करून अभिष्टचिंतन केले.सोबत त्यांचा सुपुत्र कुमार जित आठवले उपस्थित होते. लाडका सुपुत्र जित आणि पत्नी
सौ.सिमाताई आठवले यांच्या सोबत दुबई मरीना बीच वर ना.रामदास आठवले यांनी सहकुटुंब आपला वाढदिवस साजरा केला.वाढदिवसा निमित्त ना.रामदास आठवले यांना देशभरातून आणि जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला.त्यांनी आपला वाढदिवस असल्याचे दुबईत कुणालाही सांगितले नाही मात्र तरीही तेथे ना.रामदास आठवले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.

हेमंत रणपिसे
प्रसिद्धी प्रमूख

25/12/2024
*दलित बहुजनांचा संघर्षनायक*हर जोर जुल्म की टक्कर मे संघर्ष हमारा नारा है।’ अशी घोषणा देत सुरु केलेल्या भारतीय दलित पँथरन...
24/12/2024

*दलित बहुजनांचा संघर्षनायक*

हर जोर जुल्म की टक्कर मे संघर्ष हमारा नारा है।’ अशी घोषणा देत सुरु केलेल्या भारतीय दलित पँथरने-
पोटात तुझ्या पेटली आग
उठ दलिता तोफा डाग
अशी हाक देऊन सर्व महाराष्ट्रातील आंबेडकरी युवकांना ‘पँथर’ बनविणारे लढाऊ संघटन म्हणजे ‘भारतीय दलित पँथर!’ सळसळत्या रक्ताच्या तरुण क्रांतिकारी पँथर्सना सोबत घेऊन दलितांवर होणार्‍या अन्याय-अत्याचारांविरोधात बंड पुकारताना ‘जय भीम के नारे पे खून बहे तो बहने दो’ची आक्रमक घोषणा देत ‘भारतीय दलित पँथर’चे ज्वालाग्रही वादळी आक्रमक नेतृत्व म्हणून पुढे आलेले नाव म्हणजे रामदास आठवले!

भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर या आपल्या प्राणप्रिय मुक्तिदात्याचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यात यावे, या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात नामांतर आंदोलन उभे राहिले. प्राण तळहातावर घेऊन नामांतरासाठी राज्यभर गावागावांत लढत फिरणारा अवलिया म्हणजे रामदास आठवले होत. आठवलेंनी मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात ‘लाठी गोली खायेंगे फिर भी आगे जायेंगे’ची घोषणा देत पोलिसांचा लाठीमार सहन करून प्रसंगी तुरुंगवास भोगला. आंबेडकरी चळवळीत जीवाची बाजी लावून लढत ‘रामदास आठवले’ नावाचा संघर्षनायक घडला. आंबेडकरी चळवळीचे भाग्य आहे की, रामदास आठवलेंसारखा झुंजार योद्धा या चळवळीचा शीर्षस्थ नेता म्हणून लाभला. ‘संघर्ष का दुसरा नाम रामदास आठवले हैं।’ असं त्यांच्याबद्दल म्हंटलं जातं. एवढा संघर्ष करून तावून-सुलाखून निघालेले नेते म्हणजे रामदास आठवले!

१९९० मध्ये ‘भारतीय दलित पँथर’ ही संघटना बरखास्त करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’चे काम रामदास आठवलेंनी सुरु केले. १९९० मध्ये रामदास आठवलेंच्या नेतृत्वातील रिपाइंने ‘काँग्रेस आय’ला पाठिंबा देऊन विधानसभा निवडणूक लढली. त्या निवडणुकीत रामदास आठवलेंच्या नेतृत्वामुळे काँग्रेसला आंबेडकरी जनतेचे मतदान मिळाले. त्यामुळे काँग्रेसच्या ३५ जागा अधिक जिंकून आल्याची जाहीर कबुली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी दिली होती. अत्यंत खडतर प्रवास आणि व्यवस्थेशी संघर्ष करणारा आपला ‘पँथर’ महाराष्ट्राचा कॅबिनेट मंत्री झाला याचे संपूर्ण देशात कौतुक झाले.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ संपूर्ण देशात वाढविण्याचे रामदास आठवले काम करीत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या ’दि पिपल्स एज्युकेशन सोसायटी’च्या अध्यक्षपदी मंत्री रामदास आठवले यांची निवड झाली आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ‘वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट’ या आंतरराष्ट्रीय बौद्ध संघटनेचे संस्थापक-सदस्य होते. त्या आंतरराष्ट्रीय बौद्ध संघटनेच्या जागतिक उपाध्यक्षपदी रामदास आठवले यांची सेऊल येथे निवड करण्यात आली होती. सवर्णांना आर्थिक निकषांवर आरक्षण देण्यात यावे, ही भूमिका घेऊन त्यांनी देशभर सवर्णांच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देऊन दलित-सवर्ण एकजुटीसाठी प्रयत्न केले.

महाराष्ट्रात शिवशक्ती-भीमशक्ती एकजूट करुन दोन समाजातील दरी मिटविण्याचा प्रयत्न केला आहे. रामदास आठवले महाराष्ट्रात पाच वर्षे कॅबिनेट मंत्री राहिले. त्यानंतर सन १९९८ मध्ये धारावी-दादर दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून लोकसभा खासदार झाले. त्यानंतर १९९९ आणि २००४ मध्ये पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार निवडून आले. म्हणजे तीन वेळा लोकसभेत ते खासदार होते. त्यानंतर २०१४ साली ते राज्यसभा खासदार म्हणून बिनविरोध निवडून आले.
कायम लोकांच्या गर्दीत राहणारा लोकनेता म्हणून रामदास आठवले यांचा जागतिक विक्रम होईल. दिवसरात्र देशभर कोणत्याही शहरांत, गावांत त्यांचा दौरा असू द्या, ते सत्तेत असोत की नसोत, लोक मात्र कायम रामदास आठवलेंभोवती गर्दी करतात. कार्यकर्त्यांना नावानिशी ओळखणारे, त्यांच्या सुखदुःखात सामील होणारे रामदास आठवले प्रचंड लोकप्रिय ठरले आहेत.

एवढी लोकांची सेवा ते करीत असल्याच्या फलस्वरूपात जुलै २०१६ साली ते भारत सरकारमध्ये पहिल्यांदा केंद्रीय राज्यमंत्री झाले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर रामदास आठवले हे केंद्रीय मंत्रिमंडळात पोहोचणारे पहिले भीमसैनिक ठरले. दि. २५ डिसेंबर संघर्षनायक रामदास आठवले यांचा वाढदिवस देशभर ‘संघर्ष दिन’ म्हणून रिपाइंतर्फे साजरा होतो. संघर्ष, संयम आणि धैर्याचे महामेरू ठरलेल्या संघर्षनायक रामदास आठवले यांना देशसेवेसाठी उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभो ही मनःपूर्वक शुभेच्छा! जयभीम!

हेमंत रणपिसे
(लेखक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले)चे प्रसिद्धी प्रमुख आहेत)

Address

Mumbai

Telephone

+918082458784

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rpi Athawale press Release posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share