08/01/2025
बरेच लोक वायरल व्हिडिओ बघून नागा साधू बद्दल अपशब्द , टीका टीपणी करत आहेत .
त्याना आज नागा साधू बद्दल थोडी माहिती देतो .
सहाव्या शतकात आदी शंकराचार्य जेव्हा पृथ्वी च भ्रमण करत होते तेव्हा त्यांच्या लक्षात आल येणाऱ्या काळात फक्त शास्त्रांनी काम नाही होणार तर
शास्त्रांच्या रक्षणा साठी शस्त्रांची सुधा आवश्यकता पडणार आहे .
तेव्हा त्यांनी नागा साधू समूहाची निर्मिती केली होती .
त्यांचं काम च आहे की धर्माची रक्षा करणे , ते कमांडो आहेत धर्माचे , ते कमांडो आहेत हिंदुत्वाचे ..
त्यामुळे ते इकडे तिकडे फिरत असतात , प्रत्येक चार वर्षाला जेव्हा अघोरी येतात तेव्हा त्यांच्या सोबत नागा साधू सुधा येतात .
कुंभमेळ्यात ते जाणून बुजून शक्ती प्रदर्शन करतात कारण विरोधकांना समजावे की जेव्हा धर्मावर संकट येईल तेव्हा आम्ही इथे उभे आहोत .
- नागा साधू बनण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला कुटुंबातील सोडून गेलेल्या व्यक्ती च आणि जिवंत व्यक्ती च पिंड दान करावे लागते .
त्या नंतर स्वतः चे सुधा पिंडदान करावे लागते . त्या नंतर आपल्याला एक नवीन नाव दिले जाते .
नागा साधूंची ट्रेनिंग बॉर्डर वरच्या कमांडो पेक्षा कठीण असते .
नागा साधू बनण्यासाठी बरेच कडक नियमाचे पालन करावे लागते .
नियम 1 :- कोणी पण नवीन व्यक्ती नागा साधू बनण्यासाठी आला तर त्याला सर्वात आधी ब्रह्मचर्याच पालन करावे लागते .
त्यामध्ये त्याचे स्वतः वरचे नियंत्रण बघितले जाते .
बऱ्याच दिवस ब्रह्मचर्या झाल्यानंतर त्याच्या मधे वासना आणि इच्छा आहे का बघितले जाते .
जो पर्यंत व्यक्ती वासना आणि इच्छेपासून मुक्त होत नाही तो पर्यंत त्याला दीक्षा मिळत नाही .
नियम 2 :- त्या व्यक्तीचे सेवा भाव बघितले जाते तो सर्वांची सेवा आणि सुरक्षा करू शकतो का हे परकले जाते .
बऱ्याच वेळेस त्याने वरिष्ठ साधू संतांची सेवा करावी लागते
नियम 3 :- त्या व्यक्तीला स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान करावे लागते .
नियम 4 :- त्या व्यक्तीला वस्त्रांचा त्याग करावा लागतो .
नागा साधून वस्त्र घालायची परवानगी नसते , त्यांना फक्त अंगावर भस्म लावायची परवानगी असते .
नियम 5:- त्या व्यक्तीला फक्त एक च वेळ जेवणाची परवानगी असते .
नागा साधूं ना पूर्ण दिवसात भिक्षा मागून एक वेळ जेवण करण्याची अनुमती असते .
त्यांना जास्तीत जास्त 7 घरातून भिक्षा मागण्याची अनुमती असते .
त्या 7 घरातून नाही मिळाले तर उपाशी झोपावे लागते .
जे पण अन्न मिळत आहे ते आवडो अगर ना आवडो त्यांना खावा च लागते .
नियम 6:- फक्त पृथ्वीवर झोपण्याची परवानगी
नागा साधून गादी आणि सतरंजी वर झोपायची परवानगी नसते .
नियम 7 :- गुरू मंत्र आस्था
नागा साधून आयुष्य भर गुरू मंत्र च follow करावं लागते .
नागा साधू बनण्यासाठी इतके नियम असतात की त्याला सामान्य व्यक्ती पार नाही करू शकत .
कमांडो सारखी ट्रेनिंग पास करावी लागते , आखाड्यात प्रवेश करण्या साठी 6 ते 12 महिन्याची ब्रह्मचारी तपस्या असावी लागते त्या नंतर ते ठरवतात हा आखाड्यात येण्यासाठी योग्य आहे का नाही .
नागा साधूंचा एकच उद्देश असतो सनातन आणि वैदिक धर्माची रक्षा
पूर्वी नागा साधूना मठ , आखाड्यांच्या रुरक्षेसाठी योद्धा सारखे तयार केले जायचे .
बऱ्याच काळ नागा साधूने मंदिर आणि मठांच्या सुरक्षेसाठी युद्ध केले आहेत .
जय महाकाल 🙌🚩