Police aani janteche vyaspith Satayvarta

  • Home
  • Police aani janteche vyaspith Satayvarta

Police aani janteche vyaspith Satayvarta पोलीस आणि जनतेचे व्यासपीठ ‘सत्यवार्?

गुरु नानक महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा कॉलेज म्हंटल की आली ती दंगामस्ती, दंगामस्ती सोबत चातक पक्ष्याला जशी पावस...
15/11/2022

गुरु नानक महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा
कॉलेज म्हंटल की आली ती दंगामस्ती, दंगामस्ती सोबत चातक पक्ष्याला जशी पावसाची ओढ असते तसेच विद्यार्थ्यांना वेध लागतात ते महोत्सवांचे. अभ्यासासोबत वैविध्य उपक्रम करायला विद्यार्थ्यांना फार आवडतात आणि याच उप्रकमातून विद्यार्थी देखील घडत असतात.
सध्या सर्वत्र महोत्सवांचे वारे वाहत असताना चर्चा आहे सेंट झेवियर्स महाविद्यालयाने आयोजित केलेल्या IKSHANA 2022 या मीडिया फेस्टची. विविध स्पर्धा आणि त्याचं सादरीकरण असलेल्या या फेस्ट मध्ये यंदा आकर्षण ठरलं ते म्हणजे शॉट फिल्म कॉम्पिटिशन. एकूण 200 स्पर्धक सहभागी असणाऱ्या या स्पर्धेत सायन येथील गुरु नानक महाविद्यालयाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून रोख रु. 50,000/-, सन्मान चिन्ह देऊन निखिल चौरसिया, विष्णू अज्जी, हफसा खान, प्रणय खंडागळे, जॉर्डन सिंग, लावण्या खतरी, प्रेरणा खेमानी, सौरभ शर्मा, केवल दोशी, निशा उपाध्याय या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या यशाबद्दल पत्रकारिता आणि जनसंज्ञापन विभागाच्या प्रमुख अमरीन मोगर यांनी विद्यार्थी चे कौतुक केले व भविष्यात अशीच नवनवीन शिखरे गाठावी यासाठी शुभेच्छा दिल्या. याखेरीज महाविद्यालयाच्या प्राचार्या. पुष्पिंदर भाटिया यांनी देखील विद्यार्थ्याना आशीर्वाद देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.या यशाबद्दल महाविद्यालयातील सर्वच स्तरातून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

शुभम पेडामकर

सलाम बॉम्बे मीडिया अकादमीचे बहुरूपी मुंबईचे फोटो प्रदर्शनसलाम बॉम्बे फाऊंडेशन ही विद्यार्थी सर्वांगीण विकासासाठी नेहमी प...
12/11/2022

सलाम बॉम्बे मीडिया अकादमीचे बहुरूपी मुंबईचे फोटो प्रदर्शन

सलाम बॉम्बे फाऊंडेशन ही विद्यार्थी सर्वांगीण विकासासाठी नेहमी प्रयत्नशील असते. गेल्या २० वर्षांपासून मुंबईतील महापालिका शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या कलात्मक व गुणात्मक विकासासाठी प्रिव्हेंटीव हेल्थ प्रोग्राम, खेळ, कला, व्यावसायिक कौशल्य विकास आणि मीडिया अकादमी असे विविध उपक्रम राबविले जात आहेत. संस्थेच्या ‘A CHILD IN SCHOOL HAS A FUTURE’ या ब्रीद नुसार सलाम मुंबई मीडिया अकादमी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करीत आहे.
मीडिया अकादमीव्दारे इयत्ता ७ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांना भाषिक कौशल्य, संवाद कौशल्य, फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी, क्रिएटिव्ह रायटींग अशा कौशल्यांचे प्रशिक्षण, ह्या क्षेत्रामधिल करियरची ओळख व मार्गदर्शन दिले जाते. सदर प्रशिक्षणातून विकसीत झालेल्या कौशल्यांना सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना मंच उपलब्ध करून देण्यासाठी छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येते. फोटोग्राफी क्षेत्रातील नामवंत मास्टर फोटोग्राफर्स विद्यार्थ्यांना विविध सत्रांद्वारे मार्गदर्शन करून व विद्यार्थ्यांनी विविध छायाचित्रांचे प्रकल्प केले आहेत. ते राहत असलेल्या वस्त्यांमध्ये त्यांच्याशी निगडीत विषयाला अनुसरून त्यांनी काढलेली उत्तम छायाचित्रे इतर विद्यार्थ्यांसाठी व प्रेक्षकांसाठी प्रदर्शनामार्फत सादर करणार आहेत.
मुंबई सुमारे १.८४ करोड लोकांची वैविध्यपूर्ण जीवनशैली असून सर्वांचे पालनपोषण करते. मुंबई हि सर्व प्रकारच्या लोकांसाठी स्वप्ननगरी आहे. परंतु याठिकाणी सगळ्यांची स्वप्ने पूर्ण होतील असे नाही. यामागचे एक प्रमुख कारण म्हणजे इथल्या लोकांना विविध उत्पन्न स्तरावरील मिळणारी संधी. सुमारे ६५% लोकसंख्या वस्त्यांमध्ये राहत असल्याने त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठीची पुरेशी संसाधने उपलब्ध नाहीत. ते या मल्टिव्हर्सचा एक भाग आहे. या फोटोग्राफी प्रदर्शनाच्या माध्यमातून सलाम बॉम्बे मीडिया अकादमीच्या विद्यार्थ्यांनी मुंबईचे विविध चित्र दाखवण्यासाठी त्यांच्या लेन्सद्वारे हे सार टिपले आहे.
बालदिनाचे औचित्य साधून ‘मल्टीवर्स ऑफ मुंबई (बहुरूपी मुंबई)’ या विषयाला अनुसरून विद्यार्थ्यांनी काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन दिनांक १४/११/२०२२, सोमवार, सकाळी ११ ते संध्याकाळी ६ रोजी कोरम क्लब ८ वा मजला, टॉवर 2A, वन वर्ल्ड सेंटर, लोअर परळ, मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. ह्या प्रदर्शनाला वेगवेगळ्या शाळांमधील विद्यार्थी, मीडिया कॉलेजचे विद्यार्थी, नामांकित छायाचित्रकार तसेच वेगवेगळ्या माध्यमांचे प्रतिनिधि उपस्थिती दर्शविणार आहेत.
८१०८३६९३७१ या संपर्क क्रमांकावर सकाळी ११ ते सायं ०६ पर्यंत संपर्क साधा अथवा [email protected] या मेल आय.डी वर आपली तपशीलवार माहिती पाठवून द्या.

शुभम पेडामकर

कोजागिरी पौर्णिमेची रात्रसंकष्टी चतुर्थीला आपण जसे उपवास सोडण्यासाठी चंद्रोदयाची वेळ बघतो. चंद्राची प्रतीक्षा करतो, पण ख...
19/10/2021

कोजागिरी पौर्णिमेची रात्र

संकष्टी चतुर्थीला आपण जसे उपवास सोडण्यासाठी चंद्रोदयाची वेळ बघतो. चंद्राची प्रतीक्षा करतो, पण खरा चंद्रोत्सव फुलतो, रंगतो, भावतो, स्मरतो तो कोजागिरी पौर्णिमेला. अश्विन पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा असेही म्हटले जाते. पुराना नुसार शरद पौर्णिमेच्या रात्री भगवती महालक्ष्मी पृथ्वीवर कोण कोण जागे आहे हे पाहण्यासाठी भ्रमण करते. आणि जे लोक जागे असतात त्यांना महालक्ष्मी कल्यान करते, धनधान्य आणि समृद्धी प्रधान करते असे मानले जाते.

पौर्णिमेला आकाश खूप दिवसानंतर स्वछ, निरभ्र व सुंदर दिसते. या नीरभ्र आकाशाचा आनंद घेता यावा व त्याचे स्वागत करावे म्हणून कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते. कोजागिरी पौर्णिमेला शरद ऋतू च्या पौर्णिमेच्या स्वछ चांदण्यात दूध आटवून चंद्राला नैवेद्य दिला जातो आणि नंतर ते दूध प्रसाद म्हणून ग्रहणही केले जाते. सद्या या दिवशी सगळीकडे गरबा, दांडिया देखील खेळला जातो आणि त्यानंतर सगळे एकत्र येऊन हे दूध प्राशन करतात. अशी ही कोजागिरी पौर्णिमा सगळे एकत्र येऊन साजरी करतात गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीमुळे हा सण देखील घरात राहूनच साजरा केला गेला पण सध्याची महामारीची स्थिती पाहता हळूहळू हे सण कमी प्रमाणात एकत्र येऊन साजरे केले जात आहेत.

तन्वी तिरपळे
सलाम बॉम्बे फाउंडेशन
मीडिया अकादमी.
विद्या विकास मंडळ विद्यालय

सत्यवार्ता सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या मीडिया अकादमीतर्फे फोटोग्राफी प्रदर्शनाचे आयोजनकोविड नियमांचे पालन करत फोटोग्राफी प्...
13/08/2021

सत्यवार्ता

सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या मीडिया अकादमीतर्फे फोटोग्राफी प्रदर्शनाचे आयोजन

कोविड नियमांचे पालन करत फोटोग्राफी प्रदर्शन पार - सबहेडलाईन

सलाम बॉम्बे फाउंडेशन मार्फत गत १९ वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या कलात्मक व गुणात्मक विकासासाठी प्रिव्हेंटीव हेल्थ प्रोग्राम , खेळ, कला, मिडीया ह्या अकादमी आणि व्यावसायिक कौशल्य विकास असे विविध उपक्रम राबविले जात आहेत. सध्या कोरोना महामारीमुळे सर्व उपक्रम ऑनलाईन पद्धतीने राबविले जात आहेत. सदर उपक्रमांपैकी सलाम बॉम्बे मिडीया अकादमीव्दारे इयत्ता ७ वी ते ९वी च्या विद्यार्थ्यांना भाषिक कौशल्य, संवाद कौशल्य, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, क्रिएटिव्ह रायटींग अशा कौशल्यांचे प्रशिक्षण, ह्या क्षेत्रांमधील करिअरची ओळख व मार्गदर्शन दिले जाते. फोटोग्राफीचे प्रशिक्षण देत असताना प्रशिक्षणातून विकसित झालेल्या कौशल्यांना सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना मंच उपलब्ध करुन देणे अतिशय महत्त्वाचे आहे. याकरिता अकादमी मार्फत दरवर्षी १९ ऑगस्ट हा जागतिक छायाचित्र दिवस साजरा करण्यात येतो. यासाठी फोटोग्राफी क्षेत्रातील नामवंत मास्टर फोटोग्राफर्स विद्यार्थ्यांना विविध सत्रांद्वारे मार्गदर्शन करतात व विद्यार्थी विविध छायाचित्रांचे प्रकल्प करतात. विद्यार्थांनी काढलेली उत्तम छायाचित्रे इतर विद्यार्थ्यांसाठी व प्रेक्षकांसाठी प्रदर्शनामार्फत सादर केली जातात.

यावर्षी जागतिक छायाचित्र दिनाच्या निमित्ताने फोटो-जर्नालिजम विषयाला अनुसरून विद्यार्थ्यांनी काढलेल्या छायाचित्रांचे एक मर्यादित प्रदर्शनाचे आयोजन दिनांक १३ ऑगस्ट २०२१ रोजी त्रिवेणी संगम म.न.पा. शालेय इमारत सभागृह, तळ मजला, करी रोड (पूर्व), मुंबई – १२ येथे सकाळी ११:३० ते संध्याकाळी ६ पर्यंत आयोजित करण्यात आले होते.

सदर प्रदर्शनासाठी अनेक वर्षांपासून फोटो-पत्रकारितेचे कार्य करित असलेले छायाचित्रकार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले असून
विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक विषयांना घेऊन जसे कि, मुंबई मेरी जाण, द फूटपाथ, नो वेअर टू वॉक, द मोबाईल फोन बेन अँड ब्लेसिंग, डेली स्लम लाईफ, या विषयावर छायाचित्रे काढली . महत्त्वाचे म्हणजे कोरोना विषयक गाईडलाईन्सचे तंतोतंत पालन करत या प्रदर्शनाला काही ठराविक अधिकारी वर्ग व प्रमुख पाहुणेच प्रत्यक्ष उपस्थित होते.सदर प्रदर्शनाचे उद्घाटन बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या शिक्षण समती अध्यक्षा संध्या दोशी , शिक्षणाधिकारी राजू तडवी, शिक्षण कला विभागाचे प्राचार्य. दिनकर पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

सलाम बॉम्बे फाऊंडेशनचे कार्य हे खऱ्या अर्थाने सलाम करण्यासारखे आहे. बृहन्मुंबई म.न.पा शाळेच्या विद्यार्थ्यांना संधी देऊन अनेक हिरे घडवण्याचे काम संस्थेमार्फत केले जात आहे, असे प्रतिपादन शिक्षण समितीच्या अध्यक्षा संध्या दोशी यांनी केले.

शुभम पेडामकर

सत्यवार्ताचला करूया संरक्षकांच्या आरोग्याचे संरक्षण त्यांना योग्य प्रतिबंधात्मक आरोग्य माहिती देऊन.मा. डॉ. ज्ञानेश्वर चव...
24/07/2021

सत्यवार्ता

चला करूया संरक्षकांच्या आरोग्याचे संरक्षण त्यांना योग्य प्रतिबंधात्मक आरोग्य माहिती देऊन.

मा. डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग मुंबई पोलीस यांच्या नेतृत्त्वाखाली दिनांक २३ जुलै २०२१ रोजी झूम ऑनलाईन च्या माध्यमातून मुंबई पोलीस विभाग आणि सलाम मुंबई फाऊंडेशन यांच्या एकात्मिक संलग्नतेने मध्य प्रादेशिक पोलीस विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस उप-आयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, एकूण २० पोलीस स्टेशन मधिल वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक आरोग्य आणि तंबाखूमुक्त पोलीस स्टेशन वेबिणार सफलतापूर्वक संपन्न झाला. सदर वेबीनारदरम्यान डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण सर यांनी वेबीनारची प्रस्तावना करत आपल्या मध्य विभागातील पोलिसांचे आरोग्य चागले राहण्यासाठी तंबाखू मुक्त पोलिस स्टेशन करण्याचे आव्हाहन केले जेणेकरून आपल्या पोलिसांचे आरोग्य चांगले राहील तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अधिक मदत होईल. कोरोना काळात तंबाखू सेवनाने धूम्रपानामुळे कोरोनाचा धोका अधिक वाढतो, तसेच तंबाखू सेवनामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात इत्यादी बद्दल ची माहिती मा. अर्जुन सिंग, सर्जिकल ओंकॉलॉजिस्ट, टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांच्या मार्फत देण्यात आली. तसेच तंबाखू मुक्त पोलीस स्टेशन आपले कार्यस्थळ इत्यादी बद्दल ची माहिती मा. नारायण लाड, असिस्टंट जनरल मॅनेजर, सलाम मुंबई फाऊंडेशन यांच्या मार्फत देण्यात आली. तसेच सदर सभेदरम्यान एकूण २० पोलीस स्टेशन मधील ४१ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
येणाऱ्या काळात आरोग्य आणि तंबाखू मुक्त पोलीस स्टेशन बाबत जनजागृतीपर ऑनलाईनच्या माध्यमातून मध्य प्रादेशिक पोलीस विभागातील २० पोलीस स्टेशन मधील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येईल. जेणेकरून आपले पोलीस अधिकारी तंबाखू सारख्या व्यसनामुळे होणाऱ्या दुर्धर आजारावर नियंत्रण मिळेल आणि त्यांचे आरोग्य सुदृढ, निरोगी राहिल्यामुळे आपला समाज हा सुदृढ बनेल...

शुभम पेडामकर

सत्यवार्ताआषाढी एकादशी एक सांस्कृतिक परंपरा....पाऊले चालती पंढरीची वाट असं म्हणतं आजच्या  आषाढी एकादशीला संपूर्ण महाराष्...
20/07/2021

सत्यवार्ता

आषाढी एकादशी एक सांस्कृतिक परंपरा....

पाऊले चालती पंढरीची वाट असं म्हणतं आजच्या आषाढी एकादशीला संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी हे पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी जातात.

वारी परंपरा आपल्या महाराष्ट्र अनेक वर्षांपासून चालत आली आहे. महिला डोक्यावर तुळस , पुरुष मंडळी हातात भगवी पताका अर्थात भगवा झेंडा, गळ्यात टाळ घेऊन मृदुगांच्या तालावर भजन, गौळण गात हजारो किलोमीटर ऊन,वारा, पाऊस यांना सामोरे जावून विठ्ठलाच्या चरणी माथा टेकवतात. असं म्हणतात जगण्याचा अर्थ नेमका काय आहे हे शोधायचं असेल तर नक्कीच एकदा तरी पायी वारी करावी. त्याचे कारण म्हणजे वारीत असणारी संघभावना, एक- दुसऱ्या प्रति आदर, माऊली म्हणतं एक- दुसऱ्यांना दिलेला मदतीचा हात आणि भजन- कीर्तनात दंग होऊन विठ्ठलाला भेटण्याची आस.

एक वारी आपल्याला संयम, जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन, माणसांची पारख कशी करावी,भक्तीत कसे रमून जावे, संतांची शिकवण नेमकी काय आहे ह्या सर्व गोष्टी शिकवून जाते.

आजच्या दिवशी पंढरपूर हे रंगीबेरंगी लायटिंग, रांगोळ्या, टाळ- मृदुगांचा आवाज, कीर्तन- भजन- गौळण या दृश्याने बघायला मिळते. प्रसाद म्हणून काही ठिकाणी जोंधळ्याची भाकरी खाण्यासाठी दिली जाते. केवळ जेष्ठ मंडळी नाही तर आपल्या सारखी तरुण मंडळी देखील वारी अनुभवण्यासाठी येतात. वेगवेगळे नृत्य प्रकार, फुगड्या त्याचबरोबर रिंगण ,घोड्याची शर्यत इकडे बघायला मिळते. वारी करून घरी आलेल्या माणसांच्या पाया पडण्याची परंपरा आजही कित्येक घरात पाळली जाते. त्यामुळे आयुष्यात एकदा तरी पायी वारी काय असते हे अनुभवण्यास काही हरकत नाही.

प्रद्युम साळुंखे
साधना विद्यालय
सलाम बॉम्बे फाउंडेशन- मीडिया अकादमी.

सत्यवार्ता वर्डालय मिडीया हाऊसकडून पत्र लिहिण्याची सुवर्ण संधीटेक्नोसॅव्ही युगात समाज माध्यमातून आपण इतरांसोबत अगदी सहज ...
18/07/2021

सत्यवार्ता

वर्डालय मिडीया हाऊसकडून पत्र लिहिण्याची सुवर्ण संधी

टेक्नोसॅव्ही युगात समाज माध्यमातून आपण इतरांसोबत अगदी सहज जोडले जाऊ शकतो पण समजा पत्राच्या माध्यमातून आपण त्या व्यक्तींसोबत व्यक्त झालो तर ? आपल्या भावना पत्रातून व्यक्त केल्या तर ? नक्कीच हा अनुभव उत्तम असेल. हाच अनुभव घेण्याची संधी वर्डालय मिडीया हाऊस तुम्हांला देत आहे. तुम्हाला खालील विषयांवर पत्र लिहिता येतील.

१. पावसाला पत्र
२. महापुरुषाला पत्र
३. नकार दिलेल्या प्रियकर / प्रेयसीला पत्र
४. विठ्ठलाला पत्र
५. वृद्धआश्रमातून आपल्या मुलाला / मुलीला पत्र
६. तुमच्या आवडत्या विषयावर पत्र ( विषयाचे बंधन नाही)

या स्पर्धेत तुम्हाला देखील सहभाग नोंदवायचा असेल तर [email protected] या मेल आय.डी वर किंवा 9321836215 या संपर्क क्रमांकावर तुमचे पत्र व्हाट्सअप्प करू शकता.

शुभम शंकर पेडामकर

सत्यवार्ता*स्वच्छ समुद्र निसर्ग वाचवण्यासाठी!* समुद्र म्हणजे पाण्याचा प्रवाह, जो न थांबता सतत नवीन वाटा शोधत या सजीव सृष...
08/06/2021

सत्यवार्ता

*स्वच्छ समुद्र निसर्ग वाचवण्यासाठी!*

समुद्र म्हणजे पाण्याचा प्रवाह, जो न थांबता सतत नवीन वाटा शोधत या सजीव सृष्टीला विविधतेने रंगवत आहे. विविध झाडांनी, वनस्पती, जीव सृष्टीला समुद्रातच नवं जग तयार झालंय असं मला वाटतं. या मनुष्य प्राणीच्या आयुष्यात समुद्र किनारा म्हणजे अनेक आठवणींची साठवण आहे असं हि म्हणतां येईल. समुद्र सृष्टीला आपण सगळ्यांनी जपावं त्याचं आयुष्य वाढवावं तसेच त्यातील नैसर्गिक सौंदर्य कायम टिकून रहाव यासाठी जागतिक समुद्र दिवस साजरा केला जातो.

अनेक लोक समुद्र किनारा साफसफाई उपक्रम राबवत होते. गेली दोन वर्षे लॉकडाउनमुळे ऑनलाईन स्पर्धा, प्रदर्शन, कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. आपण समुद्र स्वच्छ व निर्मळ असावं यासाठी अनेक उपाययोजना करु शकतो. आपण अनेक वर्षे बघत आलो आहोत कि समुद्रात असंख्य प्रकारचा कचरा आपल्याला पाहायला मिळतात असतं. कागद, प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक बॉटल असे वेगवेगळ्या प्रकारचा कचरा आपण पाहतच आहोत. काही वर्षांनी समुद्रात मासे नसुन कचरा असेल असा दावा देखिल तज्ञांनी व्यक्त केला आहे. यामुळे आपण समुद्रात असो वा नदीमध्ये कचरा टाकणे थांबवलं पाहिजे. जल प्रदुषण होण्यापासून बचाव केला पाहिजे. जल प्रदुषणामुळे फक्त मनुष्य प्राणीला हानी होते असं नाही तर जल जीव सृष्टीला देखिल मोठी हानी होताना दिसते.

भारतात अनेक सण समुद्र नद्याच्या किनार्यावर साजरा केले जातात त्यामुळे देखिल निसर्गाची हानी होताना आपण पाहतच आहोत.‌ या दिवशी आपण संकल्प करुया कि समुद्र व नद्या स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. या निसर्गाला अजून फुलू देऊयात.

चैत्राली निंबाळकर
डोंगरी शाळा
मीडिया अकादमी , सलाम बॉम्बे फाऊंडेशन

सत्यवार्ताडॉ वा  ना बेडेकर स्मृती व्याख्यानमालेचे एकोनतीसावे पुष्प ज्येष्ठ तत्वज्ञ डॉ उमा शंकर यांनी गुंफलेसकारात्मकपणे ...
25/05/2021

सत्यवार्ता

डॉ वा ना बेडेकर स्मृती व्याख्यानमालेचे एकोनतीसावे पुष्प ज्येष्ठ तत्वज्ञ डॉ उमा शंकर यांनी गुंफले

सकारात्मकपणे जगता आले पाहिजे : डॉ उमा शंकर

विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर महाविद्यालयातर्फे आयोजित स्वर्गीय डॉ वा ना बेडेकर स्मृती व्याख्यानमालेचे एकोनतीसावे पुष्प जेष्ठ तत्वज्ञ व एस. आय. ई. एस. सायन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ उमा शंकर यांनी नुकतेच गुंफले. "आध्यात्मिक उन्नतीचे गुपित"या विषयावर दुरदृश्य प्रणाली द्वारे त्यांनी आपले विचार मांडले.

याप्रसंगी प्रारंभीच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ सुचित्रा नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यात्मिकता या शब्दाची व्याख्या करताना आपल्या दैनंदिन जीवनात संतुलित पद्धतीने जगता येणे म्हणजे अध्यात्मिकता असे त्या म्हणाल्या. ठाण्याच्या सांस्कृतिक विश्वात स्वर्गीय डॉ वा. ना. बेडेकर यांनी केलेल्या योगदानाचा त्यांनी समर्पक उल्लेख करत; ही व्याख्यानमाला विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक, पालक व सुजाण ठाणेकरांसाठी महत्त्वाचा ठेवा आहे असे त्या म्हणाल्या.

डॉ उमा शंकर यांनी आपल्या व्याख्यानात व्यक्तीच्या जडण-घडणीत श्रद्धा, भक्ती, सद्गुननिष्ठा या महत्त्वाच्या प्रेरणा आहेत असे नमूद केले. एखादी व्यक्ती सश्रद्ध आहे म्हणजे तिच्यामध्ये निर्भयता, आत्मविश्वास, दृढनिश्चय व एकनिष्ठता हे गुण असतात. रोजच्या जगण्यात अध्यात्मिकता येणे म्हणजे सकारात्मकपणे सर्व गोष्टींकडे पाहणे होय. अंत:करणात शांती, जगाप्रति निष्कलुश प्रेम, साधी राहणी व उच्च विचारसरणी हे गुण आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये अंतर्भूत करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे असे त्या म्हणाल्या.

सनातन धर्माची पताका दिगंतात फडकवणारे आदि शंकराचार्य त्यांचे कार्यही व्यक्तीच्या उत्थानाला मार्गदर्शक ठरणारे असून भगवद्गीतेमध्ये देखील "मा शुच।" अर्थात काळजी न करता आपले कर्म करत राहावे हा सिद्धांत मंडला गेला आहे असे त्या म्हणाल्या.

डॉ उमा शंकर यांनी ज्येष्ठ पाश्चात्य धर्म विचारक'इव्हागरियस पॉंटिकस', दक्षिण भारतातील नयनमार संत'कराईकल आम्मयार' व पश्चात पर्शियन कवी व तत्त्वज्ञ जलालूद्दीन रुमी या तीन वेगवेगळ्या काळात जगलेल्या व लोकोत्तर काम केलेल्या व्यक्तींच्या योगदानावर प्रकाश टाकला. दक्षिण भारतातील नयनमार व अलवार या भक्ती परंपरेचा उल्लेख करत लोकांचे जीवन अध्यात्मिकतेने भारुन सकारात्मक जगण्याचा पायंडा या संत परंपरेने पाडला असे त्या म्हणाल्या. महाराष्ट्रातील ज्ञानेश्वर तुकाराम आदि संत परंपरेचे योगदान देखील याच तोडीचे आहे.

सध्याच्या कोरोना महामारीच्या काळामध्ये सगळीकडे नकारात्मक वातावरण पसरले असून; आशादायी विचार घेण्यासाठी आपल्याला भारताच्या अध्यात्मिक परंपरेकडे वळले पाहिजे असे डॉ उमा शंकर म्हणाल्या. "सृष्टीच्या उत्पत्ती पासून निसर्गनियमानुसार सर्व गोष्टी वेळेवर होत असून माणसाने आपल्या स्वार्थीपणा मुळे निसर्गाचा समतोल नष्ट केला आहे. यातून बाहेर येण्यासाठी अध्यात्मिक जीवनाची कास धरावी लागेल" असे त्या म्हणाल्या.

या व्याख्यानाचा लाभ बहुसंख्य विद्यार्थी प्राध्यापक संशोधक यांनी घेतला. या व्याख्यानाच्या संयोजनाची जबाबदारी उपप्राचार्य डॉ महेश पाटील यांनी सांभाळली; तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा अंजली पुरंदरे यांनी केले.प्रा प्राची नितनवरे यांनी तांत्रिक सहकार्य केले.कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. या व्याख्यानमालेतील सर्व व्याख्याने जिज्ञासूंसाठी युट्युब वर विनामुल्य उपलब्ध करण्यात आले असून याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे महाविद्यालयाच्या प्राचार्या सुचित्रा नाईक यांनी सांगितले.

©शुभम शंकर पेडामकर

सत्यवार्ताकर्तव्य जाणिवतेचे सामाजिक सेवेचे...मुंबई - सध्याच्या परिस्थितीत के. ई. एम. रुग्णालयात रुग्णांची परिस्थिती अतिश...
25/04/2021

सत्यवार्ता

कर्तव्य जाणिवतेचे सामाजिक सेवेचे...

मुंबई - सध्याच्या परिस्थितीत के. ई. एम. रुग्णालयात रुग्णांची परिस्थिती अतिशय बिकट आहे, त्यांच्या नातेवाईकांची परिस्थिती आपल्या रुग्णांच्या चिंतेने अतिशय खालावलेली आहे. त्यांना आपल्या रुग्णांसाठी रक्ताच्या तपासणी, काही टेस्ट करण्यासाठी, औषधांसाठी बाहेर जावे लागते, हे रुग्णांचे नातेवाईक मुंबईतील विविध ठिकाणावरून ये जा करत असतात. यामुळे ते आपल्या दुचाकी रुग्णालयाच्या बाहेरील बाजूस पार्किंग करत असतात. काही दिवसांपासूनच या दुचाकी पार्किंग बाबत वाहतूक विभागाची कारवाई चालू होती. यासंदर्भात आजच्या परिस्थितीचा विचार करून रुग्णांच्या नातेवाईकांची झालेली संभ्रमावस्था लक्षात घेता आपले महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवडी विधानसभा प्रभाग क्रमांक २०३ च्यावतीने भोईवाडा पोलीस वाहतूक विभागास के. इ. एम. रुग्णालयाच्या बाहेरील रुग्णांच्या नातेवाईकांच्या दुचाकीवर कोणत्याही प्रकारची कारवाही करू नये, असे विनंती पत्र मनसे शाखाध्यक्ष निलेश इंदप व पदाधिकारी यांनी दिले. या संदर्भात सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेता भोईवाडा वाहतूक वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्याबद्दल भोईवाडा वाहतूक पोलीस विभाग यांचे शतश: आभार!, अशी माहिती पोलीस आणि जनतेचे व्यासपीठ सत्यवार्ताच्या प्रतिनिधीला शाखाध्यक्ष निलेश इंदप यांनी दिली.

सत्यवार्तामीडिया अकादमीने साजरा केला व्हर्चुअल जागतिक पुस्तक दिनसलाम बॉम्बे फाऊंडेशन हे विद्यार्थ्यांच्या जीवन कौशल्य वि...
24/04/2021

सत्यवार्ता

मीडिया अकादमीने साजरा केला व्हर्चुअल जागतिक पुस्तक दिन

सलाम बॉम्बे फाऊंडेशन हे विद्यार्थ्यांच्या जीवन कौशल्य विकासासाठी व त्यांना तंबाखुसारख्या घातक पदार्थापासून दूर ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करत असते. संस्थेमार्फत चालवल्या जाणाऱ्या मीडिया अकादमीकडून वेगवेगळे उपक्रम राबवले जात असतात.

मीडिया अकॅडेमी तर्फे जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून व्हर्चुअल माध्यमातून "पुस्तक परीक्षण" ही छोटेखानी ऍक्टिव्हिटी साजरी करण्यात आली. त्यात विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता.

विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लागावी , वाचनाचे महत्त्व त्यांना वेळीच लक्षात यावे या हेतूने छोटेखानी उपक्रम साजरा करण्यात आला. त्यात अंधेरी शाळेतील इ.९ वी च्या मिनाक्षी जामसंडेकर या विद्यार्थ्यांनी साने गुरुजी लिखित "श्यामची आई" तर श्रुती गायकवाड हिने विश्वास नांगरे- पाटील यांचे " मन में हैं विश्वास" या पुस्तकाचे परीक्षण केले त्याचबरोबर अनुयोग इंग्लिश व मराठी मीडियम स्कूल चे काजल वैश्य, रितिका यादव, सुजल कदम, उन्नती राठोड, संचिता पाटील या विद्यार्थ्यांनी देखील त्यांना आवडणाऱ्या पुस्तकांचे परीक्षण केले. याचबरोबरीने साधना शाळेतील कीर्ती पटवा , भैरवी गडगे या विद्यार्थिनींच्या देखील उत्कृष्ट सहभाग होता. एकूण ०९ विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पुस्तकांचे परीक्षण केले असून या छोटेखानी कार्यक्रमास व्हर्चुअली ४५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मीडिया प्रतिनिधिनी केले.

©शुभम शंकर पेडामकर

सत्यवार्ता पृथ्वीच्या सुंदरतेसाठीआपल्या सर्वांनाच माहित आहे की पृथ्वी असा एक ग्रह आहे जेथे  सजीव आहेत. येथे पाणी, हवा व‌...
22/04/2021

सत्यवार्ता

पृथ्वीच्या सुंदरतेसाठी

आपल्या सर्वांनाच माहित आहे की पृथ्वी असा एक ग्रह आहे जेथे सजीव आहेत. येथे पाणी, हवा व‌ सजीव विविध घटकांनी सामावुन घेतले आहे. येथील जमिन अशी आहे की नव्याने निर्माण होण्यासाठी फक्त बियांची गरज आहे. आपली स्वृष्टी सुंदर, निर्मळ आहे. समुद्र व बेटांनी जणू पृथ्वीवर रांगोळी काढली आहे. रंगिबेरंगी फुले, पाने, प्राणी, पक्षी आहेत आणि महत्त्वाचं हुशार मनुष्यप्राणी आहे.
पण तुम्हाला वाटतं का? आपली पृथ्वी जशी निर्माण झाली तशीच आहे. नाही तर यामध्ये खुप मोठी तफावत आहे. वातावरण बदल असो वा मानवी जीवन सगळेच काळानुसार बदलत गेले आहेत. सगळ्या क्षेत्रात तंत्रज्ञान वापर वाढत आहे. बेकारी आणि दारिद्रय यांची संख्या वाढत आहे.

वातावरण बदलल्यामुळे सर्वंच स्तरांत प्रदुषण वाढत आहे. वायु प्रदुषण, जल प्रदुषण वाढ होत आहे. यामुळे प्राणी व पक्ष्यांची संख्या कमी होत आहे. जंगल तोडून सिमेंटने नवं शहरं बांधलं जातं आहे. निसर्गाचा रंग फिका पडत आहे. वन्य प्राणी संख्या कमी होत आहेच त्याचबरोबर काही प्राणी, पक्षी नाहिसे झाले आहेत. प्राणी, पक्षी आपल्या पृथ्वीचं सौंदर्य आहे. ती सुंदरता त्यांच्यासोबत निघून गेली आहे.

सध्याची परिस्थिती पाहता तुम्हाला लक्षात येणार कि आपल्या येथे ऑक्सिजन न मिळाल्याने किती तरी लोकांचा जीव जात आहे. टेक्नॉलॉजी वाढते पण जे नैसर्गिक आहे ते निर्माण करणे आपल्या टेक्नॉलॉजीला जमले नाही. त्यामुळे आपण या पृथ्वीची काळजी घेतली पाहिजे. हिच काळाची गरज आहे. पृथ्वीच्या सुंदरतेसाठी आपण सर्वांनी झाड लावली पाहिजे ती जगवली पाहिजे. प्लास्टिक वापर कमी केला पाहिजे. पृथ्वीला सुदृढ करण्याची जबाबदारी आपलीच आहे.

लेखिका:- किर्ती पटवा

सत्यवार्तादेवदूत मयुरला सलाम!स्वत:च्या जिवाची पर्वा न करता अंध महिलेच्या मुलाचे वाचवले प्राण रायगड : देव तारी त्याला कोण...
20/04/2021

सत्यवार्ता

देवदूत मयुरला सलाम!
स्वत:च्या जिवाची पर्वा न करता अंध महिलेच्या मुलाचे वाचवले प्राण

रायगड : देव तारी त्याला कोण मारी! ही म्हण एका अंध महिलेच्या मुलाबाबतीत खरी ठरली आहे. रेल्वे रुळावर अडकलेल्या मुलाला वाचवण्यासाठी देवदुतासमान 'मयूर शेळके' धावून आला. आपल्या जीवाची पर्वा न करता त्याने चिमुकल्याचे प्राण वाचवले
17 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास एक अंध महिला मुलाला घेवून प्लॅटफॉर्मवरुन जात होती. तेवढ्यात तो मुलगा आईच्या हातातून सुटून ट्रॅकवर पडला. त्या महिलेला याबाबत काहीच समजले नाही. ट्रॅकवर पडलेला मुलगा पुन्हा प्लॅटफॉमवर चढण्यासाठी प्रयत्न करू लागला. तितक्यात ट्रेनचा आवाज आला. अंध आई जीवाच्या आकांताने मुलाला वाचविण्यासाठी धडपड करू लागली. मात्र ती हतबल झाली. चाचपड राहिली पण काहीच करता येत नव्हतं. हे सर्व दृष्य पाहताच क्षणी जिवाची परवा न करता वागंणी स्टेशनवरील पॉईंटमन मयुर शेळके हा धावून आला. त्याने प्रसंगावधान राखत त्याने थेट ट्रॅकवर उडी मारली आणि मेल जवळ येण्यापूर्वी मुलाला प्लॅटफॉमवर सोडले व स्वत: त्वरित प्लॅटफॉमवर चढला. हे सर्व दृष्ट एका क्षणात घडलं. एका सेकंदाचा विलंब झाला असता दुर्दैवी प्रसंग घडला असता. मयुर याचे धाडसी कर्तव्य तिथल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
दरम्यान, या घटनेच्या प्रसंगाचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले. खुद्द केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी मयूर शेळके याच्या धाडसी बचावकार्याचे ट्विटरद्वारे कौतुक केले. मूळचा कर्जतचा असलेल्या मयूरवर स्थानिकांसह रेल्वे अधिकारी, सामाजिक संघटनांनी कौतुक करून सन्मान केला.
मयूर शेळकेच्या जिगरबाजी कृत्याला "पोलीस आणि जनतेचे व्यासपीठ सत्यवार्ता"चा सलाम!

सत्यवार्ता न्यूज श्री नारायण गुरू महाविद्यालयाचा अनोखा उपक्रमव्हर्चुअल मीडिया न्यूज रूमचे आयोजनएबीपी माझाचे वृत्तनिवेदक ...
11/04/2021

सत्यवार्ता न्यूज

श्री नारायण गुरू महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम
व्हर्चुअल मीडिया न्यूज रूमचे आयोजन
एबीपी माझाचे वृत्तनिवेदक सौरभ कोरटकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

- शुभम शंकर पेडामकर-
मुंबई : विद्याच्या व्यक्तिमत्व विकासासाठी श्री. नारायण गुरू महाविद्यालय हे कायम प्रत्नशील असते. कोरोना संकट काळात मिळालेल्या वेळेचे योग्य नियोन करून सदर महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी व्हर्चुअल क्लास रूमच्या माध्यमातन विविध उपक्रम राबवले. यापैकी सर्वात महत्त्वाचा व उल्लेखनीय विषय ठरला 'न्यूज रूम' वर्कशॉप! या वर्कशॉपद्वारे सुप्रसिद्ध मराठी वृत्तवाहिनी एपीबी माझाचे वृतनिवेदक सौरभ कोरटकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
०९ एप्रिल २०२१ रोजी झूम प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मल्टी मीडिया अँड कम्युनिकेशन विभागाने न्यूज रूम कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेला विविध महाविद्यालयातील १८८ विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वृत्तनिवेदक सौरभ कोरटकर यांनी न्यूज रूमबद्दल माहिती दिली. न्यूज रूम म्हणजे काय ? त्यात विविध विभाग कोणते व ते कशाप्रकारे संपादकीय विभागातील पत्रकारांची टीम काम करते, न्यूज अँकरला बातमी सादर करताना कोणती साधन हाताळावी लागतात यांसह अन्य माहिती देऊन विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले.
मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर अगदी सोप्या शब्दात सौरभ यांनी दिले. पीपीटी साईल्डचा आधार घेत त्यांनी सर्व संकल्पना अगदी सोप्या शब्दात विद्यार्थ्यांना सांगितल्या. या अनोख्या कार्यशाळेमुळे मल्टी मीडिया अँड कम्युनिकेशन विभागाचे सध्या सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. वर्कशॉपचे सूत्रसंचालन क्षमता चव्हाण तर आभार प्रदर्शन पराग गोगटे यांनी केले.

श्रीवर्धनच्या खाडीत तरुण बुडाला भेंडी बंदर जेट्टी वरील दुर्दैवी घटना श्रीवर्धन (मकसूद नजिरी) - श्रीवर्धन शहरातील भेंडी ब...
20/03/2021

श्रीवर्धनच्या खाडीत तरुण बुडाला
भेंडी बंदर जेट्टी वरील दुर्दैवी घटना

श्रीवर्धन (मकसूद नजिरी) - श्रीवर्धन शहरातील भेंडी बंदर जेट्टीवर खाडीत पोहण्यासाठी गेलेल्या २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नदीम दिवेकर वय वर्षे २१ हा त्याचा भाऊ व मित्र यांच्यासोबत शुक्रवारी खाडीत पोहण्यासाठी गेला. सदर प्रसंगी पाण्याचा तात्काळ अंदाज न आल्याने कारणे नदीम खोल पाण्यात गेला. त्याच्या इतर सहकाऱ्यांनी त्याला वाचवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले . त्यानंतर त्याच्या सहकार्यांनी पाण्याच्या बाहेर येऊन स्थानिक प्रशासनास सदरची वृत्त कळवले. श्रीवर्धन तहसील, पोलीस ठाणे, व स्थानिक मच्छिमार बांधवांनी नदीम ला वाचवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले मात्र नदीम कुठेही निदर्शनास आला नाही. काल शुक्रवार पासून प्रशासकीय यंत्रणेने विविध साधनांच्या मदतीने शोधमोहीम सुरू ठेवली.
शनिवारी सकाळी नदीम चा मृतदेह शोध पथकांच्या हाती लागला. श्रीवर्धन तहसीलदार सचिन गोसावी, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश रसेडे, मंडळ अधिकारी कल्याण देऊळगावकर यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नदीम ला वाचवण्यासाठी सर्वकष प्रयत्न केले. सदरची शोधमोहीम शुक्रवारी रात्रभर चालू होती. आकस्मित मृत्यूची नोंद श्रीवर्धन पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास ठाणे अंमलदार सुरेश माने करत आहेत.

17/03/2021

स्वरूप फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम
महिलांसाठी खास रोजगार मेळाव्याचे आयोजन

पुणे (शुभम पेडामकर) - महिलांनी पुढे यावे, असं नेहमी म्हटलं जातं पण पुढे येण्यासाठी त्यांना साथ हवी असते भक्कम पाठिंब्याची! "चुलं आणि मुलं" हे सूत्र कधीच महिलांच्या वाटेपासून सुटणार नाही. त्यामुळेच घरात राहून स्त्रियांनी त्यांचा वेळ उगाचच वाया न घालवता उद्योग क्षेत्रात येऊन घरबसल्या रोजगार करावा या हेतूने पुण्यातील पिंपरी- चिंचवड येथील स्वरूप फाउंडेशन महिला उद्योग समूह अंतर्गत पिंपरी- चिंचवड मधील बचत गटातील महिलांना रोजगार प्राप्ती ची सुवर्ण संधी लवकरच निर्माण करून देण्यात येणार आहे.
१८ मार्च, २०२१ रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता स्वरुप फाउंडेशन महिला उद्योगसमूह अंतर्गत महिला रोजगार मेळावा साधुराम गार्डन गंधर्व नगरी सेक्टर नं. ५, मोशी पुणे नाशिक हायवे पिंपरी चिंचवड महाराष्ट्र ४१२१०५ येथे आयोजित केला जात आहे तरी देखील सर्व महिलांनी ह्या मेळाव्यास उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन स्वरूप फाउंडेशनचे प्रमुख प्रशांत सस्ते यांनी केले आहे. या मेळाव्यासाठी येताना प्रत्येक महिलांनी सोबत आधार कार्ड आणि स्वतःचा एक पासपोर्ट साईझ फोटो आणावा, अशी विनंती देखील स्वरूप फाउंडेशनकडून करण्यात आली आहे.

सन्मान कर्तव्याचा !
16/03/2021

सन्मान कर्तव्याचा !

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Police aani janteche vyaspith Satayvarta posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Police aani janteche vyaspith Satayvarta:

Videos

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share