The Miraj Digest

The Miraj Digest Miraj division news by New Deccan Media Solutions Group

13/09/2021

*कोयना धरण*

आज दि. 13 सप्टेंबर 2021 रोजी संध्याकाळी 6 वाजता धरणाची पाणी पातळी 2163 फूट 3 इंच झाली असून धरणामध्ये 104.92 TMC पाणीसाठा झाला आहे.

पाणलोट क्षेत्रामधील पर्जन्यमानामुळे धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असलेने धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी *आज दि. 13 सप्टेंबर 2021 रोजी संध्याकाळी 7 वाजता धरणाची वक्रद्वारे एकूण 5 फुट 3 इंच उचलून सांडवा व पायथा विद्युत गृहाद्वारे एकूण 50000 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडणेत येणार आहे. तसेच, धरणामधील आवक वाढल्यास सदर विसर्गामध्ये वाढ होणार* असल्याने कोयना नदीपात्रा जवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

07/09/2021

कोयना धरण पाऊस
कोयना -६७(३७१४)
नवजा१४०(४९९४)
महाबळेश्वर-११(४९७९)
पाणी पातळी -२१५५'.०८"
पाणी साठा -९५.१५ टी एम सी
कोयना धरण ९०.४०% भरले.
पावसाचा जोर वाढला असला तरी पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाही.अफवांवर विश्वास ठेवू नका. प्रशासन सतर्क आहे.

04/09/2021

ओ सर...
नाही पडणार तुमचा विसर...

'ओ शेठ..' च्या धर्तीवर या चिमुकल्याने गायलेले हे गाणे😎 प्रचंड वायरल होत आहे

02/09/2021

काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार काँग्रेस नेते आणि कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात राज्यपालांना 12 आमदारांच्या नियुक्ती साठी भेटले लवकरच हा तिढा सुटेल - संजय राऊत

अगदी कमी वयातच प्रसिद्धीच्या शिखरावर असणारा अभिनेता सिद्धार्थ शुक्ला काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्याचे चाहते, सहकलाकार,...
02/09/2021

अगदी कमी वयातच प्रसिद्धीच्या शिखरावर असणारा अभिनेता सिद्धार्थ शुक्ला काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्याचे चाहते, सहकलाकार, मनोरंजन विश्व एवढंच काय तर माध्यमांसाठी देखील ही बातमी अत्यंत धक्कादायक आहे.

01/09/2021

विविध सणांच्या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधासाठी केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे- आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

आज 1 सप्टेंबर रोजी LPG Gas Cylinder च्या दरात 25 रुपयांची वाढ झाली आहे. 15 दिवसांत विना सब्सिडी एलपीजी सिलेंडर 50 रुपयां...
01/09/2021

आज 1 सप्टेंबर रोजी LPG Gas Cylinder च्या दरात 25 रुपयांची वाढ झाली आहे. 15 दिवसांत विना सब्सिडी एलपीजी सिलेंडर 50 रुपयांनी महागला आहे.

केदार शिंदेंच्या या मताशी आपण सहमत आहात का
31/08/2021

केदार शिंदेंच्या या मताशी आपण सहमत आहात का

27/08/2021

“What do you mean by saying Maharashtra is like Bengal?It is the same Bengal that showed you (BJP) what a big defeat is. Bengal is a land of thinkers & fighters. So is Maharashtra. Like Bengal fought back,so will we. Bengal is the 'Tiger of India'.

महाराष्ट्र केसरी,राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते आप्पालाल शेख यांचे अल्पशा आजाराने निधनएकाच परिवारात तीन - तीन महाराष्ट्र के...
26/08/2021

महाराष्ट्र केसरी,राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते आप्पालाल शेख यांचे अल्पशा आजाराने निधन
एकाच परिवारात तीन - तीन महाराष्ट्र केसरी गदा पाटकाविणारे राज्यातील पहिलेच कुटुंब.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो .

भावपुर्ण श्रद्धांजली💐💐

24/08/2021

सांगलीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री यांचा बद्दल केलेल्या वक्तव्य विरोधात शिवसैनिकांनी आंदोलन केले

Happy Independence Day to all from DeccanDigest  🇮🇳🇮🇳
15/08/2021

Happy Independence Day to all from DeccanDigest 🇮🇳🇮🇳

आयुर्वेद आणि योग शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचे व्रत घेतलेल्या श्रीगुरू डॉ बालाजी तांबे (वय 81) यांची प्राणज्यो...
10/08/2021

आयुर्वेद आणि योग शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचे व्रत घेतलेल्या श्रीगुरू डॉ बालाजी तांबे (वय 81) यांची प्राणज्योत मंगळवारी मालवली. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी वीणा, मुलगा सुनिल आणि संजय आणि स्नूषा व नातवंडे असा परिवार आहे. डॉ तांबे यांची गेल्या आठवड्यात प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.

07/08/2021

Heartiest Congratulations to Neeraj Chopra for winning a Gold Medal in Javelin throw at the . The first Indian to win an Olympic Gold Medal in Athletics. Every Indian is proud of your astounding victory !

🇮🇳🇮🇳🇮🇳🥇🥇🥇

दरडग्रस्त तळीये गावाचे"तळीये खालची वाडी" जवळ तात्पुरते स्थलांतरण करण्यात येत आहे. प्रत्येक कुटुंबासाठी एक याप्रमाणे एकूण...
06/08/2021

दरडग्रस्त तळीये गावाचे"तळीये खालची वाडी" जवळ तात्पुरते स्थलांतरण करण्यात येत आहे.
प्रत्येक कुटुंबासाठी एक याप्रमाणे एकूण 24 कंटेनर हाऊसची व्यवस्था करण्यात आली आहे.
एका कंटेनर हाऊस चे आकारमान 20×10×10 फूट असे आहे अशी माहिती राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली .

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून, अकोला येथे ३०० श्रवणयंत्राचे मोफत वितरणास प्रारंभ, आयुष्यात पहिल्यांदा आवाज ऐ...
05/08/2021

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून, अकोला येथे ३०० श्रवणयंत्राचे मोफत वितरणास प्रारंभ, आयुष्यात पहिल्यांदा आवाज ऐकल्यावर उमटलेली चिमुकल्याची बोलकी प्रतिक्रिया..

Bacchu Kadu

04/08/2021

पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा होणार नाही: उदय सामंत यांची घोषणा

पुणे : बारावीच्या निकालांच्या आधारावरच विद्यार्थ्यांचे पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश होणार आहेत.बारावी परीक्षेचा निकाल ९९ टक्के लागला असल्याने एवढ्या विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश कसे मिळणार ? अशी चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर प्रवेशासाठी CET परीक्षा घेतली जाण्याची चर्चा सुरू होती. मात्र, अशी कोणतीही सामाईक प्रवेश परीक्षा घेतली जाणार नसून, बारावीच्या निकालांच्या आधारावरच पदवी परीक्षेचे प्रवेश होणार असल्याचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले आहे.

सांगलीसह इतर 11 जिल्ह्यात निर्बंध कायम
03/08/2021

सांगलीसह इतर 11 जिल्ह्यात निर्बंध कायम

02/08/2021

सांगलीत शहरात राजकीय पक्षांनी केलेला गोंधळ मुळे मुख्यमंत्री महोदयांनी सर्व सामान्य पूरग्रस्तांच्या भावना न ऐकता निघून गेले . सकाळी 11 पासून पूरग्रस्त मुख्यमंत्री ची वेळ पाहत होते . शेवटी पूरग्रस्तांनी भावना अनावर न झाल्याने त्यांनी जाहीर निषेध नोंदवला
CMOMaharashtra Vishwajeet Kadam

29/07/2021

४० ते ४२ पाणी पातळीने बाधित होणाऱ्या नागरिकांनी अजून आपल्या घरी परतू नये - आयुक्त नितीन कापडणीस.

हवामान खात्याने या आठवड्यात कोयना धरण क्षेत्र व परिसरात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवल्याने या आठवड्यात कृष्णा नदीची पाणी पातळी पुन्हा ४० ते ४२ फुटांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे या भागातून स्थलांतरीत झालेल्या नागरिकांनी प्रशासनामार्फत सूचना दिल्याशिवाय पुन्हा घरी परतू नये. तसेच या पाणी पातळीने बाधित होणाऱ्या व्यापारी/वाणिज्य आस्थापनांनीही माल/मौल्यवान वस्तू/अत्यावश्यक वस्तू पुन्हा दुकानात आणण्याची घाई करू नये.

पाण्याची पातळी हळू हळू कमी होत आहेसध्या 45 .01 ft आहे .धीम्या गतीने पाणी नदी पात्रात परत जात आहे त्यामुळे सांगलीकरांची स...
28/07/2021

पाण्याची पातळी हळू हळू कमी होत आहे
सध्या 45 .01 ft आहे .
धीम्या गतीने पाणी नदी पात्रात परत जात आहे
त्यामुळे सांगलीकरांची सध्या तरीमहापुरापासून सुटका झाली आहे

सांगली शहर व उपनगरातील पाणी पुरवठा मागील 2-3 दिवसापासून बंद होता .विविध सामाजिक संघटना यांनीही याबाबत आवज उठवला होता . अ...
27/07/2021

सांगली शहर व उपनगरातील पाणी पुरवठा मागील 2-3 दिवसापासून बंद होता .विविध सामाजिक संघटना यांनीही याबाबत आवज उठवला होता . अखेर काल सायंकाळी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभाग चे टीम ने पुराच्या पाण्यात जाऊन अत्यंत धाडसाने सुरू केला त्यांचा अभिनंदन

Team of Military Has reached Sangli They have started rescue operations and started the medical health camp Hon Collecto...
25/07/2021

Team of Military Has reached Sangli
They have started rescue operations and started the medical health camp
Hon Collector Shri Abhijeet Chaudhari Sir visited the camp

25/07/2021

कोल्हापूरप्रमाणेच सांगली जिल्ह्यात देखील पुराची भीषण परिस्थिती पाहायला मिळत आहे. कारण कृष्णा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी 54.6 फुटावर पोहचली आहे.
आतापर्यंत सांगली शहरातील 40 हून अधिक ठिकाणामध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. दरम्यान, वाढत्या पाणी पातळीमुळे सांगली शहर आता रेड झोनमध्ये दाखल झालं आहे.
एखाद्या भागात 40 फुटापर्यंत पाणी असल्यास तिथे येलो (Yellow)अलर्ट जारी केला जातो. जर पाण्याची पातळी 50 फुटापर्यंत पोहचली तर तिथे ऑरेंज (Orange) अलर्ट दिला जातो आणि पुराच्या पाण्याची पातळी ही 50 फुटांहून अधिक असेल तर तिथे रेड (Red) अलर्ट जारी केला जातो. त्यामुळेच आता सांगलीमध्ये सध्या रेड अलर्ट जारी केला गेला आहे.

25/07/2021

Problem faced by people due to flood

... सांगलीत रात्री तीन नंतर 2005 चा महापुराचा विक्रम मोडीत. 7:30 वाजता सांगलीत पाणी पातळी 55 फूट. पहाटे साडेपाच ताकारी अ...
25/07/2021

... सांगलीत रात्री तीन नंतर 2005 चा महापुराचा विक्रम मोडीत. 7:30 वाजता सांगलीत पाणी पातळी 55 फूट.

पहाटे साडेपाच ताकारी अर्धा फूट, नागठाणे दीड ते दोन फूट पाणी उतरले... औदुंबर तीन इंच भिलवडी 1 इंच पाणी उतरले.* नागरिकांनी घाबरू नये... कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये... जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे...

" पूरग्रस्त व दरडग्रस्त जिल्ह्यात मोफत अन्न व धान्य पुरवणार :-  अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ "महाराष्ट्र सध्या अ...
24/07/2021

" पूरग्रस्त व दरडग्रस्त जिल्ह्यात मोफत अन्न व धान्य पुरवणार :- अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ "

महाराष्ट्र सध्या अस्मानी संकटाचा सामना करतो आहे. पावसाने माजवलेला कहर आणि त्यानंतर नद्यांना आलेला पूर अशा दुहेरी समस्यांना राज्य सामोरं जातं आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. रायगडमधल्या महाडमध्ये असलेल्या तळये गावातली दरड कोसळण्याची घटना तर माळीण गावाची आठवण करून देणारी ठरली आहे.
32 घरं दरडीखाली जाऊन 36 जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर लोक बेपत्ता आहे. साताऱ्यातही 9 जणांचा मृत्यू झाला आहे. अशा सगळ्या भीषण परिस्थितीत पूरग्रस्त आणि दरडग्रस्तांना अन्नधान्य आणि केरोसीनचं मोफत वाटप केलं जाणार आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली. नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महाराष्ट्रातल्या सहा जिल्ह्यांमध्ये पूर आणि पावसाचा कहर आहे. त्यामुळे सहा या जिल्ह्यांमध्ये प्रति कुटुंब 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ आणि पाच लिटर केरोसीनचा मोफत पुरवठा केला जाणार आहे. राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या पूरग्रस्त आणि दरडग्रस्तांना अन्नधान्य वाटप करण्याबाबतच्या 8 मार्च 2019 च्या शासन निर्णयानुसार ही मदत दिली जाणार आहे असंही मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे गहू नको असेल त्यांना गव्हाऐवजी तांदूळ दिले जातील. प्रत्येक कुटुंबाला 5 किलो डाळ देण्याबाबत सुद्धा निर्णय घेण्यात आला आहे.
पूर परिस्थीतीमुळे अनेक जिल्ह्यांत वीज नाही अशा ठिकाणी मोफत केरोसीनचे वाटप करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी शिवभोजन केंद्र वाहून गेले आहे किंवा पाण्यात आहे तेथे इतर ठिकाणावरून शिवभोजनाचे पाकिटे वितरित करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. पाकिटांच्या वितरणासाठी त्याचप्रमाणे लाईट नसलेल्या ठिकाणी किंवा शिवभोजन App ची कनेक्टिव्हिटी नसलेल्या ठिकाणी थाळीच्या नोंदणीसाठी स्थानिक पातळीवर तहसीलदारांनी त्यांच्या यंत्रणेचा वापर करावा अशा सूचना देण्यात आल्या असल्याचंही मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी पावसाचा कहर पाहण्यास मिळाला आहे. राज्यावर आलेल्या नैसर्गिक संकटाशी सरकार सामना करतं आहे. तसंच जनतेच्या पाठिशीही उभं आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये शिवभोजन थाळ्यांचं वाटप हे दुप्पट करण्यात आलं आहे असंही भुजबळ यांनी सांगितलं.
महाराष्ट्रातल्या चार ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये आत्तापर्यंत 47 जणांचा मृत्यू झाला आहे तर याच चार ठिकाणांमधले 64 लोक बेपत्ता आहेत. NDRF चे डीजी सत्यनारायण प्रधान यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
NDRF ने दिलेली माहिती
पोसरे खेड, या ठिकाणी दरड कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला आहे तर 12 जण बेपत्ता आहेत.
तळये, रायगड, या ठिकाणी 36 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 34 जण बेपत्ता आहेत
मिरगाव, सातारा या ठिकाणी 10 जण बेपत्ता आहेत
अंबेनगर, सातारा या ठिकाणी 6 जणांचा मृत्यू झाला आहे तर 8 जण बेपत्ता आहे
महाराष्ट्रातल्या चार विविध ठिकाणी घडलेल्या या घटनांमध्ये एकूण 47 मृत्यू झाले आहेत. तर याच चार ठिकाणचे 64 नागरिक बेपत्ता आहेत. आता सगळ्याच आपत्तीग्रस्तांना मोफत धान्य दिलं जाणार आहे अस मंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिक मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.

24/07/2021

सांगलीत कृष्णा नदीने 50 फुटाची आपली पातळी मागे टाकत झेप घेतली.शहरात पत्रकार नगर ,सिटी हायस्कूल रोड सह काही भागात पाणी भरले.
अफवा उठू लागल्या या पाश्वमूमीवर कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी घाबरु नका,अफवांवर विश्वास नको पावूस मंदावला आहे. विसर्ग नियंत्रित करुन पाणी पातळी 52 फूटापेक्षा जास्त जाणार नाहीत असे प्रयत्न करत आहोत असे म्हटले आहे.51/52 फूट पातळी स्थीर होऊन उतरु लागेल असेही देवकर यांनी म्हटले आहे.सांगलीत एक वाजता 50.8 पातळी होती.

24/07/2021

Tilak chowk Sangli

Address

Miraj

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Miraj Digest posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to The Miraj Digest:

Videos

Share


Other Media/News Companies in Miraj

Show All