17/12/2022
मनमाड 😦 योगेश म्हस्के )मनमाड शहराचे भूमिपुत्र आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथ शिंदे यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी प्रा.श्री नितीन लालसरे यांना आदिवासी विचार मंच संस्थेच्या वतीने यंदाच्या वर्षीचा समाज भुषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आदिवासी विचार मंच , अहमदनगर , महाराष्ट्र राज्य संस्थेच्या वतीने दरवर्षी समाजातील गरजवंतांच्या मदतीसाठी धावणाऱ्या आणि समाजसेवा करणाऱ्या समाजसेवक आणि अशा मान्यवर व्यक्तींचा संस्थेच्या वतीने समाजभुषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात येत असतो , यंदाच्या वर्षी प्रशासकीय सेवेत राहुन समाजातील प्रत्येक नागरिकांना नेहेमी मदत करत असणारे आणि आपल्या कामातून मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास संपादन करून त्यांचे विश्वासु अधिकारी म्हणुन प्रशासनात परिचित असणारे प्रा.श्री नितिन लालसरे यांना समाजभुषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले , संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री सुधीर दरेकर , उपाध्यक्ष दिलीप सोनवणे , राहुल शिंदे ,भाऊसाहेब कुदळ , प्रमोद सोनवणे आदी पदाधिकारी यांच्या हस्ते प्रा.श्री नितीन लालसरे यांचा समाजभूषण पुरस्काराचे सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. समाजभुषण पुरस्कार मिळाल्या बद्दल प्रा.श्री नितिन लालसरे यांचे समाजातील सर्व स्थरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.