Mymarathi

Mymarathi for a purpose to express view upon current situation

रोजगाराची सर्वोत्तम संधीNXT Digital cable & internet services,Mancharमंचर शहरात अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या इंटरनेट आणि ...
12/02/2023

रोजगाराची सर्वोत्तम संधी
NXT Digital cable & internet services,Manchar
मंचर शहरात अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या इंटरनेट आणि केबलच्या सेवेकरीता मंचर शहर आणि परिसरात काम करण्याकरिता कामगार हवे आहेत
* उत्तम पगार दिला जाईल
*शैक्षणिक कोणतीही अट नाही...
त्वरित संपर्क साधा
मोबाईल क्रमांक 78 75 345 390

01/07/2020
17/06/2020

सारख सारख सुशांतसिंहच्या संदर्भातल्या बातम्या पाहून आपल्याही मनावर परिणाम होतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली हो... एवढ्या कमी वयात एवढ्या उंचीवर पोहचलेल्या माणसाने अस टोकाचं पाऊल कस उचललं असेल.आपलं जीवन आपल्या हाताने संपवायला किती मोठी मनाची तयारी करावी लागत असेल... प्रचंड नैराश्य आले की अस होत म्हणे...खरं तर आज प्रचंड नैराश्याने ग्रासलेल्या या परिस्थितीत स्वतःला स्वतःच्या मनःस्थितीला सांभाळणे फार अवघड गोष्ट बनली आहे.इथे जगण्यापेक्षा मरण स्वस्त झालं आहे....जगण्याच्या लढाईत बहुतांश माणस ही हरून बसली आहेत....आणि आता सोशल साईटवर तर उपदेशांचा पाऊसच पडायला लागला आहे.कुठेतरी वाचलं होतं की न मागताही मिळणारी गोष्ट म्हणजे सल्ला... अहो सल्ले देणारे खूप मिळतात हो...पण जे अशा मनोअवस्थेतून जाताहेत त्यांना खऱ्या अर्थाने जगण्याची नवी दिशा देणारे किती मिळतील.याउलट दुसऱ्याच्या मरणावर टपलेले कावळेच इथे बहुसंख्येने मिळतील.आपण समाजात वावरत असताना आपल्यामुळे कुणाचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेणारे किती भेटतील...सुशांतसिंह हा बॉलिवूड इंडस्ट्री मधल्या त्याच्या नाकाबंदीमुळे ह्या स्थितीला पोहचला अस सांगितलं जातंय...जर असे झाले असेल तर ही मानसिकता कुठून येते? बरं हे केवळ सुशांतसिंहच्या बाबतीतच अस घडलं आहे का? आज ही प्रवृत्ती प्रत्येक क्षेत्रात दिसून येते...देशाच्या कानाकोपऱ्यात अनेक सुशांतसिंह पहायला मिळतील. मुळातच आपल्या समाजात एकमेकांच्या जगण्याच्या अधिकाराकडे किती आत्मीयतेने पाहीले जाते याचा जर बारीक अभ्यास केला तर तुम्हाला समजू शकेल की आपल्या समाजात मानवता नावाची गोष्टच उरली नाहीये...याउलट इथे जंगलराज आहे..दुसऱ्या शब्दात सांगायच झाल तर बळी तो कान पिळी ही म्हण सार्थ ठरते आहे.जो बलवान आहे तो कमजोर व्यक्तीला मारून स्वतःचे साम्राज्य निर्माण करतो आहे.आपल्या देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केल्यांनंतर जी घटना लिहिली गेली...डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कमकुवत घटकाला किंवा सामान्य व्यक्तीला डोळ्यासमोर ठेऊन जे काही देशाचं स्वप्न पाहिलं ते आज कुठेही प्रत्यक्षात येताना दिसत नाही.कायदा आणि सुव्यवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधली गेली आहे.परिणामी इथे इंग्रज गेले आणि देशी इंग्रज देशावर राज्य करायला लागले. आज सुशांतसिंहच्या जाण्याने बॉलिवूड मधल्या या परिस्थितीवर भाष्य केल जात आहे..पण ज्या आजवर हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.. अथवा या यंत्रणेचे बळी ठरून ज्यांनी आत्महत्या केल्या त्यांचे काय? आत्महत्या...म्हणजे आपल्या समाजासाठी कलंक आहे...कदाचित पूर्वी म्हणजे वतनादारीच्या काळातही सामान्य माणसाचे जगणे कठीण बनले म्हणून जिजामतेने आपल्या शिवबाला म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांना हाती तलवार घ्यायला सांगितली आणि त्यांनी रयतेचे राज्य निर्माण केले.आता तीही परिस्थिती नाही...त्यामुळे अशा होणाऱ्या आत्महत्या या केवळ त्या व्यक्तीची आत्महत्या नसून संपूर्ण समाजाला हा विचार करायला लावणारी घटना आहे की आपण माणूस म्हणून कधी विचार करणार आहोत.प्रत्येक व्यक्तीने दुसऱ्याच्या जगण्याचा अधिकार मान्य केला...जर आज या समाजातली जीवघेणी स्पर्धा संपली तर आणि तरच येत्या काळात आपल्याला अशा आत्महत्या कमी झालेल्या दिसतील अन्यथा हे भविष्यात भयावह चित्र निर्माण करील हे मात्र निश्चित....

सह्याद्रीच्या कडेपाऱ्याला अभिमान वाटतो तो स्वराज्यातील या अनमोल अशा किल्ल्यांचा... आणि आपल्याला संघर्षाच बळ देतात ते हे ...
07/06/2020

सह्याद्रीच्या कडेपाऱ्याला अभिमान वाटतो तो स्वराज्यातील या अनमोल अशा किल्ल्यांचा... आणि आपल्याला संघर्षाच बळ देतात ते हे किल्लेचं... मुजरा करूयात या भगव्याला...

03/06/2020

गाढवही गेलं आणि ब्रम्हचर्यही....
मागील काही दिवसांपासून जुन्नर तालुका एका वेगळ्याच विषयाने चर्चेत आला.आता विषय काय होता...काय घडले हे सर्वश्रुत झाले आहे.यातून अनेकांनी अनेक प्रकारचे धडे घेतले असतील कारण सुज्ञास सांगणे न लगे...याची चर्चा अवघ्या महाराष्ट्रात झाली ती सोशल मीडियामुळे...यादरम्यान अनेकांनी आपली मते प्रकट करण्याची घाई केली.आता ते चूक की बरोबर हे ज्याचे त्याने ठरवावे...यातले सत्य बाहेर न येताच शील अबाधित रहावे यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करून अखेर हा वाद तिथेच मिटवला गेला म्हणा किंवा मिटविण्यात ते यशस्वी झाले म्हणा...आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊयात.सध्या सोशल मीडियामुळे कोणतीही माहिती ही सहजरित्या आपल्याला मिळते.परिणामी आज आबालवृद्ध या माध्यमाद्वारे जगाची माहिती करून घेण्याचा प्रयत्न करतो आहे.पण यात धोका असा आहे की इथे उपलब्ध होणारी माहिती ही योग्य की अयोग्य हे ठरविण्यासाठी आजही वृत्तपत्रे अथवा टी व्ही चॅनलच प्रमाण मानले जाते.यापूर्वी एखाद्या घटनेला वाचा फोडण्यासाठी ह्या माध्यमांचाच उपयोग केला जात होता.मात्र आता सोशल साईटद्वारे वारेमाप माहिती आपल्या मोबाईल स्क्रीनवर धडकू लागली आहे.दुर्दैवाने या माहितीची सत्यता पडताळणीचा कोणताही फिल्टर नाही...याचा फिल्टर एकच तो म्हणजे स्वतःची सद्सद्विवेक बुद्धी..आणि याचा वापर खूप कमी लोक करताना दिसतात.अनेकदा या सोशल साईटचा गैरवापर केला जात असल्याची अनेक प्रकरणे समोर येताना दिसत आहे.ज्याचा सामाजिक आणि कधी कधी वैयक्तिक देखील विपरीत परिणाम दिसून येतो.या सोशल ट्रायलमुळे काहींचे आयुष्य उध्वस्त झाले आहे.त्यामुळे आपण या सोशल साईटवरील माहितीवर चटकन विश्वास ठेवणे घातक ठरेल.कोणत्याही माहितीची सखोल तपासणी केल्याशिवाय त्यावर आपली प्रतिक्रिया देणं आत्मघातकी ठरेल. सोशल मीडिया जसा उपयोगी आहे तसे त्याचे दुष्परिणाम देखील आपण ओळखायला हवेत.कोणत्याही माहितीची खातरजमा करूनच ती पुढे पाठवायला हवी.सध्या सुरू असलेल्या महामारीच्या परिस्थितीत तर याचे अनेक परिणाम आपल्याला दिसून आले.शासनाला वेळोवेळी याविषयी सूचना द्याव्या लागल्या यावरूनच सोशल साईटचा सामाजिक जीवनावर होणारा परिणाम लक्षात येतो..आपल्यापैकी अनेकांनी शालेय जीवनात शाप की वरदान असा संदर्भ असलेला निबंध लिहला असेल त्यात आपण एखाद्या गोष्टीचा फायदा आणि तोटा या दोन्ही बाजू मांडत असू...त्याप्रमाणेच आपण या सोशल साईटचा योग्य वापर केला तर याचे फायदे मिळतील आणि जर याचा अयोग्य वापर झाला तर त्याचे नक्कीच तोटे होणार आहेत...त्यामुळे आपण आता सोशल साक्षर होण्याची गरज आहे असं मला वाटत...

Address

Behind Market Yard
Manchar
410503

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mymarathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mymarathi:

Share


Other Manchar media companies

Show All