30/01/2024
धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट , कोल्हापूर आयोजित निबंध स्पर्धा
सिद्धार्थ गौतम बुद्ध : जीवन कार्य
स्पर्धक
संतोष दामोदर बागडे
एम .ए. , डि .एड
यशोधम कॉलिनी
हनुमान मंदीरा मागे .
मलकापूर
जि. बुलढाणा .
email: [email protected]
www.brambedkar.in
www.needsofyou.com
मो .नं. 9766552090
प्रस्तावणा :
अखील विश्वाला मानवतेची शिकवन देनारे तथागत सिद्धार्थ गौतम बुध्द .
हम रहे या ना रहे
ये दुनिया यह महफील आबाद रहे
लेकीन सदा ही हमारे ओठोपर
तथागत बुध्द का नाम रहे !
असे का म्हणावेसे वाटते सर्व जगाला ?
कारण सर्व जगाला तारू शकेल असे तत्वज्ञान हे केवळ तथागत बुद्धांनीच दिले .
बुद्ध म्हणजे सत्य , बुद्ध म्हणजे विज्ञान , बुद्ध म्हणजे निसर्ग नियम, बुध्द म्हणजे यथार्थ, बुध्द म्हणजे तथागत .… इतकी सगळी विषेशने तथागत गौतम बुद्धांना लागतात . खऱ्या अर्थाने भगवान ही उपाधी जर कुण्या मानवाला लावण्याचा अधिकार आणि पात्रता या पृथ्वीतलावर कुणाची असेल तर केवळ सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचीच .
मानवी इतिहासात मानवाला मानवतेची शिकण देणारे पहिले मानव ज्यांनी मानवतेच्या कल्यानासाठी ४५ वर्ष सतत रात्रंदिवस लोकांना जागृत करण्याचे कार्य केले. आपला परिवार, राजवैभव, आपली पत्नी, आपला मुलगा अशा संसारीक सुखाचा त्याग करून मानवाला दुःख मुक्त करण्यासाठी आपल्या अंतिम श्वासापर्यंत लोकांना ज्ञान देण्याचे कार्य आपल्या उपदेशांमधुन आपल्या आचरणामधून केले .
जगातील सर्वोत्तम, सर्वोच्च प्रज्ञा असलेल्या तथागतांनी मानवाला दुःख मुक्त करण्यासाठी आपल्या वाणीच्या माध्यमातुन ८४००० स्कंधाच्या स्वरूपात आपले विचार मांडले आहेत . या सर्व विचारांचा संग्रह म्हणजे तीपीटक होय . तथागतांचे विचार हे मानवाला सुगतीकडे नेणारे आहेत. तथागत तथागत गौतम बुद्धांच्या अथांग अशा जीवन कार्याची मांडणी एका निबंधाच्या स्वरूपात करणे म्हणजे सागराला घागरीत सामावून घेण्यासारखे कठीण कार्य कार्य . हेच कार्य डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी ' बुध्द आणि त्यांचा धम्म ' ग्रंथामध्ये केला आहे . बौद्ध तत्वज्ञान हे कालानुसार अधिक विस्तृत आणि प्रगल्भ होत जाणारे आहे. डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर अनेक उपासक , भिक्खु , साहित्यिक, विचारवंत यांनी तथागत गौतम बुद्धांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे . या मध्ये डॉ . अ . ह. साळुंखे . अ . फ . भालेराव . भंते पय्यानंद , डॉ .धनराज डहाट इत्यादी मान्यवरांचा नामोल्लेख करणे गरजेचे आहे . कारण याच मान्यवरांनी तथागत गौतम बुद्धांच्या शिकवणुकी प्रमाणे सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेत आणि प्रचलीत माध्यमांचा वापर करुन बौद्ध तत्त्वज्ञान तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवीण्याचे कार्य केले आहे .
तथागतांचा जन्म ते परिव्रत्येपर्यंतचा कालखंड हा तथागतांच्या जीवनकार्याची आणि धम्म कार्याची प्रस्तावणाच म्हणावी लागेल कारण मानसाच्या जडणघडणीमध्ये ० ते ६ वर्षाचा कालावधी खुप महत्वाचा असतो . या वयात झालेले संस्कार, आलेले अनुभव हे पुढील आयुष्याच्या इमारतीची पायाभरणीच असते . या कालावधीतच सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या आयुष्यात घडलेल्या घटणा म्हणजे, त्यांचा इ .स पुर्व ५६३ मध्ये झालेला जन्म - माता महामाया यांचा बाळ सिद्धार्थ जन्मानंतरच सातव्या दिवसी झालेला मृत्य- असितमुनींची भविष्यवाणी - या भविष्य वाणीचा बाळ सिध्दार्थाच्या पालनपोषण करण्यासंबंधी पालकांचा बदललेला दृष्टीकोन - हि भविष्यवाणी पालकांनी त्यांच्या मताला अनुकल करण्यासाठी निर्माण केलेली परिस्थिती . या सर्व घटणा बाळ सिध्दार्थाची तथागत गौतम बुद्ध निर्माण होण्यासाठी केलेले बिजारोपणच म्हणावे लागेल .
६ ते १४ या वयोगटांमध्ये बालवयात तथागत गौतम बुध्द होण्यासाठी अंकुरीत केलेल्या रोपाला चांगलेच पोषक वातावरण मिळाले . वडीलांचे राजवैभव, संपन्नता, अतिप्रेम, अतिकाळजी या मुळे बाळ सिध्दार्थाला जीवन जगण्यासाठी सामान्य व्यक्तीच्या मुलाला करावा लागणारा संघर्ष करावा लागला नाही, पोटाची खळगी भरण्यासाठी करावा लागणारा संघर्ष आणि चिंता या मध्ये खर्च होणारा वेळ हा बाळ सिद्धार्थाचा वाट्याला आलेला नाही . मग हाच वेळ बाळ सिद्धार्थाने आत्मचिंतनात घालविला . या मुळे एक शांत, संयमी, विचारप्रणव, प्रयोगशील, स्वमतावलंबी, चिंतनशील व्यक्तीमत्व घडण्यासाठी पोषक असे वातावरण बाळ सिद्धार्थाला मिळाले .
१४ ते २८ या वयोगटामध्ये व्यक्ती विकासास आवश्यक असणारे गुण विकासीत करण्यास पोषक असणारे वातावरण सहज उपलब्ध झाल्यामुळे शरीरयष्टी, तारुण्य, रुप, चपळता, चिकाटी, कणखरता, ज्ञान संपन्नता, आक्रमकता , मृदुता, कोमलता, विरता, इत्यादी गुण जे एक सर्व गुण संपन्न युवक होण्यासाठी आवश्यक असणारे सर्व गुणवैशिष्टये सिद्धार्थानी धारण केले होते . एक सर्वसामान्य मानव म्हणुन येथ पर्यंतचा प्रवास सिद्धार्थ नावाच्या एका राजपुत्राचा झाला .
वयाच्या २८ व्या वर्षी सिद्धार्थ्याच्या जीवनाला कलाटणी देण्यास कारणीभूत असणाऱ्या तात्कालीक कारणाची सुरुवात झाली . ती घटणा म्हणजे रोहीणी नदीच्या पाण्याच्या वाटणीवरून शाक्य आणि कोलीय यांच्यात उभाठाकलेला संघर्ष . या संघर्षामध्ये मानवाता आणि अमानवता या दोनच पर्यायांपैकी कोणताही एकच पर्याय निवडण्याची निर्माण झालेली अगतीकता . हे दोनच पर्याय सिद्धार्थाला चक्रवर्ती सम्राट सिद्धार्थ किंवा सम्यक संमबुद्ध सिद्धार्थ गौतम बुध्द घडण्यास कारण ठरणार होते .
गर्भावस्था ते वयाच्या २८ व्या वर्षापर्यंत सिद्धार्थाच्या मनावर घडलेले संस्कार आणि त्या संस्कारांचे प्रतिबिंब हे निश्चितच मानवतेकडे वळणारे होते … आणि घडले सुद्धा तसेच .
सिद्धार्थाचा सम्यक संमबुद्धांकडे जाणारा प्रवास :
मानवता आणि अमानवाचा यांच्या पैकी मानवतेचा मार्ग निवडण्याची प्रेरणा आतापर्यंतच्या घडलेल्या संस्कारांनी दिली . परंतु हा मार्ग सुलभ नव्हता . प्रवाहाच्या विरूद्ध जाणारा होता . कुटूंबाला, देशाला त्यागण्याच्या अग्नीदिव्यातुन ताऊन सलाखुन काढणारा होता . विरहाचे चटके देणारा होता , शरीराचे बेहाल करणारा होता, सत्य आणि असत्य यांचाच न्यायनिवाडा करण्याचा होता .... याची सर्व कल्पना असुन सुध्दा . सिद्धार्थाचा दृढ संकल्प किंचितही ढळणारा नव्हता . सिद्धार्थाच्या संकल्पापुढे पर्वत सुध्दा नतमस्तक होईल आणि सागर सुध्दा सिद्धार्थाला मार्ग मोकळा करून देईल इतका प्रचंड आत्मविश्वास बालपणात घडलेल्या संस्कारांनी सिद्धार्थाला आत्मसात झाला होता .
संघाशी झालेल्या संघर्षातुन सर्वाचे हित साधणारा परंतु स्वतःमात्र दिपज्योति प्रमाणे अग्नीदाह सहणकरून जगाला ज्ञानाचा प्रकाश देण्याचा मार्ग सिद्धार्थांनी निवडला होता . आता मागे फिरणेनाही हाच दृढनिश्चय.
देशत्यागाची तयारी.
जननी, जन्मभूमी, भार्या, पुत्र, प्राणप्रिय मातृभूमी सत्याच्या अग्नीकुंडात अर्पण करून मानवतेचा कल्याणाचा मार्ग शोधण्याचा खडतर प्रवास सुरू झाला होता .
परिव्रज्येतेचा मार्ग निश्चित झाला जीवंतपणी मरणयातना होणार याची स्पष्ट कल्पना असुन सुद्धा आपण ज्यांना एैहिक सुख म्हणतो त्या सर्वांना निरोप देण्याचा प्रसंग आला . गृहत्याग करून पुन्हा गृहस्थजीवनाकडे परतण्याचे सर्व मार्ग स्वतःहूण बंदकरून हे विश्वची माझे घर अवघाची संसार सुखी करावया, झीजविण्यास माझा देह, मी झालो तत्पर . या भावनेने सिद्धार्थ मार्गस्थ झाले .
प्रकाशाचा मार्ग दिसेना, भटकलो चहू दिशांना . शोधता शोधता भेटेना मार्ग नवा . तेव्हा सिद्धार्थांनी जो मार्ग दिसेल त्या त्या मार्गाने चालण्याचे ठरविले . प्रत्येक मार्गाचा स्वतः अनुभव घेउन नंतर योग्य मार्ग निवडण्याचे ठरविले . त्या काळातील प्रचलीत असलेल्या सर्वच ज्ञान मार्गाचा अनुभव सिद्धार्थाने घेतला . या मध्ये भृगुऋषींच्या आश्रमात तपस्या मार्ग . गौतम आलारकालाम यांचा सांख्य तत्वज्ञानाचा मार्ग . तसेच वेगवेगळया ऋषी कडे समाधिमार्ग . तपस्या मार्ग . या सर्वांचा अवलंब करून आपल्या शरीराला आणि मनाला प्रचंड वेदना सहन करण्याची सवय लावली परंतु अपेक्षीत मार्ग सापडेना . ज्ञानाचा प्रकाश दिसेना . शेवटी तपस्येचा त्याग करून आपला स्वत:चा स्वतंत्र मार्ग तयार करण्याचे सिद्धार्थ गौतमांनी ठरविले . शरीराला प्रचंड यातना देणारा तपस्या मार्गाचा त्याग करून सुजाताने दिलेली खीर खाऊन शरीराचे पोषण करून ज्ञान प्राप्तीचा नवा मार्ग निवडला .
नव्या प्रकाशासाठी ध्यानसाधनेचा मार्ग : जेवण करून शरीर ताजेतवाने झाल्यानंतर सिध्दार्थ गौतमांनी आपण आजपर्यंत घेतलेल्या अनुभवांचे चिंतन करण्यास सुरूवात केले . अनुभवांच्या सखोल चिंतनानंतर त्यांना जानवले की ज्ञानप्रकाशाच्या आपण अगदी समिप पोहचलो आहोत . अगदी शेवटचे निकराचे प्रयत्न केल्यास आपल्याला नक्कीच प्रकाश मार्ग सापडेल याची त्यांना खात्री पटली होती . त्या करीता गौतमांनी संपुर्ण तयारी करण्याचे ठरविले . आपल्या ध्यान साधनेसाठी योग्य स्थळांचा त्यांनी शोध सुरू केला, ते गयेच्या मार्गाणे निघाले . आपल्या ध्यानसाधणेत कुणाचा अडथडा येणारनाही अशी जागा त्यांनी शोधली . निसर्गप्रेमी गौतमांनी आपल्या ध्यानधनेसाठी पिंपळाच्या वृक्षाची निवड केली . ज्ञान साधनेचा दृढ संकल्प करून तथागत पद्मासण घालून आणि पाठ सरळ ठेउन ज्ञान प्राप्तिच्या निश्चयाने स्वतःशीच म्हणाले . " मला जो पर्यंत संम्यक संबोधी प्राप्त होणार नाही तो पर्यंत मी माझे आसण कदापी सोडणार नाही . माझ्या शरीलाला कितीही वेदना झाल्या, माझा प्राणगेला तरिही शेवटच्या श्वासापर्यंत मी माझा संकल्प सोडणार नाही " . अनेक नैसर्गीक तसेच मानसिक वादळाना तथागतांनी पराजीत केले, मनातील वाईट विचार, भीती, दृष्ट वासना, यांनी तथागतांच्या मनावर प्रचंड प्रहार केले परंतु तथागतांनी ते सर्व प्रहार परतुन लाऊन मनातील मोह माया, भीती , नकारात्मक भावना यांचा पराभव करून संम्यक संबोधी प्राप्त केली .
ज्ञानप्राप्ती : चिंतनकाळात चाळीस दिवस पुरेल येवढा अन्न साठा गोळा केलेला होता . ज्ञानप्राप्ती करुन घेण्यासाठी तथागतांना चार आठवड्यांचा कालावधी लागला . सतत ध्यानमग्न रहावे लागले . अंतिम अवस्थेपर्यंत पोहचण्यासाठी त्यांना चार पायऱ्यांनी संपर्ण ज्ञानप्राप्ती करून घेतली . त्या पायऱ्या म्हणजे . १ .वितर्क आणि विचार प्रधानतेचा संयोग २ .एकाग्रता ३ . मनाचा समतोल आणि जागरुकता यांचा संयोग ४ . मनाचा समतोल आणि पावित्रता यांचा संयोग .
अशा प्रकारे त्यांचे चित्त एकाग्र झाले, पवित्र झाले, निर्दोष झाले . त्यांच्या चित्ताला किंचीतही डाग राहला नाही, ते सुकोमल, दक्ष, दृढ, रागविरहित झाले त्यांनी आपले सर्वलक्ष एकमात्र समस्येवर केंद्रीत केले ते म्हणजे दुःख .
चौथ्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी त्यांना दुःख, दुःख कसे नाहीसे करायचे व मानवजातीला सुखी कसे करायचे या संबधी मार्ग सापडला, तो मार्ग म्हणजेच प्रतित्यसमुत्पाद होय . या प्रमाणे चारआठवडे चिंतन केल्यानंतर अज्ञानाचा अंधकार नाहिसा झाला व ज्ञानाचा प्रकाश उदयास आला . त्यांना एक नविन मार्ग दिसला .
नव्या धम्माचा शोध : चार आर्य सत्याचा शोध दुःख .. दुःख नाहीसे कसे करावे … दुःख उत्पन्न होण्याची कारणे कोणती ? ... ते कारणेच नष्ट केली तर दुःख होणारच नाही . या सर्व प्रश्नांची उत्तरे सिद्धार्थांना बिनचुक मिळाली यालाच सम्यक संबोधी म्हणतात .
बोधिसत्त्व गौतम सम्यक संबोधीनंतर ' बुद्ध ' झाले . आपल्या धम्म मार्गामध्ये कार्यकारण भावाचा सिद्धांता म्हणजेच प्रतीत्यसमुत्याद याला महत्वाचे स्थान दिले, जीवनातील निराशावादी दृष्टीकोणाचे खंडण केले. आत्मा, पूर्वी जन्माचे कृत्य, ईश्वर , मोक्ष इत्यादी भ्रामक कल्पनांचा त्याग केला .
मानसाच्या सर्व गोष्टींच्या केंद्रस्थानी ' मन ' हेच असते. मनाचा विकास म्हणजेच व्यक्तीमत्वाचा विकास होय, जर मनावर संयम करता आला तर सर्व कृत्यांवर नियंत्रण मिळविता येते . ज्या प्रमाणे गाडी ओढणाऱ्या बैलाच्या पावलांमागोमाग गाडीची चाके जातात, त्याच प्रमाणे अशुद्ध चित्ताने केलेले कर्म हे दुःखाला आपल्या सोबत घेऊन येते, तर शुद्ध चित्ताने केलेले कर्म हे सुख देणारे असतात . म्हणजेच माणवाचे सुख किंवा दुःख हे कोणत्याही बाह्य घटकावर अवलंबून नसुन ते ' मन ' या आंतर घटकावर अवलंबुन असते . पापकृत्य टाळा , कुशल कर्म करा, चित्त शुद्ध करा, धम्म तत्वांवर भर न देता आचरणावर भर दया हाच खरा धम्म मार्ग आहे .
तथागतांनी आपले विचार मांडतांना कोठेही धार्मिक अंधश्रध्देचा, कर्मकांडाचा आधार घेतलेला नाही . त्यांनी स्वतः प्रथम खडतर ज्ञान साधना केली, त्या काळामधे प्रचलती असलेल्या सर्वचज्ञान मार्गाचा स्वतः अनुभव घेऊन बघीतला . स्वत:चा बौध्दीक विकास केला . उच्चतम स्वरूपाचे ज्ञान प्राप्त केले . विशुद्ध आचरण केले . त्यांनी आपल्या मनातील सर्व विकारांचा नाश केला . मानवाप्रति प्रेम, दया , करुना मैत्री भावना , उपेक्षा, मुदीता, संवेदनशिलता निर्माण करून लोकांना दुःख मुक्तीचा मार्ग दाखवीला .
तथागताचे जीवन कार्य आपणास जाणुन घ्यावयाचे असेल तर पालि साहित्याचा आढावा घेणे अनिवार्य ठरते . कारण तथागतांच्या विचारांचे प्रतिबिंब पालि साहित्यामधे प्रकट होते . या मध्ये तिपिटक मुख्य आहे . या मध्ये धम्मोपदेशासोबतच त्या काळातील समाज जीवन, व्यवसाय, वस्त्रालंकार लोकांचे राहणीमान इत्यादिवर धम्मविचारांचा प्रभाव आपणास जानवतो . थेर - थेरीच्या जीवनप्रवासातुन आपल्याला स्त्री पुरुषसमानतेचे तत्व स्पष्ट होते .
तथागतांनी आपल्या जीवन काळात आपल्या धम्माच्या माध्यमातुन अनेक क्षेत्रांमधे आणि अनेक व्यक्तींच्या विचारांमध्ये अमुलाग्रह बदल घडुन आणला . या मध्ये सुनीत, उपाली, अंगुलीमाल, मोग्गलायन, सारीपुत्त, नंद यांच्या संघ प्रवेशातुन धर्म, वंश , जात, लिंग इत्यादी कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्व मानव हे समान आहेत असा संदेश दिला. सर्वांना ज्ञान प्राप्त कारण्याचा व दुःख मुक्त होण्याचा अधिकार आहे हे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांनी सिद्धकरुन दाखविले .
स्वामी विवेकानंद म्हणतात - तथागत गौतम बुद्धां ऐवढा बुध्दीमान, परिपुर्ण आणि प्रगल्भ विचारांचा मानुस जगाने आजवर पाहीलेला नाही . बुध्दांच्या सामर्थाचा एक थेंब जरी माझ्याकडे असता तर खुप झाले असते .
आज सर्व जग बुद्धांचा विचारांकडे का वळत आहे ? अनेक युध्द, महायुध्द अनुभवलेल्या देशांना युद्ध नको बुध्द हवा असे का वाटत असेल ? .. तथागत सिध्दार्थ गौतम बुद्धांनी आपल्या जीवना मध्ये असे कोणते कार्य केले आहे की सर्व जग त्यांच्या विचारांकडे वळत आहे .
या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण आज तथागत सिध्दार्थ गौतम बुद्ध आणि त्यांचे जीवन कार्य या निबंधाच्या माध्यमातुन करणार आहोत .
बौद्ध जीवन मार्ग :
बौद्ध जीवन मार्ग हा अगदी सोपा आणि सरळ जीवन मार्ग आहे . निसर्ग नियमांचे पालणकरणे म्हणजे बौद्ध जीवन मार्ग होय . 'निसर्गाचे नियम म्हणजे विज्ञान, विज्ञान म्हणजे प्रयोगातुन आलेली अनुभूती, या अनुभूतींवर आधारीत दृष्टीकोण म्हणजेच वैज्ञानिक दृष्टीकोण . वैज्ञानिक दृष्टीकोणावर आधारीत जीवन मार्ग म्हणजे बौद्ध जीवनमार्ग होय. स्वतःअनुभव घ्या, तेव्हाच कोणतेही तत्त्व स्विकारा असे तथागत सांगतात . ग्रंथ प्रमाण किंवा पिढ्यानं पिढया चालत आलेल्या परंपरांचे अंधानुकरण करणे, तसेच दुसरा कुणीतरी सांगतो किंवा तसे वागतो म्हणुन आपणही तसेच करावे असे मुळीच नाही .
मानवी जीवनातील प्रत्येक समस्येवर तथागत बुध्दांनी सखोल चिंतन केले आहे आणि त्या सर्व समस्यांवर उपाय सुध्दा सांगीतला आहे . जन्म आणि जगण्याचा अर्थ आपणास तथागत बुद्धांनी सांगीतलेला आहे .
जन्म आणि मृत्यू याच्या मधील जो काही प्रवास आहे त्याला आपण जीवन असे म्हणतो . जीवन जगणे म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा या प्राथमिक गरजा पुर्ण करणे म्हणजे जीवन असे म्हणता येतनाही . मानवी जीवन मार्ग निच्छितच या पेक्षा वेगळा आहे . कारण मनुष्याच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या गरजा पुर्ण झाल्यावर सुध्दा मानुस सुखी होतो का ? असा प्रश्न केला तर याचे उत्तर हे ' नाही ' असेच येईल . म्हणजेच भौतिक गरजा पुर्ण झाल्या तरी सुद्धा मानुस सुखी होऊ शकत नाही . जगा मध्ये दु:खच दु:ख आहे . या दु:खाचे कारण काय ? याचा विचार तथागत बुद्धां पुर्वी कुणीही केलेला नव्हता . तथागत बुद्धांनी दु:खाचे कारण शोधले तसेच त्याचे निराकरण कसे करावे हे सुध्दा शोधून काढले .
मनुष्याच्या दु:खाचे कारण .
मनुष्यामध्ये असणारी कामना किंवा तृष्णा हेच दु:खाचे कारण आहे. दु:ख हे दोन प्रकारचे असतात, एक शारिरीक दु:ख आणि दुसरे मानसिक दु:ख. शारिरीक दु:ख हे औषधाने डॉक्टर कडे जाऊन बरे होउ शकते परंतु मानसिक दु:ख कसे बरे करणार ? मानसिक दु:ख हे तथागत बुद्धांनी सांगीतलेल्या धम्माचे आचरण करून दुर होऊ शकते. म्हणजेच आपल्याला चांगले कर्म करावे लागतील . कुशल कर्म करण्याचा मार्ग म्हणजे बौद्ध जीवन मार्ग होय . म्हणजेच सम्यक जीवन मार्गाचा अवलंब करावा लागेल .
गुण आणि सद्गुण .
प्रत्येक मनुष्या मध्ये अनेक गुण असतात उदा . खोटे बोलणे, चोरी करणे, दुसऱ्यांना फसविणे इत्यादी परंतु मनुष्या मध्ये सद्गुणां पेक्षा अवगुणच जास्त असतात . म्हणुन मनुष्य दु:खी होतो . तथागत बुध्द म्हणतात मानसामध्ये सद्गुण जास्त असतील तरच मनुष्य सुखी राहू शकतो . धम्मपदा मध्ये मनुष्याच्या ४२३ प्रकारच्या स्वभावाची चर्चा केलेली आहे . या मध्ये तथागत बुध्द सद्गुण धारण करण्याचा उपदेश देतात .
" चर्चा ही चर्चा करे , धारण करे ना काई
धर्म बिचारा क्या करे , जो धारे वह सुखी होई . "
मानसाला मानुस म्हणुन जगण्यासाठी बौद्ध जीवनमार्ग अनुसरणे अतिशय म्हत्वाचे आहे . बौद्ध जीवन पध्दतीच्या विपरीत आचरण हे पशुतुल्य जीवन जगणे होय . धम्मआचरणा शिवाय सुख लाभनार नाही .
मनुष्य प्राण्यालाच सद्गुण धारण करण्याची संधी मिळत असते. कारण मनुष्यच स्वातंत्र विचार करू शकतो. विचार करून कृती करू शकतो . चांगले किंवा वाईट यातील भेद ओळखू शकतो . चांगल्या कर्माचे चांगले फळ मिळते . जो हे सद्गुण धारण करेल त्यालाच सुख मिळेल .
विनम्रता हा सद्गुण :
ज्या नम्रतेमध्ये भिती आहे . किंवा काहीतरी स्वार्थ साधून घेण्यासाठी जी नम्रता दाखविली जाते त्या नम्रतेला सद्गुण म्हणता येणार नाही . विनम्रता म्हणजे कोणताही स्वार्थभाव न ठेवता दाखविलेली नम्रता .
व्यक्तीमत्व :
एक व्यक्ती म्हणुन जगण्या पेक्षा एक व्यक्तिमत्त्व म्हणुन जगा. मनुष्य मेल्या नंतर जेव्हा त्याच्या संपुर्ण जीवनाचा आढावा आपण घेतो. तेव्हा आपण त्या दिवंगत व्यक्तीच्या सद्गुणांचा आणि दुर्गुणांचा आपण आढावा घेत असतो. सद्गुणांचे प्रमाण जास्त आलेल्या व्यक्तीच्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो व अशाचा व्यक्ती लोकांच्या स्म्रणात राहतात .
दुध का सार मलाई मे है
मनुष्य जीवन का सार भलाई मे है !
धम्म हा प्रत्यक्ष आचरणाचा मार्ग आहे . केवळ तत्वज्ञान नाही .तथागत बुद्धांची शिकवन ही मनुष्याचे मन व त्याचे आचरण यावर आधारीत आहे .
मनुष्य ऐकतो मन भर
दुसऱ्यांना सांगतो टन भर
आणि आचरण मात्र करतो
फक्त कण भर .
थोडे थोडे सद्गुण धारण करत जावे तेव्हाच तुम्ही सुखी व्हाल .
जीवन म्हणजे खेळ नाही
फुकट मिळालेला वेळ नाही
जीवन म्हणजे एक कोडे आहे
सोडवाल तीतकेच थोडे आहे .
सब्ब पापस अकरणं
कुसलस्स उपसंपदा
सचित परियो दपनं
येतं बुध्दां नं सासनं
अज्ञानातून मनुष्य अनेक दुर्गुण धारण करतो . त्याला ज्ञानाचा प्रकाश मिळाल्यास त्याचे दुर्गुण कमी कमी होत जातात .
सभोवताल घडणाऱ्या धटणांना आपण जेव्हा प्रतिसाद देतो तेव्हा दु:खाची निर्मिती होत असते. कोणतीही गोष्टीला सम्यकपणे प्रतिसाद दिल्यास दु:ख होणार नाही यालाच मध्यम मार्ग म्हणतात .
जसे बैलगाडीचे चाक हे बैलाच्या मागे मागे चालत असतं, तसच कलुषित मनामुळे मानसाकडून जे वाईट कर्म घडतात त्याचा परिणाम दु:खात होतो आणि हे दु:ख आपला पिच्छा सोडत नाही .
मनुष्याचे शरीर आणि मन हे निर्मळ असले पाहिजे . शुभ्र वस्त्रांप्रमाणे, मन शुध्द झाले तर नाकाचे , कानाचे जीभेचे संपुर्ण शरीराचे व्यवहार शुद्ध होतील . केलेल्या चांगल्या कार्याचा परिणाम हा सुखात होत असतो .
मन चंगा तो कटोती मे गंगा ( संत रवीदास )
मन निरोगी राखायचे असेल तर मनाचा व्यायाम केला पाहिजे . यालाच सम्यक व्यायाम असे म्हणतात . मनामध्ये चांगले विचार आणा . मनामधे जे वाईट आहे त्याला बाहेर काढा. मनात जे आगोदरपासुन जे चांगले विचार आहेत त्याला वाढवा. मनात कुठलेच वाईटपण येऊ देणार नाही याची काळजी घ्या. असे विस्तृत विशेलषण मनाचे केले आहे .
शुद्ध आचरण म्हणजेच बौद्ध जीवन मार्ग होय . तीन रत्न, पंचशील, अष्टांगीक मार्ग या प्रमाणे जीवन व्यतीत केल्यास सगळयांचे मंगल होईल कल्याण होईल .
हाच बौद्ध जीवन मार्ग होय .
तथागत बुद्धांचा जनवादी धम्म-
तथागत बुद्धांनी जो जनवादी धम्म मार्ग शोधुन काढला त्याचा आपणास अभ्यास करायचा असेल तर तथागतबुद्धांचे धम्मचक्रप्रवर्तन ते डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे धम्मचक्रप्रवर्तन या कलखंडाचा आपण थोडक्यात आढावा घ्यावा लागेल .
तथागत बुद्धांना अतिशय खडतर अशी ज्ञान साधना करून दुःख मुक्तीचा जो मार्ग सापडला तो इतरांना सांगावा की सांगुनये ? की फक्त आपणच विमुक्तीचा आनंद घ्यावा . याचे चिंतन तथागत बुद्धांनी काही दिवस केल्या नंतर त्यांनी निश्चित केले की ,
मला जे ज्ञान प्राप्त झालं आहे ते इतरांना मी दिलच पाहिजे. म्हणुन तथागत बुद्धांनी त्यांचे जुने सहकारी कौढीन्य, भद्देय, अश्वजीत, वप्प, महानाम यांना धम्मोपदेश दिला यालाच धम्मचक्रप्रवर्तन असे म्हणतात . आणि खऱ्या अर्थाने येथुनच तथागत गौतम बुध्दाच्या जनवादी धम्माला सुरुवात झाली . सम्बोधिप्राप्तीनंतर तथागतांनी' चरथ भिक्खवे चारिकं, बहुजन हिताय बहुजन सुखाय ' असा फार मोठा संदेश भिक्खु संघाला देत सतत ४५ वर्ष आपल्या जीवनाच्या अंतिमक्षणा पर्यंत ज्ञानदानाचे कार्य केले असा उल्लेख विनय पिटकात आहे. तथागतांनी त्या काळातील भारतीय समाजालाच नव्हे तर संपुर्ण जगाला आपल्या बौध्दीक सामाजीक, धार्मीक, आर्थिक, सांस्कृतिक नीतिमूल्यांमधुन ' नत्थी अतीता च , नत्थी अनागतो च ' . अशी खुप मोठी शिकवण दिली .
धम्माच्या मर्गामध्ये ईश्वर आणि आत्मा यांना स्थान नाही, कर्मकांडाचा त्याग तथागतांनी केला आहे . जगाच्या इतिहासात आतापर्यत मानवी दुःखाचे अस्तीत्त्व मान्य करणे हाच धर्माचा खरा पाया आहे . हे सांगणारे पहिलेच व्यक्ती म्हणजे तथागत बुद्ध होत .
तथगत बुद्ध , सम्राट अशोक , सम्राट कनिष्क ते सम्राट हर्षवर्धन म्हणजेच इ.स. १२ व्या शतकापर्यंत सुमारे १७५० वर्ष भारताच्या इतिहास आणि संस्कृतिवर बौद्ध धम्माचा प्रभाव होता .
कारण तथागतांचा धम्म हा बहुजन हिताय , बहुजन सुखाय असा होता , सामान्य जनतेच्या उपयोगाचा व सर्व सामान्य जनतेला समजेल अशाच भाषेमध्ये मांडलेला होता . सुंदर प्रकारे, तर्कशुद्ध आणि सरसाळ वाणीमधे धम्मोपदेश देण्याचे कौशल्य तथागतांनी दिले होते. धम्म हा चिकीत्सक, बुध्दीला पटणारा तसेच कालबाहय न होता काल आणि परिस्थिती अनुसार उन्नत होत जाणारा आहे. याच जन्मात शरीराने आणि मनाने अनुभवता येणारा आहे. पुणर्जन्म मान्य नाही . बुद्धीनिष्ठ आहे श्रध्दानिष्ठ नाही. श्रध्देची जागा ज्ञानाने घेतलेली आहे. सर्व संस्कार सुस्पष्ट आणि आपआपल्या क्षमतेनुसार कारण्याची मुभा आहे, काहीही गुढ रहस्यमय किंवा गुपीत नाही. म्हणूनच सर्वसामान्य जनतेचा जनवादी धम्म आहे. विश्वाचे कल्याण करणारा धम्म आहे . लोककल्याण हेच धम्माचे तत्वज्ञान आहे. मनुष्य व प्राणीमात्र यांच्या विषयी निस्सीम प्रेम हेच धम्माचे सार आहे .
ज्ञानापासून वंचित राहिलेल्या सर्वसामान्य जनतेला ज्ञानाचीकवाडे खुली करण्याचे कार्य तथागतांनी केले . मानवतावाद मांडणारे तसेच मनुष्या मनुष्यामध्ये भेदभाव नाहीत, सर्वमानव समान आहेत या प्रकारचे तत्वज्ञान सर्व प्रथमच मांडणारे तथागत होते .
प्रात्येक मनुष्य हा एक स्वतंत्र व्यक्तीमत्व असतो, त्याचा स्वभाव , त्याचे विचार, त्याला आलेले अनुभव हे त्याचे स्वताचे असतात एका व्यक्तीचे विचार आणि अनुभव दुसऱ्या व्यक्तीला पुर्णपणे लागु होतीलच असे आपण ठामपणे म्हणु शकत नाही . हा निसर्ग नियम तथागत बुद्धांनी मान्य करुन प्रत्यक व्यक्तीने इतरांचे अंधानुकरण न करता स्वानुभूती घ्यावी व नंतरच ते तत्वज्ञान स्वीकारावे, पाली भाषा या सर्वसामान्याच्या बोलीभाषसून उपदेश देण्यामागे सर्वसामान्य लोकांना आपला धम्म समजावा व स्वता त्याला त्या धम्माची अनुभूती घेता यावी, तसेच धम्माचा अर्थ सजुन घेण्यासाठी त्याला कोणत्याही मध्यस्थाची गरज भासु नये हाच उद्देश होता . कोणत्याही प्रकारची टोकाची भूमिका न घेता मध्यम मार्गाचा उपदेश तथागत करतात. मोक्षदाता न होता मार्गदाता होतात .
बौद्ध धम्मातील काही मूलभूत संकल्पनांचा अर्थ समजने अनिवार्य आहे . त्या शिवाय आपणास धम्माचे आकलण होणार नाही . ते पुढील प्रमाणे .
अहिंसा : जगातील सर्व प्राणामात्रां विषयी मेत्रीभावना ठेवणे , दुसऱ्याच्या वेदनेने दुःखाने स्वतः दुःखी होणे . दुसऱ्याच्या सुखात आपले सुख मानने इतका व्यापक अर्थ बौद्ध धम्माच्या अहिंसा या तत्वामध्ये अभिप्रेत आहे .
विश्व मैत्रीय धम्म :
धम्म तत्वाप्रमाणे कर्म करणे हाच धम्म होय. तथागत अहिंसेलाच धम्म म्हणतात. करुणेला महत्व देतात , कर्मवाद, प्रयत्नवाद, प्रत्यक्ष अनुभव व अनुमाण हे दोन प्रमाण मानुन धम्माची मांडणी तथागत करतात .
ईश्वर अमान्य : ईश्वर प्रत्यक्ष नाही. मात्र दुःख हे प्रत्यक्ष आहे. म्हणुनच धम्माचा आरंभ हा ईश्वरापासून न करता प्रत्यक्ष अस्तित्वात असणाऱ्या दुःखापासून केलेली आहे .
दुःखाचा नाश म्हणजे परम सुख प्राप्ती .
बुध्द आणि धम्म हे एकच आहेत .
जो धम्माला पाहतो तो मला पाहतो .
जो मला पाहतो तो धम्माला पाहतो .
माझ्या नंतर मी उपदेशलेला धम्म आणि विनयच तुमचा शास्ता असेल . तथागत बुध्द हे धम्म आणि संघ यांना जोडणारा दुवा आहेत .
असा हा मानवतावादी समतावादी धम्म . विषमतावादी मनुवादी मानसिकतेच्या समुहाला अमान्य होता. या समुहाणे बौद्ध धम्म नष्ट करण्याचे अनेक प्रयत्न केले . अनेक क्रांति आणि प्रतिक्रांती ह्या केवळ बौद्ध धम्म विचार नष्ट करण्यासाठीच करण्यात आल्या . भारतामध्ये बाराव्या शतकापासुन तर एकोणविसाव्या शतकापर्यंत बौद्ध धम्माच्या प्रत्येक पाऊलखुणा जाणीवपुर्वक पुसण्याचा प्रयत्न करण्यात आला . परंतु याच कालावधीत भारताबाहेर बौद्ध धम्म प्रचंड विस्तार पावत होता .
डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ मध्ये आपल्या पाच लक्ष अनुयायांसह बौद्ध धम्माची दिक्षा घेउन भारतात पुन्हा बौद्ध धम्म प्रस्थापीत केला .
उजेडाला कवेत घेण्याचं सामर्थ्य धम्मामुळे मिळते .
डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला या धम्माच्या ओटीत टाकले आणि भारतामध्ये लुप्तप्राय झालेल्या बौद्ध धम्माला १९५६ साली पुन्हा नवसंजीवनी दिली . प्रत्यक्ष पणे भारताला बौद्धमय करण्यासाठी आपले संपुर्ण जीवन व्यतित केले . भारतीय संविधानावर बौद्ध धम्माचा स्पष्टपणे प्रभाव जाणतो . डॉ . बाबासाहेबांच्या जीवनातील प्रत्येक कृतीमध्ये धम्माचा प्रभाव जानतो . एक आदर्श बौद्ध उपासक कसा असावा याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे डॉ . बाबासाहेब होय .
मनुष्य जीवन उन्नत करण्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचा प्रभाव जाणवतो . संपुर्ण शिक्षण क्षेत्र तर बौद्ध धम्मावरच आधारीत आहे . संशोधन क्षेत्रामध्ये प्रतीत्यसमुत्पाद सिद्धांताचा अवलंब केला जातो . मानसशास्त्राचे जनकच भागवान बुद्धांना म्हटले पाहीजे कारण आजपासुन अडीच हजार वर्षापर्वी गौतम बुद्धांनीच मन हे सर्व कृतिचा आधार असतो हे सिद्ध केले आहे . आणि ' मन ' या एकाच गोष्टीला आधार माणुन मनाचा विकास करण्यासाठीच आपल्या धम्म उपदेश केला . मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावरच बौध्द धम्माचे श्रेष्टतम विचार अधिराज्य करीत आहेत . जगातील सर्वच धर्मामध्ये समतावादी , मानवतावादी, आणि जे काही उदात्त आणि चांगले विचार आहेत ते सर्व विचार तथागत गौतम बुद्धांचेच आहेत . कारण निसर्गनियमांचा अभ्यास करून निसर्गाला अनुकूल आणि पुरक ठरतील अशा सर्व विचारांची मांडणी तथागतांनी आपल्या उपदेशात केली आहे . निसर्गानेच निर्माण केलेल्या स्त्री आणि पुरूष यांना समानतेची वागणुक केवळ बौद्ध धम्मातच आहे .
बौध्द धम्मात स्त्रियांचे स्थान -
बौद्ध धम्म म्हणजे निसर्गनियम, आदर्श जीवन जगण्याची आचारसंहिता जी निसर्ग नियमांवर आधारित आहे. निसर्गानेच नर आणि मादी. तसेच मानवामध्ये स्त्री आणि पुरुष असे वर्गीकरण केले आहे. आणि हे दोन वर्ग मानवाच्या प्रगतीसाठी एकमेकांस पुरक आहे. निसर्गनेच स्त्रीयांना आणि पुरुषांना काही विशिष्ट गुण आणि वैशिष्टे बहाल केलेली आहेत. त्यामुळे स्त्री श्रेष्ठ की पुरूष श्रेष्ठ हा मुद्दाच उपस्थीत होत नाही. दोघांनाही समान दर्जा निसर्गानेच बहाल केला आहे. परंतु या निसर्गनियमांना तिलांजली देऊन पुरूषप्रधान संस्कृति निर्माण करून स्त्रीयांना दुय्यम स्थान देण्याचे कार्य या समाजामध्ये होत आहे. त्याला धर्माचे अधिष्ठान देऊन स्त्री स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे कार्य तथागतांच्या पुर्वी होत होते. याला सर्व प्रथम विरोध तथागत गौतम बुद्धांनी केला. स्त्रियांना भक्खु संघात स्थान देऊन स्त्री स्वातंत्र्याचा जाहिरणामाच तथागतांनी मांडला . धम्मामध्ये प्रवेश दिल्यानंतर हजारो स्त्रीया अर्हत झाल्या . इतर कोणत्याही धर्मामध्ये स्त्रीयांना धार्मिक स्थान नव्हते. ते तथागतांनी आपल्या धम्मा मध्ये दिले.
बौध्द धम्माचे जे मुळ सिध्दांत आहेत ते निसर्गनियमांचे सुक्ष निरिक्षण करूणच मांडलेले आहेत .
बुध्द धम्माचे मुळ सिद्धांत -
बौध्द धम्म हा आचरणप्रधान धम्म आहे . बौध्द व्यक्ती त्याच्या आचरणावरुन ओळखला जावा .
जगामध्ये वेगवेगळया भौगोलीक परिस्थितीनुसार , संस्कृतीनुसार बौद्ध धम्म आचरण पद्धतीमधे विभिन्नता दिसुन येते. परंतू बौध्द धम्माचा जो गाभा आहे तो म्हणजे अनित्य , दुःख , अनात्मता आणि निर्वाण हे चार मूलभूत सिद्धांत आहेत. हे चार सिध्दांत प्रतित्यसमुत्पादावर आधारित आहेत . या मध्ये समाविष्ट असलेल्या संकल्पनांचा अर्थ आपण जाणुन घेऊया .
अविद्या : अविद्या म्हणजे चार आर्यासत्यांचे ज्ञान नसने .
भव तुष्णा : आत्मा आहे आणि तो अमर आहे अशी भावना म्हणजे भ
Website on Babasaheb Ambedkar