Swaraja maza

Swaraja maza आपल्या परिसरातल्या आपल्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करा
(1)

स्थानिक गुन्हे शाखेची अवैध धंद्यावर कारवाई. 01 लाख 51 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू  जप्त. 02 व्यक्ती ...
09/11/2024

स्थानिक गुन्हे शाखेची अवैध धंद्यावर कारवाई. 01 लाख 51 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त. 02 व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल.

या बाबत थोडक्यात हकीकत अशी की,पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देशित केले आहे. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक तयार करून लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याची मोहीम राबवित आहेत.
अवैध धंद्याची माहिती काढत असताना दिनांक 08/11/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास खात्रीशीर माहिती मिळाली की, अहमदपूर येथे काही व्यक्ती लपून-छपून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी साठवणूक व वाहतूक करीत आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर माहितीची शहानिशा करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांने दिनांक 08/11/2024 रोजी पोलीस ठाणे अहमदपूर हद्दीमधून घरामध्ये साठवणूक करण्यात आलेला महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला 01 लाख 51 हजार 650 रूपयाचा गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त केले आहे.
प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची अवैधरित्या व्यवसायासाठी साठवणूक केल्याचे मिळून आलेले इसम नामे

1) शेख नवीन अब्दुलगणी, वय 25 वर्ष, राहणार दस्तगीर गल्ली अहमदपूर.

2)अन्वर सिकंदर सय्यद राहणार दस्तगीर गल्ली अहमदपूर.(फरार)

यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे अहमदपूर चे पोलीस अधिकारी,अंमलदार करीत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलीस अमलदार सचिन धारेकर , रामहरी भोसले, नाना भोंग, प्रदीप स्वामी, जमीर शेख यांनी पार पाडली.

09/11/2024

उदगीर मतदार संघातील निवडणूक दिवसेंदिवस ही रंगतदार होत असून आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या एकमेकावर मोठ्या जोराने सुरू आहेत जनता मात्र या सर्वांचं ऐकण्यात मग नाही आहे जो तो येतो मी कसा सरस हे सांगून जातो मात्र जनतेला काय हवं याचा विचार करतो की नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहुयात काय म्हणाले उदगीर तालुक्यातील करडखेल पाटी येथे भेटलेले नागरिक...

21/10/2024
*मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतून लातूर जिल्ह्यातील*                   *भाविक अयोध्या धाम तीर्थ यात्रेसाठी रवाना*•      ...
15/10/2024

*मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतून लातूर जिल्ह्यातील*
*भाविक अयोध्या धाम तीर्थ यात्रेसाठी रवाना*
• *जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दाखविली हिरवी झेंडी*
लातूर, दि. 14 : राज्यातील सर्व धर्मातील 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची, दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात लातूर जिल्ह्यातील जवळपास 800 ज्येष्ठ नागरिक आज लातूर येथून रेल्वेने अयोध्या धाम येथे रामलल्लाच्या दर्शनासाठी रवाना झाले. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून तीर्थ यात्रेला सुरुवात करण्यात आली. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी तीर्थ दर्शन यात्रेला जाणाऱ्या भाविकांसा पाठविलेल्या शुभेच्छा संदेशाचे यावेळी वाचन करण्यात आले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, तहसीलदार सौदागर तांदळे, सहकारी संस्था सहायक निबंधक श्री. गडेकर, आयआरसीटीसीचे गुरुराज सोना यावेळी उपस्थित होते.
साठ वर्षांवरील नागरिकांना विविध तीर्थक्षेत्रांचे दर्शन घडवण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू केली आहे. लातूर जिल्ह्यातून या योजनेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आज या योजनेतून जवळपास 800 भाविक अयोध्या येथे रामलल्लाच्या दर्शनासाठी जात आहेत. सहा दिवसांची ही तीर्थ दर्शन यात्रा 16 ऑक्टोबर रोजी अयोध्या येथे पोहचणार आहे. त्याठिकाणी दर्शन व एक दिवस मुक्काम करून 17 ऑक्टोबर रोजी परतीच्या प्रवासाला निघतील. या भाविकांना वातानुकुलीत रेल्वेतून प्रवास, भोजन, निवास आणि दर्शन व्यवस्था पुरविण्यात येत आहे. भाविकांच्या मदतीसाठी वैद्यकीय पथक, शासकीय कर्मचारी सोबत राहणार आहेत.

राज्य शासनाच्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेला लातूर जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या योजनेमुळे जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शनाची संधी मिळाली असून सर्वजण अतिशय आंनदी वातावरणात या यात्रेत सहभागी झाले आहेत. या यात्रेत सहभागी प्रत्येकाची काळजी घेतली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले. तसेच तीर्थ दर्शन यात्रेत सहभागी झालेल्या सर्वांना राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनावतीने त्यांनी शुभेच्छा दिल्या.

प्रारंभी तीर्थ दर्शन यात्रेत सहभागी झालेल्या भाविकांचे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. तसेच या भाविकांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेमुळे आपल्याला रामलल्लाच्या दर्शनाची संधी लाभल्याचा आनंद यावेळी भाविकांनी व्यक्त केला. तसेच शासनाचे व प्रशासनाचे आभार मानले. पारंपारिक वाद्यांच्या गजरात भाविकांना घेवून जाणारी रेल्वे अयोध्या धामकडे रवाना झाली.

उदगीर आजही भाजपचेच..!‘उदगीर विधानसभा आपल्या हक्काची’ हा नारा देत यावेळी स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचा १०० गाड्यांचा ताफा ...
10/10/2024

उदगीर आजही भाजपचेच..!

‘उदगीर विधानसभा आपल्या हक्काची’ हा नारा देत यावेळी स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचा १०० गाड्यांचा ताफा आज, ८ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात दाखल झाला. यंदाच्या निवडणुकीत उदगीर विधानसभेची जागा महायुतीतर्फे भाजपसाठी घेण्याची मागणी या कार्यकर्त्यांनी केली. तसेच ही जागा निश्चितपणे निवडून आणण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.

मागील विधानसभा निवडणूक वगळता २० वर्षांहून अधिक काळ जळकोट - उदगीर विधानसभेत भाजप कार्यकर्त्यांनी मेहनतीने कमळ फुलवले आहे. यंदाच्या २०२४ च्या निवडणुकीत गेल्या वेळचा पराभव पुसून काढत विक्रमी मताधिक्याने विजयाची परंपरा राखायची या विश्वासाने उदगीरचे युवा नेतृत्त्व आणि इंजिनीयर असलेल्या विश्वजित गायकवाड यांच्या नेतृत्त्वाखाली ३०० हून अधिक कार्यकर्त्यांनी प्रदेश कार्यालयात स्थानिक स्तरावरील ताकदीचा नमुना पेश केला. यावेळी उदगीर विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांसह शहराध्यक्ष मनोज पुदाले, राहुल केंद्रे, बसवराज बागबंदे, धरमपाल देवशेट्टे, शिवशंकर धुप्पे, अमोल निडवदे, दत्ता पाटील, बसवराज पाटील कौळखेडकर, बापूसाहेब राठोड, उत्तरा कलबुर्गे, सत्यवान पांडे, मनोहर भंडे, नंदू नलंदवार आदी सन्माननीय पदाधिकारी उपस्थित होते.

*विद्यार्थ्यांच्या आरोग्याची, सुरक्षिततेची पालकत्वाच्या भूमिकेतून काळजी घ्या - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे*• प्राचार्य...
09/10/2024

*विद्यार्थ्यांच्या आरोग्याची, सुरक्षिततेची पालकत्वाच्या भूमिकेतून काळजी घ्या - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे*

• प्राचार्य, वसतिगृह अधीक्षक यांची बैठक
• आरोग्य, सुरक्षिततेच्याबाबतीत हलगर्जीपणा नको
• वसतिगृह, शाळेत सीसीटीव्ही बंधनकारक; सुरक्षारक्षक नेमा
• पिण्याच्या पाण्याची शुद्धता, आहाराची गुणवत्ता नियमितपणे तपासा

लातूर, दि. ०८ : आई-वडील आपल्या मुलांना अत्यंत विश्वासाने शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहात पाठवितात. या विद्यार्थ्यांची काळजी घेणे ही प्रत्येक शाळा, महाविद्यालायचे प्राचार्य, वसतिगृहाचे अधीक्षक यांची जबाबदारी आहे. केवळ जबाबदारी म्हणूनच नव्हे पालकत्वाच्या भूमिकेतून त्यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची काळजी घ्यावी. यामध्ये कोणत्या प्रकारची कुचराई खपवून घेतली जाणार नाही, असे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज येथे सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित प्राचार्य, वसतिगृह अधीक्षक यांच्या बैठकीत जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे बोलत होत्या. जिल्हा पोलीस अधीक्षक वर्षा ठाकूर-घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, समाज कल्याण सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते, शिक्षणाधिकारी नागेश मापारी, तहसीलदार सौदागर तांदळे यावेळी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्व शाळा, वसतिगृहामध्ये पिण्याच्या पाण्याची शुद्धता, वसतिगृहातील भोजनाची गुणवत्ता, शाळा आणि वसतिगृहात विद्यार्थी-विद्यार्थिनींची सुरक्षितता याकडे विशेष लक्ष दिले जावे. यासाठी राज्य शासनाने वेळोवेळी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या असून त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करणे सर्व शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहचालकांना बंधनकारक आहे. विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, महिला सुरक्षारक्षक यांची नेमणूक करावी. स्वच्छतागृहांची स्वच्छता आणि सुरक्षितता राखणे आवश्यक आहे. प्राचार्य, वसतिगृह अधीक्षक, गृहपाल यांनी स्वतः विद्यार्थ्यांशी सुसंवाद ठेवून त्यांना येणाऱ्या अडचणी, समस्या जाणून घ्याव्यात. त्याचे तातडीने निराकरण करावे. प्रत्येक शाळा, वसतिगृहात तक्रार पेटी लावण्यात यावी. या तक्रार पेटीत येणाऱ्या तक्रारींची योग्य दखल घेवून आवश्यक कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे म्हणाल्या.

शाळा, महाविद्यालयाच्या दर्शनी भागात महत्वाचे दूरध्वनी क्रमांक लावणे, पिण्याचे शुद्ध पाणी, वसतिगृहातील विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी, सीसीटीव्ही, भोजनाची गुणवत्ता, स्वच्छतागृहांची साफसफाई आणि सुरक्षितता, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसेसची सुरक्षितता, तक्रार पेटी, सुरक्षा रक्षक नियुक्ती आणि शाळा, महाविद्यालये व वसतिगृहात नियुक्त कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी आदी बाबींविषयी जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सूचना दिल्या. तसेच या सूचनांची आठ दिवसात अंमलबजावणी करून अहवाल सादर करावा. यापुढे शाळा, वसतिगृह यांची अचानकपणे तपासणी करून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी होत असल्याची खात्री करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाल्या.

राज्य शासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहात करावयाच्या उपाययोजनांबाबत नियमावली जाहीर केली आहे. ही नियमावली सर्वांसाठी बंधनकारक असून यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा झाल्यास संबंधित संस्थेला जबाबदार धरण्यात येईल. तसेच प्रत्येक शाळांनी ‘सिक्युरिटी ऑडिट’ करून घ्यावे. जेणेकरून विद्यार्थ्यांच्या दृष्टीने संभाव्य धोक्यांवर वेळीच उपाययोजना करणे शक्य होईल. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे चालक, मदतनीस, शाळेतील, वसतिगृहातील कर्मचारी, भोजन व्यवस्था पाहणारे ठेकेदार व कर्मचारी यांची चारित्र्य पडताळणी करणे आवश्यक असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सांगितले.

प्रारंभी उपजिल्हाधिकारी श्रीमती गाठाळ, शिक्षणाधिकारी श्री. मापारी, समाज कल्याण सहायक आयुक्त श्री. चिकुर्ते आणि तहसीलदार श्री. तांदळे यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने उपस्थितांना मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील महाविद्यालयांचे प्राचार्य, वसतिगृह अधीक्षक, गृहपाल यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीला प्रत्यक्ष व दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
*****

*दसरा महोत्सव - दुधीया हनुमान मंदिर - दुपारी ठीक तीन वाजता - दिनांक 12 ऑक्टोंबर 2024 रोजी देवाच्या गाण्यावर डीजेच्या ताल...
09/10/2024

*दसरा महोत्सव - दुधीया हनुमान मंदिर - दुपारी ठीक तीन वाजता - दिनांक 12 ऑक्टोंबर 2024 रोजी देवाच्या गाण्यावर डीजेच्या तालावर प्रभू श्रीराम यांचा जयघोष करत तालुका क्रीडा संकूलन दसरा मैदान येथे आपणास रावण दहन करण्यास जायचं आहे .

03/10/2024
मा.ना.श्री संजय भाऊ बनसोडे यांच्याकडून लाडक्या बहिणीस राखी पौर्णिमेचे सप्रेम भेट...तालुक्यातील प्रत्येक महिला बचत गटास स...
17/08/2024

मा.ना.श्री संजय भाऊ बनसोडे यांच्याकडून लाडक्या बहिणीस राखी पौर्णिमेचे सप्रेम भेट...
तालुक्यातील प्रत्येक महिला बचत गटास संजयजी बनसोडे साहेब यांच्याकडून लाडक्या बहिणीस राखी पौर्णिमेनिमित्त भेट देण्यात आली आहे.तरी देवर्जन गावातील महिलांचे 54 गट असून त्या गटात 648 महिला आहेत तरी त्यांना ही सप्रेम भेट देण्यात आली आहे यावेळी उपस्थित सरपंच अभिजीत साकोळकर विनोद रोडगे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते...

Address

Pune
111045

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swaraja maza posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share