Prajwal Digital Services

Prajwal Digital Services B.Sc.agri. , Online Service, Ph.D. thesis, Bsc.Agriculture Project, Blogging, digital Advertisin

30/03/2024

भारत
सरकार,
कार्मीक लोक शिकायत तथा पेन्शन मंत्रालय कार्मिक प्रशिक्षण विभाग, कर्मचारी
चयन आयोग, नवी दिल्ली यांचेकडून सदर कनिष्ठ अभियंता (सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल) या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार विविध
आस्थापनेवरील पदांसाठी पात्रताधारक उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात
येत आहेत.तरी इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांनी कनिष्ठ अभियंता पदासाठी विहित
मुदतीत अर्ज भरून घ्यावा.

स्टाफ
सिलेक्शन भरतीच्या एकूण 968 जागा

कनिष्ठ
अभियंता - i) सिव्हिल, ii)
मेकॅनिकल, iii) इलेक्ट्रिकल

शैक्षणिक
पात्रता काय आहे?

कनिष्ठ
अभियंता (सिव्हिल,
मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल) यामध्ये
डिप्लोमा किंवा पदवी अर्हता प्राप्त व्यक्ती या पदासाठी करू शकतील. अधिक
माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पहावी.

ऑनलाइन
शुल्क किती आहे ?

प्रत्येक
अर्जास 100 रुपये शुल्क असणार आहे. Bhim ॲप किंवा UPI द्वारे या पेमेंट करू शकतात.

पदासाठी
वयोमर्यादा किती आहे ?

सर्वसाधारणपणे
उमेदवाराचे वय 01/08/2024 पर्यंत 30 वर्षे
किंवा त्यापेक्षा कमी असावे.

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाइन अर्ज करा

अर्ज
करण्याची अंतिम तारीख : 18 एप्रिल 2024

http://www.pdslatur.in/2024/03/Staff-Selection-Commission-Recruitment-2024.html

30/03/2024

Police
Bharti Recruitment-2024 अंतर्गत राज्य पोलीस आयुक्त,
पोलीस अधीक्षक कार्यालय, राज्य राखीव दलांमार्फत
पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई, सशस्त्र
पोलीस शिपाई याकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज करण्याची
तारीख 31 मार्च 2024 पर्यंत
होती. मात्र ऑनलाइन अर्ज करण्यास येणाऱ्या वारंवार तांत्रिक अडचणी लक्षात घेता व
पोलीस भरती पासून कोणताही पात्र उमेदवार वंचित राहू नये. यासाठी Police
Bharti Recruitment पोलीस भरती 2024, अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ 15 एप्रिल 2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

तरी
इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांनी पोलीस भरती २०२४ करिता ऑनलाईन अर्ज विहित
मुदतीत भरून घ्यावा. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात व अधिकृत संकेतस्थळाला भेट
द्यावी.

Police
Bharti साठी वयोमर्यादा काय आहे?

1) खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय 18 ते 28 वर्षे पर्यंत असावे.

2) मागास प्रवर्गातील उमेदवाराचे वय 18 ते 33 वर्षे पर्यंत असावे.

Police
Bharti ऑनलाइन शुल्क किती आहे?

1) खुला प्रवर्ग 450 रुपये

2) मागास प्रवर्ग 350 रुपये

Police
Bharti 2024 अर्ज करण्याची अंतिम तारीख किती आहे?

15 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज करता येईल.

अधिक
माहितीसाठी संपर्क

प्रज्वल
डिजिटल सर्विसेस, नेताजी नगर, लातूर

http://www.pdslatur.in/2024/03/Police-recruitment-2024-deadline-to-apply-again.html

26/03/2024

धाराशिव
येथील तुळजापूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान असून हे खूप
प्राचीन देवस्थान व धार्मिक पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणी विविध पदे सरळसेवेने
भरण्यासाठी जाहिरात क्रमांक 01/2024 अन्वये प्रसिद्ध
करण्यात आली आहे. त्यानुसार विविध पदे व शिपाई पदे विहीत कार्यपध्दतीचा अवलंब करुन
सरळ सेवेने भरण्यासाठी जाहिरातीत नमूद केलेप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची
पुर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. दि.
२३/०३/२०२३४ पासून ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया चालू आहे.

जाहिरातीत
नमूद केलेले पदाची नावे

श्री
तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर जि. धाराशिव मार्फत सहाय्यक
व्यवस्थापक (धार्मिक), नेटवर्क इंजिनिअर, हार्डवेअर इंजिनिअर, सॉफ्टवेअर इंजिनिअर, लेखापाल, जनसंपर्क अधिकारी, अभिरक्षक,
भांडारपाल, सुरक्षा निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी,
सहाय्यक सुरक्षा निरीक्षक, सहाय्यक स्वच्छता
निरीक्षक, प्लंबर, मिस्त्री, वायरमन, लिपिक-टंकलेखक, संगणक
सहाय्यक, शिपाई इ. पदे रिक्त आहेत.

शैक्षणिक
पात्रता : शैक्षणिक
पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

वयोमर्यादा
किती आहे : 18 ते 30 वर्षे

ऑनलाईन
अर्ज करण्याचा शुल्क :

खुला प्रवर्ग
(विनाआरक्षित) रु. 1,000/-

मागास
प्रवर्ग (आरक्षित) रु. 900/- GST अतिरिक्त
लागेल.

जाहिरात
पहा

अर्ज करण्याची वेबसाईट



अधिकृत वेबसाईट

अर्ज
करण्याची शेवटची तारीख: 12 एप्रिल 2024

http://www.pdslatur.in/2024/03/shri-tuljabhavani-temple-trust-bharti-2024.html

24/03/2024

आजकाल धावपळीच्या जीवनामध्ये संगणक व इंटरनेटचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. याचा विचार करता नवीन तंत्रज....

23/03/2024

महाराष्ट्र
राज्य पोलीस भरती २०२४ अंतर्गत पोर्टलवर विविध पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने उमेदवाराकडून
अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे. अनेक उमदेवार त्यांच्या पात्रतेनुसार
वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज करीत आहेत. नवीन नोंदणी करतांना उमेदवारांना व संगणक
चालकांना अनेक अडचणी व समस्या निर्माण होत आहेत. याविषयी अधिकृत संकेतस्थळाचा आधार
घेऊन माहिती देण्यात येत आहेत.

पोलीस
भरती-२०२४, अर्ज करण्यापूर्वी या बाबींकडे लक्ष द्या

1) कृपया अर्जदारांनी नोंदणी करतांना आपला वैध तसेच सध्यस्थितीत कार्यरत
असलेला आणि आपण वापरत असलेला ईमेल आय. डी. आणि मोबाईल क्रमांक नमूद करावा.

2) नोंदणी प्रक्रिये दरम्यान
यामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

3) अर्जदारांनी एका पदाकरीता
एकापेक्षा जास्त अर्ज करु नयेत याचे पडताळणीसाठी आधार क्रमांक अनिवार्य केलेला
आहे.

4) त्यामुळे उमेदवारांनी माहिती
भरताना उचित दक्षता बाळगावी.

वरील सूचना अद्यावत असून अधिकृत संकेतस्थळावरून
घेण्यात आलेल्या आहेत.

नोंदणी करतांना वारंवार येणाऱ्या अडचणी व उपाय

ई-मेल
OTP
येत नाही ?

नोंदणी
करतांना उमेदवाराने अचूक ईमेल आयडी प्रविष्ठ करावा. चुकीचा व कॅपिटल टाकल्यास
नोंदणी होत नाही. चुकीच्या ईमेलवर कन्फर्मेशन लिंक जाऊ शकते. यामुळे तुम्हांला जोपर्यंत
ईमेल कन्फर्मेशन होत नाही तोपर्यंत अर्ज करता
येत नाही. यामुळे आपण ईमेल आयडी अद्यावत चालू देणे बंधनकारक आहे.

अर्ज
नोंदणी यशस्वी पूर्ण होत नाही ?

एखाद्या
उमेदवाराने ईमेल, मोबाईल व आधार टाकून चुकीच्या पद्धतीने नोंदणी झाल्यास किंवा
ईमेल कन्फर्मेशन यशस्वी पूर्ण न झाल्यास तुम्हांला पोलीस भरतीसाठी अर्ज करता येणार
नाही. याविषयी सविस्तर अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे.

पासवर्ड
विसरल्यास Forgot न होणे ?

नोंदणी
करतांना योग्य व अचूक ईमेल आयडी व मोबाईल देणे अत्यंत गरजेचे आहे. आपण जर ईमेल व
मोबाईल चुकीचा दिल्यास नोंदणी होईल व पासवर्ड Forgot होणार नाही याची नोंद
घ्यावी. यामुळे अचूक पासवर्ड नोंदणी वेळी देण्यात यावा. उदा. Lat@2024

युजरनेम
विसरल्यास Forgot न होणे ?

नोंदणी
करतांना योग्य व अचूक ई-मेल आयडी व मोबाईल देणे अत्यंत गरजेचे आहे. अर्ज करतांना
तुमचा ईमेल आयडी हा युजरनेम असतो. आपण जर ईमेल चुकीचा दिल्यास नोंदणी होईल पण
युजरनेम Forgot
करता येणार नाही याची नोंद घ्यावी. यामुळे अचूक युजरनेम नोंदणी वेळी
देण्यात यावा. उदा. [email protected]

आधार
नंबर एकदा नोंदणीकृत झाल्यास नोंदणी होते का ?

नाही,
जर आपण एक ईमेल एका अर्जास वापरल्यास दुसऱ्यांदा नोंदणी तुम्हांला करता येणार
नाही.

एखादा
नोदंणी केल्यास किती अर्ज करता येतील.

आपण
जर एका ईमेल, एका मोबाईल व आधार नंबर ने नोंदणी केल्यास आपल्या फक्त एकच पदासाठी अर्ज
करता येईल. उदा. पोलीस शिपाई, ड्रायव्हर म्हणजेच एका एका पदांसाठी व एका विभागात
एकदाच अर्ज करता येईल. एकाच पदांसाठी वेगवेगळ्या विभागात अर्ज करता येणार नाही.

पोलीस
भरती नोंदणी, शुल्काबाबत विवरण

1) अर्ज सुरु होण्याची तारीख

05-03-2024
00.00 वा.

2) अर्ज बंद होण्याची तारीख

31-03-2024
24.00 वा.

3) ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख

31-03-2024
24.00 वा.

सूचना
डाऊनलोड करा

अधिक
माहितीसाठी संपर्क :

प्रज्वल
डिजीटल सर्व्हिसे, नेताजी नगर, लातूर, महाराष्ट्र-४१३५१२

श्री.
किशोर ससाणे, मो.नं. ९६८९६४४३९०, ०२३८२-२२२२९०

http://www.pdslatur.in/2024/03/State-police-recruitment-2024-instructions.html

20/03/2024

Border
Security Force (BSF) सीमा सुरक्षा दल-२०२४
अंतर्गत विविध पदांच्या एकूण ८२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या
उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सीमा
सुरक्षा दल (BSF) मार्फत पात्रताधारक उमेदवाराने खालील
दिलेल्या पदानुसार आवश्यक असणा-या शैक्षणिक पात्रतेचा विचार
करून उक्त पदांसाठी विहित मुदतीत अर्ज भरून घ्यावा.

BSF
(Border Security Force) विविध पदे

सीमा
सुरक्षा दल (BSF) अंतर्गत असिस्टंट एअरक्राफ्ट मेकॅनिक,
असिस्टंट रेडिओ मेकॅनिक, कॉन्स्टेबल
(स्टोअरमन), सब-इन्स्पेक्टर (वर्क), जेई
(इलेक्ट्रिकल), प्लंबर, हेड कॉन्स्टेबल
सुतार, कॉन्स्टेबल (जनरेटर ऑपरेटर), जनरेटर
मेकॅनिक व लाइनमन पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत.

अर्जाची अंतिम तारीख :

दिनांक ११ एप्रिल २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

BSF पदांसाठी शैक्षणिक पात्रता

पदांनुसार
सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

जाहिरात डाऊनलोड

ऑनलाईन अर्ज

http://www.pdslatur.in/2024/03/border-security-force-bharti.html

17/03/2024

रेल्वे भर्ती बोर्ड रेल्वे मंत्रालय, भारत सरकार (RRB) अंतर्गत 2014 मध्ये भारतीय रेल्वे आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 9144 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९१४४ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

तंत्रज्ञ ग्रेड 1 (Technician-i)

या पदासाठी इलेक्ट्रिशन पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण अभ्यासक्रम प्रमाणपत्र उत्तीर्ण व टेक्निशियन मध्ये अनुभव असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येईल.

तंत्रज्ञ ग्रेड 2 (Technician-ii)

या पदासाठी इलेक्ट्रिशन पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण अभ्यासक्रम प्रमाणपत्र उत्तीर्ण व टेक्निशियन मध्ये अनुभव असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येईल.

तंत्रज्ञ ग्रेड 3 (Technician-iii)

शासकीय व निमशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील मान्यताप्राप्त डिप्लोमा प्रमाणपत्र किंवा इलेक्ट्रिशन पदवी किंवा डिप्लोमा धारक पात्र उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येईल.

ऑनलाइन शुल्क

1) आरक्षित मागास प्रवर्ग 250 रुपये

2) खुला प्रवर्ग (open) 350 रुपये

उमेदवारांसाठी हेल्पडेस्क (Helpdesk)

केवळ या पोर्टलच्या तांत्रिक समस्यांशी संबंधित प्रश्नांसाठी.

९५९२-००१-१८८/ ०१७२-५६५-३३३३

[email protected]

(सकाळी 10:00 ते संध्याकाळी 5:00)

जाहिरात पहा

ऑनलाइन अर्ज करा

ऑनलाइन अर्ज करण्यास संपर्क

प्रज्वल डिजिटल सर्व्हिसेस, लातूर

मो. न. 9689644390

http://www.pdslatur.in/2024/03/indian-railway-requirement-2024.html

13/03/2024

कृषी सेवक
भरती परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी महाराष्ट्र कृषी विभाग यांनी
संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार परीक्षा दिलेल्या उमेदवाराने
त्यांची नावे सर्च करून त्यांना कृषी सेवक परीक्षेत मिळालेल्या गुण पाहता येतील.

कृषी
सेवक परीक्षाचा निकाल कसा पहावा ?

उमेदवाराने
ज्या विभागात कृषी सेवक पदांसाठी अर्ज केलेला आहे व परीक्षा दिलेली आहे त्यानुसार
त्यांनी विभागनिहाय पीडीएफ फाईल डाऊनलोड करून ओपन करावी व त्यामध्ये आपले नाव सर्च
किंवा रजि.नंबर द्वारे प्राप्त झालेले गुण पहावे. खालील प्रमाणे कृषी सेवक सर्वसाधारण
(Basic
Score) गुणवत्ता यादी विभाग निहाय शोधावी.

१) पुणे विभाग कृषी सेवक गुणवत्ता यादी २०२४

2) कोल्हापूर विभाग कृषि सेवक गुणवत्ता यादी २०२४

3) कोंकण विभाग- ठाणे कृषी सेवक गुणवत्ता यादी २०२४

4) कोंकण विभाग ठाणे कृषी सेवक गुणवत्ता यादी २०२४

5) लातुर विभाग कृषी सेवक गुणवत्ता यादी २०२४

अधिक माहितीसाठी:

कृषी सेवक भरतीच्या सर्वसाधारण
(Basic
Score) गुणवत्ता यादी पाहण्यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या
संकेतस्थळाला https://krishi.maharashtra.gov.in भेट द्यावी.

http://www.pdslatur.in/2024/03/krishi-sevak-basic-merit-list-2024.html

11/03/2024

Police bharti 2024 ही दहावी व बारावी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी निर्माण झालेली आहे. राज्यातील विविध पोलीस आयुक्त/ पोलीस अधीक्षक कार्यालय/ राज्य राखीव दलाच्या अंतर्गत असलेल्या पोलीस घटकातील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई आणि सशस्त्र पोलीस शिपाई पदांच्या एकूण १४२९४ जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

पोलीस भरती 2024 शैक्षणिक पात्रता काय आहे?

पात्रता धारक उमेदवार इयत्ता बारावी (एच.एस.सी.) परीक्षा उत्तीर्ण असावा. (मूळ जाहिरात पाहावी.)

Police bharti 2024 करिता वयोमर्यादा कशी आहे

1) खुल्या प्रवर्गातील वय १८ ते २८ वर्षे

2) मागासवर्गीय प्रवर्गातील वय १८ ते ३३ वर्षे दरम्यान असावे.

पोलीस भरती 2024 करिता फीस किती आहे ?

1) खुल्या प्रवर्ग Rs.४५०/- रुपये

2) मागासवर्गीय प्रवर्ग Rs.२५०/- रुपये फीस आहे.

Police bharti 2024 अर्ज करण्याची तारीख

दिनांक ५ मार्च २०२४ पासून दिनांक ३१ मार्च २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

पोलीस भरती 2024 करिता वारंवार विचारले जाणारे प्रश्न

पोलीस भरतीसाठी अर्ज कसा करावा?

पात्रता धारक उमेदवारांनी सर्व जाहिरात व्यवस्थित वाचून मजकूर समजून घेऊन संबंधित ऑनलाईन फॉर्म भरणा सेंटर किंवा तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊन ऑनलाईन फॉर्म भरावयाचा आहे. अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहावी.

पोलीस भरतीसाठी कोणत्या जिल्ह्यात जागा जास्त आहेत?

उमेदवाराने त्यांच्या स्थानिक किंवा त्यांच्या प्रवर्गनिहाय असलेल्या जागेचा विचार करून पोलीस भरतीसाठी जिल्हा निवडावयाचा असून त्यानंतर अर्ज करावयाचा आहे.

मागासवर्गीय उमेदवारास पोलीस शिपाई पदासाठी अर्ज करता येईल का?

होय मागासवर्गीय उमेदवारांना पोलीस भरती 2024 मध्ये नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झालेली आहे गरजू उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. बहुतांश जिल्ह्यामध्ये चांगल्या जागा रिक्त आहेत.

पोलीस भरती परीक्षा कशी राहील?

ऑनलाइन अर्ज केल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या ईमेल किंवा मोबाईल द्वारे परीक्षा बाबत सूचना कळविण्यात येतील त्या उपयोगी परीक्षेचे स्वरूप जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात वाचून पहावी.

पोलीस भरतीसाठी मैदान व इतर शारीरिक बाबी कशा असाव्यात?

पोलीस भरती 2024 अंतर्गत नमूद केलेल्या जाहिरातीमध्ये उमेदवाराचे ग्राउंड व इतर शारीरिक बाबी विषयी सविस्तर माहिती देण्यात आलेले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क

प्रज्वल डिजिटल सर्विसेस, नेताजी नगर, लातूर

mo. No. 9689644390

http://www.pdslatur.in/2024/03/Police-bharti-2024-apply-online-form.html

11/03/2024

महाराष्ट्र
राज्य महावितरण कंपनी (MSEDCL) अंतर्गत दि. २९/१२/२०२३ रोजी
जाहिरात क्र. ०६/२०२३ प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार बऱ्याच काळ प्रतीक्षा
केल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी संकेतस्थळावर लिंक उपलब्ध झाली आहे. सदर
ऑनलाईन भरतीचे फॉर्म IBPS कंपनीकडून भरण्यात येत आहेत. पात्रता
धारक उमेदवाराने जाहिरातीत नमूद केल्यानुसार त्यांच्या शैक्षणिक पात्रता व अनुभव
याचा विचार करून अर्ज करावयाचा आहे. अनुभवी उमेदवारास प्राधान्य राहील.

विद्युत सहाय्यक पदांच्या एकूण जागा- ५३४७

अर्ज करण्‍याची अंतिम तारीख- 20
मार्च 2024 पर्यंत आहे.

ऑनलाईन शुल्क - खुला प्रवर्ग २५०/- रुपये तर मागास
प्रवर्ग १२५/- व दोन्ही चलनास जी.एस.टी. वेगळा राहील.

विद्युत सहाय्यक पदांसाठी शैक्षणिक पात्रता
:

१) आधारकार्ड /पॅनकार्ड/ Driving License

2)
तहसीलदार रहिवासी प्रमाणपत्र /नॅशनिलीटी

3)
जातीचा दाखला /नानॅ क्रिमिलेअर

4)
दहावी, बारावी व पदवी गुणपत्रक (कलर)

4)
विद्युत सहाय्यक पदास वर नमूद पदानुसार आवश्यक कागदपत्रे.

5)
आय.टी.आय. किंवा डिप्लोमा /पदवी प्रमाणपत्र

6)
पासपोर्ट साईज (3.5cm x 4.5cm) फोटो

7)
अर्जदाराची सही (140 x 60) २० kb

8)
ई-मेल आयडी व मोबाईल नंबर

9)
Thumb उजाव्या हाताचा अंगठा

10)
Deceleration स्वयंघोषणापत्र हाताने लिहून

ऑनलाईन जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा

अधिक माहितीसाठी संपर्क

Prajwal
Digital Services, पशुसंवर्धन गेट नं. 2, केशवराज
शाळा रोड, नेताजी नगर, लातूर Contact:
9689644390 Email: [email protected]

आपल्या
मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

http://www.pdslatur.in/2024/03/Vidyut-sahayyak-bhart-2024.html

01/03/2024

ग्रामीण
भागातील तरूणांना रोजगाराची चांगली संधी Modern Dairy Development
And Veterinary Association (MDDVA) माध्यमातून निर्माण झालेली आहे.
विशेष बाब म्हणजेच पशुवैद्यकीय क्षेत्रात करिअर घडू इच्छिणाऱ्या उमेदवारांना चालू
आर्थिक वर्षांत रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेली आहे. यामुळे तरूणांना रोजगार मिळेल
व त्यांना उज्जवल जीवन समृद्ध करण्याच्या उद्देशाने (MDDVA) हा
उपक्रम राबविण्यात येत आहे.

MDDVA म्हणजे काय आहे ?

पशुवैद्यकीय
औषधे,
जैविक उत्पादने, वैद्यकीय उपकरणे, आपल्या देशाचा अन्न पुरवठा फेडरल एजन्सी प्रमाणित करण्यात आली आहे. Modern
Dairy Development And Veterinary Association (MDDVA) आंतरराष्ट्रीय
मानकीकरण संस्था प्रमाणित नियंत्रित संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी, वित्तपुरवठा करण्यासाठी आणि समर्थन करण्यासाठी कॉर्पोरेट मंत्रालयामार्फत
प्रमाणित, Modern Dairy Development And Veterinary Association (MDDVA) च्या निर्मितीचे मूळ हे आहे की सामाजिक-आर्थिक प्रगती होण्यास प्रेरित
करून सेवा आणि आर्थिक सहाय्य पुरविणे.ग्राहक उत्पादन सुरक्षा आयोग नोंदणीकृत आहे.

MDDVA अंतर्गत विविध पदे, पात्रता व निकष :

MDDVA मार्फत विविध पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने पात्रताधारक उमेदवाराकडून फॉर्म
भरण्याची प्रक्रिया चालू केली आहे. सदर Modern Dairy Development And
Veterinary Association (MDDVA) मार्फत खालील प्रमाणे पदांची भर्ती
केली जाणार आहे.

1. पशुवैद्यकीय अधिकारी

कामाचे
स्वरूप :- पशुधन विकासाशी संबंधित बाबींवर समर्थन प्रदान
करापशुधनातील बॅकस्टॉप कार्यक्रम आणि प्रकल्प पशुधनाला सामुदायिक व्यवसाय म्हणून
प्रोत्साहन देणे.

शैक्षणिक
पात्रता : पशुवैद्यकीय विज्ञान, पशु
उत्पादन/विज्ञानातील प्रगत विद्यापीठ पदवी , संबंधित पशु
आरोग्य किंवा उत्पादन विषयातील पदव्युत्तर पदवी.

2. सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी

कामाचे
स्वरूप:-काम, प्रकल्प, उत्पादने आणि/किंवा सेवांच्या कार्यक्रमांचे नियोजन, अंमलबजावणी/ वितरण आणि देखरेख करण्यास समर्थन देण्यासाठी तांत्रिक,
विश्लेषणात्मक, देखरेख आणि अहवाल फ्रेमवर्क
आणि संबंधित पद्धती, साधने, प्रणाली
आणि डेटाबेस इ. विकसित करते.

शैक्षणिक
पात्रता : पशुवैद्यकीय विज्ञान पदविका, पशु उत्पादन/विज्ञानातील प्रगत विद्यापीठ पदविका , संबंधित
पशु आरोग्य किंवा उत्पादन विषयातील पदव्युत्तर पदविका, डिप्लोमा इन व्हेटरनरी
मेडिसिन,पशुसंवर्धन डिप्लोमा,संबंधित
पदविका.

3. डेअरी टेक्नॉलॉजिस्ट

कामाचे
स्वरूप:-भूमिका आणि जबाबदाऱ्यागुणवत्ता प्रमुख आणि
प्रयोगशाळा प्रभारी, दूध आणि इतर कच्च्या मालाच्या
गुणवत्तेसाठी जबाबदार.

विभाग:-
अन्न तंत्रज्ञान ,उत्पादन ,दुग्धव्यवसाय
,अन्न प्रक्रिया

शैक्षणिक
पात्रता : फूड टेक्नॉलॉजी, B.Sc, MS/M.Sc (विज्ञान)
अन्न तंत्रज्ञान, दुग्ध तंत्रज्ञान, MA,BA,कोणत्याही शाखेत पदविका /पदवीदर/ITI.

4. अन्न सुरक्षा (गुणवत्ता अधिकारी)

कामाचे
स्वरूप:- पाणी, जैवतंत्रज्ञान,
अन्न प्रक्रिया, गुणवत्ता व्यवस्थापन, पूर्ण, प्रयोगशाळा, व्यवस्थापन
प्रणाली ,गुणवत्ता हमी ,ऑपरेशन्स
व्यवस्थापन

शैक्षणिक
पात्रता : 12th/कोणत्याही शाखेत पदविका /पदवीदर/B.Pharma/DPharma/MPharma.

5. पशुविमा अधिकारी

कामाचे
स्वरूप:- अंडररायटिंग मंजूरी मिळविण्यात मदत करणे. ग्राहकांच्या प्रश्नांना आणि
तक्रारींना उत्तरे देणे. मीटिंगचा पाठपुरावा करणे.

शैक्षणिक
पात्रता : कोणत्याही शाखेत पदविका /पदवीधर.

6. वीर्य संकलन आणि एआय तंत्रज्ञ

कामाचे
स्वरूप:- वीर्य संकलन, कृत्रिम रेतन,
TVR आणि ET, पशुपालन आणि सामान्य शेती कर्तव्यांसह
पशु प्रजनन सेवा केंद्रावरील सर्व प्रजातींसाठी पशु व्यवस्थापनाच्या सर्व
पैलूंमध्ये मदत करणे.

शैक्षणिक
पात्रता : 10th/12th /कोणत्याही शाखेत पदविका
/पदवीदर.(कृत्रिम रेतन प्रशिक्षण विनामूल्य देण्यात येईल.

7. पशु आरोग्य प्रयोगशाळा तंत्रज्ञ

कामाचे
स्वरूप:- आमच्या अ‍ॅनिमल हेल्थ लॅब टीममध्ये तांत्रिक
कौशल्य आणि नेतृत्व प्रदान करण्यासाठी वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञांसाठी आमच्याकडे
एक उत्तम संधी आहे. ही भूमिका पशु आरोग्य प्रयोगशाळेत पीसीआर आणि एलिसा चाचणीसाठी
बोवाइन टिश्यू, दूध, रक्त आणि वीर्य नमुने
तयार करण्यासाठी आणि चाचणीसाठी जबाबदार असेल. तुम्ही समस्यानिवारण कराल, नवीन प्रक्रिया समाकलित कराल.

शैक्षणिक
पात्रता : DMLT/12th /कोणत्याही शाखेत पदविका /पदवीदर/ B.Pharma/
DPharma/ MPharma.

8. दूध वितरण चालक

कामाचे
स्वरूप:- जबाबदाऱ्यांमध्ये वाहने लोड करणे, वितरण मार्गांचे अनुसरण करणे, उत्पादनाची गुणवत्ता
राखणे आणि वितरण माहितीचे दस्तऐवजीकरण करणे समाविष्ट आहे.

आवश्यकता:-वैध
ड्रायव्हरचा परवाना आणि स्वच्छ ड्रायव्हिंग रेकॉर्डडिलिव्हरी वाहन सुरक्षितपणे
चालवण्याची क्षमता उत्कृष्ट वेळ व्यवस्थापन आणि संस्थात्मक कौशल्ये स्थानिक रस्ते
आणि शेजारचे ज्ञान.

9. डेअरी INFRASTRUCTURE / TECHNICAL DEPARTMENT ऑफिसर
/कॉम्पुटर तज्ञ

कामाचे
स्वरूप:- सेवेची गुणवत्ता, अपटाइम आणि
मिशन क्रिटिकल डिस्ट्रिब्युटेड सिस्टीमचे निरीक्षण सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक
सुरक्षा आणि व्यवस्थापन क्षमता प्रदान करतो .

शैक्षणिक
पात्रता : BCS/BCA/BE
MEech/BE Civil /ITI Any Relivent Field.

10. महिला/पुरुष बचत गट

कामाचे
स्वरूप:- बचत गट व्यवस्थापनासाठी जमा खर्च पत्रक, सभासद
पुस्तक (पासबुक), लेजर, हजेरी वही,
अहवाल वही (मिनिट बुक) अशा नोंद पत्रकाची आवश्यकता असते.

आवश्यकता:-
नोंदणीकृत बचत गट सदस्य.

11. दुध केंद्र/ संस्था

कामाचे
स्वरूप:- दूध संकलन,आधुनिक माहिती
प्रक्षेपण ,मिटिंग व्यवस्थापन व कार्य व्यवस्थापन.

आवश्यकता:-
खाजगी दूध केंद्र संचालक.

12. तक्रार विभाग

कामाचे
स्वरूप:- ग्राहकांच्या प्रश्नांना आणि तक्रारींना उत्तरे देणे.

शैक्षणिक
पात्रता : 10th/12th /कोणत्याही शाखेत पदविका /पदवीदर.

अर्ज
करण्यास लागणारी कागदपत्रे

१) अर्जदाराचे संपूर्ण नाव

2) अर्जदाराचा संपर्क पत्ता पिनकोडसह

3) मोबाईल नंबर व ईमेल आयडी

4) आधार कार्ड / मतदान कार्ड / ड्राईविंग लायसन

5) उमेदवाराचा कलर पासपोर्ट फोटो व सही

6) शैक्षणिक कागदपत्रे अंतिम वर्षांचे गुणपत्रक

7) शुल्क रू. 429 प्रति फॉर्म (विना
परतावा)

ऑनलाईन
अर्ज करा

https://moderndairydevelopmentandveterinaryassociationgov.com/careerf.php

अधिकृत
वेबसाईट

https://moderndairydevelopmentandveterinaryassociationgov.com/

अर्ज कोठे
करावा ?

http://www.pdslatur.in/2024/03/Modern-Dairy-Development-Veterinary-Bharti-2024.html

जिल्हा परिषद भरती-2023, सुपरवायझर पदाचे प्रवेश पत्र उपलब्ध
26/02/2024

जिल्हा परिषद भरती-2023, सुपरवायझर पदाचे प्रवेश पत्र उपलब्ध

Zilha Parishad Bharti 2023- सुपरवायझर पदाचे प्रवेशपत्र उपलब्ध

26/02/2024

जिल्हा परिषद भरती 2023 अंतर्गत विविध गट क संवर्गातील म्हणजेच सुपरवायझर (पर्यवेक्षक) पदांसाठी यापूर्वीच अर्ज मागविण्यात आले होते. ज्या उमेदवाराने सुपरवायझर पदासाठी अर्ज केलेला आहे. यांनाच सदर पदाचे हॉल तिकीट आयबीपीएस वेबसाईट द्वारे डाऊनलोड करता येतील.

सुपरवायझर पदाचे हॉल तिकीट डाउनलोड कसे करावे

तरी अर्ज केलेल्या उमेदवाराने हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यावे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी लिंक दिलेली आहे लिंक वर जाऊन हॉल तिकीट डाउनलोड करावे.

प्रवेश पत्र डाउनलोड करा

टीप: जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी उमेदवारांनी अर्ज भरलेले होते त्या अनुषंगाने गट-क संवर्गातील पदानुसार परीक्षा झालेल्या आहेत. सदर सूचना फक्त सुपरवायझर पदांसाठी आहेत.

http://www.pdslatur.in/2024/02/zilha-parishad-bharti-2023.html

16/02/2024

केंद्रीय लोकसेवा
आयोग (UPSC)
भरती- २०२४ अंतर्गत आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५० जागा
भरण्यासाठी जाहिरात दि. १४/०२/२०२४ रोजी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार पात्रताधारक
व अर्हताप्राप्त उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पद्धतीने
अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर पदासाठी उमेदवारास दि. ०५ मार्च २०२४ पर्यंत अर्ज
(Application Form) करता येईल.

एकूण जागा
: १५०

पदाचे नाव : भारतीय
वन सेवा परीक्षा

अर्ज करण्याची मुदत :

दि. ०५ मार्च २०२४ पर्यंत
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

UPSC फॉर्म भरण्यास हे कागदपत्रे आवश्यक :

१) आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड

2) कलर पासपोर्ट
फोटो व सही

3) राष्ट्रीयत्व
प्रमाणपत्र

4) रहिवासी
प्रमाणपत्र

5) आरक्षीत
प्रवर्गासाठी जात प्रमाणपत्र

6) पदानुसार शैक्षणिक
कागदपत्रे (दहावी, बारावी, पदवी गुणपत्रक)

7) याव्यतिरिक्त
ऑनलाईन फॉर्म मधील आवश्यक माहिती

वय मर्यादा किती असावी ?

उमेदवाराचे
वय 21 वर्षे पूर्ण झालेले असावे. 1 ऑगस्ट, 2024 रोजी 32
वर्षे, म्हणजेच त्याचा जन्म 2 ऑगस्टच्या आधी झालेला नसावा,
1992 आणि 1 ऑगस्ट 2003 नंतर नाही.

विनामुल्य वय मोजा (Age Calculate)

जाहिरात डाऊनलोड

उमेदवाराने अधिक माहितीसाठी
मूळ जाहिरात डाऊनलोड करावी.

अधिकृत वेबसाईट

ऑनलाईन अर्ज

आपल्या
मित्रांना केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) भरती २०२४, असा
करा अर्ज ही बातमी शेअर करायला विसरू नका !!!

http://www.pdslatur.in/2024/02/upsc-recruitment-2024-apply-online-form.html

15/02/2024

Latur MC Recruitment 2023, Admit कार्ड डाउनलोड करा

दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी लातूर शहर महानगरपालिका यांनी अ, ब व क श्रेणी आस्थापनेच्या एकूण 80 जागे करिता जाहिरात (क्रमांक 1) प्रसिद्ध केली होती. त्या अनुषंगाने 14 जानेवारी 2024 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज केलेल्या उमेदवारांना परीक्षा संदर्भात सूचना इमेल द्वारे प्राप्त झालेले आहेत.

लातूर महानगरपालिका भरती 2023 अंतर्गत महापालिकेच्या विविध पदांच्या आस्थापनेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांचे हॉल तिकीट डाउनलोड करता येतील.

अर्ज केलेल्या उमेदवारांनी त्यांचे हॉल तिकीट डाउनलोड करून परीक्षा द्यावयाची आहे.

हॉल तिकीट कसे डाऊनलोड करावे?

1) सर्वप्रथम लातूर शहर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

2) वेबसाईट ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी जाहिरात बटनावर क्लिक करावी.

3) त्यानंतर लिंक ओपन होईल लिंक ओपन झाल्यानंतर लॉगिन या बटनावर क्लिक करावी अथवा खाली दिलेल्या लिंक वर भेट द्यावी.

4) फॉर्म भरताना आलेला मोबाईलवर किंवा ईमेल द्वारे आयडी आणि पासवर्ड त्यामध्ये टाकून हॉल तिकीट डाउनलोड करावयाचे आहे.

हॉल तिकीट डाउनलोड करा

अधिक माहितीसाठी संपर्क

प्रज्वल डिजिटल सर्विसेस, नेताजी नगर, लातूर

किशोर ससाने मो.न. 9689644390

http://www.pdslatur.in/2024/02/latur-mc-recruitment-2023-admit.html

15/02/2024

भारतीय
राज्यघटनेनुसार सर्व आरक्षित प्रवर्गासाठी शासकीय लाभ अथवा सवलत मिळण्यासाठी जात
प्रमाणपत्र (Cast Certificate in Marathi) अनिवार्य आहे. व्यक्तींची
जात ओळख ओखण्यासाठी सक्षम प्राधिकृत अधिकाऱ्यांनी निर्गमित केलेले जात प्रमाणपत्र असणे
बंधनकारक आहे. विविध घटकांसाठी आरक्षित प्रवर्गातील व्यक्तींना लाभ मिळण्यासाठी
जात प्रमाणपत्र (Cast Certificate in Marathi) आवश्यक आहे.

जात प्रमाणपत्राचे लाभ-Benefit of Caste
Certificate

1) सरकारी
नोकरीत आरक्षण मिळते.

2) शाळा-महाविद्यालयीन प्रवेश शुल्कात सूट मिळते.

3) उमेदवारास
निरनिराळ्या निवडणुका लढविण्यासाठी.

4) शासकीय
अथवा निमशासकीय शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतांना.

5) सरकारी
नोकरीत वयोमर्यादेत अतिरिक्त वयाची सूट मिळण्यासाठी.

6) सर्व
शासकीय शैक्षणिक शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी.

एकंदरीत
विचार केल्यास सर्व शासकीय लाभ मिळण्यासाठी जात प्रमाणपत्र अनिवार्य आहे.

वरील
सर्व बाबींचा विचार केल्यास सर्व सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि महत्वाचे
म्हणजे विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी त्‍यांचे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. जात
प्रमाणपत्र काढण्यासाठी पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत.

जात प्रमाणपत्रासाठी अनिवार्य कागदपत्रे :-

१)
रहिवाशी स्वंयघोषणापत्र

२)
शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड दाखला

३)
वडिलांचे कागदपत्रे

4) जातीचे
प्रमाणपत्र किंवा जातीचा पुरावा- नातेसंबंधातील
जातीचा दाखला असल्यास १०० रू च्या स्टॅम्प पेपवर कुटुंबाची वंशावळी नोकरीकृत

5) आधार
कार्ड व रेशन कार्ड झेरॉक्स

6)
मुलाचे कागदपत्रे

7) आधार
कार्ड झेरॉक्स

8) शाळा
सोडल्याचा दाखला ( टी.सी.) /प्रवेश
निर्गम उतारा / बोनाफाईड

9) कलर
पासपोर्ट फोटो

जात प्रमाणपत्र येण्यास कालावधी :
कार्यालयीन 15 दिवस.

जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज कोठे करावा ?

जात
प्रमाणपत्रासाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन तालुका तहसील कार्यालय किंवा महा-ई-सेवा
केंद्र अथवा आपले सरकार सेवा केंद्र इत्यादी ठिकाणी जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज
सादर करता येईल.

अधिक माहितीसाठी संपर्क

साबळे
आपले सरकार सेवा केंद्र, पशुवैद्यकीय दवाखान्या समोर, नेताजी नगर, लातूर

मो.नं.
7709582650

http://www.pdslatur.in/2024/02/caste-certificate-mandatory-documents-2024.html

Indian-Railway-Requirement-2024 तंत्रज्ञ पदासाठी अर्ज करता येईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 मार्च 2024 पर्यंत आहे.
15/02/2024

Indian-Railway-Requirement-2024 तंत्रज्ञ पदासाठी अर्ज करता येईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 मार्च 2024 पर्यंत आहे.

भारतीय रेल्वे आस्थापना भरती 2024, तंत्रज्ञ पदासाठी अर्ज करता येईल.

13/02/2024

Indian Railways Bharti 2024: भारतीय रेल्वे आस्थापना भरती 2024, तंत्रज्ञ पदासाठी अर्ज करता येईल. रेल्वे भर्ती बोर्ड (Railway Recruitment Board) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९०२० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज/ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत आठ मार्च 2024 अशी आहे.

इच्छुक उमेदवारांनी सदर पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करून पहावी.

विविध पदांच्या एकूण ९०२० जागा

तंत्रज्ञ ग्रेड I, तंत्रज्ञ ग्रेड II पदांच्या जागा ९०२० जागे करिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत l.

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

Railway recruitment जाहिरात पहा

www.indianrailway.gov.in

अर्ज करण्याची अंतिम मुदत:

8 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज करता येईल.

http://www.pdslatur.in/2024/02/2024.html

10/02/2024

नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र-Non-Cremy layer Certificate,नॉन क्रिमीलेअर साठी कागदपत्रे, नॉन क्रिमीलेअर साठी अर्ज कोठे करावा ?

10/02/2024

राज्यपुरस्कृत
विविध सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी, शासकीय नोकरी भरतीसाठी,
महाविद्यालयीन प्रवेश घेण्यासाठी, स्कॉलरशीप /शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी सर्व
विद्यार्थ्यांना शैक्षणिक व खाजगी कामासाठी
नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्राची गरज असते. नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (Non-Cremy
layer Certificate) काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्राची
माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.

नॉन
क्रिमीलेअर साठी कागदपत्रे :

१) रहिवाशी
स्वंयघोषणापत्र

२) बोनाफाईड
दाखला

३) वडिलांचे
कागदपत्रे

आधार कार्ड

रेशन कार्ड /शिधापत्रिका

उत्पन्न
प्रमाणपत्र (नॉन क्रिमीलअर करिता काढलेले तीन वर्षे)

४) मुलाचे
कागदपत्रे

आधार कार्ड /पॅनकार्ड

शाळा
सोडल्याचा दाखला (टी.सी.)

जातीचे
प्रमाणपत्र

पासपोर्ट कलर
फोटो

कालावधी
: कार्यालयीन 15 दिवस.

नॉन
क्रिमीलेअर साठी अर्ज कोठे करावा ?

नॉन क्रिमीलेअर
(Non-Cremy layer Certificate) प्रमाणपत्र काढण्यासाठी वरील सर्व कागदपत्रे घेऊन संबंधित तहसील कार्यालय
किंवा आपले सरकार सेवा केंद्र अथवा महा-ई-सेवा केंद्र येथे करता येईल.

अधिक
माहितीसाठी संपर्क ?

साबळे आपले सरकार
सेवा केंद्र, लातूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्या समोर, नेताजी नगर, लातूर

साबळे भिवराज
मो.नं. 7709582650

http://www.pdslatur.in/2024/02/non-cremy-layer-certificate.html

महाराष्ट्र अधिवास /रहिवासी प्रमाणपत्र - आवश्यक कागदपत्रे
09/02/2024

महाराष्ट्र अधिवास /रहिवासी प्रमाणपत्र - आवश्यक कागदपत्रे

तहसीलदार अधिवास/रहिवाशी प्रमाणपत्र - Tahsildar Domicile Certificate, तहसीलदार अधिवास/ रहिवाशीसाठी (Domicile Certificate) कागदपत्रे

तहसीलदार उत्पन्न दाखला-आवश्यक कागदपत्रे
09/02/2024

तहसीलदार उत्पन्न दाखला-आवश्यक कागदपत्रे

तहसीलदार उत्पन्न दाखला- Tahsildar Income Certificate, उत्पन्न दाखल्यासाठी (Income Certificate) अर्ज कोठे करावा ?

09/02/2024

महाराष्ट्रातील अधिवास अथवा रहिवाशी असल्याचे सिद्ध
करण्यासाठी, विविध शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी, नोकरीसंदर्भात अर्ज करण्यासाठी, भारत सरकार शिष्यवृत्तीचा
लाभ घेण्यासाठी आणि शालेय विद्यार्थी, पदवीधर व उच्च पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या
सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी व नागरिकांना खाजगी कामासाठी तहसीलदार यांनी
निर्गमित केलेल्या तहसीलदार अधिवास/रहिवाशी प्रमाणपत्र अत्यंत आवश्यक असते.

तहसीलदार अधिवास/ रहिवाशीसाठी (Domicile Certificate) कागदपत्रे :-

तहसीलदार अधिवास/रहिवाशी प्रमाणपत्र (Tahsildar
Domicile Certificate) मिळवण्यासाठी सर्वप्रथम खालील आवश्यक कागदपत्रे जाणून घेणे आवश्यक
आहे.

१) रहिवाशी स्वंयघोषणापत्र

२) शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड दाखला

३) तलाठी अहवाल

४) चालू सालचा घरचा उतारा किंवा सातबारा

५) रेशन कार्ड (झेरॉक्स)

तहसीलदार अधिवास/ रहिवाशी (Domicile Certificate) प्रमाणपत्राचा कालावधी :

विहित नमुन्यात ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज
केल्यानंतर कार्यालयीन ४ दिवस तहसीलदार अधिवास/ रहिवाशी दाखल्यासाठी लागतात.

तहसीलदार अधिवास/ रहिवाशी (Domicile
Certificate) साठी अर्ज
कोठे करावा ?

अर्जदाराने तहसीलदार अधिवास/ रहिवाशी प्रमाणपत्र काढण्यासाठी उक्त
सर्व कागदपत्रे घेऊन आपल्या तालुक्याच्या तहसील कार्यालय किंवा आपले सरकार सेवा
केंद्र किंवा महा-ई-सेवा केंद्र अथवा साबळे आपले सरकार सेवा केंद्र, लातूर येथील पशुवैद्यकीय
दवाखान्या समोर, नेताजी नगर, लातूर येथे करता येईल.

तहसीलदार अधिवास/रहिवाशी प्रमाणपत्र (Domicile Certificate) संपर्क ?

साबळे भिवराज मो.नं. 7709582650

http://www.pdslatur.in/2024/02/tahsildar-domicile-certificate.html

09/02/2024

तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला
(Tahsildar Income Certificate) मिळवण्यासाठी सर्वप्रथम खालील आवश्यक कागदपत्रे घेणे आवश्यक आहे. शासनाच्या
तसेच सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी, नोकरीसाठी, उत्पन्नाची पडताळणी करण्यासाठी,
भारत सरकार व इतर स्कॉलरशीप /शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी आणि शालेय विद्यार्थी,
पदवीधर व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी
तहसीलदार यांनी निर्गमित केलेला उत्पन्नाचा दाखला काढून घेणे अत्यंत आवश्यक असते.

उत्पन्न दाखल्यासाठी (Income
Certificate) आवश्यक
कागदपत्रे :-

१) रहिवाशी स्वंयघोषणापत्र

२) उत्पन्नाचा पुरावा तलाठी उत्पन्नाचा दाखला /
आयकर विवरण पत्र

३) पत्त्याचा पुरावा रेशनकार्ड झेरॉक्स / लाईट
बिल / कर पावती (कोणतेही एक)

४) ओळखीचा पुरावा पॅन कार्ड/ आधार कार्ड/ मतदान ओळखपत्र (कोणतेही एक)

कालावधी : कार्यालयीन ८ दिवस.

उत्पन्न दाखल्यासाठी (Income
Certificate) अर्ज
कोठे करावा ?

अर्जदाराने वरील कागदपत्रे घेऊन आपल्या
तालुक्याच्या तहसील कार्यालय किंवा आपले सरकार सेवा केंद्र किंवा महा-ई-सेवा
केंद्र अथवा साबळे आपले सरकार सेवा केंद्र, लातूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्या
समोर, नेताजी नगर, लातूर येथे करता येईल.

उत्पन्न दाखल्यासाठी (Income
Certificate) संपर्क ?

साबळे भिवराज मो.नं. 7709582650

http://www.pdslatur.in/2024/02/tahsildar-income-certificate.html

Address

Near Veterinary Hospital, Netaji Nagar Latur
Latur
413512

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+2382222290

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prajwal Digital Services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Prajwal Digital Services:

Share



You may also like