
12/01/2025
कोकणात सिने- मालिका सृष्टी आली पाहिजे हे आम्ही पाहिलेलं स्वप्न आता पूर्णत्वास होताना दिसतय. आजच्या घडीला वर्षभर सिनेमा, मालिका नाहीतर वेब सिरीजचे चित्रीकरण तळकोकणात चालूच असत. त्यामुळे ईथल्या अनेक कलाकार आणि तंत्रज्ञाना रोजगार आणि व्यवसायांना चालना मिळत आहे आणि आता फक्त मराठीच नाही तर मोठं मोठे बॉलीवूड सिनेमे सुद्धा आमच्या माध्यमातून तळकोकणात तितक्याच ताकदीने चित्रित होतायत. पण या साठी अजून तळ कोकणात कोणकोणते बदल झाले पाहिजेत हे माझ्या व्हिजन मधून मी दै. तरुण भारतच्या 41 व्या वर्धापन दिनानिमित्त पब्लिश झालेल्या महाराष्ट्र व्हिजन ह्या पुरवणी मधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे आपण सर्वांनी ही बातमी नक्की वाचा आणि आपला अभिप्राय कळवा...
“साई जळवी फिल्म्स”च्या प्रत्येक नवीन उपक्रमात अगदी खंबीर पाठीशी उभ्या असलेल्या दैं. तरुण भारत परिवाराचे आणि आमचे गुरू मित्र शेखर सामंत ( सिंधुदुर्ग - रत्नागिरी संवाद संपादक) यांचे खूप खूप आभार..