Mh07news

Mh07news जिल्हावासीयांच्या समस्या,व्यथा व भावना अगदी परखडपणे मांडणार आपलं हक्काचं न्युज पोर्टल "Mh07 News"

29/02/2024

शिक्षकानेच विद्यार्थ्याचा आवळला गळा...व्हिडीओ व्हायरल; प्रकार क्रुर,

https://kyanews.page.link/tzJn

Stay connected to your neighborhood's heartbeat!

YOUR area's news, VIP Announcements, offers, jobs, events and more.

Download Kyanews now!!

Story by: *MH07NEWS**आंबा पिकावरील थ्रिप्स रोगासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाच्या प्रश्नांवर आ. वैभव नाईक यांनी अधिवेश...
27/02/2024

Story by: *MH07NEWS*

*आंबा पिकावरील थ्रिप्स रोगासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाच्या प्रश्नांवर आ. वैभव नाईक यांनी अधिवेशनात उठविला आवाज*

https://kyanews.page.link/6xoF

Stay connected to your neighborhood's heartbeat!

YOUR area's news, VIP Announcements, offers, jobs, events and more.

Download Kyanews now!!

30/09/2023
10/08/2023

आंबलपाड उप सरपंच श्री. धिरेंद्र उर्फ गोटया चव्हाण यांची पत्रकार परिषद

10/08/2023

माजी खासदार निलेश राणे यांची पत्रकार परिषद

19/07/2023

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच शाळांना जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त असलेले अधिकारात उद्या 20 जुलै 2023 रोजी एक दिवसाची सुट्टी...

12/07/2023

आमदार नितेश राणे यांची आजची पत्रकार परिषद.....

सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी पंचवार्षिक निवडणूक प्रचार शिगेलाभाग्यलक्ष्मी सहकार पॅनल राजन कोरगावकर या...
12/05/2023

सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी पंचवार्षिक निवडणूक प्रचार शिगेला

भाग्यलक्ष्मी सहकार पॅनल राजन कोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली प्रचारात आघाडीवर

परिवर्तन पॅनलचे बॅनर प्रमुख सेवा संपलेले...

परिवर्तन पॅनलचे दोन उमेदवार सेवेची काही वर्ष शिल्लक असताना रिंगणात - राजन कोरगावकर

परिवर्तन पॅनलच्या मालवण तालुका संचालक पदाच्या उमेदवाराची सेवेची 4 वर्षे शिल्लक तर सावंतवाडी तालुका संचालक पदाच्या उमेदवाराची सेवेची 3 वर्ष शिल्लक..

हा तर शिक्षक मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न - राजन कोरगावकर

आमचा विजय निश्चित.... गुलाल आम्हीच उधळणार- राजन कोरगावकर

14 मे ला मतदान प्रक्रिया सकाळी 8 ते 4 यावेळेत पडणार पार,तर पंधरा मे ला होणार मतमोजणी

मतदारांनी भाग्यलक्ष्मी पॅनल ला बहुमताने विजयी करा- राजन कोरगावकर

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण ह्यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध वृत्...
04/05/2023

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण ह्यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना कुठल्याही प्रकारचे दौऱ्याचे किंवा कार्यक्रमाचे आमंत्रण दिले जात नाही.तसेच पालकमंत्री हे कोणताही संपर्क साधत नाहीत.यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्यावतीने पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या यापुढील सर्व दौरावर व कार्यक्रमावर बहिष्कार घालण्यात येत असल्याचा एकमुखी ठराव कणकवली येथील बैठकीत घेण्यात आला.

यापुढे पालकमंत्री यांच्या कोणत्याही दौरात व कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय यावेळी बैठकीत घेण्यात आला.यावेळी इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे राजन नाईक,महेश सावंत,विकास गावकर,विजय गावकर,विनायक वंजारी,सदाशिव लाड,सुरेश कौलगेकर,समिर महाडेश्वर,उमेश परब,प्रसाद पाताडे,भरत केसरकर, विशाल रेवडेकर आदी उपस्थित होते.

'त्या' गावात चक्क पायवाट झाली गायब..?सिंधुदुर्ग सिंधुदुर्गात ग्रामीण भागात देवचार त्याच्या वाटेआड कोणी आल्यास त्याला गाय...
03/05/2023

'त्या' गावात चक्क पायवाट झाली गायब..?

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गात ग्रामीण भागात देवचार त्याच्या वाटेआड कोणी आल्यास त्याला गायब करायचा अशी आख्यायिका ऐकिवात आहे... असाच एक प्रकार कुडाळ तालुक्यातील कडावल पंचक्रोशी मध्ये घडला आहे... मात्र 'या' गावात देवचाराने एखादी व्यक्ती गायब केली नसून.. चक्क 'त्या' ग्रामपंचायत मधील अंदाजे 65 हजार खर्च पडलेली पायवाट गायब झाली आहे.... मात्र ही पायवाट कोणी गायब केली याची चर्चा त्या गावांमध्ये जोरदार चर्चिली जात आहे.

शासकीय कामात कागदपत्रे, सर्वसामान्य नागरिकांचा एखादा अर्ज, विभागातून फाईल गायब होणे असे प्रकार ऐकिवात होते, मात्र एका ग्रामपंचायतीने संमती पत्राप्रमाणे, ग्रामस्थांच्या सहकार्याने 23 नंबरलाही लावण्यात आली होती. तर निविदा प्रक्रिया पूर्ण करून ठेकेदाराने निविदा प्रक्रियेनुसार पायवाटेसाठी सुमारे 65 हजाराचा निधी खर्चही केला.. मात्र ही पायवाट जागेवर दिसत नसल्याने.. ही पायवाट गायब झाली का म्हणून सुजाण नागरिकांनी तत्कालीन सरपंचास विचारणा ही केली... मात्र तत्कालीन सरपंचाकडून मिळालेली उडवाउडुची उत्तरे पाहता शेवटी माहितीच्या अधिकाराचा वापर करावा लागला... यावेळी समोर आलेली घटना ही अचंबित करणारी होती...

'त्या' ग्रामपंचायतच्या प्रशासनाच्या कारभाराबाबत या आधीही बरेच प्रश्न निर्माण करण्यात आले होते.. मात्र खर्च होऊनही ही पायवाट गायब झाली आहे.. त्यामुळे या प्रकरणाचे गौडबंगाल ते काय असा प्रश्न निर्माण झाला आहे... या सर्व प्रकारानंतर नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत ग्रामपंचायत समोर आंदोलनही केले होते ... यानंतर प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..

मात्र प्रशासन ती पायवाट शोधून देईल का? पायवाट चोरीस गेल्याप्रकरणी प्रशासक तत्कालीन सरपंचावर गुन्हा दाखल करेल का? असा प्रश्न या सर्व प्रकरणानंतर निर्माण झाला आहे.

29/04/2023

आमदार नितेश राणे यांची पत्रकार परिषद

भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून पोखरण येथे ओपन जिम मंजूर.पोखरण बौद्धवाडी ग्रामस्थांनी केली होती मागणी.रामचंद्र ...
16/04/2023

भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून पोखरण येथे ओपन जिम मंजूर.

पोखरण बौद्धवाडी ग्रामस्थांनी केली होती मागणी.

रामचंद्र घाडी | सिंधुदुर्ग

कुडाळ तालुक्यातील पोखरण बौद्धवाडी येथे ओपन जिम व्हावी यासाठी भाजपा ओरोस मंडलमागासवर्गीय सेलचे अध्यक्ष विनोद कदम यांनी भाजपा ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल यांच्या मार्फत भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांच्याजवळ पोखरण येथे ओपन जिम व्हावी यासाठी मागणी केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत निलेश राणे यांनी पोखरण बौद्धवाडीसाठी ओपन जिम मंजूर केली असून पोखरण येथील आनंद कदम यांच्या जागेत ही जिम साकारणार आहे. या जिमच्या उभारणी नंतर निलेश राणे यांच्या हस्ते या जिमचा लोकार्पण सोहळा होणार असून ही जिम उपलब्ध करून दिल्याबद्दल भाजपा नेते निलेश राणे व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री रवींद्र चव्हाण यांचे पोखरण बौद्ध विकास मंडळ पोखरण गाव शाखा, सावित्रीबाई महिला मंडळ पोखरण आणि ब्लू स्टार कला व क्रीडा मंडळ पोखरण यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

31/03/2023

*"मार्च एन्ड..!" अधिकाऱ्यांचा बागुलबुवा की वर्षभराची अनास्था..?*

◾===== 💡सर्च लाईट 💡=====◾

फेब्रुवारी महिना संपतो ना संपतो तोच प्रत्येक शासकीय कार्यालयात कोणत्याही कामासाठी जायचं म्हटलं की कर्मचाऱ्यांच्या गोतावळ्यातून एक शब्द अपचुक कानावर पडत असतो "मार्च एन्ड" ची लगबग..नंतर बघू ..!खेड्यापाड्यातून शासन दफतरी काखेला झोळी लावून कामासाठी गेलेल्या अर्धशिक्षित शेतकऱ्याला काय कळतो मार्च एन्ड..त्याला वाटत दिवाळी गणपती सारखा एखादा सणचं आहे जणू..त्यामुळे मागे परतणेच योग्य..! जाताना मात्र त्याच्या मनात प्रश्नांचा एकच काहूर की तिकिटाचे पैसे परत कुठून आणायचे..? कर्मचाऱ्यांना सण मात्र त्याच्यासाठी महिनाभराच्या काळोखच जणू..!
नक्की काय असतो हा मार्च एंड... जबाबदार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्षभर निधीवाटपात दाखवलेली अनास्था की कर्मचाऱ्यांच्या वर्षभर मानगुटीवर बसलेलं भूत मार्चमध्ये काय ते बघू..! सामान्य कष्टकरी माणसासाठी कोणताही सॊयर सुतक नसलेला प्रशासकीय व्यवस्थेचा बागूलबुवाच म्हणजे मार्च एन्ड..!काही ठराविक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे 11 महिने खोळंबलेली प्रशासकीय व्यवस्था नाईलाजास्तव मार्चच्या महिनाभर अगदी तहान भूख विसरून काम करताना दिसते. एरव्ही वर्षभर कार्यालयात पाऊल ठेवताच टपरीवर चहा प्यायला जाणे,कालांतराने नाश्ता बहाणा करून गप्पांची मैफल सजवणे.. परत दीड च्या सुमारास जेवण सुट्टी आलीच..मग अडीज नंतर काय ते कामाला खरी सुरुवात..मग मात्र कामाच्या तणावाखाली चहाची तलफ लागतेच त्यामुळे पाय परत टपरीच्या दिशेने धावणारच.. काही वेळानंतर सायंकाळी घराची ओढ..अशीच बहुतांश कर्मचाऱ्यांची दिनचर्या पहावयास मिळते. दिवसभराच्या या संपूर्ण भरगच्च नियोजनात मोबाईल हा देखील अविभाज्य घटक आहे हे ही विसरता काम नये.

दिवसांमागून दिवस जात असतात अन शेवटी मार्च उजाडतो.हळू हळू कामाचे तास पशु लागतात.एरव्ही अकरा महिने निद्रिस्त असलेला विभाग प्रमुख खडकन जागा होतो अन पुढे चालू होतात ते आदेश पर आदेश..! "फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश" अशी भावना घेऊन बंद कपाटात वर्षभराच्या मळ खात पडलेल्या फाइल्स उजेडात येऊ लागतात..वर्षभराचा दिनक्रम एकाएक बदलू लागतो.. कामाचा प्रचंड ताण वाढतो.मार्चच्या शेवटच्या आठवड्यात तर रात्री अकरा पर्यन्त कामकाज चालू लागते.कौटुंबिक गैरसोयी नकळतपणे निर्माण होऊ लागतात..निरागस मुलं नोकरदार आई वडिलांच्या येण्याकडे अगदी आस लावून बघत असतात..साहजिकच आई वडीलांमध्ये नैराश्याची भावना निर्माण होऊन चिडचिड होऊ लागते ज्याचा थेट परिणाम साहजिकच कामावर होवू लागतो. ही सर्व परिस्थिती वेळच्या वेळी न झालेल्या कामाचे परिणाम असतात; मात्र ह्याला तळागाळाचे कर्मचारी जबाबदार नसतात तर वर्षभर झोपलेले मंत्रालयीन वरिष्ठ अधिकारी कारणीभूत असतात. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत निधी राखून थेट ऐनवेळी वितरित केला जातो ज्यामुळे अखेरच्या क्षणांना मूळ उद्देश बाजूला राहून तो फक्त खर्ची पडणे एवढाच सीमित ठरतो.

हे सर्व काही टाळलं जाऊ शकतं जर प्रत्येक जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळ च्या वेळी आपली जबाबदारी पार पाडली तर.. हे सर्व काही चालू असताना एक गोष्ट मात्र नक्की की, मार्च महिन्यात अधिकारी कर्मचारी व ठेकेदारांची चांदी असते पण काम न झाल्याने परतलेल्या "त्या" कष्टकरी अतिसामान्य शेतकऱ्याकडे आपल्या कामासाठी महिनाभर वाट पाहण्या पलीकडे पदरात काहीच नसतं... डोक्यात एकच विचार तो फक्त परत यायचं कसं.. तिकिटाचे पैसे आणायचे कुठून.. एकूणच उद्याच्या चिंतेचा काळाकुट्ट काळोख..!

तूर्तास एवढंच..

प्रत्येक शासकीय अधिकाऱ्याने व कर्मचाऱ्याने आत्मपरीक्षण केल्यास..मार्च एन्ड दि एन्ड नक्की होईल याच अपेक्षेसह..🙏🏼

#प्रसाद गावडे✍🏻
☎️8275390875

कुडाळ :-भाजपचे प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ येथील नवीन एस. टी. बस आगार येथे शुक्...
06/03/2023

कुडाळ :-

भाजपचे प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ येथील नवीन एस. टी. बस आगार येथे शुक्रवार १७ मार्च रोजी सायं. ५ वा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित शिवगर्जना हे महानाट्य होणार असल्याची माहिती भाजपचे सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब व विशाल सेवा फाऊंडेशनचे विशाल परब यांनी कुडाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

25/02/2023

शिवगर्जना आता जिंकेपर्यंत लढायचं! या टॅगलाईन खाली उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कुडाळ तालुक्यात मेळावे आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला मार्गदर्शन करताना ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई.

23/02/2023

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यांच्या कामांना वेग आला आहे, मार्च अखेर तोंडावर असल्याने रस्ता पूर्ण...

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Mh07news posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mh07news:

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share