Ruturaj Ingale Vlogs

Ruturaj Ingale Vlogs "Vlogger sharing life's adventures one video at a time. Follow my journey on Facebook at Ruturaj Ingale Vlogs for travel, lifestyle, and everything in between!"

19/12/2024

मंडळी आम्ही मित्र बरेच दिवस जेवायला गेलो नव्हतो. मग जेवायला जायचं ठरलं. मग दिवसा कुठे जायचं असा विचार सुरू होता मग माझ्या एका मित्राने आम्हाला होटेल अशोका च नाव सांगितल. मला म्हंटला अशोका हॉटेल ची वेलकम थाळी खाऊन बघ एक नंबर आहे. मग म्हंटल असल कधी काय आपण ट्राय केलेलं नाही जाऊया म्हंटल.

दुपारी आम्ही बाहेर पडलो. मुंबई बँगलोर हायवेला विकासवाडी गावाजवळ हॉटेल अशोका मध्ये पोचलो. तिथे मग आम्ही वेलकम थाळी ची ऑर्डर दिली. सुरुवातीला आम्हाला चिकन पहाडी कबाब दिलं.

थोडावेळ गेल्यानंतर मग भली मोठी वेलकम थाळी आणली. मग आम्ही सगळ्यामधील थोडे थोडे पदार्थ घेतले. जेवण अप्रतिम होत चव खूपच भारी होती. मस्तपैकी पोटभर जेवलो सगळ्यांच पोट भरलं. मग राहिलेलं पार्सल घेतल आणि बाहेर पडलो.

तिथून मग आमचं विराज जंक्शन ला जायचं ठरल. मग आम्ही तिथून विराज जंक्शनला पोहोचलो. तिथे मस्त फोटो काढले आणि मग घरी आलो.

हा व्हिडीओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडीओ आवडल्यास नक्की लाईक करा. आणि चॅनेलला सबस्क्राईब केल नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.
---------------------------------------------------------

#हॉटेलअशोका #लंच #वेलकमथाळी #तंदूर #फुडब्लॉग #फ्रेंड्स #ट्रॅव्हलब्लॉग #विकासवाडी #कोल्हापूर #विराजजंक्शन #कोगनोळी #कर्नाटक

---------------------------------------------------------

Links -
Facebook : / ruturaj4143
Instagram : / ruturajingalevlogs
YouTube :
/
Twitter :
/

Contact Me On : [email protected]

---------------------------------------------------------
माझे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया चॅनेलला subscribe करा, like❤️, share करा आणि हो comment करून सांगायला विसरू नका😊
Transcript

18/12/2024

मंडळी आमचं बरेच दिवसांपासून फार्म हाऊस वर जायचं चालल होत. मग रविवारी आमचं फिक्स झालं आणि त्या दिवशी वर्ल्ड कप ची फायनल मॅच म्हंटल दुधात साखर. मग काय सकाळी उठून सगळी तयारी केली बॅग वगैरे भरली आणि आम्ही सगळे फार्म हाऊसच्या दिशेनं निघालो.

पुढच्या अर्ध्या तासात आम्ही फार्म हाऊस वर जाऊन पोहोचलो. मस्त पैकी गाड्या पार्क केल्या कपडे बदलले आणि सगळ्यात आधी टँक मध्ये गेलो. मस्तपैकी धमाल केली आणि बाहेर आलो.

मग मॅच स्टार्ट झाली होती आणि इकडे आमच्या मित्रांनी चिकन तळायला घेतल होत. थोड्यावेळाने करून आणलेलं जेवण गरम केलं आणि सर्वजण जेवायला बसलो. मस्तपैकी मॅच बघत आम्ही सगळ्यांनी जेवणाचा आनंद घेतला. मग संध्याकाळी क्रिकेट खेळायला चालू केलं. मनसोक्त क्रिकेटचा आनंद घेऊन मग पुन्हा आम्ही मॅच पहात बसलो.

थोड्यावेळाने जेवायला बसलो मस्त जेवलो आणि गार्डन मध्ये संगीत खुर्ची खेळायला सुरू केलं. संगीत खुर्ची खेळताना खूप मजा आली. खूप वर्षानंतर मी संगीत खुर्ची खेळलो. शेवटी ऋतुराज संगीत खुर्ची चा विनर झाला. त्यानंतर सगळे खूप दमले होते आणि त्यात भारतानं वर्ल्ड कप हारला होता सगळे नाराज झाले आणि झोपले.

सकाळी उठून मग आम्ही चहा केला आणि चहा घेऊन झाल्यावर आम्ही सर्वजण तिथून बाहेर पडलो.

हा व्हिडीओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडीओ आवडल्यास नक्की लाईक करा. आणि चॅनेलला सबस्क्राईब केल नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.

---------------------------------------------------------------------------------------------------------

फार्म हाऊस नाव - अनुप घाटगे सरकार
फार्म हाऊस ठिकाण - हणबरवाडी
केअर टेकर नाव - राजू वाडकर
मोबाईल नंबर - +91 93564 83737 (बुकिंगसाठी)
लोकेशन - https://maps.app.goo.gl/TqSb8viu6QnXH...

-----------------------------------------------------------------------------------------------

#पार्टी #पार्टीटाईम #फार्महाऊस #स्विमिंगटँक #वर्ल्डकपमॅच #वर्ल्डकपफायनलमॅच #चिकन #नॉनव्हेज #एन्जॉय #बॅचलरपार्टी #मित्र #फुडब्लॉग #ब्लॉग #हणबरवाडी #कोल्हापूर

---------------------------------------------------------

Links -
Facebook : / ruturaj4143
Instagram : / ruturajingalevlogs
YouTube :
/
Twitter :
/

Contact Me On : [email protected]

---------------------------------------------------------
माझे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया चॅनेलला subscribe करा, like❤️, share करा आणि हो comment करून सांगायला विसरू नका😊

17/12/2024

कार्ला डोंगर हे प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. फार वर्षांपूर्वी बौद्ध धर्माच्या लेण्या येथे बांधण्यात आल्या होत्या त्यांचा आजची कार्ला लेणी म्हणून उल्लेख आढळतो. कार्ला येथे असलेल्या लेण्या ह्या बौद्ध संस्कृतीचे दर्शन घडवतो,बऱ्याच लेण्या ह्या अपूर्ण आहेत व जीर्ण झालेल्या आहेत. मुंबई आणि परिसरातील मूळ रहिवाशी असलेला आगरी कोळी समाजाची एकवीरा देवी ही कुलदैवत मानली जाते. ठाणे मुंबई पालघर रायगड येथिल आगरी कोळी कराडी समाज येथे आवर्जून भेट देतात व देवीला आम्हाला सुखी ठेव आणि अशीच कृपा आम्हा आगरी कोळ्यांवर राहुदे असा आशिर्वाद घेतात.

मंडळी खूप दिवस झाले मला एकविरा देवीला जायची इच्छा होती. मग आम्ही रविवारी जायचं ठरवलं. रविवारी सकाळी ९:५७ मिनिटांनी लोनावळा लोकल होती. मग आम्ही सकाळी ९ पा बाहेर पडलो पुणे स्टेशनला जाण्यासाठी. आम्हाला खूप वेळ झाला होता फक्त २ मिनिट आधी आम्ही स्टेशनला पोचलो.

मग आम्ही लोकल मधे बसलो आणि आमचा प्रवास सुरु झाला. एका तासाने आम्ही मळवली स्टेशनला उतरलो. तिथून रिक्षा पकडली त्यांनी आमचे ५० रुपये प्रति व्यक्ती यानुसार आम्हाला पायथ्याला सोडून दिले.

तिथे आम्हाला भूक लागली होती मग आम्ही तिथे थोड खाऊन घेतल आणि मग पायऱ्या चढायला सुरू केलं. अर्ध्या पाऊण तासात आम्ही वरती पोचलो. आणि ४ तासाने आमचं दर्शन झालं कारण गर्दी खूप होती.

तिथून मग आम्ही संध्याकाळी ५:३० च्या लोकलनी आम्ही पुन्हा पुण्यात आलो.

हा व्हिडीओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडीओ आवडल्यास नक्की लाईक करा. आणि चॅनेलला सबस्क्राईब केल नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.

14/12/2024

मंडळी सकाळी लवकर उठून आम्ही ७:३० ला दर्शनासाठी बाहेर पडलो गाडी पार्क केली आणि मंदिराकडे निघालो. जाताना सुरुवातीस आम्हाला खंडोबा मंदिर लागलं तिथे छान दर्शन घेतल. तिथे एका मामांनी आम्हाला साईबाबांच्या बद्दल खूप छान माहिती दिली. त्यांच्या आयुष्यात ज्या काही घटना घडल्या त्या आम्हाला सांगितल्या.

तिथून मग आम्ही मंदिरात गेलो. पुढच्या २ तासात आमचं दर्शन झालं आणि मग बाकी मंदिर परिसर आम्ही फिरून पाहिला. दर्शन घेऊन झाल्यावर एका दुकानात आम्ही सगळ्यांनी थोडी खरेदी केली ज्यांना देवाच्या मूर्ती वगैरे घ्यायच्या होत्या त्या घेतल्या आणि आम्ही तिथून बाहेर पडलो.

तिथून आम्ही राहता या आमच्या मित्राच्या गावी गेलो. तिथे मस्तपैकी मित्राने नाश्ता दिला होता अगदी पोटभर तो खाल्ला आणि मस्तपैकी गप्पा गोष्टी केल्या आणि मग गावातील एका मंदिरात दर्शनासठी गेलो. तिथे छान दर्शन घेऊन मग आम्ही दुपारी नाशिक साठी रवाना झालो.

आमची एक गाडी मग होती आम्ही नाशिक मध्ये पोचलो होतो म्हणून मुक्तिधाम मंदिर मध्ये गेलो. तिथून पंचवटी ला गेलो. तोपर्यंत आमची मागे राहिलेली गाडी आली आणि मग आम्ही त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी निघालो. त्या दिवशी खूप दिंड्या आल्या होत्या त्यामुळं दर्शन मिळेल याची शक्यता कमीच होती. त्र्यंबकेश्वरला पोहोचल्यावर गर्दी खूप होती त्यामुळं आम्ही बाहेरूनच मंदिराच दर्शन घेतल आणि तिथून बाहेर पडलो थोडा चहा घेतला आणि आम्ही पुन्हा पंचवटीला जाण्यासाठी बाहेर पडलो.

पंचवटी मध्ये फिरून झाल्यावर आम्ही काळाराम मंदिरात गेलो तिथे देवाचं दर्शन घेतल बाहेर ड्रायफुटस च दुकान होत तिथे खरेदी केली आणि तिथून मग आम्ही जवळच असणाऱ्या कपालेश्वर महादेव मंदिरात गेलो. तिथे दर्शन घेऊन आम्ही पुण्याला जाण्यासाठी निघालो. पुण्याला येताना हॉटेल मध्ये जेवण केले आणि पहाटे ४ वाजता पुण्यात पोहोचलो.

हा व्हिडीओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडीओ आवडल्यास नक्की लाईक करा. आणि चॅनेलला सबस्क्राईब केल नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.

---------------------------------------------------------

#शिर्डी #साईबाबा #नाशिक #मुक्तीधाममंदिर #पंचवटी #काळाराममंदिर #कपालेश्वमंदिर #त्र्यंबकेश्र्वर, #त्र्यंबकेश्र्वरमंदिर #एन्जॉय #ऑफिसस्टाफ #ट्रॅव्हल #ट्रॅव्हलब्लॉग #पुणे

---------------------------------------------------------

Links -
Facebook : / ruturaj4143
Instagram : / ruturajingalevlogs
YouTube :
/
Twitter :
/

Contact Me On : [email protected]

---------------------------------------------------------
माझे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया चॅनेलला subscribe करा, like❤️, share करा आणि हो comment करून सांगायला विसरू नका😊

13/12/2024

मंडळी आमच्या ऑफिस मध्ये शुभम म्हणून आहे ती शिर्डीचा आहे. तो खी दिवसापासून म्हणत होता की आपण सगळे शिर्डीला जाऊयात. बरेच दिवस प्लॅन झाल्यावर आम्ही मग जायचं ठरवलं. मग शनिवार आणि रविवर हे २ दिवस ठरले. शनिवारी दुपारी निघायचं आणि रविवारी परत यायचं अस आमचं ठरलं. आम्ही शनी शिंगणापूर, देवगड, शिर्डी आणि नाशिक चे त्र्यंबकेश्र्वर, काळाराम मंदिर, पंचवटी, कपालेश्वर मंदिर पहायचं ठरवलं.

शनिवारी आम्हाला पुण्यातून बाहेर पडायला १ वाजला. मग ३ वाजता आम्ही वाघोलीला पोचलो. तिथे हॉटेल लक्ष्मी येथे जेवलो. तिथून पुणे सोडायला आम्हाला जवळपास ५ वाजले. सगळ्यात पहिला आम्ही गेलो ते शनी शिंगणापूरला. संध्याकाळी साधारण ७ वाजले होते. तिथे एकदम निवांत आमचे दर्शन झाले. तिथून मग आम्ही देवगडला जायला निघालो. पुढच्या अर्ध्या तासात आम्ही देवगड येथे पोचलो.

देवगड मध्ये दत्तांच मंदर आहे. देवगडचे मंदिर खूप सुंदर आहे. मंदिर परिसर खूप मोठा आणि भव्य दिव्य आहे. तिथे दर्शन घेतल्यावर मंदिराच्या अगदी समोर फक्त ६० रुपये मध्ये तुम्हाला अनलिमिटेड जेवण मिळत. ते देवस्थानचे आहे
तिथे आम्ही सगळ्यांनी जेवायचं ठरवलं. सगळेजण जेवलो आणि आम्ही तिथून मग बाहेर पडलो. जाताना मसाले पान घेतला मस्त खाल्ले आणि मग आम्ही तिथून शिर्डी साठी रवाना झालो.

शिर्डीला पोचल्यावर तिथे मित्राच्या ओळखीने आम्ही भक्त निवासला रूम घेतल्या आणि झोपून गेलो कारण अमहला सकाळी लवकर दर्शनाला जायचं होत.

हा व्हिडीओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडीओ आवडल्यास नक्की लाईक करा. आणि चॅनेलला सबस्क्राईब केल नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.

---------------------------------------------------------

#शनीशिंगणापूर #शनिदेव #देवगड #दत्तमंदिर #शिर्डी #साईबाबा #सहल #मित्र #एन्जॉय #ऑफिसस्टाफ #ट्रॅव्हल #ट्रॅव्हलब्लॉग #पुणे

---------------------------------------------------------

Links -
Facebook : / ruturaj4143
Instagram : / ruturajingalevlogs
YouTube :
/
Twitter :
/

Contact Me On : [email protected]

---------------------------------------------------------
माझे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया चॅनेलला subscribe करा, like❤️, share करा आणि हो comment करून सांगायला विसरू नका😊

12/12/2024

भावाचं स्किल बघा फक्त | आपल्या चॅनेलचा लोगो टाकला गाडीवर |

मित्रांनो आपल्या चॅनेलचा लोगो गाडीवर प्रिंट करून घेतला. माझा आतेभाऊ रेडियम वर्क करतो. त्याच स्किल खूप छान आहे. त्याच शॉप इस्लामपूर मध्ये आहे जर कुणाला रेडियम वर्क करून घ्यायचे असेलतर त्याचा शॉपचा नाव आणि पत्ता आहे :-
हिंदवी डिजिटल, सावकार कॉलनी, इस्लामपूर
प्रोप्रा. प्रथमेश पाटील
मो. नं. - +918805013380

रेडियम वर्क सोबतच नेम प्लेट्स, नंबर प्लेट, ट्रॉफी, ग्लास फिल्मीग, डिजिटल बोर्ड, LED लेटर्स इ. कामे पण करून मिळतात.

Instagram Page Link - https://instagram.com/digitalhindavi?...

--------------------------------------------------------------------------------

--------------------------------------------------------------------------------
Music Credit By :-

1) Alfa Fact Background Music - NCS
2) Pure Magic - Chris Haugen

--------------------------------------------------------------------------------
Links -
Facebook : / ruturaj4143
Instagram : / ruturajingalevlogs
YouTube :
/
Twitter :
/

Contact Me On : [email protected]

--------------------------------------------------------------------------------
माझे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया चॅनेलला subscribe करा, like❤️, share करा आणि हो comment करून सांगायला विसरू नका😊

11/12/2024

यावेळी ट्रेकिंसाठी निवडला किल्ले तोरणा 🚩 |

बरेच दिवस कुठे गेलो नव्हतो आमचा पावसाळ्यात तोरणा किल्ल्यावर जायचा प्लॅन ठरला होता. पण पावसाळ्यात किल्ला ट्रेकसाठी बंद असलेले आम्ही तो पुढे ढकलला.

रविवारी सकाळी पहाटे ५ वाजता आम्ही पुण्याहून तोरणा किल्ल्याकडे रवाना झालो. साधारण ८ वाजता आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलो. किल्ला चधायला सुरुवात केली आणि ९:१५ वाजता आम्ही किल्ल्यावर पोहोचलो.

सर्वात पहिला आम्ही बुधला माची बघितली. त्यानंतर कोकण दरवाजा मधून आत जाऊन पुढे आम्हाला एक पाण्याचं टाक लागलं पुढे आम्ही किल्ल्याची संपूर्ण तटबंदी पार करून बिनी दरवाजा आणि महादरवाजा म्हणजेच कोठी दरवाजा पाहिला.

महादरवाजा मधून आल्यावर आपल्याला सर्वात प्रथम लागत ते खोकड टाके हे किल्ल्यावरील सर्वात मोठे पाण्याचे टाके आहे. तिथून पुढे लगेच आपल्याला लक्कडखाना लागतो.

लक्कडखान्यापासून पुढे गेल्यावर आम्ही गेलो ते झुंजार माची कडे पण तिथून माचीकडे जाणारा मार्ग हा खडतर असलेने अर्ध्या वाटेतून झुंजार माची पाहिली आणि तिथून बाहेर पडलो.

पुढे येऊन आम्ही किल्ल्यावर असणार मेंगाईदेवी मंदिर आणि तोरणेश्र्वर महादेव मंदिर मध्ये जाऊन देवीचे आणि देवाचे दर्शन घेतले. आणि तिथून आम्ही किल्ल्यावरून खाली उतरलो. साधारण खाली आम्ही ५ वाजता आलो.

तिथून आम्ही वेळ होता म्हणून प्रति बालाजी मंदिर कडे जायचे ठरवले. जाताना खूप भूक लागली होती म्हणून राजतोरण मध्ये मस्त मिसळ खाल्ली आणि थेट पोहोचलो ते प्रति बालाजी मंदिर मध्ये तिथे दर्शन घेऊन मनाला प्रसन्न वाटल आणि तिथून आम्ही पुन्हा पुण्याकडे रवाना झालो.

हा व्हिडीओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडीओ आवडल्यास नक्की लाईक करा. आणि चॅनेलला सबस्क्राईब केल नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.

---------------------------------------------------------

#शिवाजीमहाराज #तोरणा #तोरणाकिल्ला #राईड #किल्लेतोरणा #किल्ला #गड #तोरणगड #ट्रेकिंग #मित्र #एन्जॉय #ट्रॅव्हल #ट्रॅव्हलब्लॉग #फूडब्लॉग #पुणे

---------------------------------------------------------

Links -
Facebook : https://www.facebook.com/ruturaj4143
Instagram : http://www.instagram.com/ruturajingalevlogs
YouTube :
https://youtube.com/channel/UCBNqFHY1bIUyQcX6QaYT8bA
Twitter :
http://www.twitter.com/

Contact Me On : [email protected]

---------------------------------------------------------
माझे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया चॅनेलला subscribe करा, like❤, share करा आणि हो comment करून सांगायला विसरू नका😊

10/12/2024

Rumailah च्या घरी केरळची मलबार बिर्याणी खाल्ली 😋
मंडळी आमच्या ऑफिस मध्ये रुमेला आहे ती केरळ ची आहे तर आम्हाला केरळ ची बिर्याणी खायची होती. त्यामुळे तिने सर्वांना आम्हाला घरी बोलवलं होत. आम्ही सगळे जायचं ठरवलं मग रविवारी दुपारी आम्ही सगळे बाहेर पडलो आणि थोड्याच वेळात आम्ही तिच्या घरी पोचलो.

घरी पोचल्यावर तिने कोल्ड्रिंक प्यायला दिले. त्यानंतर मस्त गप्पा गोष्टी चालल्या. रूमेलाच्या छोट्या मुलीसोबत आम्ही मस्त खेळलो. त्यानंतर मग आम्हाला लंचला बोलवलं गेलं.

डायनिंग टेबल वर मस्त बिर्याणी होती. सगळ्यांनी बिर्याणी चा आस्वाद घेतला पोटभर बिर्याणी खाल्ली. त्यांनतर तिने आम्हाला तिने घर फिरून दाखवले. तिचे घर खूपच मस्त होते. परत आम्ही फोटो वगैरे काढले आणि तिथून बाहेर पडलो.

हा व्हिडीओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडीओ आवडल्यास नक्की लाईक करा. आणि चॅनेलला सबस्क्राईब केल नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.

---------------------------------------------------------

#बिर्याणी #मलबारबिर्याणी #थाल्लासरीबिर्याणी #केरळबिर्याणी #लंच #मित्र #एन्जॉय #ऑफिसस्टाफ #ट्रॅव्हल #ट्रॅव्हलब्लॉग #विमाननगर #पुणे

---------------------------------------------------------

Links -
Facebook : / ruturaj4143
Instagram : / ruturajingalevlogs
YouTube :
/
Twitter :
/

Contact Me On : [email protected]

---------------------------------------------------------
माझे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया चॅनेलला subscribe करा, like❤️, share करा आणि हो comment करून सांगायला विसरू नका😊

"Every picture tells a story, and this one speaks volumes!✨📸      "
10/12/2024

"Every picture tells a story, and this one speaks volumes!✨📸 "

30/11/2024

तिरुपती वरील हि सर्व ठिकाणे नक्की पहा |

आम्ही रात्री २ वाजता उठून आवरून साधारण ४ पर्यंत आम्ही मंदिरापाशी पोहोचलो. जवळपास ८ पर्यंत आम्ही मुख्य गाभाऱ्यात पोचलो आणि मन भरून देवाची मूर्ती आम्ही पाहिली आणि दर्शन घेतले. त्यानंतर आम्ही प्रसाद घ्यायला गेलो. प्रसाद घेऊन मग आम्ही नाश्ता केला. मग आम्ही रूम मध्ये गेलो आणि झोपून गेलो.

दुपारी उठल्यावर मग आम्ही रूम सोडली आणि मग तिथेच वरती ६ ठिकाणे आहेत पहायला ती पहायचं ठरवलं. प्रत्येकी २०० रुपये घेऊन आपल्याला ती ठिकाणे दाखवली जातात. मग त्यांच्या गाडीतून आम्ही जायला निघालो.

सगळ्यात पहिला आम्ही पोहोचलो ते श्रीवरी पडालू तिथे आम्ही बालाजीच्या चरणांचे दर्शन घेतले. त्यानंतर आम्ही पोहोचलो सिलंथोरणाम येथे तिथे आम्ही रॉक गार्डन पाहिले. त्यानंतर आम्ही गेलो चक्रतीर्थम येथे तिथे आम्ही महादेव मंदिर पाहिले.त्यानंतर आम्ही पोचलो ते वेणुगोपाल स्वामींच्या मंदिरामध्ये तिथे दर्शन घेऊन पुन्हा आम्ही बाहेर पडलो आणो पोहोचलो आकाश गंगा येथे तिथून आम्ही शेवटच्या ठिकाणी गेलो ते म्हणजे पापविनाशाम या मंदिरामध्ये मग तिथे दर्शन घेऊन आम्ही मग स्टेशनला जाण्यासाठी निघालो.

मग आम्ही सर्वजण खाली पोचलो तिथे पंजाबी ढाबा येथे जेवण केलं आणि ट्रेन मध्ये बसलो दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही ११ वाजता बेळगाव ला पोचलो तिथून कोल्हापूर बस पकडून ४ वाजता कोल्हापूरला पोहोचलो. मग घरी गेलो आणि आवरून वगैरे मग आम्ही महालाक्समि देवीच्या दर्शनाला गेलो .

हा व्हिडीओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडीओ आवडल्यास नक्की लाईक करा. आणि चॅनेलला सबस्क्राईब केल नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

#तिरुपती #तिरुमाला #बालाजी #बालाजीमंदिर #तिरुपतीदर्शन #बालाजीदर्शन #महालक्ष्मीमंदिर #ट्रॅव्हल #ट्रॅव्हलब्लॉग #आंध्रप्रदेश #भारत

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

Links -
Facebook : / ruturaj4143
Instagram : / ruturajingalevlogs
YouTube :
/
Twitter :
/

Contact Me On : [email protected]

------------------------------------------------------------------------------------------------------------------------
माझे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया चॅनेलला subscribe करा, like❤️, share करा आणि हो comment करून सांगायला विसरू नका😊

27/11/2024

माझी खूप दिवसांची इच्छा शेवटी पूर्ण झाली | बालाजी दर्शन भाग - १ |

मंडळी मी आणि माझ्या मित्रांचं बऱ्याच दिवसांपासून तिरुपतीला जायचं चालल होत. पण जायचं म्हणत ते सारखं रहात होत शेवटी मग माझ्या एका मित्राने जायचंच असं ठरवून तिकीट बुकिंग केले आणि आमचं जायचं फिक्स झालं.

मग १२ तारखेला सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी आमची ट्रेन होती. आम्ही घरातून १० ला बाहेर पडणार होतो आणि सिटी बसनी जाणार होतो पण अक्षय आणि सुमित बोलले कि आम्ही तुम्हाला सोडून देऊ स्टेशन ला मग त्यांनी आम्हाला स्टेशन ला सोडलं मग तिथे आम्ही ट्रेनची वाट पहात उभारलो. थोड्या वेळाने ट्रेन आली मग आम्ही सगळे ट्रेन मध्ये बसलो.

आमचा ट्रेनचा प्रवास चॅन सुरु झाला. मस्त गप्पा गोष्टी करत आम्ही चाललो होतो. घरून जेवण घेतलं होत आम्ही ते खाल्लं मग ४ ला बेळगाव ला पोहोचलो. रात्री परत ट्रेन मध्ये जेवण आलं होत मग आम्ही सगळ्यांनी पुलाव खाल्ला आणि झोपून गेलो.

सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी आम्ही तिरुपतीला पोहोचलो त्यांच्यानंतर आम्ही लगेच सेवा दर्शन पाससाठी स्टेशन जवळ असणाऱ्या बिल्डिंग जवळ पोचलो. तिथे आम्हा सगळ्यांना पास भेटला दुसऱ्या दिवशी पहाटे ४ ची टाईमिंग आम्हाला मिळाली होती.

त्यांनतर आम्ही पोचलो ते रूम बुक करण्यासाठी सीआरओ ऑफिसला तिथे आम्हला टोकन मिळालं. रूम साठी वेळ होता मग तोवर आम्ही तिथे प्रसाद खाऊन घेतला. मग साधारण ३ वाजता आम्हाला रूम मिळाली त्यांनतर आम्ही सगळे फ्रेश झालो थोडी विश्रांती घेतली.

उठून आवरून मग आम्ही ५ वाजता केस कापण्यासाठी गेलो. तिथे सर्वानी केस कापले मग पुन्हा रूम वरून येऊन आंघोळ वगैरे केली. मग ७ वाजता मंदिर परिसरात फेरफटका मारण्यासाठी आलो. थोडावेळ मंदिर परिसरात बसलो आणि मग प्रसाद खायला गेलो आणि रात्री रूम वरती येऊन झोपून गेलो

हा व्हिडीओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडीओ आवडल्यास नक्की लाईक करा. आणि चॅनेलला सबस्क्राईब केल नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.
---------------------------------------------------------

#तिरुपती #तिरुमाला #बालाजी #बालाजीमंदिर #तिरुपतीदर्शन #बालाजीदर्शन #ट्रॅव्हल #ट्रॅव्हलब्लॉग
#आंध्रप्रदेश #भारत

---------------------------------------------------------

Links -
Facebook : / ruturaj4143
Instagram : / ruturajingalevlogs
YouTube :
/
Twitter :
/

Contact Me On : [email protected]

---------------------------------------------------------
माझे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया चॅनेलला subscribe करा, like❤️, share करा आणि हो comment करून सांगायला विसरू नका😊

18/11/2024

मित्रांसोबत दुसऱ्या दिवशी गेलो केर्ले धबधब्याला भाग - २|

मंडळी जाताना आम्हाला जवळपास ३-४ धबधबे अजून दिसले. तिथं जाण्याचा मार्ग न्हवता कारण त्याचा कड्याचा उतार तीव्र होता पण खूप छान धबधबे होते.

थोड पुढं गेल्यावर आम्हाला झाडी लागली. जंगला सारखी ही झाडी हती त्यातून वाट काढत आम्ही धबधब्याकडे जात होतो. अधे मधे छोटे छोटे ओढे लागत होते.

हे सर्व पार करून आम्ही धबधब्याजवळ पोचलो. जास्ती जवळ गेलो नाही कारण पाण्याचा प्रवाह खूप जास्त होता. लांबून फोटो आणि व्हिडओ काढले. हे सर्व करत असतानाच एका मुलाचा पाय सटकला आणि तो वाहून जाऊ लागला पण एका दगडाला पकडल्याने तो वाचला त्याला बाकी लोकांनी बाहेर काढल.

तर मंडळी तिथून आम्ही थोड्यावेळाने बाहेर पडलो. मंडळी एक सांगायचं झालं तर तुम्हीपण कधीं धबधब्याला गेलात तर नक्की काळजी घ्या कारण अपघात घडू शकतो.

तिथून बाहेर पडल्यावर वाटेत आम्हाला स्वीट कॉर्न दिसल. थंडी आणि पाऊस असल्याने आम्ही ते खायला घेतल. मस्तपैकी गोड आणि गरम गरम होत. तिथून मग घरी जायला निघालो. भूक लागल्याने कोल्हापूर रत्नागिरी रोड ला हॉटेल मॅजेस्टिक म्हणून आहे तिथं आम्ही जेवण केलं आणि घरी जाण्यासाठी बाहेर पडलो.

हा व्हिडीओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडीओ आवडल्यास नक्की लाईक करा. आणि चॅनेलला सबस्क्राईब केल नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.

---------------------------------------------------------

#केर्ले #केर्लेधबधबा #धबधबा #आंबा #मान्सून #मान्सूनट्रिप #मित्र #कोल्हापूर #पावसाळा #पाऊस #पावसाळीट्रिप

---------------------------------------------------------
Links -
Facebook : / ruturaj4143
Instagram : / ruturajingalevlogs
YouTube :
/ channel
Twitter :
/

Contact Me On : [email protected]

---------------------------------------------------------
माझे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया चॅनेलला subscribe करा, like❤️, share करा आणि हो comment करून सांगायला विसरू नका😊

13/11/2024

मित्रांसोबत पन्हाळ्यावर मान्सून ट्रीप भाग - २ |

मंडळी कॉफी आणि नाश्ता करून झाल्यावर आम्ही गेलो ते सज्जकोटी पहायला. सज्जकोटी ही वास्तू खूप महत्वाची आहे कारण इथे साक्षात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे चरण स्पर्श लागून गेले आहेत. शिवाजी महाराजांच्या मृत्यूपूर्वी महाराजांची आणि संभाजीराजेंची अखेरची भेट या वास्तू मध्ये झाली होती.

सज्जाकोटी पाहून झाल्यावर आम्ही पुढं असलेल्या बुरुजावर गेलो. तिथून मग अंधार पडल्याने आम्ही पुन्हा रूम वरती आलो. दुपारी तंदूर ची ऑर्डर दिली होती ती आली आणि आम्ही मस्तपैकी तंदूर चा आस्वाद घेतला. मग परत एकदा चिकन चीली मागवली.

रात्रीचे जवळपास ९:३० वाजले होते. मग हॉटेल वर जेवायला गेलो. मस्तपैकी जेवण केले छान अस धुके पडले होते त्याचा मनमुराद आनंद घेऊन आम्ही पुन्हा रूम वे गेलो. त्यानंतर रूम वर टीव्ही होता त्यावर आम्ही Fast X हा पिक्चर पाहिला नंतर झोपून गेलो

सकाळी उठल्यावर आम्ही मस्तपैकी चहा घेतला. सगळ आवरून आम्ही रूम सोडली. मग आमचं जायचं ठरलं केर्ले येथील धबधब्याला पण त्या आधी जोराची भूक लागल्याने आम्ही खायचं ठरवलं. मग आम्ही वन उद्यान जवळच्या काकाश्री मिसळ ला गेलो. पन्हाळ्यावरची ही प्रसिध्द मिसळ आहे. पोटभर मिसळ खाल्ली आणि आम्ही तेथून बाहेर पडलो केर्लेला जायला बाकी पुढे काय काय झालं ते पुढच्या व्हिडीओ मध्ये नक्की बघा मंडळी. ☺️

हा व्हिडीओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडीओ आवडल्यास नक्की लाईक करा. आणि चॅनेलला सबस्क्राईब केल नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.

------------------------------------------------------------------------------

, #पन्हाळा #पन्हाळाकिल्ला #मान्सून #मान्सूनट्रिप #मित्र #काकाश्रीमिसळ #कोल्हापूर #पावसाळा #पाऊस #पावसाळीट्रिप

-------------------------------------------------------------------------------
Links -
Facebook : / ruturaj4143
Instagram : / ruturajingalevlogs
YouTube :
/ channel
Twitter :
/

Contact Me On : [email protected]

---------------------------------------------------------
माझे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया चॅनेलला subscribe करा, like❤️, share करा आणि हो comment करून सांगायला विसरू नका😊

21/10/2024

मित्रांसोबत मस्त Camping केली या तलाव वरती? |

मंडळी आमच्या सर्व मित्र मंडळींच बाहेर जायचा प्लॅन होता पण जायचं कुठे हे ठरत न्हवत. मग शेवटी ठरलं camping ला जायचं. त्यात पण कुठे जायचं हा प्रश्न होता मग ठरवलं की पवना तलावावरती जायचं. मग माझ्या मित्राने बुकिंग केल आणि मग जायचं ठरलं पवना तलावावर.

दुपारी ४ वाजता आमची चेक इन टाईम होती पण बाहेर पडायला आम्हाला ४ झाले. तिथून मग साधारण ४५-५० किमी च अंतर कापून आम्ही साधारण ६ च्या आसपास तलावाजवळ पोहोचलो.

तिथे पोचल्यावर गाडीतून बॅगा काढल्या आणि मग थोडावेळ तलावावर जाऊन बसलो. तिथून मग आम्ही indoor games खेळलो. त्यानंतर मग barbique बनवलं आणि खाल्ल. मग परत कॅरम खेळलो थोडावेळ टॉवर वरती फोटोज् वगैरे काढले. मग खूप भूक लागली होती मग सगळ्यांनी जेवण केलं.

जेऊन झाल्यावर मस्त क्रिकेट खेळलो त्यानंतर व्हॉलीबॉल चा आस्वाद घेतला. ते झाल्यावर मस्त गिटार वरची गाणी ऐकली आणि झोपून गेलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही फ्रेश झालो मस्त नाश्ता केला. सगळ्यांनी फोटोज् वगैरे काढले आणि मग १०:३० वाजता चेक टाईम असल्यामुळे आम्ही तिथून बहे पडलो. आणि मस्तपैकी आम्ही camping चा आनंद लुटला.

हा व्हिडीओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडीओ आवडल्यास नक्की लाईक करा. आणि चॅनेलला सबस्क्राईब केल नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.
---------------------------------------------------------

#कॅम्पिंग #पवनालेक #पवनालेककॅम्पिंग #टेंटकॅम्पिंग #पुणेकॅम्पिंग #कॅम्पिंगब्लॉग्स #पवना #तलाव #ट्रिप #टूर #फ्रेंड्स #ट्रॅव्हलब्लॉग #पुणे

---------------------------------------------------------

Links -
Facebook : / ruturaj4143
Instagram : / ruturajingalevlogs
YouTube :
/
Twitter :
/

Contact Me On : [email protected]

---------------------------------------------------------
माझे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया चॅनेलला subscribe करा, like❤️, share करा आणि हो comment करून सांगायला विसरू नका😊

27/09/2024

मित्रांसोबत पन्हाळ्यावर मान्सून ट्रीप भाग - १ |

मंडळी आम्ही मित्रांनी पावसाळा सुरुवात झालेने कोल्हापूर जवळपास फिरुन यायचं ठरवलं पण सगळे धबधबे बंद झालेने आम्ही फार्म हाऊस वर जायचं ठरवलं. गगनबावड्याला फार्म हाऊस बुक केलं पण जायच्या दिवशी प्रॉब्लेम झाला. नेमक गगनबावडा रोडवर पाणी आल. मग तिकडे जायचं कॅन्सल केलं.

मग जायचं ठरलं ते पन्हाळ्याला नियोजन काही न्हवत ना रूम बुक होती ना जाऊन करायचं काय हे माहीत न्हवत तरीपण चाललो पन्हाळ्याला. पहिला रूम शोधायला सुरूवात केली जवळपास दोन तासांनी आम्हाला रूम मिळाली. मग थोडाफार रूम वर थांबलो किरकोळ खायला खाल्ल आणि जेवणाची ऑर्डर देण्यासाठी बाहेर पडलो.

शेजारी हॉटेल स्कायलार्क होते तिथं रात्रीच्या जेवणाची ऑर्डर दिली. बाहेर मस्त धुके पडले होते खूप मजा येत होती. तिथून आम्ही पन्हाळ्याच्या वन उद्याना जवळ आलो. तिथे आम्हाला लिटिल चॅम्प गेम्स असा बोर्ड दिसला.

तिथे जाऊन पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स तिथे होते. फुटबॉल सारखा गेम तिथे पहिला आणि आम्ही तो खेळायच ठरवलं. सुरुवातीला गणेश आणि अक्षय खेळले. त्या दोघांमध्ये अक्षय तर नंतर मी आणि सुमित खेळलो तर आमच्या दोघांमध्ये मी जिंकलो.

जिंकल्यावर शेजारी नाश्ता करायचं ठरवलं माझा उपवास असलेने मी फकत कॉफी घेतली. बाकी अजून काय काय गंमत केली हे पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला मिळेलच.

हा व्हिडीओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडीओ आवडल्यास नक्की लाईक करा. आणि चॅनेलला सबस्क्राईब केल नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.

---------------------------------------------------------

#पन्हाळा #पन्हाळाकिल्ला #मान्सून #मान्सूनट्रिप #मित्र #कोल्हापूर #पावसाळा #पाऊस #पावसाळीट्रिप

---------------------------------------------------------
Links -
Facebook : https://www.facebook.com/ruturaj4143
Instagram : http://www.instagram.com/ruturajingalevlogs
YouTube :
https://youtube.com/
Twitter :
http://www.twitter.com/

Contact Me On : [email protected]

---------------------------------------------------------
माझे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया चॅनेलला subscribe करा, like❤️, share करा आणि हो comment करून सांगायला विसरू नका😊

Address

Kolhapur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ruturaj Ingale Vlogs posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ruturaj Ingale Vlogs:

Share