गुलजम्मा शहा यांच्या प्रयत्नाने आमदार आकाश फुडकर याच्या हस्ते प्रभाग 2 मध्ये विकास कामे....
शहरातील स्टेशन रोड भागातील मध्यभागी असलेली अवैध मुतारी काही व्यावसायिकांनी मिळून तोडली आहे. या अवैध मुतारीचा याठिकाणी येणाऱ्या महिला वर्गाला मोठा त्रास होता त्यांची कुचंबना याठिकाणी होत होती या त्रासला दूर करण्यासाठी हा पाऊल त्यांनी उचलला आहे, दरम्यान नागरिकांनी पोलीस स्टेशन समोर असलेल्या स्वच्छता गृहाचा उपयोग करावा असे आवाहन केले जात आहे.
बालाजी संस्थानतर्फे यावर्षी विजयादशमीनिमित्य रावणाच्या ५० फुट उंचीच्या पुतळ्याचे दहन प्रथमच
ड्रोणद्वारे रावणटेकडीवर पुष्पवृष्टी ; भव्य आतिषबाजी
दसरा उत्सवात नागरिकांनीमोठ्या संख्येने सहभागी व्हा-गोपाल अग्रवाल
खामगाव -सराफा भागातील प्राचिन काळापासुन नावाजलेल्या बालाजी संस्थानच्या वतीने अनेक वर्षापासुन विजयादशमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे . आजपावेतो ती परंपरा जोपासली जात आहे . यावर्षी सुध्दा ५ ऑक्टोंबर बुधवार रोजी विजया दशमी उत्सव साजरा करण्यात येत असुन त्यानिमित्य संस्थानतर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे . ५ ऑक्टोंबर रोजी दुपारी ११ वा . बालाजी मंदिर सराफा येथे सर्वप्रथम ध्वजारोहन करून दुपारी ३ वा . भव्य शोभा यात्रा काढण्यात येणार आहे . या शोभायात्रेत अश्वरथात श्रीराम , लक्ष्मण व हनुमान यांच्या वेशभूषेत आकर्षक युवक