महाराष्ट्र २४ मराठी न्युज पोर्टल

  • Home
  • India
  • Kamptee
  • महाराष्ट्र २४ मराठी न्युज पोर्टल

महाराष्ट्र २४ मराठी न्युज पोर्टल maharashtra 24marathi
(2)

22/04/2024

कामठी पोलीस ठाणे हद्दीतील हमालपुरा परिसरात दिवसाढवळ्या चैन स्नेचिंग

आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद

21/04/2024

आज 21 एप्रिल वर्धमान महावीर यांची जयंती. जैन धर्माचे 24 वे आणि शेवटचे तीर्थंकर भगवान महावीर (Mahavir Jayanti) यांच्या जयंती स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्याची परंपरा आहे. दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तेराव्या तिथीला हा उत्सव साजरा केला जातो. या दिनानिमित्त या दिवसाचं विषेश महत्त्व आहे
कामठीक जैन समाजातर्फे आज शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली जैन मंदिर परिसरातून शोभायात्रा काढण्यात आली शहरातील मुख्य मार्गाने भ्रमण करत ही शोभायात्रा ढोल ताशाचा गजरात निघाली तर जागोजागी या शोभायात्राचे स्वागत करण्यात आले।

भगवान महावीर यांचा जन्म इ.स.पूर्व 599 मध्ये वैशाली (आज बिहारमध्ये) येथील क्षत्रिय राजघराण्यात झाला होता. त्यांना लहानपणापासूनच अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाची आवड होती. वयाच्या 30 व्या वर्षी त्यांनी घर सोडले आणि तपश्चर्या आणि आत्मज्ञानाचा शोध सुरू केला. अनेक वर्षांच्या कठोर तपश्चर्येनंतर, 527 BC मध्ये त्यांना ज्ञान प्राप्त झाले आणि ते महावीर म्हणून ओळखले जाऊ लागले. भगवान महावीरांनी अहिंसा, सत्य, अस्तेय आणि ब्रह्मचर्य या पंचशील तत्त्वांचा उपदेश केला.

महावीर जयंतीचे महत्त्व

भगवान महावीरांनी अहिंसेला जीवनाचे सर्वोच्च तत्व मानले. त्यांनी सर्व प्राणिमात्रांप्रती करुणा आणि प्रेमाचा संदेश दिला. महावीर जयंती अहिंसेच्या या महान संदेशाची आठवण करून देते आणि लोकांना सर्व प्राणीमात्रांप्रती दयाळूपणे वागण्याची प्रेरणा देते. भगवान महावीरांनी आत्मसाक्षात्कार हे जीवनाचे अंतिम ध्येय मानले आहे. त्यांनी पाच महाव्रतांचे (अहिंसा, सत्य, अहंकार, ब्रह्मचर्य आणि तपस्वी) पालन करून मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवला. म्हणून हा दिवस आत्मसंवर्धन आणि आत्मविकासाची प्रेरणा देतो. भगवान महावीर यांनी समाजसुधारक म्हणून विशेष भूमिका बजावली. त्यांनी जातिवाद, लिंगभेद आणि अनेक सामाजिक वाईट गोष्टींविरुद्ध आवाज उठवला आणि सर्व मानवांना समान वागणूक देण्याचे आणि त्यांना समान हक्क आणि संधी देण्याचे समर्थन केले. महावीर जयंती सामाजिक न्याय आणि समतेची प्रेरणा देते. धर्माव्यतिरिक्त अनेक लोक शांतता आणि अहिंसेचा संदेश देण्यासाठी हा दिवस साजरा करतात.

13/04/2024

इंस्टाग्राम वरून ओळख झालेल्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 तरुणांनी केला अत्याचार नवीन कामठी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

कामठी इंस्टाग्राम वरून ओळख झालेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाच तरुणांनी अत्याचार केला असून त्यांच्या विरोधात नवीन कामठी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी अमान उर्फ क्यूटी वय 22 राहणार आजाद नगर नवीन कामठी यांनी बालवयातच आई-वडिलांचे छत्र हरवलेली मुलगी नवीन कामठी परिसरातील आपल्या नातेवाईकाकडे वास्तव्यास असून जानेवारी महिन्यात एस्ट्राग्राम वरून ओळख झालेल्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिस दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी नेवून अत्याचार केला मुख्य आरोपी अमान उर्फ क्युटी याने सतरा वर्षीय अल्पवयीन तरुणीस आपल्या राहत्या घरी अत्याचार करत असताना त्याचे मित्र बबलू उर्फ मिराज अली वय 22 वर्ष ,राज उर्फ खंतेशाम अब्दुल वय 23 वर्ष , मोनू हमीद वय 22 वर्ष, हुजेर शेरू वय 23 सर्व राहणार आजाद नगर नवीन कामठी यांनी वेगवेगळ्या वेळेस अमान घरी नसताना बळजबरीने सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीस बदनामी करण्याची भीती दाखवून अत्याचार केला मुख्य आरोपी अमान उर्फ क्यूटी यांनी सदर अल्पवयीन मुलगी नागपूरात नातेवाईकाकडे असताना तिथे जाऊन तिला बोलावून दोन दिवसापूर्वी पिवळ्या नदी परिसरात परत अत्याचार केला व रात्रीला रस्त्यावर सोडून पसार झाला मुलगी एकटीच रस्त्याने फिरत असताना मुलीच्या वडिलांचे मित्र भेटले असता त्यांनी तिच्या नातेवाईकाकडे पोहोचविले असतात तिने पाचही आरोपीने केलेल्या अत्याचाराची माहिती दिली. नातेवाईकांनी मुलीला घेऊन नवीन कामठी पोलीस स्टेशन गाठले व पाचही तरुणांनी अत्याचार केल्याची तक्रार नवीन कामठी पोलीस स्टेशनला केली. नवीन कामठी पोलिसांनी कलम 376 (पाकसो) बाल लैंगिक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास नवीन कामठी पोलीस करत आहे.

12/04/2024

जनतेचा कल
विकास पुरुष नरेंद्र मोदी पहली पसंत

19 एप्रिलला होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकी करिता मतदार कोणाला करतील मतदान हे जाणून घेतले
काय मनतात रामटेक लोकसभा क्षेत्रातील कामठी विधानसभा क्षेत्रात अजनी गावातील मतदारांनीकाय सांगितल नक्की बघा ।

11/04/2024

*रामटेकच्या ‘धनुष्य बाणा’ला दिल्लीच्या तख्तावर न्यावे लागणार : राजू पारवे*

 *रामटेक लोकसभा निवडणूक प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोंदींच्या उपस्थितीत विशाल सभेला महायुतीचे शक्तीप्रदर्शन*

रामटेक भूमीवर प्रभू श्रीरामांचे पाऊले पडली आहे. या भूमीचे कार्य करण्याचे मला सौभाग्य प्राप्त झाले आहे. देशाचे लोकनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी व महायुतीचे राज्याचे मुख्यमंत्री तसेच शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे, भाजपचे जेष्ठ नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टाकलेल्या विश्वासामुळे माझ्यासारख्या सर्व सामन्य कार्यकर्त्याला रामटेक लोकसभा क्षेत्राचा विकास करण्याची संधी मिळाली आहे. जेव्हा पासून माझी उमेदवारी जाहीर झाली तेव्हा पासून महायुतीमधील सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सकाळपासून ते सायंकाळपर्यंत उन्हातानाची तमा न बाळगता जनसंवाद रथ यात्रेच्या प्रचार मोहिमेत सहभागी होत आहे. लोकनेते नरेंद्र मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान जर बनविण्याचे असेल तर रामटेकमधून धनुष्य बाणाला दिल्लीच्या तख्तावर न्यावे लागणार, महायुतीचे उमरेडचे माजी आमदार तसेच महायुतीचे रामटेक लोकसभा निवडणूक क्षेत्राचे शिवसेनेचे लोकप्रिय उमेदवार राजू देवनाथ पारवे यांनी व्यक्त केले.
बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोंदींच्या प्रमुख उपस्थित आयोजित विशाल सभेत राजू पारवे बोलत होते. कन्हान पोलिस स्टेशन जवळील बुक बॉण्ड मैदानावर असलेल्या प्रचार सभेत प्रमुख पाहुण्यांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नागपुर लोकसभेचे उमेदवार तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते खा. प्रफुल पटेल, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे सर, बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या अध्यक्षा अॅड. सुलेखा कुंभारे, माजी खासदार कृपाल तुमाने आदिंची मंचावर उपस्थिती होती.
पुढे बोलताना राजू पारवे म्हणाले की, या निवडणुकीत उभे असलेल्या माझ्या विरोधकांवर मला जास्त टिका करायची नाही. परंतु, आपणास एक गोष्ट माहिती असली पाहिजे की, काँग्रेसचे जे उमेदवार आहे त्यांच्यावर फसवणूक आणि अत्याचारासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. अश्या उमेदवाराला तिकीट देणाऱ्या पक्षासोबत रामटेकची जनता सोबत नाही याची मला खात्री आहे. सर्व सामन्यांनी अश्यांना पराभूत करण्यासाठी तुम्ही मला आज निवडणूकीच्या रिंगणात उभे केले आहे.

 *लोकाभिमूख कार्य करण्याचा संकल्प*

उमरेड विधानसभा क्षेत्रात आमदार राहून मी गेली साडेचार वर्ष जे विकास केले आहे ते आपल्या सर्वांना माहिती आहे. महायुतीने माझ्यावर अत्यंत विश्वास टाकून मला रामटेक लोकसभा निवडणूकीचा उमेदवार बनण्याची संधी दिली. त्याचा सोन करण्यासाठी मला केंद्रिय मंत्री नितिन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी साथ लागणार आहे. त्यामुळे रामटेकच्या विकासासाठी केंद्र व राज्याच्या विविध योजना राबवून काम करण्याचा माझा मानस असल्याचेही राजू पारवे यावेळी म्हणाले. जर आपल्या रामटेकचा विकास प्रगतीपथावर न्यायचे असेल तर आपल्याला प्रभू श्रीरामाच्या पद स्पर्शाने पावन भूमीतून धनुष्य बाणाला दिल्लीच्या तख्तावर न्यावे लागणार. आपण माझ्यावर टाकलेल्या विश्वासला मी तडा जाऊ देणार नाही आणि पूर्ण निष्ठेने काम करणार. तसेच लोकाभिमूख कार्य करण्याचा माझा प्रयत्न राहणार. येणाऱ्या 19 तारखेला आपण सर्व मतदारांनी ईव्हीएम मशिनच्या पहिल्याच क्रमांकाच्या धनुष्य बाण चिन्हाच बटन दाबून पुन्हा भगवा फडकविण्याची संधी आपण मला देणार अशी मी आशा बाळगतो असेही राजू पारवे यावेळी म्हणाले.

09/04/2024

नमो संवाद यात्रा शहर भाजप कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेत कार्यक्रमाचे आयोजन

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्ष्याखाली शहरातील दिवाण मंदिर परिसरात शहर भाजप कार्यकर्ते तसेस पदाधिकारी यांची नमो संवाद यात्रा अंतर्गत बैठकीचे आयोजन करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनि केलेल्या यशस्वी कामावर प्रकाश टाकत चंद्रशेखर बावनकुळे यांनी यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना देशाचे पंतप्रधान बनवण्याकरिता सर्व भाजप कार्यकर्त्यांनी मतदाराचा घरोघरी जाऊन रामटेक लोकसभा क्षेत्रातील महायुतीचे शिवसेना उमेदवार राजू देवनाथ पारवे यांच्या धनुष्यबाणचा बटना दाबून नरेंद्र मोदी यांना पुन्हा देशाचा प्रधानमंत्री बनविण्याची विनंती करा असे आव्हान यावेळी केले.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या प्रस्ताविक भाषणामध्ये नागपूर जिल्ह्यातील एका काँग्रेस नेत्याचे नाव न घेता खोचक टोला मारला।

मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते सह पदाधिकारी स्थानी आमदार टेकचंद सावरकर, अनिल निदान, अजय अग्रवाल, विवेक मगतांनी ,संजय कनोजिया, चंद्रशेखर तुप्पट, कपिल , लाला खंडेलवाल, विजय कुंडलवार ,पंकज वर्मा सुनील खानवानी, बबलू तिवारी ,रमेश वैद्य, उज्वल रायबोले ,उपस्थित होते,

07/04/2024

ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट. बुध्द प्रतिमेचे घेतले दर्शन

कामठी-महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ऐकनाथ शिंदे यांचा आज नागपुर येथे आगमन झाले विविध ठिकाणी कार्यक्रमाला भेट दीली. तर नियोजीत कार्यक्रमा अंतर्गत कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस ला भेट देत बुध्द प्रतीमेचे दर्शन घेत ओगावा सोसायटी अध्यक्षा माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांची भेंट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष बुद्ध वंदना करुण बुध्द नामस्मरण केले.भेटी दरम्यान आपली प्रतीक्रीया देत विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेसला भेट देणे राजकीय हेतू नसून बुद्ध दर्शनाला आले असल्याची प्रतीक्रीया त्यांनी या वेळी दीली. या भेटीदरम्यान ओगावा सोसायटीच्या अध्यक्ष सुलेखा कुंभारे यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.भेटी दरम्यान आमदार टेकचंद सावरकर,सुधाकर कोहळे, महायुतीचे ऊमेदवार राजु पारवे, खासदार कृपाल तुमाने,आमदार आशिष जयस्वाल इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटी करिता अनेक मान्यवर नागरिकांनी देखील आपली उपस्थिती लावली होती.

05/04/2024

कामठी शहर आणि ग्रामीण भागात गाई-म्हशी ,बकरी चोरीचा घटनेत वाढ झाली आहे, महिन्याभरात वीस ते पंचवीस जनावर चोरी गेलेले आहे या चोरीचा घटनेवर अंकुश लागावा याकरिता अखिल भारतीय अहिर महासभा आणि कामठी दुध संघटनाच्या वतीने नवीन कामठी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांना निवेदन देण्यात आले, शेतकरी तसेस दूध व्यवसाई यांच्या सर्रास गाई म्हशी चोरी जात असल्याने शेतकरी दूध विक्रेता मोठ्या चिंतेत आला आहे ,वाढत्या चोरीला कुठेतरी अंकुश लागावा आणि चोरी गेलेले जनावरे परत मिळावे असे निवेदन यावेळेस देण्यात आले ,यावेळेस अतिश यादव ,मंगेश यादव, नितेश यादव, रोशन यादव ,समन्यक यादव ,करण यादव, रवींद्र यादव ,बजरंग जयस्वाल ,तसेस ओम प्रकाश यादव, गोविंद यादव, राजेश चौधरी ,राजेश ठाकूर, प्रामुख्याने उपस्थित होते।

05/04/2024

रामटेक लोकसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार राजू देवनाथ पारवे यांना जनतेचा प्रचंड आशीर्वाद मिळत असून सावनेर विधानसभा क्षेत्रातील दहेगाव येथे राजू पारवे यांचे भव्य दिव्य जेसीबीच्या साह्याने फुलाचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले, महायुतीचे शिवसेना उमेदवार राजू पारवे यांना जनतेचा भरघोस आशीर्वाद मिळत आहे |
सावनेर विधानसभा क्षेत्रात राजू पालवे यांनी जनसंपर्क दौरा काळात जनते सोबत संवाद साधला यावेळेस माजी आमदार आशिष देशमुख सह भाजप, शिवसेना ,राष्ट्रवादी काँग्रेस ,,महायुतीचे मित्र पक्ष कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते !

04/04/2024

महायुतीचे उमेदवार राजू देवनाथ पारवे यांना जनतेचा भरघोस प्रतिसाद

आगामी 19 एप्रिलला लोकसभा उमेदवार करिता मतदान होणार आहे

रामटेक लोकसभा क्षेत्रातील भाजप महायुतीचे शिवसेना उमेदवार राजू देवनाथ पारवे यांनी हिंगणा मतदारसंघात जाऊन नागरिकांची भेट घेतली यावेळेस राजू पारवे यांना जनतेच्या भरघोस प्रतिसाद मिळाला
भाजपचे आमदार समीर मेघे यांनी महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी केले

भाजप ,शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन रिपब्लिकन एकता मंच, बहुजन रिपब्लिकन आठवले ग्रुप तसेच महायुतीचे मित्र पक्षातील कार्यकर्त्यांनी हिंगणा मतदारसंघात भव्य बाईक रॅली काढली

मतदार संघातील मतदारांनी दिलेल्या मताचा विश्वासघात होऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया यावेळी महायुतीचे उमेदवार राजू देवनाथ पारवे यांनी आपल्या प्रस्ताविक भाषणात दिली

04/04/2024

परमात्मा एक सेवक यांचे गुरु महाणत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या १०३ व्या जन्मोत्सवानिमित्त कामठी तालुक्याती परमात्मा एक सेवक मंडळ शाखा गादा तफे भव्य शोभायात्रा काढून महाणत्यागी बाबा जुमदेवजी यांची जयंती ठाटात साजरी करण्यात आली. बाबा जुमदेवजी आणि आई वाराणसी यांच्या छायाचित्राची विधीवत पूजा अर्चना आणि माल्यार्पण तसेस बाबा जुमदेवजी यांच्या जन्मदिन निमित्य केक कापण्यात आला ,
बाबा जुमदेवजी यांच्या छायाचित्र असलेले सुंदर रथ सजवून परमात्मा एक अनुयायी ढोल ताशे डीजे च्या तालावर नाचत गाजत गावातील प्रमुख मार्गावरुण शोभायात्रा काढून जंयती साजरी केली या वेळी मोठ्या संख्येने परमात्मा एक सेवक मंडळाचे कार्यकर्ते महीला पुरुष बाळ गोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

02/04/2024

रामटेक लोकसभा मतदारसंघ आणि महायुतीचे लोकप्रिय अधिकृत उमेदवार राजू देवनाथ पारवे यांच्या निवडणूक प्रचारार्थ मतदार संघातील काठोल-नरखेड येथे भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले. महायुतीच्या मित्र पक्षातील सदस्य आणि कार्यकर्त्यांनी रॅली मध्ये सहभागी झाले होते,महायुतीचे उमेदवार राजू देवनाथ पारवे यांनी जागोजागी सभा घेऊन देशाचे प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देश हिताचा कामावर प्रकाश टाकत नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्याकरिता आमच्या चुनाव चिन्ह धनुष्यबाणाच्या बटनाला दाबून प्रचंड मताने विजय करण्याचे आव्हान यावेळी त्यानी क्षेत्रातील नागरिकांना केले ,
जनसंपर्क रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात मतदार संघातील भाजप, शिवसेना ,राष्ट्रवादी काँग्रेस ,बहुजन रिपब्लिकन एकता मंच बहुजन आटोले ग्रुप तसेस अन्य मित्र पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।

30/03/2024

कामठी, रामटेक च्या गडावर महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी शिवसेना -भाजप -राष्ट्रवादी -रिपब्लिकन महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांना प्रचंड मताने विजयी करण्याचे आव्हान खासदार कृपाल तुमाने यांनी कामठी गुंमथाळा मार्गावरील अजनी येथील विश्वरंजन लॉन्स सभागृहात आयोजित महायुती समन्वय बैठकीचे उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना व्यक्त केले ,
आगामी 19 एप्रिलला होणाऱ्या रामटेक लोकसभा निवडणुकीत शिवसेना -भाजप -राष्ट्रवादी -काँग्रेस रिपब्लिकन एकता मंच- रिपब्लिकन कवाडे -आठवले महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारार्थ महायुतीची कामठी- गुंमथाळा मार्गावरील विश्वरंजन सभागृहात महायुतीची बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीचे उद्घाटन खासदार कृपाल तुमाने यांचे हस्ते दीप प्रज्वलन व भारत माता, छत्रपती शिवाजी महाराज ,भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आले यावेळी रामटेक लोकसभा क्षेत्राचे निवडणूक संयोजक डॉ. राजीव पोद्दार, आमदार टेकचंद सावरकर ,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बाबा गुजर ,भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष सुधाकर कोहळे ,शिवसेनेचे नागपूर जिल्हा अध्यक्ष संदीप ईटकेलवार ,शिवसेनेचे विदर्भ विद्यार्थी सेना प्रमुख शुभम नवले, नागपूर जिल्हा भाजप महिला आघाडी अध्यक्ष म्हणून राधा अमीन, नागपूर जिल्हा परिषद च्या माजी अध्यक्ष निशा सावरकर, सदानंद निमकर, आनंदराव राऊत ,अजय बोधारे, अनिल निधान ,अड आशिष वंजारी ,दिलीप बाळबुदे ,जिल्हा परिषद सदस्य मोहन माकडे, राजन सिग , कामठी तालुका भाजप अध्यक्ष उमेश रडके, कामठी शहर अध्यक्ष चंद्रशेखर तुपट, रमेश चिकटे ,योगेश डाफ , किरण राऊत,सचिन डांगे ,संजय कनोजिया ,लक्ष्मण करारे ,तारा कडू, नेहा राऊत, राजकिरण बर्वे, लतेश्वरी काळे, ब्रह्मानंद काळे ,सुनील पारवाणी ,पंकज साबळे ,मंगला कारेर्मोरे, मनीष कारेर्मोरे, विजय कोंडुलवार, उपस्थित होते कार्यक्रमात प्रमुख नेत्यांनी मार्गदर्शन करून राजू पारवे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले कार्यक्रमात मार्गदर्शन करताना महायुतीचे उमेदवार राजू पारवे म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला रामटेक लोकसभेची उमेदवारी दिली आहे मी त्यांच्या विश्वासाला तळां जाऊ देनार नाही रामटेक लोकसभा क्षेत्रातील ग्रामीण भागाच्या विविध समस्येसाठी सदैव प्रयत्न करणार असल्याचे सांगितले , आपण सर्वांनी आशीर्वाद देऊन प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल निधान यांनी केले संचालन सचिन घोडमारे यांनी केले व आभार प्रदर्शन लतेश्वरी काळे यांनी मांनले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते

29/03/2024

रामटेक लोकसभा मतदारसंघातून उमेदवार रश्मी बर्वे यांचा जातपताळणी प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे रश्मी बर्वे काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार होत्या तर आता रामटेक लोकसभा मतदार संघातून काँग्रेस महायुतीचे उमेदवार रश्मी बर्वे चे पती श्याम बर्वे असल्याची माहिती पुढे येत आहे.

28/03/2024

नागपूर चौदा मेल येथील वेअर हाऊस मध्ये भीषण आग

येथून जवळच असलेल्या चौदा मैल येथील एका वेअर हाऊस मध्ये आज 12 च्या सुमारास आज लागल्याचे निदर्षणात आले असता आज विझविण्याचे प्रयत्न सुरू आहे आगीत लाखोंचा माल जळून खाक झाल्याची माहिती कामगारांकडून मिळत आहे.

JCB, पोकलेंड, रोड रोलर,या सर्व मशीनचे स्पेअर् पार्ट , वेयर हाउस मध्ये असल्याची माहिती पुढे येत आहे तर oil, रबर बेल्ट देखील असल्याची माहिती आहे

कळमेश्वर वाडी नागपूरच्या दमकल विभागातील गाड्या घटनेचे दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले

आग कशामुळे लागली अद्याप कारण गुलदस्ता मध्ये आहे

27/03/2024

रामटेक लोकसभा क्षेत्राचे महायुती चे उमेदवार राजु पारवे शिवसेना

 #क्या  #बोलती  #पब्लिक ?  #रामटेक  #लोकसभा
27/03/2024

#क्या #बोलती #पब्लिक ?

#रामटेक #लोकसभा

24/03/2024

रंगपंचमीचा रंग बाजारात फुलला,होळीची बाजारपेठ मध्ये जय्यत तयारी

23/03/2024

कामठी पवनगाव येथील प्रस्तावित कत्तलखाना जागा मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना गावकऱ्यांच्या विरोधामुळे दुसऱ्यांदा परत पावलाने जावे लागले काही काळाकरिता झाली होती तणावाची स्थिती.

22/03/2024

महिला बालकल्याण विभागातर्फे अंगणवाडी सेविकांना पोषक अभियान राबविण्याकरिता नवीन स्मार्ट मोबाईल फोन वाटप करण्यात आले ,कामठी महिला बाल विकास कल्याण विभागातर्फे पंचायत समिती अंतर्गत 133 अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन देण्यात आले ,
पोषण अभियान राविनाकरिता उपयोगी ठरणारा स्मार्टफोन नक्कीच अंगणवाडी सेविकांना काम करण्याकरिता फायदेशीच्या असला तरी अंगणवाडी सेविकांचा अनेक प्रश्न अध्याप शासनाकडे अडकल्या असल्याची प्रतिक्रिया अंगणवाडी सेविका यांनी यावेळी दिली ।

21/03/2024

#कामठी #
डिजल चोर पोलिसांच्या ताब्यात
मागील काही दिवसापासून नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत डिझेल चोरी आणि शेती साहित्य तसेस बकऱ्या ,गाई ,म्हशी जनावरे चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे ,या संदर्भात अनेक तक्रार देखील पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे याच अनुषंगाने पोलिसांनी रात्रगस्त देखील वाळविली .आहे ,आज पहाटे पोलीस पेट्रोलिंग करत असतात नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील नागपूर जबलपूर मार्गावरील लिहगाव परिसरात हॉटेल, ढाबा ,पार्किंग झोन मध्ये उभ्या असलेल्या दहा चक्का ट्रक मधुन काही इसम डीजल चोरताना दिसून आले पोलिसांनी त्यांना हटकले असता पोलिसाला बघताच चोराने घटनास्थळावरून पर काढला पोलिसांनी आरोपीचा पाटलाग करून सिनेस्टाईलने एका आरोपीला ताब्यात घेतले तर तीन आरोपी फरार आहे, पोलिसांनी आरोपी जळून 295 लिटर डिझल आणि एक स्विफ्ट डिझायर कार असा एकूण 5 लक्ष 44 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ,तर आरोपी विरोधात कायदेशीर गुन्हा दाखल केला आहे,
प्रणय रामचंद्र मेश्राम राहणार ताजबाग नागपूर असे अटक आरोपीचे नाव असून फरार तीन आरोपीच्या शोध पोलीस घेत आहे, सदर कारवाई परिमंडल क्रमांक पाच चे उप आयुक्त अनिकेत कदम ,सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल शिरसागर ,नवीन कामठी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमुख पोरे, यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सुनील कोडापे ,पोलीस हवालदार विशाल मेश्राम, पोलीस शिपाई ,राहुल वाघमारे, विशाल पौनीकर ,लवकुश बानोसे ,द्रोणा सव्वालाखे, यांनी यशस्वीरित्या पार पाडली ।

20/03/2024

फाल्गुन शुल्क एकादशीच्या पावन पर्वावर कामठी गवळीपुरा श्रीकृष्ण मंदिर परिसरातून श्री खाटू श्याम बाबा यांची पैदल गुणगान निशान यात्रेचे आयोजन करण्यात आले, ही निशान यात्रा शहरातील मुख्य मार्गाने भ्रमण करत श्री सीता माता मंदिर श्री श्याम धाम मंदिरात समापन करण्यात आली या निशान यात्रेचे जागोजागी स्वागत करण्यात आले तर जागोजागी प्रसाद चे देखील वितरण करण्यात आले ।

18/03/2024

आगामी लोकसभा निवडणुकी करिता कामठी तालुक्यात निवडणूक यंत्रणा सज्ज

18/03/2024

नागपूर अवकाळी पाऊस

17/03/2024

कामठी - अवकाळी पावसामुळे जनजीवन अस्तव्यस्त.
पाल्याभाज्यासह गहू, चना पिंका ला फटका .
शहरी भागासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस सह गारा.

16/03/2024

श्याम बाबा पैदल निशाणा गुणगान यात्रेने कामठी शहर दुमदुमले ठिकठिकाणी स्वागत व प्रसादाचे वितरण.

कामठी श्याम बाबा महिला मंडळ कामठी च्या वतीने राम मंदिर मोदी पडाव येथून काढण्यात आलेल्या श्याम बाबा पैदल निशाणा गुणगान यात्रेने कामठी शहर दुमदुमले असून ठीक ठिकाणी नागरिकांनी प्रसाद स्वागत करून प्रसादाचे वितरण केले,
राम मंदिर येथून सजविल्या रंथावर भगवान खाटू श्याम बाबा याची पूजा अर्चना करून ढोल तासे ,डीजे ,फटाक्याच्या आतिषबाजीत शोभायात्रा काढण्यात आली शोभायात्रा मच्छीपूर , दालओळी ,चावडी चौक, जुनी ओढ ,सत्यनारायण चौक ,पोरवाल चौक ,शुक्रवारी बाजार, जयस्तंभ चौक, गवळीपुरा लकडगंज ,जय भीम चौक ,कळमना रोड ,पारर्शी पुरा, मरारटोली येरखेडा, रनाळा नगर मार्गे भ्रमण करीत नंदनवन येथील श्याम बाबा मंदिरात शोभायात्रेचे समापन करण्यात आले. शोभायात्रेचे ठिकठिकाणी नागरिकांनी स्वागत करून प्रसादाचे वितरण केले।

15/03/2024

नागपूर कामठी मार्गावरील ऑरेंज सिटी अलायन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये गॅस कटर मशीन ने वेल्डिंग करत
असता ब्लास्ट झाल्यामुळे एका कामगार मजुर गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळीच घडली होती, त्याला उपचाराकरिता खाजगी रुग्णाला भरती केली असता उपचारांती तरुणाचा मृत्यू झाला आहे सत्येन्द्र कुमार बुधु गोड वय 21 वर्ष राहणार उत्तर प्रदेश असे मृतक तरुणाचे नाव असून कंपनीमध्ये काही दिवसा पासून कंपनीत काम करत होता ।
नवीन कामठी पोलिसाला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून झालेल्या घटनेचे पंचनामा करून पुढील तपास करत आहे त झालेल्या घंटेची अधिक माहिती नवीन कामठी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांनी दिली ।

14/03/2024

आत्महत्येचा तिळा सुटला, बापाने केली मुला आणि पत्नीची हत्या

नागपूर जिल्ह्यातील अरोली पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या शांतीनगर निमखेडा येथे एकाच घरातील तीन लोकांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला होता
माहितीनुसार, शांतीनगर निमखेडा येथील रहिवासी श्रीनिवास व्यंकटराव इडुपुगुंटी वय 58 वर्ष,पद्मलता श्रीनिवास इडुपुगुंटी वय 50 वर्ष आणि मुलगा चंद्रशेखर श्रीनिवास इडुपुगुंटी वय 28 वर्ष. यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असता
या घटनेतील पोलिसांनी अधिक तपास केला असता यातील मृतक वडिलाने अगोदर आपल्या पत्नी आणि मुलाला गळा दाबून तहत्या केली नंतर स्वतः लाकडी कपाट च्या हँडलला गळफास लावून आत्महत्या केली ,
अरोली पोलिसांनी या घटनेत 302 चा गुन्हा दाखल केला असून तिघही मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरली तपासणी करिता रुग्णालयात पाठवले आहे, सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार कर्ज बजारामुळे ही टोकाची भूमिका घेतल्या असल्याची माहिती पुढे येत आहे ,पुढील पुढील तपास अरोली पोलीस करत आहे

11/03/2024

कामठी:- पावणगाव मागील १० दीवसा पासन पवनगाव येथील प्रस्तावित कत्तलखान्या विरोधात गावकऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली होती.अखेर आज प्रस्थावीत जागेसाठी मोजनी असतांना गावकऱ्यांनी विरोध पुकारल्यावर मोजनी विभागाला आल्यापावली परतावे लागले.

11/03/2024

नागरिक मूलभूत सुविधा करिता नगरपरिषद प्रशासन विरोधात एल्गार मोर्चा

कामठी नगर परिषद मध्ये मागील 15 महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून प्रशासन नियुक्त करण्यात आले आह,
कामठी शहरातील नागरिकांना नागरिक सुविधा उपलब्ध करून देण्याची जवाबदारी कामठी नगर परिषद चे मुख्य अधिकारी संदीप बोरकर यांची असून प्रशासक म्हणून नगर परिषद कामठी येथे कार्यरत आहे ,

कामठी शहराला लगत असलेला न्यू कामठी परिसरातील नागरिकांना अनेक दिवसापासून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे या परिसरात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली असून नाली सफाई असो की परिसराची स्वच्छता अशा मूलभूत सुविधाचा अभावामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहे , या परिसरात अनेक दिवसांपासून शासकीय रुग्णालयाची मागणी करण्यात आली आहे मात्र शासकीय रुग्णालयाला परवानगी न देता बियर बार उघडण्याची परवानगी देण्यात आली नागरिकांच्या मते आम्हाला बियरबार नको शासकीय रुग्णालय हवा ।
सोबतच या परिसराला जोडणारा रमानगर रेल्वे पूल आणि अजनी रेल्वे पुलाचे प्रगती कार्य अनेक दिवसापासून सुरू असल्यामुळे नागरिकांना या मार्गांनी येणे जाणे कठीण झाले आहे तर जळ वाहनाला या भागात प्रतिबंध असल्यामुळे नगरपालिकांची अग्निशामक गाडी, शव यात्रा करिता स्वर्ग रथ, तसेच पाण्याच्या टँकर ॲम्बुलन्स सारख्या गाड्या या परिसरात येऊ शकत नाही , न्यू कामठी परिसरात अनेक शैक्षणिक संस्था धार्मिक स्थान आणि विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस देखील आहे तरी देखील हा परिसर उपेक्षित आहे ,
परिसरातील नागरिकांनी अनेक निवेदन देऊन सुधा होणाऱ्या समस्या कडे दुर्लक्ष होत असल्यामुळे माजी नगरसेवक प्रतीक पडोळे यांच्या नेतृत्वात नगरपरिषद प्रशासन विरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला नगरपरिषद विरोधात नारेबाजी करत तहसीलदार यांना समस्यांचे निवेदन देण्यात आले ,

या मोर्चामध्ये न्यू कामठी परिसरातील अनेक महिला पुरुष सहभागी झाले होते ।

Address

Nagpur
Kamptee

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्र २४ मराठी न्युज पोर्टल posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to महाराष्ट्र २४ मराठी न्युज पोर्टल:

Videos

Share

Nearby media companies


Other Social Media Agencies in Kamptee

Show All