Welcome to the Official page of Tribal News.
ट्रायबल न्यूज टुडे च्या ऑफिशिअल page वर सर्व समाजबांधवांचे स्वागत आहे.!
आदिवासींच्या न्याय, हक्कांसाठी.. आदिवासी वेब न्यूज चॅनेल..
गेली ४ वर्षे सातत्याने DS Media Publishing LLP या आदिवासी न्यूज मेडिया पब्लिशिंग कंपनीच्या माध्यमातून आदिवासी संस्कृती, इतिहास, परंपरा, कला, साहित्य यांचा विविध माध्यमातून प्रचार आणि प्रसाराचे काम आम्ही
करीत आहोत. यातूनच पुढे जात आदिवासी समाजाच्या न्याय हक्कांसाठी, आदिवासी समाजाची जगात सगळ्यांपेक्षा वेगळी अशी जी व्याख्या आहे, महान अशी आदिवासी संस्कृती आहे, परंपरा आहेत, मूळ इतिहास आहे, आदिवासी कला, साहित्य आहे, आदिवासींचे हक्क, अधिकार आहेत, सांविधानिक कायदे आहेत ते जनसामान्यांपर्यंत पोहोचावेत तसेच शिक्षण, आरोग्य, मूलभूत सुविधा यांच्या सह दैनंदिन जीवनात खूप सारे प्रश्न आहेत जे सर्वसामान्य माणसांबरोबरच प्रशासनाच्याही निदर्शनास आणण्यासाठी, समाजाची जी एक खरी बाजू आहे ते वास्तव जगासमोर मांडण्याच्या हेतूने ट्रायबल न्यूज टुडे या आदिवासी न्यूज चॅनेल ची निर्मिती केली आहे. Please Like, Subscribe & Support Our Adivasi News Channel.. आपण आम्हाला आपल्या गावातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील कोणत्याही स्वरूपातील बातमी स्वतः माहिती देऊन अथवा त्या बातमी संदर्भातील फोटो, ऑडिओ / व्हिडीओ 9076250790 या Whatsapp नंबर वर पाठवू शकता. तसेच आपल्या सूचना, अभिप्राय हि आम्हाला या नंबर वर पाठवू शकता.
जोहार.. जय आदिवासी.. !