मालेगाव शहरात कोरोना हटावसाठी यशस्वी उपचार पद्धती राबविणारे तज्ञ डॉक्टरांचे पथक जळगावात आलेले आहे. जळगावातील झोपडपट्टी आणि विकसनशील भागातील नागरिकांची तपासणी करून ते मार्गदर्शन करणार आहे.
उद्या दि.२१ रोजी राबविण्यात येणाऱ्या कॅम्पबद्दल पत्रकार परिषदेत माहिती देताना माजी उपमहापौर करीम सालार.
जिल्हावासियांच्या सेवेत लवकरच जी.एम.हेल्थकेअर अत्याधुनिक लॅब!
माजी मंत्री आ.गिरीष महाजन यांनी केली पाहणी : अल्प दरात होणार सर्व तपासण्या
जळगाव, दि.२१ - जिल्ह्यातील नागरिकांना सर्व प्रकारच्या पॅथलॉजिकल, रेडिओ लॉजीकल तपासण्या अल्पदरात करून मिळाव्या यासाठी जी.एम.फाऊंडेशन, ओम साई ग्रामीण फाऊंडेशन आणि जळगाव मनपाच्या सौजन्याने अत्याधुनिक लॅब उभारण्यात आली असून १ जून पासून लॅबचे लोकार्पण करण्यात येईल अशी माहिती माजी पालकमंत्री आ.गिरीष महाजन यांनी दिली आहे.
शहरातील मनपाच्या नानीबाई हॉस्पिटलमध्ये साकारण्यात येत असलेल्या जी.एम.हेल्थकेअर लॅबची माजी मंत्री आ.गिरीष महाजन यांनी मंगळवारी पाहणी केली. जळगाव जिल्हावासियांच्या सेवार्थ जळगावात अत्याधुनिक लॅब तयार करण्यासाठी माजी मंत्री आ.गिरीष महाजन, आ.राजुमामा भोळे, आ.चंदूभाई पटेल, नगरसेवक भगत बालाणी, कैलास सोनवणे पाठपुरावा करीत होते. लॅबचे काम प्रगतीपथावर आले असून अंतिम टप्प्यात असल्याने आ.महाजन यांनी पाहणी करून आढावा घेतला. यावेळी महापौर सौ.भारती सोनवणे, आ.चंदूभाई पटेल, आ.राजुमामा भोळे, स्थायी समिती सभापती ऍड.शुचिता हाडा, नगरसेवक कैलास सोनवणे, अमित काळे, मुकुंदा सोनवणे, अतुलसिंग हाडा, मनोज काळे, आरोग्यदूत रामेश्वर नाईक, अरविंद देशमुख, पितांबर भावसार, होनाजी चव्हाण आदी उपस्थित होते.
*अत्याधुनिक सुविधा, अल्पदरात तपासण्या*
जी.एम.हेल्थकेअर लॅबसाठी जळगाव मनपाने जागा उपलब्ध करून दिली असून ओमसाई ग्रामीण फाऊंडेशन, औरंगाबादच्या सौजन्याने लॅब साकारण्यात येत आहे. लॅबचे सर्व नियोजन जी.एम.फाऊंडेशनमार्फत केले जाणार आहे. अत्याधुनिक लॅबमध्ये सर्व प्रकारच्या पॅथलॉजिकल, रेडिओलॉजिकल तपासण्या, रक्त तपासणी, हिस्टो पॅथलॉजिकल, बायो केमिस्ट्री तपासणी, सीटी स्कॅन, एक्स रे, टू डी इको हे केंद्र शासनाने ठरविलेल्या दरात CGHS नुसार केल्या जाणार आहे. जळगाव जिल्ह्यातील लाखो नागरिकांना या लॅबचा उपयोग होणार असल्याची माहिती माजी मंत्री आ.गिरीष महाजन यांनी दिली.
*कोरोनाचा स्वॅब घेतला जाणार*
कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून या लॅबमध्ये कोरोना संशयीत रुग्णांचे स्वॅब घेतले जाणार आहेत. सर्व स्वॅब पुणे येथील अत्याधुनिक प्रयोगशाळेत पाठविले जाणार असून लवकरात लवकर अहवाल दिला जाणार आहे. कोरोना स्वॅबसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे.
*वर्षभरापासून प
LIVE....
दारूची दुकाने उघडतास लोकांची गर्दी
जळगाव प्रतिनिधी - जिल्हा उद्योग केंद्राच्या भोंगळ कारभार याची माहिती देत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिषेक पाटील आणि आर.बी.पाटील यांची पत्रकार परिषद....
जळगांव तेहसीलदार कार्यालयात आग
जळगाव :- शहरात मध्यवर्ती बळीराम पेठेतील तहसील कार्यालयास रात्री आग लागल्याची घटना घडली. कार्यालयातील मागील बाजुस निवडणूक आणि पुरवठा विभागाच्या रेकॉर्डरुमला लागलेल्या आगीत महत्वाचे दस्तऐवज जळून खाक झाले असून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी, शॉटसर्कीट मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज यांनी व्यक्त केला आहे.
भागातील हेरिटेज दर्जा प्राप्त तहसील कार्यालयाच्या इमारतीत मागील बाजुस निवडणुक आणि पुरवठा शाखेत रात्री 11 वाजेपुर्वी भिषण आग लागली. आगीचे लोट आकाशात उठू लागल्यावर जिल्हापरीषद कार्यालयातील वॉचमनद्वारे पोलिस आणि जिल्हाधिकारी कार्यालयात कळवण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरविरसींग रावळ यांनी कळवल्यानंतर तहसीलदार वैशाली हिंगे, प्रांताधिकारी दिपमाला चौरे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
महापालिकेच्या अग्निशामक दलास पाचारण केले होते. दोन अग्नि बंबाच्या साहाय्याने पाऊण तासात आगिवर नियंत्रण मिळवण्यास यश मिळाले.
विद्युत तारांचे जाळे
तहसील कार्यालयाच्या दगडी बांधकामातील इमारतीत सर्वदुर डोक्यावर विद्युत तारांचे जाळे पसरलेले असून आग लागली त्या खोल्यांच्या बाहेरही तशीच परिस्थीती असून या तारांमध्ये शॉटसर्किटने आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आह्
तहसील कार्यालातील तारांच्या भेंडोळ्यासाठी वारंवार एमएसईबीला कळवण्यात आल्याचेही येथील कर्मचाऱ्यांनी माहिती देतांना सांगीतले.
: - आंतकवाद्यांना मदत करणारा पोलीस उपअधीक्षक देवेंद्रसिंग च्या प्रतिमेचे दहन ला पोलिसांचा विरोध
: - उपोषणार्थी मधे संतापाची लाट*
: - आंतक वाद्यांना मदत करणारा पोलीस उपअधीक्षक देवेंद्रसिंग चा निषेध
जम्मू-काश्मीरमध्ये पोलिस उपअधिक्षक म्हणून कार्यरत असलेला देवेंद्र सिंग यांचे आतंकवाद या सोबत असलेले संबंध व अंतक वाद्यांना करीत असलेल्या मदती बाबत उपोषणस्थळी फारुक शेख यांनी त्याची माहिती वाचून दाखवली असता त्याचा त्रीव धिक्कार करण्यात आला व त्याच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून त्याच्या प्रतिमेचे दहन करण्यात येणार होते परंतु जिल्हापेठ पोलिसांनी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करू न दिल्याने तो कार्यक्रम स्थगित करण्यात आला परंतु आमच्या लोकशाही मार्गाने अतिरेकयाचे निषेध सुद्धा करता येत नसल्या बद्दल फारूक शेख व त्यांच्या सहकार्यनि खंत व्यक्त कली