आम्ही चंदूभाऊचे कट्टर समर्थक

  • Home
  • आम्ही चंदूभाऊचे कट्टर समर्थक

आम्ही चंदूभाऊचे कट्टर समर्थक Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from आम्ही चंदूभाऊचे कट्टर समर्थक, Muktainagar, .

10/10/2024

*नाशिक बडनेरा मेमो'ला बोदवड रेल्वे स्थानकावर मिळाला थांबा !*

*👉🏼 9 ऑगस्ट 2023 व 30 सप्टेंबर 2024 रोजी दोनवेळा झालेल्या आंदोलनाच्या माध्यमातून मिळाला "अमरावती पुणे एक्स्प्रेस" व "नाशिक बडनेरा मेमो" ला थांबा !*

*आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल यांचेसहित राष्ट्रीय विकलांग पार्टी , भिम आर्मी भारत एकता मिशन , व्यापारी संघटना , कृषी संघटना , प्रवासी संघटना , छावा संघटना तसेच पत्रकार संघटना , रिक्षा चालक मालक युनियन चे आंदोलन यशस्वी !*

*साप्ताहिक शिवसंग्राम जिल्हा प्रतिनिधी*

*सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करुन वाचा*

https://www.facebook.com/share/v/KSsCZoHssPyq9aqw/?mibextid=oFDknk

*बोदवड रेल्वे स्थानकावर "नाशिक बडनेरा मेमो" ला थांबा.**👉🏼 आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल यांचा दणका ; विविध संघटनांच्या रेल रो...
03/10/2024

*बोदवड रेल्वे स्थानकावर "नाशिक बडनेरा मेमो" ला थांबा.*
*👉🏼 आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल यांचा दणका ; विविध संघटनांच्या रेल रोको आंदोलनाला यश..*
*▫️ रेल रोको आंदोलनाच्या माध्यमातून सुरुवातीला "अमरावती पुणे एक्स्प्रेस" तर आता "नाशिक बडनेरा मेमो" ला मिळाला थांबा !*
*● उर्वरित गाड्यांसंदर्भात आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल यांचा पाठपुरावा सुरु..*
बोदवड:- दि/03
बोदवड रेल्वे स्थानकावर दिनांक 30 सप्टेंबर रोजी कोरोना काळात बंद पडलेल्या गाड्या पुर्ववत करण्यासाठी तसेच नविन विविध गाड्यांना थांबा मिळण्यासाठी राष्ट्रीय विकलांग पार्टी , भिम आर्मी भारत एकता मिशन , व्यापारी संघटना , कृषी संघटना , प्रवासी संघटना तसेच पत्रकार संघटना यांच्या वतीने आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल यांच्या उपस्थितीत "रेल रोको आंदोलन" पार पडले होते. यापुर्वी ; 9 ऑगस्ट 2023 रोजी रेल रोको आंदोलन पार पडले होते. त्यावेळेस, रेल्वे प्रशासनाने आश्वासन देउनही शब्दपुर्ती न करता केवळ अमरावती पुणे एक्स्प्रेस या एका रेल्वे गाडीला थांबा दिला होता. कोरोना मध्ये बंद केलेल्या गाड्या पुर्ववत न केल्याने राष्ट्रीय विकलांग पार्टी , भिम आर्मी भारत एकता मिशन , व्यापारी संघटना , कृषी संघटना , प्रवासी संघटना तसेच पत्रकार संघटना यांच्या वतीने दिनांक 30 सप्टेंबर रोजी बोदवड रेल्वे स्थानकावर "रेल रोको आंदोलन" पार पडले. यावेळी , आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल दुसर्यांदा दाखल होत त्यांनी आक्रमक भुमिका मांडली. आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल "रेल रोको आंदोलनावर" ठाम असल्याने रेल्वे प्रशासनाने झुकती भुमिका घेत , डीआरएम यांच्या अधिकारक्षेत्राखालील असलेल्या "नाशिक बडनेरा मेमो" या रेल्वे गाडीला तात्काळ थांबा देण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले होते. दिलेला शब्द रेल्वे प्रशासनाकडून पाडण्यात आला असून "नाशिक बडनेरा मेमो" थांबा मंजूर झाला आहे. बोदवड रेल्वे स्थानकावर दिनांक 4 रोजी नाशिक बडनेरा जाणारी गाडी रात्री साधारणत: 1:07AM तर बडनेरा ते नाशिक जाणारी रेल्वे गाडी दुपारी साधारणत: 1:41 PM वाजता थांबेल. उर्वरित गाड्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाने त्याबाबतचे प्रस्ताव वरीष्ठ यंत्रणेकडे पाठविले आहे. याबाबत आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल हे प्रयत्नशील असून मुख्यमंत्री सन्मा. एकनाथराव जी शिंदे साहेब यांच्याकडे ते सातत्याने विषय लावून धरत आहे. रेल्वे गाड्यांना थांबा मिळण्यासाठी आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल यांचे चौफेर प्रयत्न सुरु आहेत. रेल्वे प्रशासनाने शब्द न पाळल्यास ते गनिमी कावा पद्धतीने रेल्वे रुळावर "रेल रोको आंदोलन" करणार असल्याचा इशारा त्यांनी यापुर्वी दिलेला आहे. बोदवड रेल्वे स्थानकावर कोरोना काळात बंद पडलेल्या गाड्या पुर्ववत करण्यासाठी तसेच इतर नविन गाड्या सुरु करण्यासाठी आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल यांचा मुख्यमंत्री सन्मा. एकनाथ राव जी शिंदे साहेब यांच्याकडे पाठपुरावा सुरु आहे.

30/09/2024

#बोदवड_रेल_रोको_आंदोलन
बोदवड रेल्वे स्थानकावर विविध रेल्वे गाड्यांना थांबा मिळण्यासाठी विविध सामाजिक संघटनांनी पुकारलेल्या रेल रोको आंदोलनादरम्यान आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल यांनी आक्रमक भुमिका मांडली. यावेळी , दोन ते तिन दिवसांत नाशिक मेमो ला थांबा देण्यात येईल असे उपस्थित अधिकार्यांनी आश्वस्त केले. त्यानंतर , विविध मागण्या असलेल्या गाड्यांचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी , दोन ते तिन दिवसांत या आश्वासनांची अंमलबजावणी न झाल्यास दिनांक 5 रोजी आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल हे गनिमी कावा पद्धतीने आंदोलन करणार असल्याचे त्यांनी यावेळी उपस्थित अधिकार्यांना ठणकावून सांगितले.

30/09/2024

#बोदवड_रेल्वे_स्टेशन #रेल_रोको_आंदोलन
बोदवड रेल्वे स्थानकावर विविध रेल्वे गाड्यांना थांबा मिळण्यासाठी विविध सामाजिक संघटनांनी पुकारलेल्या रेल रोको आंदोलनादरम्यान आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल यांनी आक्रमक भुमिका मांडली. यावेळी , दोन ते तिन दिवसांत नाशिक मेमो ला थांबा देण्यात येईल असे उपस्थित अधिकार्यांनी आश्वस्त केले. त्यानंतर , विविध मागण्या असलेल्या गाड्यांचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी , दोन ते तिन दिवसांत या आश्वासनांची अंमलबजावणी न झाल्यास दिनांक 5 रोजी आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल हे गनिमी कावा पद्धतीने आंदोलन करणार असल्याचे त्यांनी यावेळी उपस्थित अधिकार्यांना ठणकावून सांगितले.

15/09/2024

#चंदुभाऊ ❤️

14/09/2024

कार्यसम्राट , कार्यतत्पर, विकासाभिमुख दुरदृष्टी असलेले संघर्षयोद्धा लोकनेते आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा 💐
〰️〰️〰️〰️〰️
शुभेच्छुक:-
श्री. निखिलदादा गोळे
प्रदेशाध्यक्ष
राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्र राज्य

 #सदैव_भाऊंसोबत ❤️लाख चाहनेवालो का मेला है... कोण कहता है "चंदुभाऊ" अकेला है 🚩 उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा आमदार साहे...
13/09/2024

#सदैव_भाऊंसोबत ❤️
लाख चाहनेवालो का मेला है... कोण कहता है "चंदुभाऊ" अकेला है 🚩
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा आमदार साहेब 🙏🏼

*नाडगांव येथील प्राचिन भैरवनाथ मंदिराला तिर्थक्षेत्र 'क' दर्जा ; आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल यांच्या प्रयत्नांना यश !*बोदवड...
11/09/2024

*नाडगांव येथील प्राचिन भैरवनाथ मंदिराला तिर्थक्षेत्र 'क' दर्जा ; आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल यांच्या प्रयत्नांना यश !*
बोदवड :- दि/11
आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल यांच्या प्रयत्नांनी नाडगांव येथील प्राचिन श्री. भैरवनाथ महाराज धार्मिक स्थळास तिर्थक्षेत्र 'क' दर्जा वर्ग म्हणून मान्यता मिळाली आहे. नाडगांव येथील श्री. भैरवनाथ महाराज धार्मिक स्थळाचा ईतिहास पुरातन असून , समोर पायविहीर ( बारव ) आहे. खान्देशचा परिसर पुण्यश्लोक अहिल्याआई होळकर यांच्या अधिपत्याखाली असतांना त्यांनी अनेक शिवमंदिरांचा जिर्णोद्धार व पायविहीरींचे निर्माण केल्याची ईतिहासात नोंद आहे. या प्राचिन ईतिहासाचा नाडगांव येथील भैरवनाथ बाबा मंदिराशी संबंध येत असल्याने तालुक्यासहित, जिल्हाभरात या स्थळाला विशेष महत्त्व आहे.तिर्थक्षेत्र क दर्जा असलेल्या धार्मिक स्थळांस पंधरा लक्ष पर्यंत निधी जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येतो. निधीअभावी मंदिर परिसरातील प्राचिन पायविहीरीचे संवर्धन होऊ शकलेले नाही. तिर्थक्षेत्र 'क' दर्जा वर्ग मान्यता मिळाल्याने येत्या काळात प्रलंबित असणारी कामे मार्गी लागण्यास मदत होणार आहे. आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल हे गेल्या 8 ते 9 वर्षापासून पोळ्याच्या दुसर्या दिवशी भरणार्या यात्रेला हजेरी लावत असतात. श्री. भैरवनाथ महाराज जयंतीला पन ते न चुकता हजेरी लावतात.या धार्मिक स्थळावर त्यांची श्रद्धा असल्याने ट्रस्टच्या वतीने मागणी होताच महिनाभरात त्यांनी विशेष प्रयत्नांनी प्राचिन श्री. भैरवनाथ धार्मिक स्थळास तिर्थक्षेत्र 'क' दर्जा वर्ग म्हणून मान्यता मिळाली आहे. यानिमित्त श्री भैरवनाथ महाराज मंदिर ट्रस्ट व भाविकांकडून आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल यांचे आभार मानण्यात येत आहे.

09/09/2024

#खडसेंचा_मुक्ताईनगर_येथील_शिवस्मारकाला_विरोध !
एकनाथ खडसे यांचा मुक्ताईनगर येथील एकूण 50 फुट उंचीच्या शिवस्मारकाला विरोध , वृत्तीचा जाहिर निषेध !
गेल्या 30 वर्षात सत्ता भोगूनही खडसे मुक्ताईनगर व बोदवड येथे शिवस्मारक ऊभे करु शकले नाही. आता त्यांच्याच डोळ्यात हे अश्वारूढ स्मारक खुपत आहे. तुम्ही कितीही विरोध करा ... ढाण्या वाघ आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल हे शिवस्मारक ऊभारल्याशिवाय शांत बसणार नाही. आज प्रत्यक्ष दिनांक 09 सप्टेंबर 2024 रोजी शिवस्मारकाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.
चंदुभाऊ तुम आगे बढो ... हम तुम्हारे साथ है ✌️
दिसतोय फरक ; चंदुभाऊ परत ✌️

Address

Muktainagar
Jalgaon

Alerts

Be the first to know and let us send you an email when आम्ही चंदूभाऊचे कट्टर समर्थक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share