Bharat 24 update

Bharat 24 update प्रत्येक बातमी आपल्या पर्यंत

17/11/2023
12/09/2023

दिवस भरातील ठळक घडामोडी
#मराठी #मराठा #ट्रेंड

09/09/2023

कोल्हापूर हुपरी येथे अनोखे आंदोलन
#मराठी #मराठा #मराठआरक्षण #अर्धनग्न

06/09/2023

गोकुळ अष्टमी निमित्ताने ह.भ.प. श्री रेवणनाथ भोसले (महाराज) यांचे सुश्राव्य सार्थ ज्ञानेश्वरी प्रवचन
कीर्तन,प्रवचन,भारुड व इतर कार्यक्रम साठी संपर्क ह.भ.प. श्री रेवणनाथ भोसले (महाराज) शीरशी अंबेवाडी मो.9529964556

#गोकुळाष्टमी #कृष्ण #कृष्णभजन
#कृष्णजीकेसुंदरभजन #कृष्णरहस्य #कृष्ण #कृष्ण_जन्माष्टमी #कृष्णा_जी_नॉनस्टॉप_भजन #मराठी #शिराळा #महाराज #प्रवचन #कीर्तन

04/09/2023

सागरेशवर येथील समुद्रेश्वर मंदिराची सविस्तर माहिती
#मराठी #शिराळा #महादेव #महाकाल #महाकालेश्वर #महाकाल_LoVeR #ट्रेंड

02/09/2023

समर्थ स्थापित 32 शिराळा येथील वीर मारुती मंदिर संपूर्ण माहिती

#मराठी #मारुती #जयहनुमानजी #जयहनुमान #शिराळा #जयश्रीराम #11मारुती

27/08/2023

सांगली जिल्ह्यातील दक्षिण मुखी नवसाला पावणारा स्वयंभू मारुती
#मराठी #मारुती #जयहनुमान #जयहनुमानजी

20/08/2023

बांधकाम विभागाचा 200 कोटी चा भ्रष्टाचार पुराव्यानिशी मांडणार,महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर घडवणार इतिहास

महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर तर्फे शहरअध्यक्ष राजू दिंडोर्ले व जिल्हा सचिव प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्रातील आजवरचे सर्वात मोठे आंदोलन ,२०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा पुराव्यानिशी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर करणार महाआंदोलन
सदर बैठक शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले व जिल्हा सचिव प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली.
सदर आंदोलनाचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे केवळ राजकीय आरोप न करता ३० पानी निवेदनासोबत १०० भ्रष्टाचाराचे लेखी पुराव्यानिशी भ्रष्ट अधिकाऱ्यांची नावे घेऊन त्यांना बडतर्फी संदर्भी अभ्यासू व आक्रमक आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला जाणार असून ज्याद्वारे कोणताही चौकशी आयोग नेमण्याची किंबहुना चौकशीची गरज भासणार नाही दिलेल्या पुराव्यांच्या आधारे सात दिवसात हे सर्व अधिकारी बडतर्फ होतील असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव प्रसाद पाटील यांनी सांगितले.
#मराठी #मनसे #महाराष्ट्र #महाराष्ट्रनवनिर्माण #कोल्हापूर #राजकारण #राजनीति #राजनीतिक #राज #राजठाकरे

20/08/2023

" ३२ शिराळा नागपंचमीची धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा"

३२ शिराळा हे नांव "श्रीयाळ " "श्रीयालय " यावरून रूढ झाले आहे. हजारो वर्षांपासून " श्री-आलय " असे नांव होते." श्री "- म्हणजे लक्ष्मी आणि " आलय " म्हणजे घर साक्षात "लक्ष्मी " जिथे वास करते-राहते. ते ठिकाण !!! त्याचा अपभ्रंश " शिराळा !!! तसेच श्रीयाळ राजाची राजधानी म्हणून "शिराळा " !!! आणि छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या कारकीर्दीत आसपासच्या "३२" गावांचा-खेड्यांचा शेतसारा या गावांत गोळा व्हायचा, तसेच ३२ गावांची प्रमुख बाजारपेठ म्हणून शिराळ्याचे नांव " "३२शिराळा " !!!
हजारो वर्षांपासून " सद्गुरु श्री श्री गोरक्षनाथ महाराज " यांच्या व "श्रीश्री अंबाबाई " यांच्या आशीर्वादाने " ३२ शिराळ्यामध्ये श्रावणातील शुध्द पंचमीस "जिवंत नागांची " पूजा होते, म्हणून शिराळ्याची ख्याती जगभर आहे, होती आणि राहणार !!! असे हे जिवंत नागांची पूजा करणारे, " ३२ शिराळा !!! ....... अशा या "३२शिराळ्याला " .......पुन्हा नागपंचमीचे शिराळा म्हणणे- संबोधने.....म्हणजे , " गाईचे -गोमूत्र "
किंवा " पिवळे-पितांबर " म्हणण्या सारखे आहे .असे आपणास वाटत नाही का ? ........... तेव्हा "शिराळ्याची ओळख ही जशी आहे, तशीच रहावी असे आवाहन करावेसे वाटते !!! आणि म्हणूनच, ३३ शिराळ्याची नागपंचमी श्री श्री गोरक्षनाथ महाराज ,आई महालक्ष्मी अंबाबाई आणि तमाम भगिनींच्या (नागदेवतेस सर्व महिला आपला धर्माचा भाऊ मानतात म्हणून) आशीर्वादाने पुन्हा पूर्वस्वरूपात चालू होवूदे ही प्रार्थना !!! हे निवेदन देऊन मुलाखतीस सुरूवात करावी.

#नागपंचमी #32शिराळा #मराठी #मराठीभाषा #सर्प #इतिहास

19/08/2023

तासगाव भूमी अभिलेख मधील मुख्यालय सहाय्यकाच्या कानशिलात

बातमी येतेय तासगाव मधून शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) तालुका प्रमुख प्रदीप माने यांनी मुख्यालय सहाय्यक चंद्रकांत शिरढोणे यांच्या चक्क काशीलात लगावली आहे.
सरकारी कागदपत्रे बोगस व्यक्ती च्या हातात दिल्याने व या व्यक्ती कार्यालयातील मूळ नकाशे कोणी अधिकारी उपलब्ध नसताना त्यावरून दुसरा नकाशा तयार करत असल्याचे दिसून आल्याने माने यांचा राग अनावरण झाला या मुळे माने यांनी मुख्यालय सहाय्यक चंद्रकांत शिरढोणे व बाळु लोखंडे यांच्या कानशिलात लगावली असून या पुढे या कार्यालयात एक जरी बोगस व्यक्ती दिसल्यास याद राखा असा सज्जड दम प्रदीप माने यांनी दिला आहे.
#मराठी #मराठीभाषा

18/08/2023

नागपंचमी उत्सवासाठी तालुका प्रशासन सज्ज

#मराठी #नागपंचमी #32शिराळा #मराठीभाषा

15/08/2023

महसूल प्रशासना विरोधात उपोषण

महसूल कर्मचारी, अधिकारी यांच्या चुका, चुका दुरुस्ती करण्यात, आयुष्याचा झालाय भुगा..

१) गावच्या नकाशात, आकारबंध बुक, गुणाकार बुक, ऑनलाईन ७/१२ मध्ये नसतलेल्या गटाचा फेरफार करून ७/१२ वरती नोंद.

२) वारस नोंद करताना वडीलांच्या नावच्या सातबारा ऐवजी चुलत्याच्या वैयक्तीक सातबारा वरती बेकायदेशीर वारस नोंद.

३) उपविभागीय अधिकारी यांचे प्रत्येक अपिलाला वेगवेगळे नियम, प्रत्येक अपिलात वेगवेगळे निकाल (आदेश).

४) अप्पर जिल्हाधिकारी अपिलातील समाविष्ट कागदपत्रे पहाण्याच्या आधीच निकाल तयार करतात, अपिल फक्त नावापुरते असते. ५) माहिती अधिकारात अपिलार्थी यांनी केलेल्या अपिलाचे तहसिलदार

कारण बदलून, मनाचे खोटे कारण टाकून आदेश पारित करतात. ६) माहिती अधिकारात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे माहिती असताना, कार्यालयाकडे माहिती नाही. असे खोटे उत्तर देतात.

७) जिल्हाधिकारी यांच्याकडे महसूल अधिकाऱ्यांविषयी तक्रार केल्यास जिल्हाधिकारी कोणतीच कार्यवाही करत नाहीत.

१५ ऑगस्ट २०२३ रोजी तहसिल कार्यालय शिराळा
- निखिल बाळकृष्ण साळुंखे

09/08/2023
28/07/2023

सांगली जिल्ह्यात वारणा नदी काठी NDRF च्या जवानांना दोन तासांच्या प्रयत्नानंतर सोळा तास अडकलेल्या युवकास सुखरूप बाहेर काढण्यात यश

इस्लामपूर-पेठ येथे बेकायदेशीर गुटखा व तंबाखू वाहतूक करणाऱ्या वाहनावर इस्लामपूर पोलिसांची  कारवाही चाळीस लाख चौतीस हजार प...
27/07/2023

इस्लामपूर-पेठ येथे बेकायदेशीर गुटखा व तंबाखू वाहतूक करणाऱ्या वाहनावर इस्लामपूर पोलिसांची कारवाही चाळीस लाख चौतीस हजार पाचशे रु. मुद्देमाल जप्त

अधिक माहिती अशी की इस्लामपूर पोलीस ठाणे मधील गुन्हा प्रकटीकरण पथकास मिळाले ल्या माहिती नुसार दिनांक २७ जुलै २०२३...

05/07/2023

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईच्या वांद्रे येथील मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट (एम.ई.टी.) येथे आयोजित.

05/07/2023

शरद पवार यांची बैठक लाइव्ह पहा.

30/06/2023

वाटेगाव मध्ये ट्रक चालकाचा ताबा सुटून ट्रक चा अपघात

29/06/2023

शिराळा येथे आषाढी एकादशी निमित्त गोरक्षनाथ मंदिरा मध्ये दर्शनासाठी अलोट गर्दी

25/06/2023

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनास यश

दिनांक 24 जून 2023 रोजी कृष्णा नदीची उपसाबंदी मागे घ्यावी व सांगली सातारा जिल्ह्यात दुजाभाव न करता सर्वांना सारखे नियम लागू करावे या साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मा. खा राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या आंदोलनास यश दि 25 जून 2023 पासून पाणी उपसा पूर्ववत करण्याचे पत्र पाटबंधारे खात्याचे अधिकाऱ्यांनी दिले.

उमद्या उद्योजकाने कुटूंबासह संपवली जीवनयात्रा का उचलले टोकाचे पाऊल पहा सविस्तर
24/06/2023

उमद्या उद्योजकाने कुटूंबासह संपवली जीवनयात्रा का उचलले टोकाचे पाऊल पहा सविस्तर

कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज शहरातील अर्जुन समूहाचे प्रमुख संतोष शिंदे यांनी आपली पत्नी व मुला सह...

आधीच दुष्काळ च सावट त्यात बिबट्याची दशहत शिराळा तालुक्यातील रिळे गावातील घटना
21/06/2023

आधीच दुष्काळ च सावट त्यात बिबट्याची दशहत शिराळा तालुक्यातील रिळे गावातील घटना

रिळे प्रतिनिधी गेल्या अनेक दिवसापासून बिबटया चे सर्वसामान्य शेतकरी यांच्या पाळीव प्राण्यावर प्राणघातक हल्ले ह....

14/06/2023

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळावा वाटेगांव येथे बोलताना प्रतीक पाटील (चेअरमन राजारामबापू सह साखर कारखाना)

Address

Islampur
415409

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bharat 24 update posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bharat 24 update:

Videos

Share


Other Media/News Companies in Islampur

Show All